मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प पंधरावे # 15 ☆ नैसर्गिक आपत्ती☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।  आज श्री विजय जी ने एक गंभीर विषय “नैसर्गिक आपत्ती ” चुना है।  श्री विजय जी ने प्राकृतिक आपदाओं  जैसे गंभीर मुद्दे पर इस आलेख में चर्चा की है।  ऐसे ही  गंभीर विषयों पर आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प पंधरावे # 15 ☆

 

☆ नैसर्गिक आपत्ती ☆

 

समाजपारावरून आज निसर्ग  आपत्ती विषयी जरा बोलावेसे वाटत आहे.  निसर्गाचे संरक्षण,  आणि संवर्धन जर  आपल्या हातून घडले तर हाच निसर्ग  आपल्याला वनौषधी, रानमेवा  आणि  आरोग्य संपदेने परीपूर्ण करू शकतो.

अतिवृष्टी, ढगफुटी, हिम वर्षाव, कोरडा दुष्काळ, उन्हाचा तडाखा, वाढते  उष्णता मान, वणवा, वन्यजीव,  पशुपक्षी यांच्या प्रजाती संख्या कमी होणे,  औषधी वनस्पतींचा -हास, चक्रीवादळ,भुकंप, (धरणीकंप),  कडाक्याची  थंडी,  हहवामानात झालेले प्रतिकूल बदल ,अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपण  अनुभवीत आहोत. …..

या  आपत्तीच्या काळात सर्व संकटग्रस्तांना  वेळेवर  मदत मिळतेच असे नाही.   वित्त हानी, जीवहानी, आणि मनस्ताप भोगत या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निश्चित करून  या समस्येवर मात करता येईल.  पण नैसर्गिक आपत्ती ही बहुधा  अचानक पणे उद्भवल्याने ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते.  निसर्ग हानी देखील  अशा वेळी मोठय़ा प्रमाणावर झालेली दिसते.

पर्यावरण प्रेमी संघटना,  त्यांनी केलेले सर्वेक्षण याची नोंद कुठेतरी व्हायला हवी.   कारण  नैसर्गिक आपत्ती कोसळल्यावर  मनुष्य भांबावून गेलेला असतो.  त्याला  अन्न,  वस्त्र,  निवारा, या मुलभूत गरजा कशा लवकरात लवकर पुरवता येतील  याचा पाठपुरावा प्रसार माध्यमांनी करायला हवा.

जगाच्या  कानाकोप-यात घडणा-या घटनांना विविध नैसर्गिक घडामोडींना मिडीयाच जनतेपर्यंत पोहोचवतो.  मिडियाने  प्रसारीत केलेले लघुपट,  निवूदन  पाहून  अनेक वेळा विविध उपाय योजना सरकारने राबलिल्या आहेत.

आजकाल मिडिया  हेच प्रभावी माध्यम आहे की ज्याचे मुळे आपण सावधान आणि जागरूक राहू शकतो. आदिवासी भागातील तसेच मागास वर्गीय लोकांना पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. नैसर्गिक धन संपत्ती चे महत्त्व समजावून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर बर्‍याच नैसर्गिक आपत्ती टाळता येतील.

वरातीमागून घोडे मिरविण्यापेक्षा मिडीया चा वापर दुर्गम भागातील नागरिकांना  उपलब्ध करून दिल्यास त्यांना काही संरक्षण दिले गेल्यास वनसंपदेचे जतन  आणि संवर्धन होऊ शकते.  नैसर्गिक आपत्ती हे संकट आले तरी त्याला तोंड देण्याची क्षमता आधुनिक तंत्रज्ञानात नक्कीचआहे. फक्त त्याचा वापर समयोचित व्हायला हवा.

प्रसारमाध्यमे ही केवळ पैसा आणि प्रसिद्धी साठी  अस्तित्वात नसून समाज कल्याण  आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व पूर्ण कार्य सातत्याने करीत आहेत.  स्वतःचे संसार बाजूला ठेवून हे छायाचित्रकार,  तंत्रज्ञ पूर्ण ताकदीनिशी  अपु-या सेवा सुविधा  असताना मोठय़ा साहसाने सचित्र माहिती गोळा करून त्याचे अभ्यास पूर्ण संकलन करीत  असतात. त्याची शासकीय दरबारी कुठेतरी दखल घेतली जावी  असे मला वाटते.  प्रसार माध्यमांनी जीवावर उदार होऊन दिलेल्या माहितीवरून शासनाने झोपेतून जागे व्हायचे  आणि संकटग्रस्तांना मदत केल्याचा देखावा निर्माण करायचा हे कुठेतरी थांबायला हवे.  सरकारने  उपाययोजना करताना  अशा प्रसार माध्यमांना  आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यास  ही निसर्गाची हानी काही प्रमाणात कमी करता येईल.  सध्याचे युग प्रगतीचे,  विकासाचे आणि माहिती व तंत्रज्ञानाचे आहे हे विसरून चालणार नाही.  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात याचा विचार शासकीय पातळीवर सर्वतोपरी व्हायला हवा असे मला वाटते.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #19 – ☆ निर्णय…. ☆ – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी  निर्णय…. .  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं।  यह सत्य है कि अक्सर हमारी निर्णय क्षमता हमें जिद्दी बना देती है, जब हम यह कहते हैं कि मेरा निर्णय पक्का है. किन्तु, कई बार प्रकृति हमें निर्णय लेने का समय ही नहीं देती और जो घटना है वह घट जाता है , जिसे स्वीकार करने के अतिरिक्त कोई पर्याय नहीं रहता. सुश्रीआरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #19 ?

 

☆ निर्णय…. ☆

 

हो, माझा निर्णय पक्का आहे आणि त्यात मी अजिबात बदल करणार नाहीये…

हे वाक्य एकदम टिपिकल वाटतं नाही… जणू कोणीतरी स्वतःला सिद्ध करू पहातंय असं वाटतं किंवा कोणी तरी सांगत आहे की मी म्हणत्ये तेच ऐकायचं.

निर्णय… खूप मोठा शब्द आहे हा… कधी विचार केला आहे ह्याबद्दल… नाही म्हणजे, निर्णय घ्यायच्या आधी जीवाची होणारी तगमग, चीड चीड, भीती, हतबलता ह्यांचा विचारही नको असं कधी कधी वाटतं, त्या पेक्षा जे आहे तेच ठीक असंही वाटतं… पण जे आहे ते स्वीकारायला जी हिम्मत लागते तीपण नसते… मग त्यामुळे चीड चीड सुरू होते… मग नक्की काय करायचं? निर्णय काय असावा?

मनात अनेक विचार येत असतात, पण निर्णय क्षमता माणसाची जिद्द वाढवते. जर ही क्षमता नसेल तर ? अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल हे नक्की… कधी कधी परिस्थिती निर्णय घेऊ देत नाही, सगळे पर्याय संपले आहेत असं वाटू लागतं आणि एक प्रकारची हतबलता निर्माण होते, धीर सुटेल असं वाटू लागतं… निर्णय घेतल्यावर अडचणी येणार नाहीत असं म्हणायचं नाही. पण निर्णय घेतला की जे प्रसंग समोर येतील त्यांना तोंड देण्याची हिम्मत (धमक) असतील तरच त्याच्या वाटेला जावं. नाही तर न घर का न घाट का, अशी परिस्थिती येऊन ठेपेल…

निर्णय चुकीचा तर नाही ना, ह्या विवंचनेमध्येच बराच काळ हातातून निसटून जातो… साहजिक आहे म्हणा… ज्याची सवय झाली आहे त्यातून बाहेर पडून नवीन, वेगळं करायचं म्हटलं की टेन्शन येणारच. पण जर आपण आपल्या मतावर ठाम असू तर बदल स्वीकारला जातो, जे खूप आवश्यक आहे…

आता बदल म्हटला की अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आल्याचं. अर्थात त्या पूर्वी ही होत्या, आता फक्त एवढंच आहे की नवीन गुंतागुंत समोर येते, पण कदाचित ती अपेक्षित असते म्हणून आपण त्यातून लवकर मार्ग काढू शकतो किंवा त्या गुंतागुंतीचा त्रास आपल्याला कमी होतो कारण निर्णय आपण घेतलेला असतो…

तेव्हा मला तरी असं वाटतं, की जे आहे ते स्वीकारावे, ह्या निर्णयावर ठाम राहा, नाही तर बदल घडवून आणण्याचा निर्णय घ्या.

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ स्वप्ने ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.

आज प्रस्तुत है  उनका विशेष आलेख  स्वप्ने जो कि आधारित है युवाओं के स्वप्नों पर जिसे हम रोजगार कहते हैं.  उन्होंने युवाओं के इस स्वप्न पर विस्तृत चर्चा की है. )

 

☆ स्वप्ने ☆

 

स्वप्ने म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतं ते करिअर. काहीतरी करून दाखवायची प्रबळ इच्छा. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे म्हणजे स्वप्न पूर्ण करणे. मग ती आवड कशातही असू शकते. कोणाला पोलीस बनण्यात रुची असते. तर कोणी अभिनय चांगला करतो. कोणी धावण्यात तरबेज असतो. तर कोणाला रात्रंदिवस अभ्यास करून IAS, IPS  बनण्यात आनंद असतो. तसं स्वप्नांची व्याख्या करणं कठीण काम. पण माझ्या अल्पबुद्धीला सुचलेली  ही व्याख्या. कारण रात्री झोपेत पडणारे स्वप्न म्हणजे स्वप्न ही व्याख्या लहाणपणातच राहून गेली. ती सोबत आलीच नाही. जसे मोठे झालो तसे जिवनाचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यात यशस्वी होण्यासाठी धडपड सुरू झाली. ही धडपड करतांना समोर अर्थातच परिवाराला सुखाने जगता यावे. हा हेतू असतो. मग हे स्वप्न कि कर्तव्य हा प्रश्न नेहमी समोर येतो. असो.

