image_print

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

📝 १७ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्री सुहास रघुनाथ पंडित 📝 आज 17 ऑक्टोबर. मराठी साहित्यातील वेगवेगळ्या वाटेने जाणा-या तीन सारस्वतांचा आज स्मृतीदिन! पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरणकार. पण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज स्मृतीदिन. ते व्याकरणकार तर होतेच.पण त्याशिवाय त्यानी विपुल लेखन केले आहे. मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज या संस्थांचे ते संस्थापक सदस्य होते. मराठी बरोबरच त्याना फार्शी व संस्कृत भाषेचे ज्ञानही होते. इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली  होती. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे व्याकरणाचे पहिले पुस्तक त्यांनी 1836 मध्ये प्रकाशित केले. त्याची सुधारित दुसरी आवृत्ती 1850 ला निघाली. 1865मध्ये मराठी लघुव्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या शिवाय त्यांनी आत्मचरित्र, वैचारिक, शैक्षणिक, नकाशा संग्रह असे विपुल लेखन केले आहे. कोकणातील उफळे या गावी जन्मलेले श्री रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गेले. पुढे ते अर्थशास्त्राचे पदवीधर झाले.मराठी साहित्यात ललित गद्य लेखनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कथा, कादंबरी, प्रवासवर्णन,आत्मपरलेखन, ललित असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. सुमारे 32 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यात प्रामुख्याने ललित...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

१६ ऑक्टोबर  – संपादकीय  – श्रीमती उज्ज्वला केळकर *सोपानदेव चौधरी – (१९०७-१९८२) ‘आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगची धून’ हे गाणे ऐकले की आठवतात सोपानदेव चौधरी. अलौकिक प्रतिभेच्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे, सोपानदेव सुपुत्र. ते रवीकिरण मंडळाचे सभासद होते. यातील सारे सभासद कवी आपल्या कविता गाऊन सादर करत. सोपानदेव चौधरीही आपल्या कविता गाऊनच सादर करायचे. काव्यकेतकी, अनुपमा, छंद , लीलावती इ. त्यांचे कवितासंग्रह आहेत. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून ते गद्य लेखनाकडेही वळले. एकदा नागपूर येथे कविसंमेलनासाठी त्यांना निमंत्रण होते. त्या प्रमाणे ते गेले. त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्या. श्रोत्यांनाही त्या खूप आवडल्या. पण रिपोर्टमध्ये त्यांचे नाव नव्हते. ते उदास झाले. घरी गेल्यावर बहिणाबाईंनी त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी संगितले. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, ‘कुणी प्राणी मारत होता. ते पाहून तिथून जाणार्‍या एका माणसाने त्याचा जीव वाचवला. ‘छापून येणार नाही, म्हणून त्याने तसे केले नसते तर ?’ पुढे त्यांचे उत्स्फूर्त उद्गार आहेत, ‘अरे, छापीसनी आलं ते मानसाले समजलं छापीसनी राहिलं ते देवाला उमजलं’ किती हृद्य आहे त्यांचं हे समजावणं॰ त्या म्हणाल्या, ‘अरे, तुझी सेवा रुजू झाली...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

१५ ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे वैविध्यपूर्ण विचारांचं सोनं नेहेमीच लुटत राहणाऱ्या ई - अभिव्यक्तीच्या सर्व लेखक - लेखिका, कवी - कवयित्री आणि सर्व रसिक वाचकांना आजच्या “दसऱ्याच्या शुभदिनी“ संपादक मंडळाकडून अनेकानेक शुभेच्छा. आज “वाचन-प्रेरणा दिन“ --- जगभरातील संपूर्ण साहित्यक्षेत्राला ज्यांच्यामुळे प्रसिद्धीच्या आणि लौकिकाच्या झोतात येण्यास आणि दीर्घकाळ त्या झोतात राहण्यास उद्युक्त केले जाते, अशा तमाम रसिक वाचकांना या विशेष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मा. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन-प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्व विकास, साहित्य आणि भाषाविकास यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, हा दूरदर्शी विचार यामागे आहे. डॉ. कलाम म्हणत असत की ‘एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.’ त्यांचा रोख मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण वर्गाकडे होता.  “ जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे सकल जन “ हा अतिशय व्यापक विचार श्री. रामदास स्वामींनीही खूप वर्षांपूर्वी समाजाला दिलेला आहे. इथे   “ शहाणे “ या शब्दाचा अर्थ ‘विवेक-विचार- समृद्ध’  हाच अपेक्षित आहे, असे निश्चितपणे म्हणावे लागेल. आणि...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

