image_print

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग ३ – जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆   जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर   इथून जेराश इथे गेलो. साधारण सहा हजार वर्षांपूर्वीच्या मनुष्यवस्तीच्या खुणा जेराश इथे सापडल्या आहेत. रोमन साम्राज्यात हे शहर वैभवाच्या शिखरावर होते. या शहराचे बरेचसे अवशेष सुस्थितीत आहेत. शेकडो वर्षे हे शहर वाळूच्या आवरणाखाली गाडलं  गेलं होतं.  सत्तर वर्षांपूर्वीच्या उत्खननात या सुंदर शहराची जगाला पुन्हा ओळख झाली. या शहराचं प्रवेशद्वार लाइम स्टोनचे चार उंच, भव्य खांब व कमानी यांनी बनलेले आहे. त्यावरील चक्रं, पानं, फुलं यांचे डिझाईन बघण्यासारखं आहे. रस्त्यांवर मोठ्या चौकोनी लाद्या तिरक्या बसविलेल्या आहेत. रथाच्या घोड्यांचे पाय घसरू नयेत म्हणून ही व्यवस्था होती. एका बाजूला टेकडीवर चर्च आहे तर एका टेकडीवर डायना या रोमन देवतेचे देऊळ आहे. डायना ही समृद्धीची निसर्गदेवता समजली जाते.थिएटर्स, खूप मोठे चौक, सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, आरोबा म्हणजे फ्लेश मार्केट, तिथली शेळ्या- मेंढ्या मारण्याची जागा, विक्रीची जागा, पाण्याची सोय अशा अनेक सोयी व बांधकामे तिथे  बघायला मिळाली. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सारं अतिशय प्रमाणबद्ध व प्रगत संस्कृतीचं...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग २ – जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆   जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर   जॉर्डनवर बाबीलोनियन, पर्शियन यांच्यानंतर इसवी.सन ६३ पर्यंत नेबेटिअन्सनी राज्य केलं.इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून पेट्रा ही नेबेटिअन्स राज्यकर्त्यांची राजधानी होती. हिंदुस्थान ,चीन, युरोप यांना जोडणारा व्यापारी मार्ग पेट्रावरून जात असे.नेबेटिअन्सनी  या व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या उंटांच्या कबिल्यांना, व्यापार्‍यांना संरक्षण दिलं व त्यांच्याकडून करवसुली केली. त्याकाळी हिंदुस्थानातून मसाल्याचे पदार्थ,रेशीम, अरबस्तानातून सुगंधी धूप व ऊद, आफ्रिकेतून हस्तीदंत व जनावरांची कातडी यांचा व्यापार होत असे. नेबेटिअन्सकडून   राज्य घेण्याचा प्रयत्न ग्रीकांनी केला.  नंतर रोमन जनरल पॉ॑म्पे याने सिरिया व जॉर्डन जिंकून घेतलं . रोमन्सनी शहराचं पुनर्निर्माण केलं. मोठ्या रुंद रस्त्यांच्या कडेने उंच कलाकुसरीचे दगडी खांब उभारले. सार्वजनिक बाथस्,ॲ॑फी थिएटर्स, सुंदर इमारती, कारंजी उभारली. व्यापारी मार्ग ताब्यात घेतला. नंतर रोमन साम्राज्यात ख्रिश्चन हा अधिकृत धर्म ठरविण्यात आला. दोन चर्चेस बांधण्यात आली. पुढे सातव्या शतकात इस्लामचा प्रसार झाला. इसवी सन ७३७ मध्ये भयानक भूकंप झाला आणि पेट्रा गाडलं गेलं, नाहीसं झालं व नंतर विस्मृतीत गेलं. इसवी...
Read More

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर ✈️ प्रवासवर्णन ✈️ ☆ चला आसाम मेघालयाला... भाग - 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆ आज स्वच्छ ऊन पडलं होतं. पाऊस नव्हता. पण सकाळचा गारवा जाणवत होता. काल हुकलेली रोप वे सफर आज केली. खाली संथ  वाहणारी ब्रह्मपुत्रा आणि डोक्यावर अथांग आकाश. केवळ मनोरम !! गुवाहाटी पासून दहा किलोमीटर अंतरावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे शक्तीदेवता सतीचे मंदिर आहे. व आसामी लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नीलाचल पर्वत श्रेणीत हे मंदिर स्थित आहे. भारतात देवींची ५१ शक्तीपीठे आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे जिथे स्त्रियांची योनी किंवा मासिक पाळी  या विषयावर बोलणे ही टाळले जाते तिथे या मंदिरात देवीच्या योनीची आणि मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. सती देवीने स्वत्याग  केल्यानंतर शंकराने क्रोधित होऊन तांडवनृत्य सुरू केले. हे पाहून विष्णूने सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे केले.नीलाचल पर्वतावर सतीचा योनीभाग पडला. तिथेच आज हे कामाख्या मंदिर आहे. हे मंदिर पाहताना आणि ही कथा ऐकताना एक जाणवले की, स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते. म्हणूनच सर्व सृष्टीनिर्मीतीचे  केंद्रही ...
Read More