तशी प्रत्येकाची वेगवेगळ्या  क्षेत्रात विशिष्ट आवड असते. आणि त्यात करिअर करण्याची इच्छा असते. त्यासाठी  त्या थराचं शिक्षण घेणंही खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचंय आणि त्या क्षेत्राचं ज्ञानचं नसेल तर तुमचं अपयश पक्कं असतं. कारण युध्दावर गेलेल्या शिपायाला जर युद्धाचा सरावच नसेल तर त्याच हरणं हे ठरलेलंच असतं. पण आजची स्थिती जरा वेगळी होऊन बसलीय. देशभरात दरवर्षी करोडोच्या  संख्येने तरूण- तरूणी वेगवेगळ्या क्षेत्रातील पदव्या घेऊन बाहेर पडताहेत. पण एवढ्या  संख्येने नोक-या आहेत काय ? सरकारी क्षेत्रात मोजून पाच दहा टक्के नोक-या आहेत. बाकी नव्वद टक्केपेक्षा जास्त नोक-या खासगी क्षेत्रात आहेत. सरकारी नोकरीची जाहिरात निघाली. तर तेवढ्याच जागांसाठी लाखोच्या संख्येने उमेदवार अर्ज करतात. जर समजा पाचशे जागांची जाहिरात निघाली तर त्यात लाखो अर्ज येतात. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करणं पॅनलला ही अवघड जाते. परिणामी ती भरती प्रक्रिया उशीरा पूर्ण होते. कधी कधी रद्दही होते. आणि झालीच निवड तर नियुक्ति होत नाही. परिणामी हे युवक खासगी क्षेत्रात कामाला जातात. पण या क्षेत्रात त्यांना त्यांच्या योग्यतेनूसार पगार न मिळता. आठ-दहा हजार रुपयांवर समाधान मानावे लागते. आणि सध्या सरकारच्या सगळ्याच क्षेत्रात खासगीकरण करण्याच्या नितीमुळे ज्यांच्याकडे सरकारी नोक-या आहेत त्यांही धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिवसेंदिवस कारखान्यात येणा-या मशीनरींनी अनेक कामगार बेरोजगार होताहेत. उदा. जिथं आधी दहा लोकं काम करायची तिथं आज मशीन उभं राहीलं. हे मशीन आले तसे वस्तूंचे उत्पादनही जास्त होऊ लागलं आणि न थकता 24 तास काम करू लागलं. आणि त्याला महिन्याचा पगारही द्यावा लागत नसल्यामुळे कारखानदारांनी काही मोजकेच कामगार ठेवले आणि बाकी कामगारांना घरचा रस्ता दाखवला. आणि बेरोजगारी वाढली. तसंच बॅंकिंग क्षेत्रातही झालं. पुर्वी अनेक कर्मचारी होते. पण ए.टी.एम. मशीन, प्रिंटीग मशीन आणि अजूनही बरेच मशीन आल्यामुळे बँकेतही नोक-या कमी झाल्या. तसंच विविध क्षेत्रात होतंय. परिणामी बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढतेय.

स्वतःचा व्यवसाय सूरू करावा तर तिथेही स्पर्धा आहेच. आणि आजकाल ऑनलाइनचा राक्षसाने अवतार घेतल्याने ह्या व्यवसायावर सरळ परिणाम होतोय. जे पाहीजे ते लोकांना घरबसल्या मिळतं म्हणून दुकानांत जाऊन खरेदी करण्याची तसदी हल्ली कोणी घेतांना दिसत नाही. म्हणून छोटे छोटे व्यवसाय संपले. आणि मोठे व्यवसायही डबघाईला आलेत. अगदी टाटा, मारूती,पारले सारख्या कंपन्याना ताळे लावण्याची वेळ आली आहे. वाढत चाललेल्या या बेरोजगारीमुळे मागणी कमी झाली. मागणी कमी झाली म्हणून उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी झाले तर सहाजीकच अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. आज घडीला जी. डी. पी. 5 टक्के पर्यत खाली आला आहे. आणि देशाला मोठ्या प्रमाणात मंदीला सामोरे जावे लागत आहे. या मंदीचे परिणाम किती भयंकर होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या मंदीला केंद्र सरकार तेवढेच जबाबदार आहे. यात शंका नाही. आता ते कसे यावर मी बोलू इच्छित नाही. या परिस्थितीवर उपाययोजना करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. पण या सगळया परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी माझ्या मते, डायरेक्ट सेलिंग हाही  एक सक्षम पर्याय बनून उभा राहू शकतो.

कारण कोणत्याही क्षेत्रात कितीही तंत्रज्ञान वाढलं तरी हा व्यवसाय माणसांशिवाय होत नाही. जेवढे लोकं यात येतील तेवढा हा व्यवसाय उंचीवर जाईल. आणि तंत्रज्ञानाच्या युगात बेरोजगार लोकांना कुठेतरी संजीवनीचं काम करेल. यात शंका नाही. सध्या हा व्यवसाय लोकांच्या नकारात्मक भावनेतून जात आहे. आणि या परिस्थितीतून जातांना जेवढे डायरेक्ट सेलर किंवा नेटवर्कर आहेत त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे की अशावेळीही हे नेटवर्कर खंबीरपणे उभे आहेत. आणि प्रामाणिकपणे काम करताहेत. डायरेक्ट सेलिंग हे कसे फायदेशीर किंवा बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी किती महत्वाचं आहे हे पटवून देत आहेत. प्रसंगी एक वेळचं जेवण विसरून ते हे महत्व लोकांना पटवून देताहेत. कारण भविष्यात येणा-या बेरोजगारीच्या महाभयंकर राक्षसाला मारण्यासाठी एक प्रभावी हत्यार म्हणून ते या व्यवसायाकडे पाहत आहेत.

सरकारनेही याचे महत्व लक्षात घेतले असून गेल्या काळात या व्यवसायसंदर्भात एक गाईडलाईन काढून या व्यवसायाला एकप्रकारे मान्यता दिली आहे. असे असले तरी लोकांचा विश्वास संपादन होईपर्यंत या नेटवर्कर्सना मेहनत करावी लागणार आहे.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प चौदावा # 14 ☆ सिग्नलवरचा भारत ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।   आज श्री विजय जी ने एक गंभीर विषय “सिग्नल का भारत” चुना है।  हम प्रतिदिन सिग्नल पर जी रही दुनिया और लोगों को देखते हैं किन्तु, न तो हम उन लोगों के लिए कुछ विचार करते हैं और न ही शासन।  ऐसे ही  गंभीर विषयों पर आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प चौदावा # 14 ☆

 

☆ सिग्नलवरचा भारत ☆

 