१४ ऑक्टोबर  – संपादकीय  - श्री सुहास रघुनाथ पंडित आज 14 ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री.सुभाष भेंडे आणि थोर विचारवंत श्री.आ.ह.साळुंखे यांचा आज जन्मदिवस. श्री.सुभाष भेंडे यांचा जन्म 14/10/1936 ला गोव्यातील बोरी येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथे त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घ काळ सेवा केली.अर्थशास्त्रातील डॉक्टरेट संपादन केली असली तरी अंगभूत साहित्यिक गुणांमुळे त्यांच्या कडून विविध विषयांवरील सुमारे पन्नास पुस्तकांची निर्मिती झाली.अदेशी, अंधारवाटा, उध्वस्त, ऐंशी कळवळ्याची जाती, गड्या आपला गाव बरा, हास्यतरंग, दिलखुलास ही त्यातील काही पुस्तके. 2003साली कराड येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच 21 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 13/12/2010 रोजी त्यांचे निधन झाले. श्री.आण्णासाहेब हरी तथा आ.ह.साळुंखे यांचा जन्मही आजचाच. खाडेवाडी ता.तासगाव जि.सांगली येथे 1943 ला त्यांचा जन्म झाला. मराठी व संस्कृत या विषयात एम्.ए. व संस्कृत विषयात पी.एच्.डी. त्यांनी संपादन केली आहे. सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सुमारे साठ ग्रंथांचे लेखन त्यांच्या हातून झाले आहे. हे सर्व लेखन सांस्कृतिक परिवर्तनाचा...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

१३ ऑक्टोबर  – संपादकीय  गिरीजाबाई केळकर ज्या काळात स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळापासून गिरीजाबाई केळकर या लेखन करत होत्या. म्हणजे स्त्री लेखिकांच्या पहिल्या पिढीतल्या त्या लेखिका. सुरूवातीला त्यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लिहायला सुरुवात केली. हे लेखन त्यांनी निनावी केलं होतं. काकासाहेब खाडीलकर यांनी स्त्रीयांचे बंड’ असे नाटक लिहिले. त्याला उत्तर म्हणून की काय, त्यांनी ‘पुरूषांचे बंड‘ हे नाटक लिहिले. हे नाटकही त्यांनी निनावीच लिहिले होते. पुढे भारत नाटक कंपनीच्या य. ना. टीपणीस यांनी ते रंगभूमीवर आणले. त्या पहिल्या स्त्री नाटककार आहेत. त्यांनी पुढे आयेषा, मांदोदरी, राजकुवर, वरपरीक्षा, सावित्री इ. नाटके लिहिली. ज्ञानप्रकाशमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांची ’गृहिणीभूषण’ नावाची पुस्तके, दोन भागात प्रकाशित झाली. समाजचित्रे -2 भाग, संसार सोपान हे त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्यांनी ‘स्त्रीयोनुं वर्ग या गुजराती पुस्तकाचा स्त्रीयांचा वर्ग हा अनुवादही केला आहे. न. चिं. केळकर यांच्या त्या वाहिनी. पुढे त्यांचे चिरंजीव मनोहर केळकर यांनी वङ्मयशोभा नावाचे साहित्यिक मासिक काढून अनेक वर्ष चालवले. स्त्रीयांचे लेखन समाजमान्य नव्हते, त्या काळात गिरीजाबाई केळकर यांनी इतके समृद्ध साहित्य निर्माण केले आणि पुढील लेखिकांना लेखनाचा मार्ग...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