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆☆ चला आसाम मेघालयाला… भाग -5 ☆☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर ✈️ प्रवासवर्णन ✈️ ☆ चला आसाम मेघालयाला... भाग - 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆ आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आता परत गुवाहाटीकडे. आमच्या प्रवासाची जिथून सुरुवात झाली त्याच ठिकाणी परत जायचे. गुवाहाटी म्हणजे गोहत्ती. गोहत्तीचे  चे प्राचीन नाव, प्रागज्योतिषपूर असे आहे.आसाम राज्यातील आणि ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे शहर.  हे आसामच्या मध्य पश्चिम भागात,ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे..प्राग्ज्योतिषपूर या नावाने प्रचलित असलेले गुवाहटी, हे,ऐतिहासिक कामरूप राज्य तंत्राची राजधानी होती. आता दिसपूर ही.आसामची राजधानी आहे.काझीरंगा ते गुवाहाटी हे जवळजवळ १९३  किलोमीटरचे अंतर आहे.  गुवाहाटी कडे जाणारा हा रस्ता अतिशय रमणीय होता.  वातावरण पावसाळी होते.  आकाश ढगाळलेले होते. चहाचे लांबचलांब मळे दुतर्फा होते.  केळी सुपारी होत्याच.बटाट्याचीही शेती दिसली.  वाटेत, चहा, नारळाचे पाणी,किरकोळ खरेदी अशी मौजमजा करत प्रवास चालला होता. गाडीत ड्रायव्हरने आसामी गाणी लावली होती. काहीशी भजनी चाल वाटत होती.  काही शब्दही कळत होते. थोडीशी  बंगाली पद्धतीची शब्दरचना वाटत होती. आवाजही चांगला होता. गाणी ऐकताना मन रमले. आजचे विशेष आकर्षण होते ते ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझ. आणि रोपवे सफारी. मात्र गुवाहाटीला पोहोचल्यावर मुसळधार पावसाने...
Read More

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर ✈️ प्रवासवर्णन ✈️ ☆ चला आसाम मेघालयाला... भाग - 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆ आमच्या प्रवासाचा आता दुसरा टप्पा सुरू झाला. शीलाँग सोडताना मन थोडे जड झाले होते. पण आसामची सफर करण्यासही  मन उत्सुक होते. आसाम हे ईशान्य भारतातले राज्य. त्याचा मुळ उच्चार असम असा आहे. असम  म्हणजे समान नसलेला प्रांत. पहाडी आणि चढ-उतार असलेले हे राज्य अतिशय निसर्गरम्य आहे शिवाय बांबू, चहा, यासाठी प्रसिद्ध आहे. . आसाम हे वाइल्डलाइफ आणि पुरातत्वशास्त्र साठी प्रसिद्ध असे राज्य आहे. आसाममधील काझीरंगा हे शहर अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. शिलॉंग ते काझीरंगा हे जवळजवळ 300 किलोमीटरचे अंतर आहे. ड्राईव्ह अर्थातच सुरेख होता. रस्ते वळणावळणाचे. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळे. सुपारी, केळीची बने, लांबच लांब पसरलेले डोंगर! मेघालयातील डोंगर आपल्या सोबतीने चालतात असे वाटायचे मात्र आसाममधील डोंगर दुरूनच आपले स्वागत करतात. पण तेही दृष्य अतिशय मनोहारी वाटते. रसिक मनाला चित्तवृत्ती फुलवणारे वाटते. काझीरंगा हे एक ऍनिमल कॉरिडॉर आहे. या जंगलात र्‍हायनो(गेंडा) हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. आम्ही प्रवास करत असताना, एका जलाशयाजवळ आम्हाला तो दिसला. एक शिंगी, जाड कातडीचा,...
Read More

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर ✈️ प्रवासवर्णन ✈️ ☆ चला आसाम मेघालयाला... भाग - 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆ शाळेच्या भूगोलात सर्वाधिक पाऊस पडणारे क्षेत्र म्हणजे चेरापूंजी हे वाचलं होतं .आज प्रत्यक्ष चेरापूंजी ला भेट देण्याची उत्सूकता अर्थातच खूप मोठी होती.  ड्रायव्ह अतिशय सुखद होता. आजूबाजूला उंच उंच डोंगर ,डोंगरावर उतरलेले  मेघ,वळणावळणाचे रस्ते,न बोचणारे परंतु गार वारे, भुरभुर पडणारा पाऊस सारेच खूप प्रसन्न होते.  वातावरण अतिशय आल्हाददायक होते. खासी व जायैती  हिल्स हा भूभाग खासी जमातीच्या अधिपत्याखाली होता अठराशे तेहतीस साली हा भाग ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला आणि त्यांनी मेघालया ची राजधानी चेरापूंजी न ठेवता शिलॉंग येथे हलवली.  येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे शिलॉंग ची तुलना स्कॉटलंड सोबत केली जाते. चेरापुंजीत पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे येथील कोसळणारे धबधबे! येथील एलिफंटा फॉल्स ला आम्ही भेट दिली. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये वाहता जातो .शंभर दीडशे पायऱ्या खाली उतरून टप्प्याटप्प्यावर या धबधब्याचे दर्शन विलोभनीय आहे. जिथून धबधब्याची सुरुवात होते तिथला भाग हा हत्तीच्या मस्त का सारखा दिसतो म्हणून त्यास एलिफंटा फॉल्स म्हणतात . मात्र आता डोंगर दगडांची पडझड झाल्यामुळे तसा...
Read More

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर ✈️ प्रवासवर्णन ✈️ ☆ चला आसाम मेघालयाला... भाग - 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆ या प्रवासातील अविस्मरणीय भेट म्हणजे भारत-बांगलादेश मैत्री गेट. मेघालय मध्ये भारत-बांगलादेश सीमारेषा ४४३ किलोमीटर (२७५ मैल) इतकी आहे. या मैत्री द्वाराजवळ, अलीकडे पलीकडे दोन्ही देशांचे झेंडे फडकत असतात आणि संध्याकाळी ते खाली उतरवले जातात. झेंडे उतरवणे म्हणजेच, कुठल्याही प्रकारचे वैमनस्य दोन्ही देशांमध्ये नसणे हेच अध्याहृत आहे.  मेघालया मधून बांगलादेश मध्ये दगडांची निर्यात प्रचंड प्रमाणात होते. रस्त्यावरून जात असताना हे उंच उंच डोंगर ओरबाडले दिसतच होते.हे दगडही अनेक रंगी आहेत. लाल, जांभळे, पिवळे, स्वच्छ पांढरे. इथल्या लोकांचा दगडफोडी हा मुख्य व्यवसाय आहे व हे सर्व दगड बांगलादेशात पाठवले जातात. या मैत्री गेटावर ही दगड वाहतुक आम्ही प्रत्यक्ष पाहिली .अत्यंत सुरक्षित पद्धतीने ही निर्यात, येथील सैनिकांच्या देखरेखीखाली होत असते.. सीमेचे रक्षण करणारे हे नैसर्गिक पहाड आणि हे सैनिक दोन्हीही मला महान वाटले. उमंगोट नदीच्या किनाऱ्यावर चे डावकी  हे सीमावर्ती शहर आहे.  यापूर्वी अमृतसरला वाघा बॉर्डर ला भेट दिली होती भारत-बांगलादेश मैत्री द्वाराची ही भेट तशीच संवेदनशील होती. उमंगोट नदी...
Read More

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर ✈️ प्रवासवर्णन ✈️ ☆ चला आसाम मेघालयाला... भाग -1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆ कोव्हीड थोडा आटोक्यात आला. गेली दोन वर्ष मनात या विषाणूने भयाचे घर केले होते.  आता थोडे मुक्त झाले आणि पर्यटन खुले झाल्यामुळे प्रवास प्रेमींनी  प्रवासाचे बेत आखण्यात सुरुवात केली. देशाच्या उत्तर-पूर्व विभागातल्या आसाम मेघालय ला भेट देण्याचे आम्हीही ठरवले.  एका वेगळ्याच भौगोलिक आणि सांस्कृतिक राज्याची ही सफर खूपच अविस्मरणीय ठरली,  या सफरीची सुरुवात आसाममधील गुवाहाटी या व्यापारी शहराच्या, लोकप्रिय गोपीनाथ बॉर्दोलोई या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरुवात झाली.  आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून इंडिगो फ्लाइट ६४३४ ने इथे आलो.  सोबत वीणा वर्लड ग्रुपचे आकाश व इतेश हे अतिशय उत्साही आणि या भागातले माहितगार असे सफर मार्गदर्शक आमच्या बरोबर होते.  आमचा २६ जणांचा समूह होता. गुवाहाटी ते शिलॉंग हा आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. आमच्यासाठी विमानतळावर टॅक्सीज उभ्याच होत्या. मेघालय हे भारतातील उत्तर पूर्व राज्य असून शिलॉंग ही या राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे,  त्याच्या उत्तर व पूर्व भागात आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे.  १९७२ साली मेघालय राज्य...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग १ –  जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆   जॉर्डन - लाल डोंगर, निळा सागर  जॉर्डनला जायचं ठरलं तेंव्हा मध्यपूर्वेतील वातावरण थोडं अशांत होतं. 'अरब- इस्त्रायल संघर्ष नेहमीचाच' असे म्हणत आम्ही प्रवासाचा बेत कायम ठेवला. जॉर्डनची राजधानी अम्मान इथे उतरलो. विमानतळावरच आवरून, नाश्ता करून पेट्रा इथे जायला निघालो. रमजान सुरू झाला होता पण प्रवाशांना रमजानची बंधनं नव्हती. चार तासांनी पेट्रा इथे पोहोचलो. हॉटेलवर जेवून रात्री 'पेट्रा बाय नाईट' चा अनुभव घ्यायला निघालो. पेट्राच्या प्रवेशद्वारापासून रस्ता खोलगट, उंच-सखल, खडबडीत होता. रस्त्याच्या दुतर्फा कागदी पिशव्यांमध्ये दगड व वाळू भरून एक- एक मेणबत्ती लावलेली होती. आकाशात अष्टमीची चंद्रकोर, सुनसान काळोख, थंड वारा आणि दोन्ही बाजूंना उंच, वेडेवाकडे डोंगरकडे होते. अरुंद घळीत दोन्ही बाजूंचे डोंगरकडे एकमेकांना भेटायला येत तेंव्हा त्यांच्या फटीतून काळसर पांढऱ्या चाफेगौर आकाशाची अरुंद पट्टी दिसत होती. सोबतीला असलेला सिक्युरिटीचा कुत्राही मुकाट चालत होता. पुढे-पुढे रस्त्यावरील कागदी पिशव्या व त्यातील मेणबत्या यांची संख्या वाढू लागली. काळोख अधिकच गहन- गूढ वाटू लागला.अकस्मात 'खजाना' समोरच्या प्रांगणात शेकडो मेणबत्या...
Read More

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग ६ – कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ६ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆  ✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️ व्हॅ॑कूव्हरच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील स्टॅन्ले पार्क एक हजार एकरवर पसरला आहे.( मुंबईच्या शिवाजी पार्कचा विस्तार सहा एकर आहे ) इथे कृत्रिम आखीव-रेखीव बाग-बगीचे नाहीत .नैसर्गिकरित्या पूर्वापार जशी झाडं वाढली आहेत तसाच त्यांचा सांभाळ केलेला आहे. अपवाद म्हणून तिथे केलेली गुलाबाची एक बाग फारच देखणी आहे. नाना रंग गंधांच्या॑॑ हजारो गुलाबांनी या बागेला एक वेगळे सौंदर्य, चैतन्य लाभले आहे. दुसऱ्या दिवशी व्हॅ॑कूव्हर पोर्टला जायला निघालो. वाटेत दोन्ही बाजूंना गव्हाची प्रचंड मोठी शेती आहे. शिवाय बदामाची झाडं, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चेरी यांचेही मोठ मोठे बगीचे आहेत. गाईड म्हणाला की ही सर्व शेती तुमच्या भारतातून आलेल्या शिख कुटुंबियांच्या मालकीची आहे.  शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ही पंजाबमधील शीख कुटुंबे ब्रिटिशांबरोबर शेतमजूर म्हणून इथे येऊन स्थिरावली आहेत. धाडस, मेहनत व स्वकर्तृत्वाने त्यांनी हे वैभव मिळविले आहे. आज अनेक शीख बांधव कॅनडामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच अनेक जण सिनेटरही आहेत. या धनाढ्य शिखांपैकी बहुतेकांचा स्वतंत्र खलिस्तानला ...
Read More
image_print