दारिद्रय रेषेखालील जनता म्हणजे हा  सिग्नलवरचा भारत.  ज्यांना  अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा देखील स्वायत्त तेने भागवता येत नाहीत  अशी कुटुंबे. भीक मागणारी मुले म्हणून त्यांची उपेक्षा होत रहाते. फुटपाथ वर पथारी पसरून किंवा  एखाद्या झाडाच्या  आडोश्याने यांचा संसार सुरू होतो. असे  बेघर जगणे आणि यातून जन्माला येणारी नवी पिढी,  जीवन संघर्ष करताना व्यसनाधीन  आणि गुंडगिरी याकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे

सिग्नलवर राहणाऱ्या लोकांच्या समस्या सामाजिक व्यवस्थेशी झगडा करीत  समाघास घातक ठरत आहेत. जीवनाश्यक मुलभूत गरजा,  शिक्षण,  संस्कार  यांचा अभाव, पुरेश्या सेवा  सुविधा उपलब्ध नसताना, उघड्यावर थाटलेले संसार  प्रदुषण,  दैन्य,  चोरी मारी यांना खतपाणी देताना दिसतात.

प्रथमत: सर्व दारिद्रय रेषेखालील लोकांना रोजगार  उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका स्तरावर विशेष  उपाय योजना राबविण्यात यायला हव्यात. रस्त्यावर बेवारसपणे फिरणारे हे लोक यांची ठोस व्यवस्था व्हायला हवी.  भीक मागून जगायचे  आणि पुरेशी भीक मिळाली नाही की चोरी करायची ही वृत्ती  बळावत चालली आहे.

रोजगार निर्मिती  आणि मुलभूत गरजा  उपलब्ध करून दिल्यास हा समाज  उपेक्षित रहाणार नाही.   फुटाथवर राहणाऱ्या लोकांसाठी स्वत:चा हक्कांचे घर मिळेल. उघड्यावर मांडलेला संसार त्यांना स्वतःच्या पायावर उभे  करेल.  शिक्षण मोफत  आणि विशिष्ट ठिकाणी  अशा लोकांना निवारा  उपलब्ध करून दिल्यास सार्वजनिक ठिकाणी होणारे दैन्य प्रदर्शन  आपोआप थांबेल.  भीक मागायला मनाई करून  रोजगार उपलब्ध करून दिल्यास बरेच परीवर्तन घडून येईल.

सिग्नलवरील  अनाथ मुलांस अनाथश्रम तसेच  अंध, वृद्ध अपंगांना  महापालिकेने विशिष्ट ठिकाणी आसरा द्यायला हवा.  सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने त्यांना विशेष सेवा उपलब्ध करून देता येईल.   ज्यांना मुलेबाळ नाही अशा  सधन कुटुंबातील व्यक्तींनी  अशी मुले  दत्तक घेतल्यास हे  मागासलेपण दूर होईल.

माणसाने माणसाला मदतीचा हात देऊन त्यांचा सांभाळ करणे उत्तम शिक्षण व संस्काराची प्रेरणा अंतरी रुजवणे  गरजेचे  झाले आहे. भीक देणे बंद केले की माणूस  आपोआप रोजगार शोधून स्वतःच्या  उदरनिर्वाहचे साधन शोधेल. काम करणा-या व्यक्तीला मदत करणे गैर नाही पण भिकारी जमात पोसणे हे मात्र पाप आहे.

प्रत्येक व्यक्तीस  तो निराधार नाही,  भिकारी नाही,  माणूस  आहे,  भारतीय नागरिक  आहे ही जाणीव करून दिल्यास ती व्यक्ती स्वतःचे आयुष्य  मार्गी लावू शकेल. सदर व्यक्ती रोजगार निर्मिती करेपर्यंत मुलभूत सेवा सुविधा दिल्यास ती व्यक्ति  समाजात स्वतःचे स्वतंत्र  अस्तित्व निर्माण करू शकेल.

भीक मागण्या पेक्षा भीक देणे हा  गुन्हा आहे  ही भावना मनात ठेऊन केलेली मदत सेवा कार्य  खूप मोलाचे ठरेल.  धडधाकट व्यक्तीला कष्टाची कामे करायला लावून  अर्थार्जन  उपलब्ध करून दिल्यास  भीकारी संख्या कमी होईल.  जेंव्हा भीक देणे बंद होईल तेव्हाच ही जमात  स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे राहिल.

शेवटी  व्यक्ती घडली की कुटुंब घडते. कुटुंब घडले की समाज सुधारतो,  समाज घडला की देशाची प्रगती होते हे सत्य विसरून चालणार नाही.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #18 – ☆ घर ☆ – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   अगली कड़ी  घर .  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। घर मात्र दीवारों का बना नहीं होता. उसमे  एक छत भी होती  जिसके नीचे  सुख दुःख, खट्टे मीठे प्रसंगों के साथ  रिश्ते निभाए जाते हैं.  सुश्रीआरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #18 ?

 

☆ घर ☆

 

नकोत नुसत्या भिंती…

हे वाक्य किती महत्वाचं आहे, नाही!

त्यात नकोत नुसती नाती… हेपण अगदी खरंय…

ह्या घरात, छताखाली आख्ख आयुष्य आकारास येतं, त्याचं आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे…. हो ना??

