मराठी साहित्य – सूचनाएँ ☆ संपादकीय निवेदन – श्री सुनील देशपांडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री सुनील देशपांडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक श्री. सुनील देशपांडे यांना त्यांनी लिहिलेल्या 

“Organ Donation” या इंग्लिश पुस्तकासाठी नुकतेच ‘ अनंत प्रेस इंटरनॅशनल ‘ यांच्यातर्फे – – 

“अनंत प्रेस साहित्य रत्न अवॉर्ड“ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

Anant Press ही संस्था.. “ India’s most trusted & authentic platform for recognising literary excellence “.. म्हणूनच ओळखली जाते हे इथे आवर्जून सांगायलाच हवे.

श्री. सुनील देशपांडे यांचे सामाजिक दृष्टिकोनातून लिहिलेले “Organ Donation” हे पुस्तक सामाजिक कार्यकर्ते आणि या कामाचे समन्वयक यांच्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे.

‘अवयव दान‘ हा विषय खूप महत्वाचा, समाजोपयोगी आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने विचारात घ्यावा असाच आहे हेही इथे आवर्जून नमूद करायला हवे.

आपल्या सर्वांतर्फे श्री. सुनील देशपांडे यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि समाजोपयोगी तसेच समाजप्रबोधक अशा त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ अपरिहार्य कारणों से शुक्रवार दि. ४/९/२६ से  दि. ७/९/२६ (४ दिवस) तक ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ दि. ४/९/२६ ते दि. ७/९/२६ — अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!!!! 📖 ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

📖 दि. ४/९/२६ ते दि. ७/९/२६ — अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!! 📖

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी – – 

काही अपरिहार्य कारणामुळे शुक्रवार दि. ४/९/२६ ते सोमवार दि. ७/९/२६ असे ४ दिवस दैनिक अंक प्रकाशित केला जाणार नाही. मंगळवार दि. ८/९/२६ पासून अंक नेहेमीप्रमाणे प्रकाशित केला जाईल. 

सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 

ई-अभिव्यक्ती, मराठी विभाग.– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति संवाद ☆ शिक्षाविद्, लोक-विज्ञानी स्व. डॉ. पूरनचंद श्रीवास्तव जी के 110वें जन्मोत्सव “बुन्देली दिवस” पर विशेष ☆ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर ☆

🟢 शिक्षाविद्, लोक-विज्ञानी स्व. डॉ. पूरनचंद श्रीवास्तव 🟢

(1 सितम्बर 110वें जन्मोत्सव “बुन्देली दिवस” पर विशेष)

प्रिय प्रबुद्ध पाठक गण, 

ई-अभिव्यक्ति का आज का अंक शिक्षाविद्, लोक-विज्ञानी स्व. डॉ. पूरनचंद श्रीवास्तव को समर्पित है. पुनर्पाठ के अंतर्गत 1 सितम्बर 110वें जन्मोत्सव “बुन्देली दिवस” के अवसर पर विगत वर्ष बुन्देली दिवस पर प्रकाशित विशेष रचनाएँ आपके अवलोकनार्थ सादर प्रस्तुत हैं.

 – हेमन्त बावनकर,  संस्थापक संपादक ई- अभिव्यक्ति, पुणे 

 

🟢

आप निम्नलिखित टेक्स्ट अथवा लिंक पर क्लिक कर रचनाएँ पढ़ सकते हैं 👉

 

https://e-abhivyakti.com/?p=98005

https://e-abhivyakti.com/?p=17108 

https://e-abhivyakti.com/?p=98404

https://e-abhivyakti.com/?p=98416

https://e-abhivyakti.com/?p=98423

https://e-abhivyakti.com/?p=98421

https://e-abhivyakti.com/?p=98406

https://e-abhivyakti.com/?p=98407

https://e-abhivyakti.com/?p=98405

https://e-abhivyakti.com/?p=93310

♥ ♥ ♥ ♥ ♥

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

गाडगीळ मॅनेजमेंट, सांगली आयोजित मराठी काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांच्या काव्य रचनेस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. ई अभिव्यक्ती मराठी तर्फे श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🖊️

पुरस्कार प्राप्त कविता आज प्रकाशित करत आहोत.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “पाऊस” ☆ दीप्ती कुलकर्णी ☆

☆

 पाऊस आला, पाऊस आला, घेऊन मृदगंधाला

ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा, कणकण संतोषला

जलधारांनी बरसत आला, थेंबातुनी प्रगटला

बळीराजाही पेरायाला, शिवारात गुंतला ||१||

 *

इंद्रधनुचा मोहक पट तो, आकाशी उमटला

बालचमुसह सर्वांसाठी, आनंददायी बनला

जलाशयांचा, तरुवेलींचा, जीवनदाता ठरला

चिंबही भिजल्या सृष्टीचा तो, सखा जणू भासला ||२||

 *

धरतीनेही हिरवा शालु, अंगभरी ल्यायला

गवतफुलांचा, फळाफुलांचा, सुगंध साकारला

मातीतुनी या नवकोंबांचा, हर्ष दिसू लागला

तनामनाने चाहुल घेता, आसमंती विहरला ||३||

 *

चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला

रिमझिम येता जलधारांचा, नाद ही झंकारला

पाऊस आला, पाऊस आला, मोद असा जाहला

नव आशांचा, नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||४||

☆

© दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

ई-अभिव्यक्ति के सभी प्रबुद्ध लेखकों एवं पाठकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं 🇮🇳.

कुछ अपरिहार्य कारणों से कल शनिवार दि. १५/८/२६ से  दि. २०/८/२६ (६ दिवस) तक ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ✒️संपादकीय निवेदन !!✒️ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 ✒️संपादकीय निवेदन !!✒️ 📖

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी…

काही अपरिहार्य कारणामुळे दि. १६/८/२६ ते दि. २०/८/२६ असे ५ दिवस आपला दैनिक अंक नेहेमीसारखा ‘लिंक’ स्वरूपात प्रकाशित केला जाणार नाही. त्या ऐवजी अंक थेट व्हाट्सअप ग्रुपवर प्रकाशित केला जाईल. 

शुक्रवार दि. २१/८/२६ पासून अंक पुन्हा नेहेमीसारखा प्रकाशित होईल. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ तकनीकी कारणों से आज गुरुवार  दि. ६/८ /२६ को ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ गंगा माहेराची… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच या संस्थेने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या काव्यास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे सौ. तानवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज पुरस्कार प्राप्त काव्य प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ “सांग दर्पणा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त’)

☆

न्याहाळते दर्पणी मी

सज्ज होऊनी साजिरी

ल्याली आभूषणे भारी

शालू माझा भरजरी ||

* 

केला शृंगार देखणा

फिदा माझ्यावरती मी

सांग दर्पणा यामध्ये

काही नसे ना रे कमी ||

 *

तूच खरा मित्र जगी

रूप अचूक दाखवी

उणे अधिक काहीही

ओळखाया तू शिकवी ||

 *

ऐक दर्पणा एवढे

आठवाने मी लाजते

छबी नयनात त्याच्या

पाहण्याला आसुसते ||

 *

त्याची चाहूल लागता

सुखावले मी अंतरी

लाज साखर मिठीची

उमटली गालावरी ||

 *

नेत्र दर्पणी दोघांना

खूण पटे अंतरीची

सरे क्षणातच दूरी

साथ सात पावलांची ||

 ☆

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ गंगा माहेराची… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇 

शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृत्त बद्ध काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना त्यांच्या गंगा माहेराची या काव्यरचनेसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सौ. तानवडे यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

शुभंकरोति साहित्य परिवार आयोजित भव्य वृत्तबद्ध काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त‘

? कवितेचा उत्सव ?

☆ “गंगा माहेराची” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(वृत्त – लवंगलता (८|८|८|४))

☆

मनी घालती पिंगा अवचित फेऱ्या आठवणींच्या

फेर धरोनी नाचत थयथय गाऱ्या भिंगोऱ्याच्या ||

 *

शेतामधले कौलारू घर सदैव गजबजलेले

तीन पिढ्यांचे बंध रेशमी प्रेमळ गुरफटलेले ||

* 

दारापुढती गोधन दावण खूण वैभवी झुलते

ढवळ्या पवळ्या खिलार जोडी घुंगुरमाळा घुमते ||

 *

सख्खे मावस आत्ते मामे चुलत नातलग सारे

एकोप्याच्या मेळाव्याला भेटण्यास येणारे ||

 *

सरस्वतीचे मंदिर मोठे जीवन घडवत जाई

संस्कारांची दिली शिदोरी वाटे दुसरी आई ||

 *

मंदिरातल्या आरतीमधे मन रेंगाळत राही

आशीर्वादे आयुष्याला कळस यशाचा पाही ||

 *

गावाकडल्या मातीमध्ये नाळ जोडली आहे

माहेराच्या घरामधुनिया प्रेमळगंगा वाहे ||

 ☆

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares