मराठी साहित्य – विविधा ☆ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे

सहज सुचलं म्हणून… ✍️क्षण झाला अमर

१: “भूत-भविष्य चिंतनात नाही तर वर्तमान कळतं…”

भूत म्हणजे स्मृतींची सावली.

भविष्य म्हणजे कल्पनांची छाया.

दोन्हींचा आधार मन आहे — आणि मनच काळ निर्माण करते.

पण वर्तमान?

तो ना स्मृती आहे, ना कल्पना. तो शुद्ध अनुभूती आहे.

 

उपनिषद म्हणतात —

“यत् साक्षादपरोक्षाद् ब्रह्म” —

जे प्रत्यक्ष आहे, तेच ब्रह्म आहे.

वर्तमान क्षण हाच साक्षात् ब्रह्मानुभवाचा दरवाजा आहे.

जो क्षण पूर्णतेने जगतो, तो काळाच्या पलीकडे जातो.

 

२: “दिवसांचे महत्त्व कमी झाले की ‘क्षणांचे’ मूल्य कळते…”

दिवस हे मोजमाप आहे.

क्षण हा अनुभूती आहे.

दिवस बाह्य घड्याळ सांगते. मात्र क्षण अंतःकरण उलगडते.

जेव्हा आपण दिवसांच्या धावपळीतून थांबतो, तेव्हा जाणवते —

जीवन दिवसांनी नव्हे, तर जागृत क्षणांनी घडते.

 

अद्वैत दृष्टीने —

प्रत्येक क्षणात पूर्णत्व आहे.

कारण क्षणातच चैतन्य प्रकट आहे.

 

३: “भगवंत हृदयस्थ आहे…”

भगवंत शोधायचा बाहेर का?

तो तर साक्षीभावात, शुद्ध जागरूकतेतच आहे.

ईशावास्यमिदं सर्वम्” —

सर्व काही त्याने व्यापले आहे;

मग हृदय त्याच्या बाहेर कसे असेल?

जेव्हा मन भूत-भविष्य सोडते,

तेव्हा हृदयात शांत, निर्विकल्प प्रकाश उगवतो.

तोच भगवंत.

🕉️ थोडक्यात

न भूतं न भविष्यं, केवलं वर्तमानम्।

न कालः तत्र भाति, केवलं चैतन्यम्।

यस्मिन् क्षणे विश्रान्तिः, स एव ब्रह्मक्षणः॥

(भूत नाही, भविष्य नाही — जे उरते ते वर्तमान चैतन्य; ज्या क्षणी विश्रांती मिळते, तोच ब्रह्मक्षण.)

 *

ध्यान म्हणजे अपूर्णतेच गोडी वाटणे, अनुभवणे

भूत-भविष्य निवळले की क्षण पवित्र होतो;

क्षण पवित्र झाला की हृदय मंदिर बनते. 🙏

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी 

शब्दावाचुनी संवादाची

 लाभे तुज स्वरभाषा 

सप्तसुरांची एक स्वामिनी 

नाम तिचे आशा…

अशी ही सुरांची स्वामिनी दोन महाराण्यातील महाराणी आशा भोसले काल आपल्याला सोडून गेली. 92 वर्षाच्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख एकेरी करताना प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आपलेपणाच दिसतो. देवाला जसे आपण अरे परमेश्वरा असे म्हणतो तत्वत त्या दोन भगिनींना.. लता आणि आशा अशा… याना एकेरी संबोधनच मिळाली आणि तीच जगातील सर्वात आपलेपणाची भावना आहे असे मला वाटते.

काल टीव्ही वरती एक वाजता अचानक पणे बातमी आली आशाबाई आपल्याला सोडून गेल्या दोन मिनिट धक्काच बसला विश्वास बसेना चार वर्षांपूर्वी एक स्वर हरपला आणि आज दुसरा..! खूप वाईट वाटलं पण शेवटी मन म्हणायला लागलं अरे जगणार किती वर्ष. समृद्ध आयुष्य जगलेल्या जीवाने लोळत घोळत जाणे बरोबर नाही. आशाबाई अशाच उठून निघून गेल्या एका समृद्ध, संघर्षमय, बंडखोर, मिश्किल युगाचा अंत झाला. मंगेशकरांच्या पाच भावंडामधली ही सगळ्यात चुलबुली मुलगी.. एकदा एका मुलाखतीत ऐकले होते.. आशा घरात कुठे सापडली नाहीतर लहानपणी घरातली सारी या मुलीला हुडकायचे तेव्हा त्यांच्या मातोश्री बरोबर सांगायच्या अगं पलीकडच्या गल्लीत बाया शेवाया घालताहेत तिथे गेले असेल शेवया धरायला…! अशा बाईनी लहानपणापासूनच अशा शेवया घाल कुरडया कर पापड्या घाल सांडगे तोडून दे… या सगळ्या गोष्टीत आनंद घेतला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल आणि केवळ तीन वर्षांनी मोठी असलेल्या आपल्या भगिनीलाच सर्वस्व मानून तिचे श्रद्धेने ऐकत त्या मोठ्या झाल्या. लताबाईंवर जबरदस्त विश्वास ती म्हणाली आई वडिलांच्या पायाचे पाणी तीर्थ असते ते प्याल्याने आपले जीवन सुखी होते आणि ते झोपले असताना त्यांच्या पायावरून पाणी घालून ते एका ताटलीत जमा करून तीर्थसारखे प्राशन करणाऱ्या बहिणी… आशा बाईनी हा किस्सा सांगताना सांगितला होता… कदाचित आई-वडिलांच्या पदस्पर्शाच्या त्या पाण्याने आमचे जीवन उजळून निघाले त्यांचा आशीर्वाद लाभला आणि आम्हाला मोठ होता आलं…

मोठं होण्यासारखं काय होतं जवळ? वय अत्यंत लहान पाच भावंड एकट्या आईने काय करावं पैशाची विलक्षण नड दीनानाथ मंगेशकर गेल्यानंतर त्यांना घरी आणावं की नाही का तसेच स्मशानभूमीत न्यावे? हा प्रश्न त्या घराला पडला होता कारण दोनदा टॅक्सी करणे एवढे भाड्याचे पैसे नव्हते तरीही माईनी घरी नेण्याचा निर्णय घेतला ह्या सगळ्या घटनांचा परिणाम लताबाईंवर झाला होता कारण त्या थोड्याशा कळत्या होत्या. बाकी सगळे भावंडे लहानच होती ना मग सगळी श्रद्धा आपल्या मोठ्या बहिणीवर…! सुरांची जादू सगळ्यांजवळच होती लताबाई आपण मेहनत करत आणि इतराना करायला लावत. यौवनात पदार्पण केल्यानंतर आशाबाई थोड्या बंडखोर निघाल्या मनस्वी होत्याच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला. गणपतराव भोसले यांच्याशी लहान वयात लग्न केलं ते घरी कोणालाही पसंत नव्हतं तरीही त्यांनी आपला संसार नेटका करायचा प्रयत्न केला खूप गरिबी बघितली. गणपतराव भोसले विलक्षण हिंसक खूप त्रास दिला पण आपण केल आहे आपण निभावायच आहे हा आशाबाईंचा विश्वास ठाम होता, आणि त्यांनी ते केले. ही आशा भोसले यानी सांगितलेला एका मुलाखतीला किस्सा आहे… की मी कोणत्याही साडीवर पांढरा ब्लाउज घालून जात असे कारण माझ्याकडे तो एकच चांगला ब्लाऊज होता जुना ब्लाउज रात्री घालायचा आणि हा धुवून ठेवायचा सकाळी तो ब्लाउज साडीवर घालून रेकॉर्डिंग ला जायचं त्यामुळे दोन्ही खांद्यावर पदर घट्ट लपेटून म्हणलेली त्याची गाणी आपल्याला चित्रीकरणात दिसतात हे सार त्यानी मागे टाकले आणि मेहनतीच्या जोरावर त्या पुढे गेल्या त्यांना कामे मिळताना लताबाईंचाच तर मोठा अडसर होता लताबाईंच्या आवाजाची जादू लोकांवर साम्राज्य करीत होते पण हळूहळू त्यानी आपल्या आवाजाची जादू दाखवायला सुरुवात केली. आपल्या आवाजाचे वेगळेपण दाखवायला सुरुवात केले लताबाईंशी स्पर्धा नाही त्या नेहमी म्हणत लता शेवटी लता आहे..! एका मुलाखतीत तिने सांगितले होते दीदी कडून दाद मिळवणं खूप कठीण… एका गाण्यांमध्ये दोघी एकत्र गात होत्या गाणं होतं… मन क्यू बहका रे बहका आधी रात को… त्यावर अशा बाईंची दुसरे ओळ आहे बेला मेहका रे मेहका आधी रात को… आधी रात हा शब्द त्यांनी इतका सुंदर म्हणलाय लताबाईंनी चष्मा खाली घेतला आणि तिला हसून दाद दिली की अरे वा काय सुंदर हमसे भी आगे हो.. आशाबाईनी सांगितलं असे क्षण खूप कमी पण ते मी जपून ठेवले आहेत.

 लताबाईंपेक्षा वेगळ्या धाटणीची असंख्य गाणी गाऊन सुद्धा म्हणजे कव्वाली भावगीत शास्त्रीय संगीत गायले गझल गायल्यात पाश्चिमात्य घाटाची गाणी गायली. कॅब्रे सॉंग गायलं… इतके वैविध्य आशाबाई देऊ शकल्या तरीही त्या म्हणतात लता ही लताच आहे तो हिमालय आहे हे असं म्हणायला खूप मोठे पण लागत. आपल्या मोठ्या बहिणीबद्दल आदर प्रेम हे सगळं सगळं ओसंडून वाहत होतं लताबाई एखादी गोष्ट नाही म्हणाल्या की आशांनी पुढे जाऊन ते कधीच केलं नाही कारण त्यांना कळून चुकलं होतं कि ती जे सांगते त्यात खूप जास्त तथ्य असते. अनेक डॉलरची बिदागी देऊन आपल्या मुलाच्या लग्नात लता आणि अशांनी गावे अशी इच्छा एका माणसाने व्यक्त केली होती लता दीदीनी त्याला साफ नकार दिला. आशाबाई येतील अशी आशा त्याला वाटत होती लताबाईंनी फक्त एकच वाक्य उच्चारलं… ” लता तू लग्नात जाणार आहेस का गायला? ” ह्या एका वाक्यात सगळं काही भरून होतं आणि आशाबाईने तात्काळ नकार दिला.

आशाबाई बंडखोर होत्या कारण त्या लहान बहीण होत्या हट्ट करणे बंडखोरी करणं हा त्यांचा हक्कच होता पण लताबाई ना ते करून जमणार नव्हतं कारण त्यांच्यावर त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं होतं आणि हे करत असताना आपल्या भावंडांनी कुठेही चुकू नये चुकीचा निर्णय घेऊन ये चुकीच्या ठिकाणी गाऊ नये हाच लताबाईंचा उद्देश होता आणि हा त्यांचा हेतू ती सर्व भावंड जाणून होती त्यामुळे लता बाई त्यांच्यासाठी बहीणच नव्हे तर आई बाप सर्वस्व होत्या खूप मुली आपल्या कुटुंबासाठी राबतात पण त्यांची भावंड कदर करतीलच असं नाही लताबाईंच भाग्य मोठं ही सगळ्या भावंडांनी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. आशाबाईंच्या प्रत्येक मुलाखतीत लतादीदींबद्दल विलक्षण आदर प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

काही गोष्टी ‘मन’ रिचार्ज करतात.

झालं असं की…

ऑफिसच्या कामानिमित्त खूप वर्षांनी बालपण जिथं गेलं त्या भागात जाण्याचा योग आला. दहावीत असताना घर बदललं त्यानंतर इच्छा असूनही तिथं जाता आलं नाही आणि ऑफिसमुळे अनपेक्षित संधी मिळाली.

काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. ताबडतोब शाळेजवळ गेलो. खूप वर्षांनंतर ‘शाळा’ पाहताना आठवणींची एकेक फोल्डर उघडली. ‘मन’ पुन्हा शालेय दिवसात रमलं. मोबाइलच्या आवाजानं वास्तवात आलो. भुकेची जाणीव झाल्यावर तिथल्या प्रसिद्ध भेळेची आठवण झाली. ते दुकान अजूनही चालू असेल की नाही असा विचार डोक्यात आला. ‘जाऊन बघू’ म्हणत निघालो. बालपणी पायी तुडवलेल्या गल्ली, बोळातून जाताना भन्नाट फिलिंग होतं. दहा मिनिटांत पोचलो. चक्क दुकान चालू होतं. आजूबाजूला आकर्षक बोर्ड, लखलखाट असलेल्या दुकानांच्या रंगबिरंगी गर्दीत साधा बोर्ड असलेलं भेळेचे दुकान लक्ष वेधून घेत होतं. गाडी पार्क करून दुकानात गेलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास वीसेक वर्षांनी आलेलो तरीही सगळं जसच्या तसं, पंधराजण बसतील एवढीच जागा, पन्नास वर्षाच्या वाटचालीविषयीची कात्रणं भिंतीवर लावलेली. सोबतच गिऱ्हाईकांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी आदेशवजा विनम्र सूचनांचा बोर्ड, तिथंच तीन प्रकारच्या भेळीचं मेनूकार्ड, लाकडी बाक, जुन्या धाटणीचं टेबल, त्यावर चिंचेच्या पाण्याचा स्टीलचा तांब्या आणि शेजारी हिरव्या चटणीचं भांडं, समोरच भेळ करण्याच्या तयारीत मश्गुल मालक, गंमत वाटली लहान असताना यायचो तेव्हाही दुकानात कामगार नव्हते आताही नाही. सगळी कामं मालक आणि कुटुंबीयच करत होते. आवडीच्या भेळेची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर ‘वाह!! ’ आपसूक तोंडातून निघाले. अजूनही ‘चव’ तशीच. यत्किंचितही बदल नाही. चिंचेचं पाणी, चटणी घेतली आणि उदरभरणात गुंग झालो. मन तृप्त झालं. तीन भेळ पार्सल घेतल्या. बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो तेव्हा तिशीतले मालक आपल्या मुलाला ‘भेळ’ बनवायला शिकवत होते.

“वा, भेळ वारसा पुढच्या पिढीकडे.. ”मी बोलल्यावर मालक फक्त हसले.

“खूप वर्षापूर्वी तुमच्या वडीलांना असंच शिकवताना पाहिलं होतं. ”तिथल्या फोटोकडे बोट दाखवत म्हणालो.

“म्हणजे तुम्ही!! ”

“इथली भेळ एक रुपयाला मिळायची तेव्हापासून खातोय. नऊवारीतल्या आजी काउंटर सांभाळायच्या आणि पांढरा पायजमा, हाफ शर्टातले वडील सगळी कामं करायचे. आता तुम्ही आणि नंतर हा छोटा.. पिढी बदलली पण चव नाही. वा!! तात्पुरतेपणाला महत्व असलेल्या काळात वारसा जपला जातोय हे महत्वाचं. छान वाटलं. खूप शुभेच्छा!! ”खुष झालेल्या मालकांनी हातात श्रीखंडाची वडी ठेवली. त्यांच्यासोबत छानपैकी सेल्फी घेऊन निघालो. जुनं जाऊन नवीन येणं हे निसर्गाचं चक्र. आयुष्यही तसंच चालू असतं पण काही परंपरा, वास्तु, ठिकाणं हे पुन्हा जुन्या काळात घेऊन जातात. भेळीच्या निमित्तानं अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. मस्त वाटलं. घरी पोचलो तरी मन आठवणीतच रेंगाळलेलं.

वास्तव विसरायला लावणारी अशी ठिकाणं असतात. जिथं पद, प्रतिष्ठा, अहं काही आडवं येत नाही. अशा ठिकाणी वेळ काढून भेट द्या. भारी वाटेल.

“दिल ढूंढता हैं, फिर वही फुरसत के रात दिन…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अशीही असते चॅरिटी‘!!!’

*”माझ्या गरिबीला कंटाळून तू मला सोडलं होतंस ना? बघ आज मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे! ” साहेबांनी भर शाळेत घटस्फोटित बायकोचा अपमान केला… पण जेव्हा मुख्याध्यापकांनी सत्य सांगितलं, तेव्हा साहेबांचा श्वासच कोंडला! *

*वाशिम जिल्ह्यातील ‘शिरपूर’ गावची ती एक जुनी जिल्हा परिषद (ZP) शाळा. सकाळची वेळ होती. अचानक शाळेच्या गेटवर पोलिसांच्या गाड्या आणि लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. वाशिम जिल्ह्याचे नवे आणि अत्यंत कडक शिस्तीचे ‘जिल्हाधिकारी’ (Collector) अविनाश पाटील साहेब शाळेच्या अचानक तपासणीसाठी (Surprise Visit) आले होते. *

अविनाश साहेब रुबाबात गाडीतून उतरले. मुख्याध्यापक आणि शिक्षक घाबरून स्वागताला धावले. साहेब एक-एक वर्ग तपासत पुढे जात होते. सातवीच्या वर्गात साहेब शिरले आणि फळ्यावर गणितं शिकवणाऱ्या शिक्षिकेने मागे वळून पाहिलं. साहेबांची पावलं तिथेच थबकली! त्यांचा श्वास एका सेकंदासाठी रोखला गेला.

ती शिक्षिका दुसरी कुणी नसून अविनाशची घटस्फोटित बायको, ‘पल्लवी’ होती! अंगावर एक अत्यंत साधी, विटलेली सुती साडी, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर एक अजीब शांतता. पाच वर्षांनंतर ते दोघे असे समोरासमोर आले होते. पल्लवीच्या हातातला खडू खाली पडला, पण तिने स्वतःला सावरले आणि ती गप्प उभी राहिली.

तो ५ वर्षांपूर्वीचा कटू भूतकाळ:

पाच वर्षांपूर्वी अविनाश पुण्यात यूपीएससी (UPSC) ची तयारी करत होता आणि पल्लवी एका खाजगी शाळेत ५-७ हजारांवर शिक्षिका होती. अविनाशचे सलग ३ प्रयत्न अपयशी ठरले होते. घरात भयंकर गरिबी होती. नातेवाईक त्याला ‘निकम्मा’ आणि ‘बायकोच्या पैशांवर जगणारा’ म्हणून हिणवायचे.

एके दिवशी पल्लवीने अचानक अविनाशसोबत भयंकर भांडण काढलं. ती जोरात ओरडली होती, “मला तुझ्या या फालतू संघर्षाला कंटाळा आलाय! तू आयुष्यात कधीच एक रुपया कमवू शकणार नाहीस. मी माझा जन्म तुझ्यासोबत गरिबीत सडवू शकत नाही! ” त्या एका अपमानाने अविनाशचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. रागाच्या भरात दोघांचा घटस्फोट झाला. अविनाश दिल्लीला गेला आणि पल्लवीने वाशिमसारख्या एका मागास गावात बदली मागून घेतली.

तो अपमानाचा प्रसंग आणि साहेबांचा अहंकार:

आज तोच ‘निकम्मा’ नवरा या जिल्ह्याचा राजा (कलेक्टर) बनून तिच्यासमोर उभा होता. अविनाशने शाळेची तपासणी संपवली आणि पल्लवीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावले.

केबिनमध्ये फक्त मुख्याध्यापक, अविनाश आणि पल्लवी होते. अविनाशने अत्यंत तुसडेपणाने आणि गर्वात पल्लवीकडे बघून म्हटलं,

“काय मॅडम? पाच वर्षांपूर्वी माझ्या गरिबीला आणि बेरोजगारीला कंटाळून तुम्ही मला सोडून गेला होतात ना? तुम्हाला वाटलं होतं मी रस्त्यावर येईन. पण आज डोळे उघडून बघा… तोच ‘निकम्मा’ नवरा आज या पूर्ण जिल्ह्याचा ‘कलेक्टर’ बनून तुमच्यासमोर बसलाय! आणि तुम्ही? तुम्ही आजही या खेड्यातल्या फाटक्या शाळेत ५० पोरांना शिकवत खितपत पडला आहात. आज तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप होत असेल! ”

पल्लवी काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे खाली वळवले आणि तिच्या गालावरून एक अश्रू खाली ओघळला. ती केबिनच्या बाहेर जायला वळली.

तो सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग:

तेवढ्यात वयस्कर मुख्याध्यापक (शिंदे सर) पुढे आले आणि त्यांनी पल्लवीला थांबवले.

“पल्लवी मॅडम, आज साहेबांना सत्य सांगाच… नाहीतर हे आयुष्यभर तुम्हाला स्वार्थी समजतील! ”

अविनाशने रागाने विचारले, “कोणतं सत्य शिंदे सर? हिने स्वतःच्या स्वार्थासाठी मला सोडलं होतं, हेच सत्य आहे. ”

शिंदे सरांचे डोळे पाणावले होते. ते साहेबांच्या टेबलाजवळ आले आणि म्हणाले,

*”साहेब, तुम्ही पुस्तके वाचून कलेक्टर झालात, पण माणसं वाचायला पार विसरलात! पाच वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यातून दिल्लीला गेलात, तेव्हा दिल्लीच्या ‘संकल्प आयएएस (IAS) अकॅडमीची’ दीड लाखांची फी आणि तुमच्या दर महिन्याच्या मेसचे (जेवणाचे) ४ हजार रुपये कोण भरायचं… याची तुम्ही कधी चौकशी केली का? ”

अविनाश अवाक् झाला. “ते… ते तर मला एका ‘चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून स्कॉलरशिप मिळत होती. ”

शिंदे सर अत्यंत जड आवाजात म्हणाले,

*”साहेब… ती कोणतीच स्कॉलरशिप नव्हती! या पल्लवी मॅडमने बँकेतून ५ लाखांचं पर्सनल लोन काढलं होतं आणि एका ओळखीच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या दर महिन्याला गुपचूप तुमच्या दिल्लीच्या क्लासची फी भरायच्या!

तुमच्या नातेवाईकांचे टोमणे आणि पैशांची तंगी तुमच्या ध्येयाच्या आड येत होती. तुमचा स्वाभिमान बायकोचे पैसे कधीच घेणार नाही, हे पल्लवी मॅडमला माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतःला ‘स्वार्थी’ आणि ‘वाईट बायको’ ठरवून तुमच्याशी भांडण केलं… जेणेकरून रागाच्या आणि सूडाच्या आगीत का होईना, पण तुम्ही दिल्लीला जाऊन कलेक्टर बनाल! साहेब… या माऊलीने स्वतःच्या अंगावर साधी नवी साडी घेतली नाही, एक वेळ उपाशी राहिली, पण या फाटक्या शाळेत राहून तिने तुमच्या यशाचा महाल उभा केलाय! “*

अहंकाराचा शेवट आणि पश्चात्तापाचे अश्रू:

हे शब्द ऐकताच कलेक्टर अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली! त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ज्या खुर्चीवर बसून तो पल्लवीचा अपमान करत होता, ती खुर्ची तिच्याच रक्ता-घामातून बनली होती!

अविनाश वेड्यासारखा खुर्चीवरून उठला आणि त्याने कोणताच विचार न करता, त्या जिल्हा परिषदेच्या केबिनमध्ये थेट पल्लवीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला!

तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला… “पल्लवी… मला माफ कर! मी नीच आहे. माझ्या यशाच्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं. तू माझं घर नाही सोडलंस, तू स्वतःला जाळून माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास! मला शिक्षेचा अधिकार दे, पण मला सोडून नको जाऊस… ”

पल्लवीने रडत त्याला उठवले. त्या दिवशी एका कलेक्टरचा सगळा रुबाब आणि माज एका साध्या झेडपी (ZP) शिक्षिकेच्या त्यागासमोर कायमचा मातीत मिसळला होता. सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचा असा विजय झाला होता, ज्याने जिल्ह्याच्या राजालाही गुडघे टेकायला भाग पाडले!

आई-वडील आणि बायकोच्या पडद्यामागच्या त्यागाला विसरून, स्वतःच्या यशाचा माज असणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा*

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

गूंजी  हिंदी विश्वमें 

स्वप्न हुआ साकार 

राष्ट्रसंघ के मंच से 

हिंदी की जयकार!

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा. ए. सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.

देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कूच  है

कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिर से दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट सकते

है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल. ’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले. अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस “गुड गव्हर्नन्स डे” अर्थात “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

साळिंदराचं कोडं (Porcupine Dilemma)

जवळ यायचं की लांब राहायचं? तुम्हाला वाटतं की प्रेमात किंवा मैत्रीत जितकं जास्त जवळ जाल, तितकं जास्त सुख मिळेल? तर मग तुम्ही स्वतःला एका मोठ्या संकटात ढकलत आहात.

खरं तर, माणसांच्या बाबतीत ‘अति जवळीक’ हेच दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. नात्यातलं अंतर कमी करणं म्हणजे आनंदाची खात्री नसून, तो दुखापतीला दिलेलं आमंत्रण असू शकतं.

१८५१ सालची गोष्ट आहे… आर्थर शोपेनहॉवर नावाच्या एका जर्मन तत्त्वज्ञानं जगाला एक अजब विचार दिला. याला ‘पोरक्युपाइन डिलेमा’ किंवा ‘साळिंदराचं कोडं’ म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल, माणसाच्या आयुष्याचा आणि काट्यांनी भरलेल्या साळिंदराचा काय संबंध? ऐका तर, हा संबंध तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्याशी आणि तुटणाऱ्या नात्यांशी जोडलेला आहे!

कल्पना करा, की कडाक्याची थंडी पडलीय. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीनं कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवीय.

साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचू लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन्हा जवळ येतात, आणि पुन्हा तेच काटे टोचतात.

हा खेळ असाच सुरू राहतो. जोपर्यंत त्यांना एक असं ‘योग्य अंतर’ सापडत नाही, जिथं त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत.

माणसाचंही अगदी असंच असतं… आपल्याला एकटं वाटतं, एकाकीपणाची भीती वाटते, म्हणून आपण नात्यांच्या शोधात असतो. कुणाच्या तरी जवळ जावंसं वाटतं, कुणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं…

परंतु जसं आपण कुणाच्या तरी खूप जवळ जातो, तसे समोरच्याचे ‘काटे’ आपल्याला टोचू लागतात.

हे काटे म्हणजे काय? तर समोरच्याचे स्वभावदोष, त्यांच्या सवयी, त्यांचा अहंकार किंवा त्यांचे विचार. आपण जितके जवळ जातो, तितके त्यांचे हे दोष आपल्याला स्पष्ट दिसू लागतात आणि मग सुरू होतो संघर्षाचा प्रवास… आणि आपल्याला वाटतं की, यापेक्षा लांब राहिलेलं बरं होतं!

आज  २०२६ मध्ये, जेव्हा आपण डिजिटल जगात एकमेकांशी २४ तास जोडलेले आहोत, तेव्हा हा ‘साळिंदराचा पेच’ अधिकच गंभीर झालाय.

अलीकडच्या काही संशोधनांतून असं समोर आलंय की, सोशल मीडियामुळं आपण लोकांच्या व्हर्च्युअली इतके जवळ गेलो आहोत की, त्यांच्या खाजगी आयुष्यातले ‘काटे’ आपल्याला सतत टोचत राहतात. त्यामुळं आजकाल त्यामध्ये लवकर ‘बर्नआउट’ जाणवतोय.