कशा साठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी हे जसं खरंय तसंच, आपण  सगळं काही ह्या घरासाठी, घरातल्या मंडळींसाठी करत असतो. कितीही कष्ट घ्यावे लागले, अडचणी आल्या, सुख दुःख सहन करत, मायेच्या पदराखाली ह्या घरात जीवन जगत स्वतःला सावरत, नाकारत, स्वीकारत पुढे जात असतो. खस्ता खायला लागल्या तरी रात्रीची शांत झोप ह्याच घरात येते. मग ते घर काचेच असेल, सिमेंटचं असेल नाही तर मातीचं… घर असण्याने हुरूप येतो, एक आधार मिळतो. ह्यातील नाती आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात, आणि घर सांभाळताना येणाऱ्या अडचणींमधून जीवन समृद्ध करतात… त्यात घराला घरपण देणारी माणसं असतील तर सोने पे सुहागा, हो ना !

ह्या वास्तुसाठी झटायला लागतं, जपायला लागतं, वाढवायला लागतं तेव्हा कुठे आनंदी कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ शिक्षक दिवस विशेष ☆शिक्षक आजचा व कालचा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

शिक्षक दिवस विशेष

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(प्रस्तुत है शिक्षक दिवस के शुभ अवसर पर वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी द्वारा लिखित विशेष  विचारात्मक आलेख शिक्षक आजचा व कालचा.)

 

☆ शिक्षक आजचा व कालचा☆

 

आपण कालच्या शिक्षकापासून सुरुवात करुया.

कालच्या शिक्षकांची शिक्षणावर निष्ठा होती, त्यांची त्यांच्या विद्यार्थ्यांवर निस्वार्थ, प्रेम, आपुलकी होती. विद्यार्थ्याला कसं जास्तीत जास्त शिकवून घडवता येईल याकडे त्यांचा अधिक कटाक्ष असायचा.

ते शिक्षक स्वत: ज्ञानपरायण व विद्यार्थी परायणही होते. ते ज्या गावात नोकरीत असत तिथल्या सर्वांशी त्यांची नाळ जोडलेली असायची.

त्याकाळी त्यांना गुरुजी म्हणजे गरु मानले जायचे. गावातल्यांशी त्यांचा सलोखा असायचा. गावातलं काहीही महत्वाच काम करताना त्यांचा सल्ला मार्गदर्शन घेतलं जायचं इतकी समाजाशी त्यांची नाळ घट्ट होती.

त्यावेळी शिक्षकांना पगारही तुटपुंजा असायचा, त्यांच्या खिशात खूप पैसेही नसायचे पण मनात मात्र आनंद होता. मुलांना शिकवताना आर्थिक बाब कधी त्यांच्या मधे आली नाही.ऐनवेळी त्यांना कधी संप करुन शिकवणं बंद ठेवावं वाटलं नाही.

त्यांचं शिक्षण आतापेक्षा थोडं कमी असलं तरी मुलांचे मानसशास्त्र त्यांना तंतोतंत ठाऊक होतं.

आजच्यासारखं तंत्रज्ञान त्यावेळी नव्हतं, त्यांपासून ते कदाचित दूर असतील पण नेमक्या वेळी नेमके काय करावे हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवून त्यांच्यात चांगले गुण रुजविण्याचा प्रयत्न केला.

आजचे शिक्षक तंत्रस्नेही, तंत्रप्रेमी बनले आहेत. अगदी तंत्रज्ञानातले बरेचसे प्रकार त्यांना उत्तम अवगत झाले आहेत पण एकाही शिक्षकाचा चेहरा आता मुलांना शिकवताना उचंबळून येत नाही.न जाणो तंत्रज्ञानामुळे शिक्षकांच्यातही यांत्रिकता आली की काय ? असे वाटते!

आज बहुतेक सर्व शिक्षक पाच अंकी पगार घेताहेत, त्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही,पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद दिसत नाही असे वाटते.

आर्थिक सुबत्ता भरपूर आली, भौतिक प्रगती झाली मात्र मूळ ध्येयापासून सध्याचे शिक्षक कोसो दूर राहिलेत  असे वाटते.त्यांचा शिकवण्याची वृत्ती कमी व समर्पिततेचा अभाव दिसून येतो. ते पगारार्थी व व्यावसायिक वृत्तीने आपल्या पेशाकडे पहाणारे झालेत. पेशा, व्रत हे शब्द आता विस्मृतीच्या वाटेवर आहेत असे वाटते.

आजचा एकटा शिक्षकच या सर्वाला जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. कारण आजचा समाज, पालकवर्ग, विद्यार्थी, शासनाचे सतत बदलणारे ढिसाळ धोरण व बदलती विचार सारणी हे सर्व घटक याला तितकेच जबाबदार आहेत.

सामाजिक जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.देशाला सुदृढ व बुद्धिमान नागरिक पुरविण्याचे श्रेय शिक्षकांना जाते.म्हणून आज योग्य विचारसरणीच्या शिक्षकांची समाजाला गरज आहे.

 

©®उर्मिला इंगळे

दिनांक:-४-९-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – परसाई स्मृति अंक – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प तेरावे # 13 ☆ नात्यात येणारा दुरावा ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प तेरावे  # 13 ☆

 

☆ नात्यात येणारा दुरावा ☆

 

आजकाल नाते संबध  ही मानवी भावना राहिली नसून तो एक व्यवहार झाला आहे  असे खेदाने म्हणावेसे वाटते.  .  नाते  विश्वास, स्वभाव दोष,  आकलन  क्षमता  आणि अनुभव यावर सर्वस्वी अवलंबून असते.  नाते ही नैतिक जबाबदारी आहे हे जोपर्यंत मनात रूजत  नाही तोपर्यंत  हे नाते मनापासून निभावले जाऊ शकत नाही. .

मी कसा श्रेष्ठ आणि  विद्वान  हे  सिद्ध करण्यात प्रत्येक जण  इतरांच्या भावनांशी खेळतो आहे.  या स्पर्धेचे युगात पैशाच्या जोरावर नातेसंबंध हवे तसे जोपासले जात आहेत.   भ्रष्टाचार, लाच  या गोष्टी ठराविक समाजात शिष्टाचार बनत चालल्या आहेत. दुरावा होण्याची आणखी  कारणे आहेत  ती म्हणजे संशय आणी  षडरिपू .  रक्ताचे नाते समाज काय म्हणेल या भावनेतून  किंवा क्षुल्लक  स्वार्थ साधण्यासाठी निभावले जाते.  संशयाने मनभेद आणि मतभेद होतात.  मन  एकदा का दुखावले गेले की  आपलेपणा जाऊन परकेपणा निर्माण होतो.

नाते पैशात मोजायचे की शब्दात हे ज्याला समजले तो कुठलेही नाते  छान सांभाळू शकतो.  नातेवाईक  आपल्याला काय देतात , आपण त्यांना काय दिले यापेक्षा मी  आप्तांना काय देऊ शकत नाही ते देण्यासाठी जर निस्वार्थीपणे प्रयत्न केला तर नाते आदर्श निर्माण करू शकते. समाज पारावरून हा  विषय चर्चेला घेताना समाज नाते दृढ करणारी माणसे  आता  अभावानेच आढळतात. हे सत्य डावलून चालणार नाही.

नात्यात हेतू नसावा,  बंधुता  आणि मानवता साधण्यासाठी   आपण स्नेहाच्या दोन शब्दांनी  बांधलेला सेतू नात्यात कधीही नष्ट नाही होणारे स्नेहबंध प्रस्थापित करते.  ही सर्व नाती  टिकून राहण्यासाठी आपण सर्वांशी मिळून मिसळून रहाणे जमले की  नात्यांची नाळ  जुळलीच समजा .

रक्ताची पण नाती मांडव शोभेपुरती हवा तीतका पैसा खर्च करतात.  शब्दाची शस्त्रे नात्याला दूर करतात पण मानसिक भावबंध  माणसाला कायम निराशेच्या  अंधकारातून उजेडाचा मार्ग दाखवतात.माणसाला  क्षणैक  मोहाचे  आकर्षण नातेसंबंधात दरी निर्माण करीत आहे.

नाते भावनेशी,  मनाशी जितकी जवळीक साधते तितके पैलू या पा-याला ,  नातेसंबंधाना सहवासात  आपोआप पडतात. ते कसे जपायचे  याचे कौशल्य  अनुभवाने  अंगवळणी पडते.  सा-या जाणिवा नेणिवा या नात्याला  घडवितात  अन बिघडवतात देखील.  आपण मधल्या मधे  आपल्यातला माणूस जीवंत ठेवला की झालं.

नाते,  विश्वास, माणूसकी ,  आणि स्वभाव दोष विसरून दुसर्‍याला माफ करण्याची क्षमाशीलता

या गोष्टीवर सर्वस्वी  अवलंबून असते.  नात्याला भावनांचे  असलेले रेशमी स्नेहबंध जोपासायला शिकलो की आपोआपच नात्यातला दुरावा कमी होतो.  मुळातच नाते ही संकल्पना माणूस जोडण्यासाठी उपयोगात आणता येते हे जोपर्यंत आपण  मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत ते नाते आपण समर्थपणे निभावून नेऊ शकत नाही. माणूस दूर राहूनही  नातेसंबंध  उत्तम जोपासू शकतो.  माणसा माणसात मतभेद  असावेत पण मनभेद होणार नाहीत याची काळजी घेतली की नात्यात कधीही दुरावा येणार नाही.


✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 13 – चौथा कमरा ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनका  संस्मरणीय आलेख चौथा कमरा।  प्रत्येक साहित्यकार को जीवन में कई क्षणों से गुजरना होता है। कुछ कौतूहल के तो कुछ आलोचनाओं के; कभी प्रशंसा तो कभी हिदायतें। सुश्री प्रभा जी ने इन सभी को बड़े सहज तरीके से अपने जीवन में ही नहीं साहित्य में भी जिया है। सुश्री प्रभा जी का साहित्य जैसे जैसे पढ़ने का अवसर मिल रहा है वैसे वैसे मैं निःशब्द होता जा रहा हूँ। हृदय के उद्गार इतना सहज लिखने के लिए निश्चित ही सुश्री प्रभा जी के साहित्य की गूढ़ता को समझना आवश्यक है। यह  गूढ़ता एक सहज पहेली सी प्रतीत होती है। हमारी समवयस्क पीढ़ी में शायद ही कोई साहित्यकार हो जो स्व. अमृता प्रीतम जी के साहित्य से प्रभावित न हुआ हो। संस्मरणीय आलेख में चौथा कमरा निर्मित करने  की परिकल्पना अद्भुत है।  सुश्री प्रभा जी का  पुनः आभार अपने संस्मरण साझा करने के लिए। आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 13 ☆

 

☆ चौथा कमरा ☆

 

आयुष्य कथा, कविता ,कादंबरी कशातही न मावणारं….कथा लिहिल्या, कविता लिहिल्या….कादंबरी नाही लिहिली अजून….एक खुप जुनी कविता आठवते मी लिहिलेली….

न गीत बन सका, न गजल बनी.

पूरी न हो सकी अधूरी कहानी…

शाळेत असताना रचलेली ही कविता…कविता आयुष्यभर साथ देईल असं तेव्हा वाटलं नव्हतं!

अमृता प्रीतम…एक आवडतं व्यक्तिमत्व, आयुष्य मनःपूत जगलेली स्त्री! “चौथा कमरा” ही अमृता प्रीतम ची संकल्पना आमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय स्त्रीला विचार करायला लावणारी,

मी जेव्हा स्वतःचा विचार करते तेव्हा जाणवतं, मी ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आले आहे, तिथे शक्यच नव्हतं, कविता करणं, कार्यक्रमात भाग घेणं, मैत्रीणींबरोबर कार्यक्रमांसाठी गावोगावी जाणं..  .. ..

पण माझ्याबाबतीत स्वतंत्रवृत्तीची ही बीजं लहानपणीच रूजली होती, वाचनातून, रेडिओ सारख्या प्रसारमाध्यमातून…मी माझ्या जवळच्या अगदी जिवाभावाच्या मैत्रीणीच्या घराशी…एका ख्रिश्चन कुटुंबाशी जोडले गेले होते, ते एक सुखी, प्रेमळ आणि एकमेकांशी आदराने वागणारं कुटुंब होतं!

घरात आईवडिलांचा धाक होता.

विसाव्या वर्षी लग्न ठरलं, सासर जुन्या वळणाचं….

घर संसार हेच इतिकर्तव्य असायला हवं होतं, पण विरोध पत्करून घराबाहेर पडले…संसाराकडे थोडंफार दुर्लक्ष झालंही असेल पण सगळी कर्तव्य पार पाडली…कुचंबणा, अवहेलना, अपमान सहन करावे लागले,

पण थोडंफार मनासारखं जगता आलं  ….

संधी मिळत गेल्या…साधारण १९८८ साली..   एका दिवाळी अंकाचं संपादन करायची जबाबदारी मिळाली पहिल्यावर्षी पाचशे रुपये  मानधन मिळालं ते वाढत वाढत पाच हजारापर्यंत गेलं….

स्वतःचा दिवाळी अंक सुरु केला चार वर्षे चालविला पण आर्थिक गणितं जमेनात मग बंद केला!

फार काही भव्य दिव्य करता आलं नाही पण “चौथा कमरा” निर्माण करता आल्याचे समाधान निश्चितच आहे, पण ही सगळी वाटचाल एकटीची  ….प्रतिकुल परिस्थितीत केलेली… छंद जपता आले…स्वतःचं वेगळेपण जपता आलं हे ही नसे थोडके….. १९८८   सालापासूनची म्हणजे लग्नानंतर दहा वर्षांनी उंबरठा ओलांडल्यानंतरची कारकीर्द समाधानी, तृप्त…!!

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #17 – पाचोळा… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   सत्रहवीं कड़ी  पाचोळा…।  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं।  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। एक पान  के पत्ते से  नवजीवन की परिकल्पना को जोड़ना एवं अंत में दी हुई कविता दोनों ही अद्भुत हैं। सुश्रीआरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #17 ?

 

☆ पाचोळा… ☆

 

पाचोळा, पानांचा… पानगळ… निष्पर्ण… एका सुरुवातीचा शेवट?
कदाचित शेवट… म्हणून भकास?

कदाचित?

की नव्याची सुरुवात?

अनेक विचार आपल्यालाच डाचत राहतात… पण पाचोळा कोणालाच नको असतो हे नक्की… पायदळी तुडवले जाण्याची शक्यताच जास्त असते… दुर्लक्षित होणे, ह्या सारखी भावना सुखावह नक्कीच नाही… पण मग अजून एक विचार मनात येतो… पाचोळा ही पूर्णत्वाची स्थिती तर नाही? समर्पणाची तयारी तर नाही? आयुष्यावर मात करत असताना झेललेल्या अनेक घावांचे व्रण नाहीसे करण्यासाठी ही धडपड नसावी ना? का सर्व जबाबदऱ्यांमधून बाहेर पडून हलक्या झालेल्या जीवनाचा वाऱ्याच्या झुळकी बरोबर सुरू झालेला प्रवास तर नाही? ह्या पानगळीबरोबर अनेक अयोग्य गोष्टीचा ऱ्हास होत असेल,  नाही का !

ह्याची उत्तरं प्रत्येकासाठी नक्कीच वेगळी असणार, ह्यात नवल नाही… पण उत्तरं शोधायचा प्रयत्न प्रगल्भतेच्या मार्गातील मैलाचा दगड ठरू शकतो… कारण ज्याची सुरुवात व्हावी वाटत असते, त्यासाठी कशाचातरी शेवट होणे ह्याला पर्याय नाही, हा निसर्गाचा नियम विसरून चालणार नाही…

कोंब होतो मी अवखळ,
पानापानातील सळसळ,
श्रुंगारलो सजलो देही,
जाणवे झाडाची कळकळ…

ऋतूंच्या बहरण्या साजे,
अनोखे चित्र सकळ,
खोडाखोडात अवतरे,
जगण्यासाठी पाठबळ…

वसंताच्या आगमनाने,
मिळाली माया सोज्वळ,
ग्रीष्माची उष्ण झळ,
नक्कीच होईल पानगळ,

जगरहाटी ठरलेली,
बाणवली जन्मभर,
निर्मिती, स्थिती, लय,
घडले सारे भरभर…

म्हणूनच म्हणतो,

आज पाचोळा जरी,
अनुभवले कोवळे क्षण,
पुलकित होत होतो,
पिऊन नाविन्याचे कण…

तुडवू नको पायदळी,
गळलो जरी अवकाळी,
सृष्टीचा एक भाग होतो,
आयुष्याच्या सकाळी…

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 2 ☆ ताई बालवाड़ी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। हम श्रीमती उर्मिला जी के आभारी हैं जिन्होने हमारे आग्रह को स्वीकार कर  “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” शीर्षक से  प्रारम्भ करने हेतु अपनी अनुमति प्रदान की। इस कड़ी में आज प्रस्तुत है  उनका आलेख नवनिर्मिती  

 

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 2 ☆

 

☆ ताई बालवाडी ☆

 

सकाळी उठल्यावर हातात वर्तमानपत्र घेतलं..लक्षात आलं आज दहावीचा निकाल आहे त्यामुळे अख्ख्या पेपरमध्ये त्याच बातम्या !

तेवढ्यात माझं लक्ष १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या बातमीकडं गेलं.दुर्गम व डोंगराळ अशा भागातल्या एका माध्यमिक शाळेच्या निकाल १०० टक्के लागला हे वाचून माझं मन भुर्रकन पस्तीस वर्षामागं गेलं..

१९८३ साल होतं मी शिक्षण विभागात बदलून आल्याने माझ्या कामाचा चार्ज मी यादीप्रमाणे पाहून घेत होते.तेवढ्यात ‘ताई बालवाड्या ‘ असं शीर्षक असलेल्या एका फाईलनं माझं लक्षं वेधून घेतलं.मी समाज कल्याण विभागाच्या बालवाड्यांचं काम केलं होतं पण हे ‘ताई बालवाडी ‘प्रकरण जरा वेगळंच वाटलं म्हणून उत्सुकतेनं अख्खी फाईलच मी तिथं बसल्या बसल्या वाचून काढली.

त्यांचं असं होतं, ज्या ठिकाणी यापूर्वी कसलीही शिक्षणाची सोय नाही अशा २०० ते ५०० लोकवस्ती असलेल्या अति दुर्गम -डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्यांना शासनाने १९७१ च्या जनगणनेनुसार बालवाड्या मंजूर केलेल्या होत्या.म्हणजे त्या वाडीवस्तीवर मुलांची शिक्षणाची सुरुवात झाली होती.

आमच्या जिल्ह्यासाठी १००बालवाड्या मंजूर होत्या. पैकी १९७६ ला ही योजना आली त्यावेळी प्रत्यक्षात ७७बालवाड्या सुरू होऊन त्या सर्व कार्यरत होत्या.परंतु १००पैकी २३ बालवाड्या सुरू होऊ शकलेल्या नव्हत्या असे ही फाईल वाचल्यावर माझ्या लक्षात आले.

अशा सर्व बालवाड्यांना शासनाने अति पावसाळी- दुर्गम भाग म्हणून मुलांना बसायला मोठे लांब सुंदर सागवानी पाट,छान खेळणी व ती सुरक्षित ठेवण्यासाठी भलीमोठी सागवानी लाकडी पेटी ,जिचा दुसरा उपयोग बालवाडी शिक्षिकेला बसण्यासाठी ही व्हावा.

हे सर्व वाचल्यावर माझी चौकस बुद्धी मला स्वस्थ बसू देईना.या बालवाड्या कां सुरु होऊ शकलेल्या नाहीत व त्यांचं साहित्याचं काय ?

मी याचं कारण शोधून काढायचं ठरवलं.व या बालवाड्या कसंही करुन सुरू करायच्याचं असा दृढनिश्चय करून पुढील कामाला लागले.आणि मला एक कल्पना सुचली त्या दरम्यान तालुका मास्तरांची एक मिटींग येऊ घातली होती म्हटलं ह्या निमित्ताने तालुका मास्तरांकडून याबाबतची वस्तुस्थिती कळू शकेल.व माझा अंदाज योग्य ठरला.त्या सभेसाठी येणाऱ्या ता.मास्तरांनी माझ्या टेबलकडे येऊन भेटावे अशी विनंती वजा सूचना नोटीसबोर्डंवर लावली.त्याचा खूपच छान उपयोग झाला ता..मास्तराशी चर्चा करता असे समजले की शासनाच्या निकषानुसार त्या गावातीलच महिला ताई म्हणून नेमायची होती.त्याकाळी वाड्यावस्त्यांवरच्या मुलींची लग्ने लौकर होत असल्याने अशी शिक्षिका न मिळाल्याने बालवाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत.

आज  मी ही फाईल पहात होते तेव्हा ७-८ वर्षांचा कालावधी गेलेला होता,आता ता.मास्तरांच्या मदतीने त्या २३ बालवाड्यांपैकी २२ बालवाड्या सुरू झाल्या त्यांचं जपून ठेवलेलं साहित्य त्यांना वाटप केलं.पण एका गावाला शिक्षिकाच मिळेना कारण अतिदुर्गम भागात ७वी पास‌ शिक्षिका तेथे मिळेना.मग चौकशी करता त्या गावात ४थी पास झालेली एक विधवा महिला असल्याचे समजल्यावर तिला कार्यालयात बोलावून सर्व सांगितले व तिला नियमानुसार बाहेरून सातवीच्या परीक्षेस बसविले.सुदैवाने ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली याचा तिच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद झाला.कारण आमची १००वी बालवाडी सुरू झाली.

आज ३५वर्षानंतर त्या ‘ताई बालवाडी ‘ चं रुपांतर कालांतराने माध्यमिक शाळेपर्यंत आलं आणि त्या शाळेचा दहावीचा १००टक्के निकाल लागल्याची बातमी वाचून मला भरुन पावल्यासारखं झालं

श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात नां ‘ केल्याने होत आहे रे’ ! पण आधि केलेचि पाहिजे!!’

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

Please share your Post !

Shares
image_print