  ( १२/१०/१९२२ - ६/६/२००२ ) १२ ऑक्टोबर  – संपादकीय  आज १२ ऑक्टोबर :- कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन . श्रीमती शांता शेळके या एक अतिशय प्रतिभासंपन्न कवयित्री तर होत्याच, पण त्यांची एकूणच साहित्यिक कारकीर्द चौफेर- चतुरस्त्र अशीच होती, ज्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. त्या प्राध्यापिका होत्या, गीतकार, उत्कृष्ट लेखिका, कादंबरीकार, अनुवादिका, बालसाहित्यकार,आणि पत्रकारही होत्या. सुरुवातीच्या काळात ‘ वसंत अवसरे ‘ या टोपण नावानेही त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत. आचार्य अत्रे यांच्या “ नवयुग “ मध्ये त्यांनी ५ वर्षं उपसंपादक म्हणून काम केले होते. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या , तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९९६ साली आळंदी  येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले होते. तसेच काही पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जातात. “ आठवणीतील शांताबाई “, “ शांताबाईंची स्मृतीचिन्हे “, अशासारखी पुस्तकेही त्यांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिली गेली आहेत. त्यांची अनेक काव्ये खरोखरच अजरामर झालेली आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे ‘ निवडक ‘ हा शब्द त्याबाबतीत वापरताच येणार नाही. स्वतःला उपजतच लाभलेल्या अतिशय संपन्न...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

( ३०/०४/ १९०९ - ११/१०/ १९६८) ११ ऑक्टोबर  – संपादकीय   आज ११ ऑक्टोबर : संत तुकडोजी महाराज यांचा स्मृतीदिन. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, आणि समाजाच्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार,  या स्वतःच्या सुनिश्चित ध्येयांसाठी आयुष्य वेचलेले तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. हे महत्वाचे आणि मोठे ध्येय सर्वसामान्यांच्या मनात रुजवण्यासाठी त्यांनी भजन- कीर्तनाचा अतिशय प्रभावी मार्ग अवलंबला होता. ‘ खंजिरी भजन ‘ हे त्यांच्या सामाजिक प्रबोधनाचे मोठेच वैशिष्टय ठरले होते. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी काव्यरचना केल्या. “ ग्रामगीता “ या काव्यातून त्यांनी ‘आत्मसंयमन ‘ या आचरणात आणण्यास अवघड पण आवश्यक अशा विचारावर सहजसुलभ भाषेत विवेचन केलेले आहे. आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मकतेचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रबोधन करत ते देशभर फिरले.  १९४२ च्या “ भारत छोडो “ आंदोलनादरम्यान काही काळ ते अटकेत होते, आणि “ आते है नाथ हमारे “ हे त्यांचे गीत त्यावेळी त्या लढ्यासाठी स्फूर्तिगीत ठरले होते, हेही विशेषत्वाने सांगायला हवे.  त्यांची ध्येये, त्यातही विशेषतः ग्रामविकासाचे ध्येय साकार व्हावे यासाठी त्यांनी उपाययोजनाही सुचवल्या होत्या, ज्या त्यावेळी आणि नंतरच्या काळातही परिणामकारक...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

१० ऑक्टोबर  – संपादकीय   आज आपण कबीर सन्मान पुरस्कारा विषयी माहिती घेणार आहोत. भारतामध्ये  साहित्य क्षेत्रासाठी जे विविध सन्मान ठेवले आहेत, त्यामध्ये कबीर पुरस्कार हा महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर प्रदान केला जातो. मध्यप्रदेश शासनाच्या संस्कृतिक विभागामार्फत स्थापन केलेल्या विशेष समितीकडून, भारतीय भाषांमधील कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या साहित्यिक व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या विशेष समितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींचा समावेश केला जातो. कवी, लेखक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांच्याकडून नामनिर्देश केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्तही, साहित्यिकांची निवड करण्याचा अधिकार या निवड समितीला आहे. त्यानुसार हा महत्वाचा पुरस्कार देण्यासाठी साहित्यिकाची निवड सर्व साहित्यिक मापदंडांना अनुसरून व नि:पक्षपातीपणे  केली जाते. मराठीत केवळ ३ साहित्यिकांना आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. विंदा करंदीकरांना ९० -९१ चा पुरस्कार मिळालाय. जातक, ध्रुपद, स्वेदगंगा, अष्टदर्शने, विरुपिका, मृद्गंध इ. त्यांचे कविता संग्रह प्रसिद्धा आहेत. त्यांच्या बालकविताही प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग , एकदा काय झालं, एटू लोकांचा देश इ. त्यांचे १२ बालकवितांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी  मराठी काव्यमंजुषेत  विविध घाटाच्या, रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

९ ऑक्टोबर  – संपादकीय   * मराठीतील स्त्रीवादी लेखिका विजया राजध्यक्ष या श्रेष्ठ समीक्षक आहेत. आधांतर हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर त्यांचे वैदेही, अनोळखी, अकल्पित इ. १९ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथा, मध्यम वर्गीय स्त्री जीवनावर आधारित आहेत. त्यांची कवितारति आदिमाया, संवाद इ. समीक्षेवरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ या समीक्षेच्या पुस्तकाला साहित्य ‘अ‍ॅकॅडमीचा’ पुरस्कार प्राप्त झालाय. २००० मध्ये इंदूर यथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३३ चा. * मराठीतील महान नाटककार म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या महेश एलकुंचवार यांचा  जन्मही ९ ऑक्टोबरचा. त्यांनी आपल्या नाटकांची रचना, वास्तववादी, प्रतिकात्मक, अभिव्यक्तीवादी, आशा अनेक शैलीत केली आहे. जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या अनेक  थिम्स त्यांनी आपल्या नाटकातून मांडल्या. त्यांच्या नाटकांची भारतीय आणि पाश्चात्य आशा विविध भाषेत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या होळी, पार्टी अशा नाटकांवर चित्रपट झाले. गार्बो, वासनाकांड , पार्टी, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी  इ. त्यांची नाटके गाजली. तरी सर्वात गाजले, 'वाडा चिरेबंदी'. २७ फेब्रुवारी १९ ला त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा 'विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला. २०११...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 8 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

8 ऑक्टोबर – संपादकीय   शं. वा. किर्लोस्कर ( ‘शंकर वासुदेव किर्लोस्कर) यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ साली झाला. किर्लोस्कर मासिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. सुरूवातीला ते ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रका काढत. कारखान्यात तयार होणार्‍या मालाच्या जाहिरातीसाठी प्रथम ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रिका सुरू झाली. त्या नंतर त्यातून ‘‘किर्लोस्कर’ हे मासिक परिणत झाले. पुढच्या काळात स्त्री व मनोहर ही मासिके निघाली. महाराष्ट्राच्या नियतकालिकांच्या इतिहासात  या मासिकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. महाराष्ट्राची  संस्कृती आणि कालमानानुसार त्यात झालेले बदल याचे दर्शन या मासिकांमधून घडते. ‘शंवाकीय’ हे त्यांचे आत्मकथन आसलेले पुस्तक. यातून पाच दशकाचे महाराष्ट्राचे संस्कृतिक जीवन स्पष्ट होते. ते व्यंग चित्रकारही होते. ‘त्यांचे ‘टाकाच्या फेकी’ हे व्यंग चित्रांचे पुस्तकही त्या काळात अतिशय नावाजले गेले. उद्धव शेळके – उद्धव शेळके हे वैदर्भीय लेखक कादंबरी लेखक म्हणूनते प्रसिद्ध आहेत. धग ही त्यांची कादंबरी खूप गाजली.’शिळान’ हा यांचा पहिला कथासंग्रह. वैदर्भीय ग्रामीण बोलीत त्यांनी लेखन केले. धुंदी, पुरुष, नांदतं घर, कोवळीक, इ. अनेक कादंबर्‍यांचे त्यांनी लेखन केले. त्यांचाही जन्मदिन आजचाच. कमल पाध्ये -  या प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी. त्यांचे...
Read More
image_print