शोपेनहॉवरनं यावर एक जालीम उपाय सांगितला होता… तो म्हणजे, ‘सन्मानजनक अंतर’ (Polite Distance).

नात्यात पूर्णपणे विरघळून जाणं किंवा पूर्णपणे लांब जाणं, या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. सुखी व्हायचं असेल तर दोन साळिंदरांसारखं असं अंतर राखायला हवं, जिथं प्रेमाची ऊबही टिकून राहील आणि स्वाभिमानाला धक्काही लागणार नाही.

अनेकदा आपण प्रेमाच्या नादात समोरच्याच्या वैयक्तिक अवकाशात (Personal Space) शिरतो, आणि मग तक्रार करतो की, नात्यात गुदमरल्यासारखं होतंय.

थांबा, अजून पुढं ऐका… ही समस्या फक्त जोडप्यांची नाहीये. आई-वडील आणि मुलं, जिवलग मित्र किंवा ऑफिसमधले सहकारी, या सगळ्यांना हे साळिंदराचं तत्त्व लागू पडतं.

याचा अर्थ असा नाही की जवळ जाऊच नका… याचा अर्थ असा आहे की, डोंगर चढताना त्याचे दगडधोंडे टोचणारच, हे स्वीकारून योग्य अंतर राखा. शिष्टाचार आणि मर्यादा या नात्यातल्या भिंती नसून, ती नात्याला वाचवणारी कुंपणं आहेत.

आजच्या या धावपळीच्या आणि ‘ओव्हर-शेअरिंग’च्या जगात तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपासून किती अंतर राखून आहात? विचार करा, तुम्ही उबेसाठी जवळ जाताय की एकमेकांना टोचण्यासाठी?

शेवटी प्रश्न उरतोच… आपण उबेसाठी टोचून घ्यायला तयार आहोत की थंडीत कुडकुडत एकटं राहायला? की आपण ते सुवर्णमध्य गाठणारं ‘अंतर’ शोधण्यात यशस्वी झालो आहोत…?

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ७ – अडकित्ता -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ७ – अडकित्ता – ☆ विभावरी कुलकर्णी

जुन्या वडिलोपार्जित घरातील अडगळ काढली की खूप वेगळ्या न बघितलेल्या वस्तू बघायला मिळतात. आणि मोठ्या माणसांच्या जुन्या आठवणी जागृत होतात. त्यांच्या कडून त्या आठवणी, वस्तूंचे महत्व व त्याच्याशी निगडित आठवणी ऐकायला खूप मजा येते. याच सामानात एक खूप जुनी पत्रिका सापडली. त्यातील एक वाक्य वाचले, पान सुपारी समारंभ! हे वाचून मोठीच गंमत वाटली. घरातील मोठ्या व्यक्तींना त्याचा अर्थ विचारल्यावर लक्षात आले. हा समारंभ म्हणजे सध्याचे रिसेप्शन! मग एक वस्तू दिसली. ती म्हणजे अडकित्ता! आमच्या पिढीने तो ओझरता तरी पाहिला आहे. पण आता कोणालाच माहिती नाही. मग आजीशी संवाद करुन माहिती मिळवली.

अडकित्ता ही महाराष्ट्राच्या आणि भारतीय परंपरेतील एक महत्त्वाची वस्तू आहे. सुपारी कातरण्यासाठी वापरले जाणारे हे एक कल्पक साधन आहे.

​अडकित्ता हे लोखंड, पितळ किंवा स्टीलपासून बनवलेले एक कात्रीसारखे साधन आहे. यात एका बाजूला धारदार पाते असते आणि दुसऱ्या बाजूला सुपारी धरण्यासाठी खोबणी असते.

​अडकित्त्याचा उगम नेमका कधी झाला याचे ठोस पुरावे नसले, तरी भारतात सुपारी खाण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आहे.

​प्राचीन काळी सुरुवातीला सुपारी फोडण्यासाठी दगड किंवा साध्या सुऱ्याचा वापर होत असे. परंतु सुपारी कडक असल्यामुळे ती कातरण्यासाठी हळूहळू ‘लिव्हर’ (lever) तत्त्वावर आधारित अडकित्त्याचा शोध लागला.

​पेशवेकाळात आणि मोगल काळात अडकित्ता अधिक कलाकुसरीचा होऊ लागला. त्यावेळी हे केवळ एक साधन नसून श्रीमंतीचे लक्षण मानले जाई.

महाराष्ट्रामध्ये अंजर्ले (कोकण) आणि जळगाव येथील अडकित्ते खूप प्रसिद्ध होते. हे प्रामुख्याने लोहार काम करणाऱ्या कारागिरांकडून हाताने तयार केले जात.

​अडकित्ते त्यांच्या आकार आणि कामावरून विविध प्रकारांत विभागले जातात.

लोखंडी अडकित्ता

हे सर्वात मजबूत आणि दररोजच्या वापरासाठी असतात. यांची धार बराच काळ टिकते.

पितळी अडकित्ता

हे दिसायला आकर्षक आणि पिवळसर रंगाचे असतात. यावर अनेकदा कोरीव काम असते.

कोरीव/नक्षीदार अडकित्ता

यावर प्राणी (सिंह, पोपट, घोडा) किंवा फुलांच्या वेलींची नक्षी असते. हे प्रदर्शनासाठी जास्त वापरले जातात.

सजावटीचे अडकित्ते

काही अडकित्त्यांना चांदीचा मुलामा किंवा मोत्यांची सजावट असते, जे प्रामुख्याने लग्नसमारंभात वापरतात.

दुधारे/विशिष्ट रचनेचे अडकीत्ते

काही अडकित्ते सुपारीचे चिप्स पाडण्यासाठी तर काही जाड तुकडे करण्यासाठी बनवलेले असतात.

महाराष्ट्रातील नवापूर आणि अहमदनगर भागातील जुन्या पद्धतीचे अडकित्ते त्यांच्या मजबूतीसाठी आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. आजच्या काळात पाकिटातील तयार सुपारीमुळे अडकित्त्याचा वापर कमी झाला असला, तरी त्याचे पारंपरिक महत्त्व आजही टिकून आहे.

​खिशाचा (छोटा) अडकित्ता

प्रवासात सोबत ठेवण्यासाठी अतिशय लहान आकाराचे अडकित्ते.

​अडकित्त्याचे मुख्य आणि दुय्यम उपयोग म्हणजे  ​सुपारी कातरणे हा याचा मुख्य उपयोग आहे. कडक सुपारीचे सुबक तुकडे किंवा चकत्या (काचऱ्या) करण्यासाठी याचा वापर होतो.

पूर्वीच्या काळी अडकीत्त्याच्या साहाय्याने सुपारी विविध प्रकारे कातरता येणे हे एक कौशल्य समजले जायचे. अशी व्यक्ती प्रशंसेला पात्र असायची.

​तांबूल/विडा बनवणे पाहुणचारात विडा देताना अडकित्त्याने सुपारी कातरणे ही एक पद्धतशीर कला मानली जाते. प्रवासामध्ये बऱ्याच व्यक्तींजवळ पानसुपारीचा डबा असायचा आणि त्यात अडकित्ता हमखास असायचा.

​धार्मिक कार्य लग्नामध्ये किंवा मुंजीत ‘अहेरा’चा भाग म्हणून किंवा पूजेच्या साहित्यात अडकित्ता ठेवला जातो.

एक शस्त्र म्हणून

जुन्या काळात प्रवासात स्वसंरक्षणासाठी किंवा लहान कामांसाठी चाकू म्हणूनही अडकित्ता जवळ बाळगला जात असे.

​आजच्या काळात अडकित्त्याचा वापर कमी झाला असला, तरी अनेक घरांमध्ये तो एक ‘अँटिक’ (Antique) किंवा सांस्कृतिक वारसा म्हणून जपून ठेवला जातो.

अडकित्ता म्हंटले की आमच्या लहानपणीचे एक आजोबा आठवतात. त्यांच्या हातात ते निवांत असले की, नेहेमी अडकित्ता असायचा. आता मात्र हा अडकित्ता एखाद्या संग्रहालयात बघायला मिळतो. आणि आपले गतकाळातील वैभव सांगत असतो.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”निर्णय” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “निर्णय” ☆ संध्या बेडेकर ☆

I am not afraid to start again.

Restart is always better than regret.

लवकरच भाऊंजींचा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे.

हा समारंभ भव्य दिव्य करायचा, असा निश्चय ताईंच्या मुलांनी केला. त्यानुसार अमेरिकेत बसून त्यांनी प्लानिंग केले, बाबांच्या सर्व जवळच्या मित्र मैत्रिणींना whats app वर पत्रिका पाठवली, आग्रहाचे आमंत्रण दिले.

भाऊजी म्हणाले,

अरे! मी सहजच एक पुस्तक लिहिले. त्यात खूप काही भारी असं नाहिये. खूप वर्षांनी रिकामा वेळ मिळाला. आणि मुख्य म्हणजे दुसर काही भारी करण्यासारखी परिस्थिती नव्हती. अरे! एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची गरज नाही.

लोक पुस्तक बघून/ वाचून म्हणतील 

खोदा पहाड, निकली चुहिया.

आयुष्याचा मोठा काळ नोकरी करण्यात गेला. त्या काळात घर, संसार नोकरी मुलांची देखभाल, त्यांचे शिक्षण हेच लक्ष्य होते. ती माझी जबाबदारीच होती.

माझी नोकरी चांगली होती. नोकरी नंतर हातात पैसाही होता/आहे. माझी जगभर/ भारतभर फिरायची हौस मी पूर्ण केली. अजून फिरायचे ही होतेच.

रिटायर्डमेंट नंतर आपला Active period किती असेल? 5 वर्ष 10 वर्ष हे आपल्याला माहीत नसतं. तेंव्हा माझा हा पीरियड मी छान utilize केला.

नंतर अचानक एका annual checkup मध्ये या सर्व गोष्टींवर फुल स्टॉप लागला.

यावेळेस आमचा आस्ट्रेलिया चा टूर ठरला

Tickets booking झाल. तेथूनच अमेरिकेत मुलांकडे जायच, हा ही प्रोग्राम ठरला. असा एक लांबलचक कार्यक्रम निश्चित झाला.

आता 6/8 महिने दुसर्या देशात रहायचे म्हणजे, वाढत्या वयाबरोबर थोडे टेंशन येतच. टूर तयारीत दूर दूर पर्यंत विचार करून, शरीराच्या प्रत्येक अवयवाचा विचार करून, संभावित आजापणांची यादी आणि त्यावर औषध डोॅक्टरकडून लिहून घेणे, हा तयारीचा अति आवश्यक भाग असतो. म्हणजे कपडे कमी चालतात पण औषध नाही. बाहेरच्या देशात आजारी पडण हे खूप खर्चिक काम आहे.

तसही डोक्टरच्या तोंडून 

तुम्ही बिनधास्त जा काही प्रॉब्लम नाही हे शब्द ऐकले की उत्साह आणि हिम्मत दोन्ही वाढते. annual checkup is must.

खरतर हेच ऐकायला म्हणून आज चेक अपला गेलो.

ECG बघून डोॅक्टर म्हणतात,

देशमुख सर, यावेळेस जरा कठीनच वाटतय. जायलच हवय का अमेरिकेला?

तुमचा ECG जरा…

आणि आमच्या Active life मध्ये speed breaker आला. त्या speed breaker वर white stripes आम्हाला काही दिसत नव्हत्या. म्हणजे तस काही जाणवत नव्हत. काही ध्यानीमनी पण नव्हत. जशी आपली कार speed breaker वर पांढर्या रेघा नसल्या की jump करते ना, तसच काहीस डोॅक्टरांच बोलण ऐकून आमच झाल.

आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतच राहिलो.

क्षणात मनात अनेक प्रश्न? आज तर संपूर्ण आयुष्य उलट-पुलट झाल की काय? अस वाटल. दोघांच्या नजरेत काळजी, अनेक प्रश्न, भांबावलेल्या अनेक विचारांचा गोंधळ, बरोबर एकमेकांना सांभाळायचा प्रयत्न, स्पष्ट दिसत होता.

खरतर या विषयावर सर्व जेष्ठांनी कधी न कधी चर्चा केलेली असते. आता वय झालय. छोटे मोठे सिग्नल मिळतही असतातच. कोणा दुसर्याचे आजारपण बघून / ऐकून आपल्या मनात अनेक विचार येतातच.

पण प्रत्यक्ष परिस्थितीला जेंव्हा सामोरे जाव लागत, तेंव्हा मात्र mental status काही वेगळच असत. विचारांच द्वंद चालू होत. विचारांचा कोणता धागा पकडावा? म्हणजे मन शांत होईल हे कळत नाही.

बराच वेळ वरवरून शांतता दिसत असली तरी, आत भयंकर वादळ आलेल असत।. डोळ्यातील अश्रू रोकण्याचा निश्फळ प्रयत्न चालू असतो.

भाऊजी म्हणाले,

अग! चांगलच झाल ना. वेळेवर कळल. आजकाल advance टेक्नोलॉजी आहे. सर्व ठीक होईल. आधी टूर कंपनीला आणि मुलांना मी कळवतो. नंतर माझ्या मित्राला जोशीला कळवतो. आता त्याची मदत लागणारच आहे. भाऊंजींनी परिस्थितीला normal करायचा प्रयत्न केला. तसही कुठून तरी सुरवात करण आवश्यकच होत.

त्यानंतर डोॅक्टर च्या visits, second opinion, अनेक Tests, मुलांचे फोन, त्यांची काळजी, भारतात यायची त्यांची धडपड/घाई. हे सर्व सांभाळायच होतच.

शेवटी 

आम्ही बघतो, गरज पडली तर तुम्हाला सांगू, मग या.  यावर बोलण थांबावाव लागल.

म्हणतात ना,

Life does not go where you plan, it goes where it is written to be.

Anyways हळुहळु नवीन उद्भवलेल्या परिस्थितीशी समझौता झाला.

भाऊंजींची treatment सुरू झाली. दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या.

आता बोलण्याचे विषय मनात येणारे विचार वेगळेच होते. पैशाचे टेंशन जरी नसले तरी मनात हिशेब होतच होता.

बरोबरच महत्वपूर्ण कामांची लिस्ट ही होतीच. तेही पूर्ण करायचे आहे.

म्हणतात ना,

Situation will teach you the real meaning of life.

आता restrictions, limitations ही आलेच. औषधपाणी वाढलय. जीवन शैली बदलायची गरज आहे.

पुन्हा एकदा आयुष्याचे alignment  करण आवश्यक आहे.

एक Pause घेऊन दोघांनी आपले दैनंदिन जीवन डोॅक्टर च्या सल्ल्याने

Rethink, Redesign Reorganize करून Reset केले.

आम्ही दोघे त्यांच्या supporting team मध्ये होतोच. तरी त्यांची लढाई त्या दोघांनाच लढायची होती.

बरोबर आहे

Every pain gives you a lesson, and every lesson changes the person. .

आज ताईच्या नजरे समोरून मागचा दीड दोन वर्षाचा काळ सिनमाच्या फ्लॅश बॅक सारखा गेला.

ताई म्हणाली,

या आधी खूप फिरत होतो. खूप पैसे खर्च केले. आज त्या आठवणी enjoy करतोय.

आज कुठेतरी वाचलेल एक वाक्य आठवल,

When you r travelling, you r not spendig money, but you r buying memories.

आज पटलय.

आता भाऊजींचा morninng walk, थोड्याबहूत exercises सुरू झाल्या.

मनातील चलबिचल, गोंधळ, अचानक बदलेल आयुष्य. अस्वस्थता यावर लगाम लावायला म्हणून, आपल्या विचारांना दिशा द्यायच्या उद्देशानने भाऊंजीनी लिहायला सुरवात केली आणि एका छान पुस्तकाचा जन्म झाला.

मी काल, आज आणि उद्या

खरय 

Things will not go as planned, but sometimes even unplanned things can be beautiful.

वादळातून मार्ग काढायला शिकावेच लागेल. वर्तमान परिस्थिती चा विचार करून भविष्याची रूपरेखा आखण ज्याला जमत त्यालाच आयुष्याचे गणित समजलंय अस म्हणता येईल.

आजारपण कोणी बाजारात विकत घ्यायला जात नाही. पण नशीबात जे आहे ते मान्य करावेच लागेल. आणि प्रसंगानुसार निर्णय पण घ्यावेच लागतील.

म्हणतात ना

जिंदगी किस्मतसे चलती है साहब,

दिमागसे चलती तो बिरबल बादशाह होता.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘अभिजात संगीत’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘अभिजात संगीत’ ☆ श्री दिवाकर बुरसे

संगीत ही खरे तर स्वर्गीची कला!

सृष्टी निर्मितीसवेच ब्रह्मदेवाने हिची निर्मिती केली. नारद, नंदी, भरत आदि महामुनींनी अत्यंत कठीण परिश्रम करून ती भूतलावर आणली, आम्हा सामान्य मानवांना उपलब्ध करून दिली.

केवळ सात सुरांचा सारा खेळ!

या सप्त-सूरसरितांच्या संगमातून साकारला हा संगीताचा अथांग रत्नाकर. त्यात किती राग, किती रागिण्या. कशी त्यांची रूपे, कसे त्यांचे रंग, गंध, आकार… साजिरे गोजिरे!

सात सूर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनंत राग – रागिण्या.

… यांच्यातून साकारते एक नादब्रह्म! म्हणूनच पूर्वीच्या वाग्गेयकारांनी, ऋषिमुनींनी या संगीताची प्रतिष्ठापना केली परमेश्वराच्या पवित्र मंदिरातून.

… पण खरं तर हे सूर चराचर व्यापूनही चार अंगुळेभर उरलेच आहेत, अगदी ब्रह्मतत्वासारखे! म्हणूनच ऋषीमुनींनी –

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मना ।

नादब्रह्म तदानन्दमद्वितीयमुपास्महे ॥

– – असे म्हणत त्याची उपासना केली. ईश्वरप्राप्तीचा एक वेगळा मार्ग त्यांना गवसला.

स्वरमाध्यमातन उभे राहणारे हे स्वरविश्व अमूर्त अरूप आहे. आपल्या परीने ज्याने त्याने ते समजून, जाणून घ्यायचेय, अनुभवायचेय.

– – ज्याला ते जसे भावले तसे त्याने ते व्यक्त केले. कुणी शिल्पातून, कुणी रंगरेषांच्या तर कुणी शब्दांच्या माध्यमातून!

मी सुद्धा एक असाच प्रयत्न केलाय…..

अभिजात भारतीय संगीताची उत्पत्ती…

(Evolution of Indian Classical Music)

*

वाद्य, नृत्य अन् गीत मिळोनी होते संगीत कला 

ही स्वर्गीची ठेव लाभली दैवे मनुजाला।। ध्रु।। 

*

प्रथम दिले ब्रह्म्याने संगीत भोळ्या सांबाला 

त्याने दिधले सरस्वतीला, तिने नारदाला 

यक्ष, किन्नरा, गंधर्वांना, नंदी अन् भरताला 

तिथून पातले भूलोकाला, अम्हा मानवाला।।१।। 

*
निद्रा मुद्रेतून उमेच्या “रुद्रवीणा” जन्मली 

डौलदार चालीतून तैशी “नृत्यकला” प्रकटली 

कृद्ध शिवाच्या पद घातातुनी “तांडव” आकारले

चार दिशांतुनी चार राग हे तसेच निर्मियले।।२।। 

*

पूर्व दिशेतुनि उठला “भैरव”

” हिंडोलाचे” पश्चिम वैभव 

दक्षिणेतूनि “दीपक” उमटे

“मेघ”, “श्री”चे कौतुक वाटे

उमे निर्मिला ” कौशिक” पश्चात 

संगीत हे जणू वेदच साक्षात! ।।३।। 

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४. ☆ प्रा.भारती जोगी ☆

एमिली शेंकल

समिधाच सख्या या!! …

सन १९४५, ऑगस्ट महिना, संध्याकाळ ची वेळ! ती स्वयंपाकघरात नेहमीसारखी कामात… आणि अचानक रेडिओ वर ऐकायला येते… ‘ सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू! ‘

 ती हळूच उठते, बेडरूममध्ये जाते, जिथे तिची जेमतेम ३ वर्षे वयाची मुलगी झोपलेली असते. बिछान्याजवळ गुढगे टेकून बसते आणि आयुष्यात पहिल्यांदाच मनाने कोसळते… अश्रूंचा बांध फुटतो, मनसोक्त रडते. जिच्या दृढतेसाठी, साहसी स्वभावासाठी तिचा पती बाघिन म्हणत असतो… ती रडत होती, शक्तीच संपल्या सारखी!!

 ती होती… एमिली शेंकलकॉंग्रेस योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पत्नी!!

 एमिली च्या डोळ्यांपुढून सगळा जीवनपट सरकू लागला. आठवला तिला तो दिवस… सुभाषबाबूंच्या परिचयाचा!

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरूंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली, ब्रिटिश सरकारने उपचारासाठी त्यांना व्हिएन्ना मध्ये ठेवले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा देशाचाच विचार करणा-या सुभाष बाबूंनी, भारतीय युवकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्रित करण्याचं ठरवलं. द इंडियन स्ट्रगल या नावाने पुस्तक लिहायला घेतलं. त्यासाठी टाइपिस्ट ची गरज भासली. आणि मुलाखतीत निवड होऊन एमिली शेंकल चा सुभाषबाबूंच्या आयुष्यात प्रवेश झाला. हळूहळू रोजच्या भेटीतून… सौम्य स्वभाव, हसतमुख, स्पष्टवक्ती, निस्वार्थी, कामाला वाघ… अशा एमिली कडे सुभाषबाबू आकर्षित झाले. देशप्रेम अग्रस्थानी असलेल्या मनात… एका उदात्त अशा प्रेमाने अलगद प्रवेश केला. आजपर्यंत घरच्यांना लग्नासाठी नेहमीच नकार देणारे दोघेही… नकळतपणे गुंतले.

२६ डिसेंबर १९३७ या दिवशी… एमिली च्या वाढदिवशी… दोघांनी अखेर गुप्त विवाह केला. आणि शेवटपर्यंत तो गुप्तच ठेवला. कारण सुभाष बाबूंसाठी देश सर्वोपरि होता. हे एमिली पूर्णपणे जाणून होती. म्हणूनच उदात्त हेतू आणि एक शोकांतिका असलेलं नातं तिने जोडलं. उदात्त हेतू ला उदात्त अशी साथ देऊन त्यांची खरी हमराज बनली. तिनं सुभाष बाबूंच्या संघर्षाला समजून घेतलं. त्या नात्यात एमिली ने अदम्य साहस, सर्वोच्च गरिमा आणि उच्च त्यागाची भावना… हे गुण पेरले, रूजवले.

लग्नबंधनात बांधल्या नंतरही तिने सुभाषचंद्र ना मात्र आपल्या प्रेमात बांधून न ठेवता… आजाद ठेवलं.

सुभाषचंद्र जरी एक सैनिक, एक योद्धा, एक कूटनीतिचा महारथी होते तरीही… या सगळ्याच्या आंत/आड आणखी एक सुभाष आहे… हे एमिली ने ओळखलं होतं. आणि फक्त त्या मौन स्नेहातलं एक आगळं-वेगळं प्रेम, ते जपणं तिनं ओळखलं. त्यामुळे च तर… १२ वर्षांच्या लग्नाच्या आयुष्यात फक्त ३ वर्षे सहवास लाभला तरीही एमिली ने हे… दुराव्यातलं दृढ नातं ही जपलं! कधीच दुरावू दिलं नाही. सुभाषबाबू आणि तिच्यातलं हे अनोखे, गुप्ततेतले पती-पत्नीचं नातं, हे स्नेहबंध… ख-या अर्थाने बद्ध झाले ते… सुभाषबाबूंनी विविध ठिकाणाहून एमिली ला पाठवलेल्या पत्रांमध्ये! ही पत्रे त्यांच्या मर्मबंधातली ठेव बनली.

पण ही पत्रे… प्रेम पत्रे होती कां? की दोन जीवांचं तादात्म्य पावणं? एकमेकांसाठी संबल… सहयोगी, आधार, ख-या अर्थाने, सहचर बनंत, दूर राहूनही एकमेकांना भेटणं, जपंत रहाणं होतं ते! नात्यातील संबोधने सुद्धा बघा… ते फ्राऊलिन शेंकल ने सुरूवात करीत, आणि तिच्या पत्राची सुरूवात असे.. श्री बोस!!

 त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात… राजनीती, विविध पुस्तके संगीत, विनोद, आध्यात्मिकता, आणि एकमेकांच्या नाजूक तब्येतीची चौकशी… हा असे… पत्रातल्या मायन्याचा आयना!!!

सुभाष बाबूंनी एकदा आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणा-या… गोएथे या कवीच्या, कालिदासाच्या शाकुंतल मधल्या अनुवादित ओळी शोधायला सांगून… अप्रत्यक्षरित्या भावना प्रकट केल्या. त्या ओळी अशा…

क्या तुम युवा वर्ष के फूलों और उसके पतन के फूलोंको पसंद करोगे?

और वह सब जिससे आत्मा आनंदित हो, तृप्त हो…

 क्या तुम स्वर्ग और पृथ्वी को एक ही नाम से मिला दोगे?

 हे, शकुंतले, मैं तुम्हारा नाम लेता हूं!

बस्स्… हीच ती मनतळातली जाणीव… जिच्या बोधावर एमिली ने नंतरंचं संपूर्ण आयुष्य एक… समर्पित पत्नी, एक आदर्श माता, वृद्ध आईची काठी, लेक अनिता ची सखी, बनून स्वाभिमानाने, स्वबळावर व्यतित केलं.

एमिली ने आपल्या लेकीला… एक अतिशय बुद्धीमान आणि शैक्षणिक रूची असलेली स्त्री बनवलं. एक अर्थशास्त्रज्ञ बनली तिची लेक. विश्वविद्यालयात प्रोफेसर झाली. प्रोफेसर मार्टीन फाफ यांच्या शी विवाह बद्ध झाली.

एमिली… एक आदर्श पत्नी च नाही, तर एक आदर्श माता ही सिद्ध झाली. तिने आपल्या लेकीत… पित्याच्या नावाने मोठी न होता, स्व प्रयत्नाने आपलं आयुष्य उभं करण्याचे, आणि स्व कर्तृत्वाने मोठं होण्याचे, जगाला काहीतरी सकारात्मक देण्याचे संस्कार रूजवले!!!

अशी ही एमिली… जी एका महानायका च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्याच्या नंतर ही तितक्याच खंबीरपणे, स्वाभिमानाने, पतीच्या परिवाराकडून भारतात येण्याचा आग्रह नाकारून, एका छोट्या टेलिग्राफ ऑफिस मध्ये, कमी पगारावर नोकरी करून, वृद्ध मातेचा सांभाळ करंत, लेकीला सत्याचा सामना करणारी लढवय्यी बनवंत… शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनातल्या नायका ची आणि जनातल्या महानायका ची मूक नायिका बनून जगली.

या मौन, मूक संवेदनेला, देश प्रेमासाठी राखरांगोळी करणा-या त्या त्यागकुंडातील राखेच्या कणातला एक भाग बनणारी ही… समिधा च ना?

– लेख क्र. ४.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares