मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Out of the box..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Out of the box.. ☆ संध्या बेडेकर ☆

” काही लोक ‘ out of the box ‘ विचार करतात. “

आज खूप दिवसांनी देशपांडे आजी आजोबा भेटले. माझे आवडते आजी आजोबा आहेत ते. नेहमी उत्साहात असतात. अगदी ‘full of energy ‘. मागच्या वर्षीच पंचाहत्तरी झाली त्यांची.

त्यांचे घर म्हणजे, आजी आजोबा, अजय अनिता म्हणजे त्यांचा मुलगा सून व नातु अनय. अजय अनिता दोघे ही नोकरी करणारे व अनय दुसरीत आहे. शाळेनंतर तो ‘डे केअर ‘ ला जातो. येताना अनिता त्याला बरोबर घेऊन येते. आजी आजोबांना दिवस भर बिझी ठेवायचा, अजिबात शांत बसत नाही अनय. म्हणूनच अजय अनिता ने त्याला ‘डे केअर ‘मधे ठेवायला सुरुवात केली.

या घरची संध्याकाळ म्हणजे, अनिता ची धावपळ असते. स्वयंपाक, अनय चा अभ्यास, आजी आजोबांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे औषधपाणी, अनयची दुसऱ्या दिवशीची तयारी, सकाळच्या डब्याची तयारी, त्यात येणारे जाणारे असतातच. आजी जेवढं जमेल त्यापेक्षा जास्त मदत करतातच. मुख्य म्हणजे दोघे ही जेष्ठ अजिबात घाई गडबड करत नाही. पण अनिता ची ओढताण बघून त्यांना वाईट वाटत. बायकांची नोकरी म्हणजे ‘double front ‘ वर काम करावे लागते. घर आणि ओफिस. दोन्ही काम सोप्पी नाहीत. अजय ही मदत करतो तिला. सकाळी मावशी येतातच. पण घरच्या बाईला लक्ष द्यावेच लागते.

आज शनिवार, अजय अनिता घरीच आहेत. आज आजी आजोबा कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आहेत. आजोबा म्हणाले, अजय !! आज तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला की बोलू आपण.

अजय अनिता आपापली कामे पूर्ण करून येऊन बसले. आजोबा म्हणाले, मी काय म्हणतो, ते शांतपणे ऐका.

अरे!! आम्ही दोघे वृध्दाश्रमात रहायला जायचा विचार करत आहोत. आजोबा थेट विषयावरच आले. एवढं ऐकलं, आणि अजय तर उठून चाललाच गेला. अनिता ढसाढसा रडू लागली. आई!! माझी काही चूक झाली का ? मला माफ करा. तिने आपल्या सासूबाईंचा हात हातात घेतला. तिला रडू आवरत नव्हते.

अजय पुन्हा आला काय झाल बाबा ? असं का म्हणाला तुम्ही ? काय चाललंय तुमच्या मनात ? हे असे विचार कसे आले तुमच्या मनात ? कोणी कान भरले का तुमचे ? एका नंतर एक प्रश्नांची झडीच लावली त्याने ? त्याच्या डोळयात पण पाणी आले होते आजी पण रडत होत्याच.

आजोबा मात्र शांत होते. अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अरे बाबा!! असं काही नाही. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. खूप आनंदात व आरामात आहोत. तुमचे रोजचे काम बघुन आम्हीच थकतो.

सध्या तू आणि अनिता वेगळ्याच फेज मधुन जात अहात. करीयर पण बघायचं आहे. अनयकडे पण लक्ष द्यायचे आहे. आमची पण खूप काम असतात. आम्हाला दिसतय तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि आम्हाला आमचा वेळ कसा काढायचा??? हे कळत नाही.

आजोबा पूढे म्हणाले, अरे !! एखादे छानसे वृध्दाश्रम बघ. अगदी छान सोई असलेले. आम्ही तेथे राहू. आम्हाला पण मित्र मैत्रिणी भेटतील. अरे !! आजही तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. तुमचा आनंद, तुमची तब्येतही महत्वाची आहे. आणि नवीन पिढी ला पण घडवायचे आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, ते लक्षात घे व विचार कर. आणि हो, लोक काय म्हणतील ? याचा विचार करायचा नाही. ते येतात का अनिता ला मदत करायला ? अनयला शिकवायला ?

बघू, म्हणून‌अजय ऊठुन गेला आज जेवताना डायनिंग टेबलावर सर्व शांत होते.

रविवारी सकाळी आजोबांनी अजयला चौकशी करायला सांगितले. व स्वतः येऊन बसले. अजय ने नेटवर चेक करायला सुरुवात केली. अजूनही विचार करा. असं सारखं म्हणत होताच तो.

शेवटी एक वृद्धाश्रम मनाजोगे वाटले. तेथे जाऊन बघीतले. अजयने खूप चौकशी केली. नियम वाचले. खोली बघीतली. सोई बघीतल्या. डॉक्टर ची सोय आहे. मनोरंजन, जेवण हे सर्व बघून खात्री झाल्यावरच आजी आजोबा तेथे रहायला गेले. हे सर्व प्रत्येकासाठी खूप कठीण होते. पण आजोबांनी निर्णय घेतलाच होता.

आता प्रत्येक ‘weekend ‘ला अजय अनिता अनयला घेऊन आजी आजोबांना भेटायला जातात. बरोबर दोघांची औषध, फळ व इतर त्यांच्या आवडत्या वस्तू नेतात. चांगले दोन तास तेथे बसतात. चौघे बगिच्यात बसून खूप गप्पा मारतात. आता अनय ला एक नाही अनेक आजी – आजोबा मिळाले आहेत. आता सर्वांनाच अनयची सवय झाली आहे. अजय अनिता ही सर्वांना प्रेमाने भेटतात. विचारपूस करतात. आता सर्व weekend ची वाट बघतात. वृध्दाश्रमातील उत्साह वाढला आहे.

आज आजोबा गमतीत अजयला म्हणाले, अरे !! एवढा वेळ तर आमच्या शी बोलायला, तुम्हाला घरी पण मिळायचा नाही. अरे !! आता वृध्दाश्रमात रहायला जाणे म्हणजे मुलं याना सांभाळत नाही असे राहिले नाही. असा अर्थ निघत नाही. नवीन पिढी, घरातले जेष्ठ सर्वच महत्वाचे आहेत. काही निर्णय घेताना त्रास होतो. पण ते योग्य असतात. कधी कधी ‘out of box ‘विचार करून बघावे. जमलं तर ठीक नाहीतर आपलं घर आहेच ना. अजय रोज सकाळ संध्याकाळ फोन करतोच.

आज अनयचा वाढदिवस, सकाळी सर्व आजी आजोबांबरोबर झाला. आता संध्याकाळी मित्र मैत्रिणींनी बरोबर. म्हणुन आजी आजोबा परमीशन घेऊन घरी आले आहेत.

आजोबांचे हे bold decision ऐकुन त्यांच्या बद्दल माझा आदर वाढला आहे.

कधी कधी. “out of the box” विचार करून बघावा. त्याकरिता धाडस लागतं.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभवाचे शहाणपण… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ अनुभवाचे शहाणपण☆ शीला पतकी 

परवा एक वाक्य वाचलं….” माणूस लहान मोठा असू शकतो, त्याच काम लहान मोठ असू शकत पण माणसाचा अनुभव मात्र नेहमीच मोठा असतो…..” वाक्य पुन्हा एकदा वाचलं आणि मनाला पटलं म्हणून तर आपण वयाने मोठे असलेल्या माणसाला तो कितीही कमी शिकलेला असू दे आपण त्याला वाकून नमस्कार करतो, म्हणजे करत होतो आताची पिढी झेन वाली आहे ती माहित नाही… तो नमस्कार त्यानं त्याच्या वयात घेतलेल्या अनुभवाला असायचा. याची एक गमतीदार गोष्ट  एका वक्त्याच्या तोंडून ऐकली. मला ती खूप आवडली आणि खूप बोलकी होती…

कॉलेजमध्ये शिकणारी तीन मुलं रेल्वेमधून प्रवास करत होती. एक शास्त्र शाखेचा एक कला शाखेचा आणि एक वाणिज्य शाखेचा… असे ते तिघे …त्यांच्या वृत्तीही त्याप्रमाणे म्हणजे एखादी गोष्ट पाहिली तर कला शाखेचा विद्यार्थी त्याच्यावर निबंध लिहील कविता करेल…. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ती किती फायदा घेऊन विकता येईल… बाजारात त्याला काय किंमत असेल? त्याचे आणखीन काही प्रॉडक्ट बनतील का ?.असा विचार करेल. विज्ञान शाखेचा विद्यार्थी त्याचं पार डीसेक्शन करून त्यात नेमकं काय काय आहे त्या प्रत्येक गोष्टीमुळे काय घडतं याच संशोधन करेल …!

अशा वृत्तीची ही तीन मुलं प्रवास करत होती तिघे खालच्या बर्थ वर बसलेले. वरच्या बर्थवर एक माणूस झोपलेला होता… साधारण मळके कपडे, डोक्याला बांधलेला फेटा  उशाशी घेऊन चपला जवळ घेऊन तो पाय मोडून झोपला होता. त्याच्या वरच्या बाजूला साखळी होती. डब्यात काही दुर्दैवाने घडलं तर ती ओढून गाडी थांबवण्याची सोय.. आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबवता येत असे…! त्या तिघांनी त्या साखळी कडे पाहिलं त्यातला एक म्हणाला,” खरंच का रे साखळी ओढली तर गाडी थांबेल?” सायन्स वाल्यांनी सांगितलं,” अरे हो साखळी ओढली की एक विशिष्ट ब्रेक असतो तो आपोआप लागतो गाडी एक दोन मिनिटात थांबते त्या डब्याचा नंबर तिथे येतो गार्ड त्याप्रमाणे चौकशी करत त्या पर्यंत येतात आणि मदत मिळते” …दुसरा म्हणाला,” खरंच हे असं घडत असेल का रे?” विज्ञानवाल्याने उत्तर दिले,” अर्थात प्रयोग करून बघायचे का?.” त्यावर कॉमर्स वाला म्हणाला,” अरे त्याच्या खाली काय लिहिले वाचा विनाकारण साखळी सोडल्यास तीनशे रुपये दंड होईल… सर्वांनी ती बारीक अक्षरात लिहिलेली सूचना वाचली आणि म्हणाले, “खरंच रे बाबा…” एका मिनिटांनी त्यांच्या डोक्यात परत विचारआला…. काय हरकत आहे आपण प्रयोग करून पाहू ना… कॉमर्स वाला म्हणाला,” अरे पण दंड कोण भरणार? आर्ट्स वाला म्हणाला आपण प्रत्येक जण शंभर शंभर रुपये काऊंट्री काढू आणि तीनशे रुपये दंड भरू …आहेत का बघा सगळ्यांकडे पैसे” सगळ्यांनी खिशे चाचपले प्रत्येकाकडे शंभराची एक एक नोट होती.  शंभर रुपये तर प्रत्येकाकडे आहेतच आपण आज हा प्रयोग करूनच बघू…असे म्हणून त्यातल्या एकाने साखळी ओढली… गाडी थांबली… गार्ड आणि रेल्वेची इतर काय त्यांची जी व्यवस्था होती ती माणसं त्या डब्यापर्यंत आली. डब्यात चढून आल्यावर त्यांनी विचारले कोणी साखळी ओढली? आणि काय झाले? आता हे तीघे  थोडे घाबरले होते.  त्यातल्या एकाने युक्तिवाद केली त्यातला एक जण पटकन म्हणाला ,”आम्ही काय केलं नाही साहेब तो वरच्या बाकड्यावर झोपलाय ना माणूस त्यांनी साखळी ओढली बघा अन आता गपचूप खाली मान घालून झोपलाय” गार्डने त्या खेडूताला हलवून उठले आणि म्हणाला ,”ओ बाबा उठा साखळी कशासाठी ओढली? तुम्हीच ओढली ना साखळी? त्यावर तो माणूस ऊठला म्हणाला,” मला जरा खाली घ्या “दोघांचा हात धरून तो खाली उतरला आणि म्हणाला,” होय साहेब मीच साखळी वडली. गार्डन विचारले “काय झालं तुम्हाला काय आपत्ती होती कि तुम्ही साखळी ओढलीत?” तो म्हणाला, “साहेब लयधरन झालय ही तीन पोरं मला पिडत्यात मला ढुसन्या देऊन मारले.  आणि माझ्या खिशातले तीनशे रुपये  काढून घेतलेत, हे चोर आहेत. माझ खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येकाच्या खिशात तपासा  बर नुसते घेतले नाहीत तर ते लगेच वाटून प्रत्येकाने आपापल्या खिशात शंभर शंभर रुपये ठेवलेत माझा खोटं वाटत असेल तर तुम्ही त्याची झडती घ्या माझे गरीबाची तीनशे रुपये द्या साहेब .अन निघाले नाही ना तर मग तुम्हाला काय मला शिक्षा करायची ती करा आता माझ्याकडे तर एक पैसा बी नाही” गार्डने  त्या तिघांचे खिसे तपासले आणि त्या माणसाने म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाच्या खिशात शंभर शंभर ची नोट निघाली कारण ही मुलं जेव्हा खाली बोलत होती तेव्हा म्हातारा वरती  गप्प पडून ऐकत होता अन प्रत्येकाच्या खिशात शंभर रुपयात हे त्याला पक्क ठाऊक होतं प्रत्येकाच्या खिशातले शंभर रुपये काढल्याबरोबर म्हातारा म्हणाला,” बघा साहेब म्या म्हणतो ते खर आहे का नाही ?” आता गार्डने तीनशे रुपये म्हाताऱ्याच्या जवळ ठेवले हे घ्या बाबा .बाबा तुमचे पैसे नीट सांभाळा आणि त्याने पोरांना पुढच्या स्टेशनवर उतरून त्यांची धुलाई केली ते म्हाताऱ्याच्या गळ्यात काही अडकवायला निघाले होते आणि म्हातारा एवढा बेरकी आणि वयाने अनुभवी त्यांन बरोबर त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवला आणित्याला नाहक गोवल्या बद्दल तीनशे रुपये वसूल केले.

असं कोणाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नये समोरचा माणूस शिकलेला नाही याचा अर्थ शहाणा नाही असा होत नाही ना तो धडा त्या मुलांना जन्मभर बरंच काही शिकवून गेला

एकूण काय शहाणपण शिक्षणावर अवलंबून असतच असे नाही अनुभव समृद्धता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अनुभव हे कोणत्या शाळेत शिकून येत नाहीत ते जगाच्या शाळेत डोळे उघडे ठेवून वावरल्यानेच प्राप्त होतात….!

 

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

मागच्या भागात आपण पाहिलं की, देव- पिता, माता, बालक, पती या रूपात टागोरांना कसे भेटतात. या भागात आपण टागोरांना जाणवणारी देवाची अन्य रूपे पाहू…

देव प्रियकर म्हणून:-

प्रियकर – प्रेयसी यांच्यातील अनोख्या नात्यांचं उदाहरण राधा कृष्ण यांचं आहे. गीत क्र. २३ मधे कवीला वाटतं, प्रियकर रूपातला देव प्रेमरथावर स्वार होऊन येईल. म्हणून प्रेयसी रूपातला कवी त्याची वाट पहात आहे. तो कोणत्या वाटेने येईल? चुकामूक तर होणार नाही नां? त्याच्या भेटीसाठी ती आसुसलेली आहे.

देव मित्र म्हणून:-

गीत क्र.९७ मधे कवी म्हणतो तू बालपणीचा माझा सखा! तू रोज यायचास. आपण एकत्र रानावनात फिरत होतो. तुझी गाणी मी ऐकायचो आणि त्या सुरांच्या वर्षावात माझा मनमोर नाचू‌ लागे. पण तुझं नांव गाव मला काहीच माहित नव्हतं. आज जाणवतं की, लहानपणी ज्याच्याबरोबर आपण खेळलो तो कोणी सामान्य नव्हता हे आपल्याला कळलंच नाही. तो प्रत्यक्ष देवच होता.

देव गायक म्हणून:-

कवीला कधी कधी देव गायकाच्या रूपात दिसतो. तो म्हणतो, तुझी गाणी, तुझं संगीत यांची अवीट  माधुरी मला कधी कळलीच नाही. मी अल्पमती होतो. कडे कपारीतून वाहणाऱ्या पाण्याचा नाद म्हणजे तुझेच गीत आहे. आकाशात होणारा गडगडाट, कडकडाट ही पण तुझीच गाणी आहेत. हे मला समजले नाही. तू मात्र तुझ्या गीत संगीताच्या वर्षावानं मला मंत्रमुग्ध करत होतास. (गीत ३)

देव श्रोता म्हणून:-

कधी देव कवीला गीत गाण्याची आज्ञा देतो तर कधी तो कवीची गाणी ऐकायला श्रोता म्हणून येऊन बसतो, कवी म्हणतो तुझ्याच कृपेमुळे मी ही गीते गाऊ शकतो. (गीत २). गीत क्र. ४९ मध्ये कवी देवाला म्हणतो, ” तुझ्या दरबारातली यक्षकिन्नरांची गाणी सोडून तू माझी बेसूर गाणी ऐकायला येऊन बसतोस कारण त्या गीतांतला भक्तीभाव तुला भावतो. तू माझी गाणी फक्त ऐकत नाहीस तर तुला ती आवडली म्हणून जाताना मला बक्षीस म्हणून एक फूल पण देऊन जातोस.”

देव दाता म्हणून:-

देव दाता म्हणूनही काही गीतांत दिसतो. कवी म्हणतो (गीत १), तूच ह्या देहात चैतन्य भरून देतोस (जन्माला घालतोस) आणि एक दिवस हा चैतन्याचा घट रिकामाही करतोस (मृत्यू). माझा आत्मा वेष बदलून पुन्हा पुन्हा  या धरणीवर येतो आणि पुन्हा पुन्हा तू त्याची झोळी भरतोस. असा मी युगायुगांचा याचक आहे आणि तू कल्पांतापर्यंत हे दान देतच राहतोस. अशी सुंदर कल्पना ते करतात. तसंच दुसऱ्या कवितेत ते म्हणतात, (गीत ५०) “मी एक भिक्षेकरी! तुझा सुवर्ण रथ दिसल्यावर मला वाटलं की तू सुवर्ण मुद्रा उधळशील  आणि मी त्या गोळा करेन आणि खूप श्रीमंत होईन. पण अचानक तुझा रथ माझ्यासमोर थांबला आणि तूच माझ्याकडे  भिक्षा मागितलीस. मी बावरलो. माझ्या झोळीतले चार दाणे तुला काढून दिले. असं वाटलं की असला कसला राजा, भिकाऱ्याकडेच भीक मागतो. घरी गेलो. झोळीत असणारा एखादा दाणा भुकेल्या पोटाला द्यावा म्हणून झोळी झाडली तर त्यातून सुवर्णाचे दाणे पडले. मला कळलेच नाही की, तू गरिबांसाठी न मागता दान देणारा दाता असतोस.(कविता ५०)

देव दास म्हणून:-

कवी देवाला भक्तांचा सेवक म्हणूनही पाहतो. गीत क्र. ८१ मधे ते म्हणतात, कामामध्ये वेळ वाया जातो म्हणून दु:खी कशाला व्हायचं? सगळा भार त्याच्यावर टाकून आपण मुक्त व्हायचं. जसा तो संत  जनाबाईला कामात मदत करायचा तसा तो आपल्यालाही करेल. दीन दुबळ्यांच्या जवळ तो बसतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्यासाठी उन्हापावसात, धुळीत, मातीत काम करतो. मात्र जे माझ्यासारखे उन्मत्त, अहंकारी आहेत त्यांना त्याचे चरण देखील दिसत नाहीत. (गीत १०,११)

देव राजा म्हणून:-

आपले संत म्हणतात तसं परमेश्वराला आपल्याकडून फक्त भक्तीभाव हवा असतो, दुसरं काहीही नको असतं. (अर्थात आपण त्याला काय देणार? कारण आपलं असं काहीच नसतं. सगळं त्यांनंच दिलेलं असतं.) एका कवितेत त्यांना देव  राजाच्या रूपात दिसतो. राजा रथारूढ होऊन येत आहे हे कळताच कवी घाबरून जातो. त्याला वाटतं आता राजाचं स्वागत कसं करायचं? सिंहासन कुठून आणायचं? दिवे, झुंबर कुठून आणायचं? गालीचा कुठून आणायचा? माझ्याकडे तर फक्त एक फाटकी चादर आहे. ती कशी घालू त्याच्या स्वागताला? पण शेवटी कवीचा अंतरात्मा त्याला सांगतो की काही काळजी करू नकोस. त्याला हे काही नको आहे. तो फक्त भावाचा भुकेला आहे. 

(कविता ५१)

देव‌ मोक्ष दाता म्हणून :-

सगळ्यात उच्च प्रतीची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती! यामध्ये आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होतं. द्वैत रहातच नाही. एका कवितेमध्ये कवी म्हणतो मला पाहिलं की तुझ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम जागृत होतं. मी नसतो तर तू कोणावर प्रेम केलं असतंस? मला जे जे आवडतं ते ते सगळं मला देतोस. माझं मन जिंकण्यासाठी अनेक रूपे घेऊन माझ्यासमोर येतोस. आता सुद्धा तुझं सर्वस्व मला अर्पण करून माझ्या हृदयात बसला आहेस. कळलंच नाही मला, तुझ्यात मी आणि माझ्यात तू कधी विलीन झालो. जीवा – शिवाचे मीलन झाल्यामुळे मला आता मुक्ती मिळाली आहे.(गीत ५६) 

– – – अशाप्रकारे आपल्याला विविध रूपातील परमेश्वर टागोरांच्या गीतांतून पहायला, अनुभवायला मिळतो. ही निरनिराळी रूपे रेखाटताना त्यांचा सुंदर कल्पनाविलास, रूपकांचा वापर, शब्दांची योग्य निवड, मांडणी, मनाला मोहून जाते. अनेक नैसर्गिक घटनांमधून, नैसर्गिक आवाजात त्यांना विधात्याचा भास होत असतो. कवीला सर्वत्र प्रेम प्रतिबिंबित झालेले दिसते. त्यांनी देवाची निरनिराळ्या प्रकारे भक्ती केली असली तरीही अंधश्रद्धेच्या पायावर उभा असलेला कोणताही भक्तीमार्ग त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांची अध्यात्मिक उंची त्यांच्या कवितांमधून जाणवते.

—– 

☆ गीत : ९१ ☆

O THOU the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me! 

Day after day have I kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life. 

All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. One final glance from thine eyes and my life will be ever thine own. 

The flowers have been woven and the garland is ready for the bridegroom. After the wedding the bride shall leave her home and meet her lord alone in the solitude of night. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९१ ☆

☆ येई प्रियकरा, येई मंदिरा॥ ☆

*

सरली वर्षे वाट पाहता

मृदु बोल तव कानी पडता

अंतिम ध्येया जवळी जाता

जीवन सार्थक होई, मधुकरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

तुझ्याचसाठी रिचवित गेले

सुखदुःखाचे अगणित प्याले

पाश सर्व मी तोडित आले

तुझिया भेटी लागी, सुखकरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

तुलाच सारे प्रेम अर्पुनि

आस एक तुजवरी लावुनि

सर्वस्व माझे तुला देऊनि

माहेरा टाकीन, हृदयेश्वरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

भेट आपुली पहिल्या राती

हितगुज होईल मग एकांती

अन्य नको मज, नकोत नाती

मृत्युदेवा, पती परमेश्वरा

येई प्रियकरा, येई मंदिरा॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत : ९२ ☆

KNOW that the day will come when my sight of this earth shall be lost, and life will take its leave in silence, drawing the last curtain over my eyes. 

Yet stars will watch at night, and morning rise as before, and hours heave like sea waves casting up pleasures and pains. 

When I think of this end of my moments, the barrier of the moments breaks and I see by the light of death thy world with its careless treasures. Rare is its lowliest seat, rare is its meanest of lives. 

Things that I longed for in vain and things that I got ⎯ let them pass. Let me but truly possess the things that I ever spurned and overlooked. 

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९२ ☆

या नाट्यावर पडदा पडता।

शांतपणे मी निरोप घेता॥

*

कुठे धरा ती, कुठले गगन।

मिटले असतील माझे नयन॥

*

तारे तरिही टिमटिम करतील।

सूर्य उगवता, कलिका फुलतील॥

*

काळाच्या लाटांवरती स्वार। 

असतील सुखदुःखांचे शृंगार॥

*

अंतिम घडीचा विचार करता।

काळाचा अडसर तेथे नसता॥

*

अमर्त्य जग तुझे मज मिळे।

मृत्यूनेच ज्या उजळून दिले॥

*

असीम खजिना तुझ्या स्वर्गीचा।

मागमूस ना दुष्कर जिण्याचा॥

*

उच्च नीचतेचे नाही दुखणे।

नसे भेदभाव नच उणेदुणे॥

*

उभ्या जन्माचे देणे घेणे।

कामना वासनांचे उजवणे॥

*

हिशेब इथले इथेच टाकून।

आजवरी जे दिले लाथाडून॥

*

त्याच सुखाचा स्वाद मोहवे।

आता मज ना दूरी साहवे॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत : ९३ ☆

 HAVE got my leave. Bid me farewell, my brothers! I bow to you all and take my 

departure. 

Here I give back the keys of my door ⎯ and I give up all claims to my house. I only ask for last kind words from you. 

We were neighbours for long, but I received more than I could give. Now the day has 

dawned and the lamp that lit my dark corner is out. A summons has come and I am ready for my journey. 

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९३ ☆

अज्ञाताचा प्रवास करण्या।

निघतो तुम्हा करुनि नमना॥

*

दोन शब्द तुम्ही प्रेमाचे देणे।

तीच शिदोरी घेऊनि जाणे॥

*

लौकिक सारे इथे सोडतो।

धनदौलत नेऊ ना शकतो॥

*

आजवरी मी बहुत घेतले।

तुम्हा परंतु कांही न दिधले॥

*

सुदिन आज अजि उगवला।

काळोखाचा अंतचि झाला॥

*

क्षमा करा जर कांही चुकले।

मज मूढाला नाही कळले॥

*

तत्पर मी हा प्रवास करण्या।

निघतो तुम्हा करुनि नमना॥

निरोप द्या मज प्रिय सखयांनों।

निरोप द्या मज प्रिय सखयांनों॥

– क्रमशः भाग ३१

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सायकलींचे शहर… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆

राधिका माजगावकर पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ सायकलींचे शहर… ☆ राधिका माजगावकर पंडित

50,60 वर्षांपूर्वी पुण्याच्या चार लाखाच्या वस्तीत एक लाखाच्या वर नुसत्या सायकलीच होत्या. प्रत्येक घरांत दोन तरी सायकली असायच्या. मुला मुलींचा कॉलेज प्रवेश, प्रवास सुरू झाला तो सायकली वरूनच. तेव्हा नव्या सायकलीला 110 ते 140 रुपये किंमत असायची, पण अहो!सर्वसामान्यांसाठी ही पण किंमत खूप होती. कशीतरी जोडाजोडी करून, काही वडिलांच्या पगारातून, थोडे हिंगाच्या डबीतून आईच्या साठवलेले पैसे तर थोडे स्वकष्टाचे, दूध, पेपर टाकून मिळवलेल्या पैशांची जोडणी करून रु.50, 60 उभे करायचे आणि वापरलेली (सेकंड हॅन्ड) सायकल दारात यायची. त्याच्यातही समाधान मानणारी ती पिढी होती.

लेखक डॉ. एच वाय कुलकर्णी त्यांच्या लेखात गमतीदार किस्सा लिहितात. ‘1955 साली श्री. अंतरकरांकडून मी सायकल घेतली, ती तब्बल 30 वर्ष वापरलेली होती. त्यानंतर मी ती 1960 सालापर्यंत वापरली. त्यावेळी कॉर्पोरेशनला वार्षिक टॅक्स अडीच रुपये असायचा. मग पत्र्याच्या बिल्ला मिळायचा. तो सायकलला लावला नाही तर कॉर्पोरेशनच्या लोकांच्या तावडीत सायकल स्वार सहज पकडला जायचा. दिवसाची ही कथा तर रात्रीची वेगळीच कहाणी, रात्री रॉकेलचा दिवा सायकलला  हवाच. तो दिवा सायकल खड्ड्यात गेली की गपकन डोळे मिटत असे. मग काय सगळाच अंधार. आणि मग पोलिसांनी अडवल्यावर कष्टाने साठवलेले रु.25 रडकुंडीला येऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे  लागायचे.’

मोहिमेवर जाणारी पेशवाई कारकीर्द संपून पुण्याच्या परिसरातली त्यांची घोडदौड संपली आणि पुण्याच्या रस्त्यावर टांग्यांच्या  घोड्याच्या टापा सुरू झाल्या. प्रवासाचं प्रमुख साधन म्हणून हजारभर टांगे पुण्यात फिरू लागले. विश्रामबाग वाडा आणि सदाशिव पेठ हौद चौकात दत्त उपहारगृहाजवळ टांगा स्टॅन्ड असायचा, बाजीराव रोड वरून नू.म.वि. पर्यन्त आल्यावर आनंदाश्रम ते आप्पा बळवंत चौक हा रस्ता इतका अरुंद आणि गर्दीचा होता की समोरून बस आली तर येणाऱ्या सायकल स्वाराला उडी मारून बाजूलाच व्हावं लागायचं.

1953 पासून टांग्यांचा आकडा घसरला आणि रिक्षाचा भाव वधारला. 1960 नंतर आली बजाजची व्हेस्पा स्कूटर, मग स्कूटरची संख्या वाढून सायकलचा दिमाख आटोपला. त्यात पीएमटी बसने भर टाकली. बस भाडं कमी, पुन्हा सुरक्षित, आरामात प्रवास, मग पुण्याच्या रस्त्यावरून लाल पऱ्या, पीएमटी धावू लागल्या. टांगेवाल्यांना टांग मिळून सायकल स्वारही तुरळक झाले.

जोगेश्वरी जवळच ठामपणे उभं राह्यलेलं, अजूनही उत्तम चाललेलं 98 वर्षे पूर्ण झालेलं ‘कुलकर्णी अन्ड सन्स’ यांचे दुकान वडिलांच्या कारकिर्दीपासून ठामपणे उभं राह्यले आहे. लवकरच शंभरीत दुकानाचे पदार्पण होईल.

श्री. बाबासाहेब कुलकर्णी आता 82 वर्षाचे आहेत, पण त्या काळी त्यांनी जोपासलेलं आरोग्य अजूनही कौतुक करावं इतकं उत्तम आहे. दांडगी स्मरणशक्ती, खणखणीत आवाज, देवाधर्माची आवड, धार्मिक सामाजिक कार्यातला त्यांचा पुढाकार, तरुणांनाही लाजवील असा आहे. बाबासाहेब आणि त्यांचे बंधू श्री. श्रीनिवास ह्यांनी वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आपल्या आई-वडिलांबद्दल त्यांना अतिशय आदर आहे. त्यांनी बहुमजली शंकर हाईट्स इमारत  उभी केलीय ‘मातृदेवो भव’ ही  उक्ती स्मरून त्यांनी ‘मनोरमा अपार्टमेन्ट’ ही वास्तू उभी केली.

श्री. बाबासाहेब अभिमानाने सांगतात, “आयुष्याच्या या वाटचालीत धर्मपत्नीने मला उत्तम साथ दिली आहे.” वडिलांबद्दल आदराने बोलताना बाबासाहेब सांगत होते, “ति. नानासाहेब (वडील )तळेगाव पासून पायी नू.म.वि. त यायचे. माधुकरी मागून ते मॅट्रिक झाले. मनासारखा कामधंदा नोकरी मिळेना. तेव्हां रस्त्याच्या कडेला सायकल दुरुस्तीचं दुकान त्यांनी टाकलं. घराबाहेर पडलेला हा जिद्दी तरुण कुणाची सायकल रिपेअर कर, कुणाचा स्टो तर कुणाच्या गॅस बत्या दुरुस्त करून पैसे मिळवत होता. पोटापाण्यासाठी पायपीट करतांना अतिशय कष्टातले दिवस कठीण जात होते. एकदा तर एक आण्याचे फुटाणे घेऊन ते आठ दिवस त्यांनी पुरवले होते.

कामाचा शोध घ्यायला ते डेक्कन पर्यंत पोहोचले. कॉलेजमधल्या मूठभर विद्यार्थ्यांकडे तेव्हा सायकली होत्या. त्यांना सायकल रिपेअर करायला खूप लांब जावं लागायचं. श्री. कुलकर्णींनी डोकं लढवलं. शुक्रवारी रात्री बिघडलेल्या सायकली ते ट्रक मधून घेऊन जायचे. दिवस रात्र एक करून  दुरुस्त करायचे अगदी मस्त, ओक्के करून विद्यार्थ्यांच्या ताब्यात रविवारी आणून द्यायचे. मग काय!वेळ आणि पायपीट वाचली म्हणून विद्यार्थी मंडळ पण कमालीचे खुश व्हायचे. असे त्यांना तब्बल शंभर रुपये मिळायचे. एक आण्याचे फुटाणे आठ दिवस पुरवणारे हे सद्गृहस्थ महिना शंभर रुपये मिळवू लागले. अर्थात त्यामागे त्यांची दांडगी चिकाटी आणि अपार मेहनतही होती.”

श्री. शंकरराव कुलकर्णी प्रगतीपथाकडे वळत होते. जोगेश्वरी म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हा अजिबातच नव्हता, तो नागमोडी आणि कच्चा रस्ता होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्री जोगेश्वरी रस्त्यावरूनच जायची. अशी ही मोक्याची जागा हेरून जोगेश्वरी जवळच त्यांनी गाळा विकत घेतला. वडिलांनी सुरू केलेला श्री गणेशा श्री. बाबासाहेब व श्रीनिवास बंधू वडिलांच्याच जुन्या खुर्चीवर जुन्या टेबलावर बसून पुढे चालवत आहेत. अजूनही जोगेश्वरी जवळ गेलात की ‘कुलकर्णी अँड सन्स’ दिमाखाने झळकत असलेली वास्तू तुमच्या नजरेस पडेल. 98 वर्षे पूर्ण झालेल्या ह्या वास्तूला माझा मनापासून सलाम.

© राधिका माजगावकर पंडित

सन सॅटॅलाइट, पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आसक्ती आणि प्रेम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आसक्ती आणि प्रेम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

आसक्ती (Attachment) आणि प्रेम (Love) हे वरवर पाहता सारखे वाटतात, पण त्यांचे स्वरूप खूप वेगळे असते.

 आसक्ती म्हणजे काय?

आसक्तीमध्ये “मला तू हवा/हवी आहेस” हा भाव असतो.

त्यात अपेक्षा, मालकीभाव आणि भीती असते.

समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही तर दुःख, राग किंवा असुरक्षितता निर्माण होते.

आसक्ती स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला धरून ठेवते.

उदा.: “तू माझ्याशीच बोलले पाहिजेस, माझ्याशिवाय कुठे जाऊ नकोस” — हा आसक्तीचा भाव आहे.

प्रेम म्हणजे काय?

प्रेमामध्ये “तू आनंदी राहा” हा भाव असतो.

त्यात स्वातंत्र्य, स्वीकार आणि समर्पण असते.

प्रेम देण्यात आनंद असतो; बदल्यात काही मिळावे अशी अपेक्षा नसते.

प्रेम दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करते.

उदा.: “तू जिथे असशील तिथे आनंदी राहा, तुझे भले होवो” — हा प्रेमाचा भाव आहे.

 योगवासिष्ठाच्या दृष्टीने आसक्ती मनाला बांधून ठेवते, तर प्रेम मनाला विस्तार देते. आसक्तीत संकुचित “मी आणि माझे” असते; प्रेमात सर्वांना सामावून घेणारी विशालता असते.

गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात:

“प्रेम तुमचा स्वभाव आहे, आणि आसक्ती हे प्रेमाचे विकृत रूप आहे.”

जेव्हा प्रेमात भीती, अपेक्षा, मत्सर, मालकीभाव मिसळतो तेव्हा ते आसक्ती बनते. आणि जेव्हा प्रेम शुद्ध, निरपेक्ष आणि व्यापक होते तेव्हा ते मुक्तीचा मार्ग बनते.

थोडक्यात:

आसक्ती म्हणते: “तू माझा/माझी आहेस.”

प्रेम म्हणते: “मी तुझा/तुझी आहे.”

आसक्ती बांधते.प्रेम मुक्त करते.

आसक्तीत आई म्हणते, “मुलाने माझेच ऐकले पाहिजे. माझ्याशिवाय त्याने कोणताही निर्णय घेऊ नये. तो दूर गेला तर मी जगू शकणार नाही.”

येथे मुलाच्या भल्यापेक्षा “माझे” हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिंता, भीती आणि दुःख निर्माण होते.

प्रेमात आई म्हणते, “माझ्या मुलाने प्रगती करावी, आनंदी राहावे. त्याला जिथे चांगल्या संधी मिळतील तिथे जावे.”

मुलगा दूर गेला तरी तिच्या मनात त्याच्याविषयी शुभेच्छा आणि प्रेमच असते!

* * * *

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीची श्रीमंती आणि प्रामाणिकपणा… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

🌸 विविधा 🌸

माणुसकीची श्रीमंती आणि प्रामाणिकपणा… ☆ सुरेखा चिखलकर ☆

​हा सुविचार मानवी जीवनातील एका अत्यंत महत्त्वाच्या सत्यावर प्रकाश टाकतो. त्याचे पैलू खालीलप्रमाणे मांडता येतील:

​विचारांची स्पष्टता आणि शुद्धता:

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या विचारांशी प्रामाणिक असते, तेव्हा तिच्या वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि पारदर्शकता असते. मनात एक आणि ओठावर दुसरे, असा दुटप्पीपणा नसल्यामुळे लोक अशा व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू शकतात. तुमचे चांगले विचार हीच तुमची खरी ओळख असते.

 सरळ स्वभावाचे महत्त्व:

सरळ स्वभाव म्हणजे कपटविरहित मन. असा स्वभाव असलेल्या व्यक्तीशी नाते जोडणे कोणालाही आवडते. गुंतागुंतीच्या जगात ‘सरळ’ राहणे कठीण असले तरी, तेच व्यक्तीला इतरांच्या जवळ नेते. सरळमार्गी माणसाला कुणाचेही भय नसते, कारण त्याने कुणाचेही वाईट चिंतलेले नसते.

 ​कठीण काळातील साथ:

आयुष्यात नेहमीच सुखाचे दिवस नसतात. जेव्हा संकट येते, तेव्हा पैसा किंवा सत्ता नेहमीच कामी येते असे नाही. अशा वेळी तुमच्या आयुष्यात तुम्ही कमावलेली ‘माणसे’ उभी राहतात. तुम्ही भूतकाळात लोकांशी ज्या प्रामाणिकपणाने आणि सरळपणाने वागलात, तीच तुमची ‘पुण्याई’ म्हणून मदतीला धावून येते.

 ​माणसांची जोडणी:

माणसे जोडणे ही एक कला आहे, पण ती टिकवणे हा एक संस्कार आहे. जो माणूस आपल्या तत्वांशी आणि स्वभावाशी एकनिष्ठ असतो, त्याला लोक आपोआप जोडले जातात. अशा माणसांना संकटकाळात एकटे पाडणे कोणालाही मनाला पटत नाही. म्हणूनच, कठीण प्रसंगात त्यांना न मागता ही मदतीचे हात पुढे येतात.

 ​थोडक्यात सांगायचे तर

तुमचे चारित्र्य आणि तुमचा स्वभाव हीच तुमची खरी संपत्ती आहे. तुम्ही जगाशी जसे वागता, त्याचे प्रतिबिंब तुम्हाला तुमच्या संकटात पाहायला मिळते. जर तुम्ही मनापासून चांगले असाल, तर नियती सुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपाने चांगली माणसे तुमच्या पाठीशी उभी करते. हा सुविचार आपल्याला केवळ ‘चांगले’ बनण्याचाच नाही, तर ‘प्रामाणिक’ राहण्याचा मोलाचा सल्ला देतो.

🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अडचणींवर मात – पार्किंग” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “अडचणींवर मात – पार्किंग” ☆ श्री सुधीर करंदीकर

आपण गाडी घेऊन बाहेर पडलो की पार्कींगला जागा मिळेल का?  हे एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्याच समोर असते, आणि त्याच्या जोडीला हे पण प्रश्नचिन्ह असते, की पार्कींगला जागा मिळाली, तर नंतर गाडी बाहेर काढता येईल कां?

आपला टु व्हीलर वाल्यांचा पार्कींगचा अनुभव साधारण असा असतो –

आपण गाडी घेऊन बॅंकेजवळ, दुकानाजवळ किंवा हॉटेलजवळ थांबतो. गाडी लावायला कुठेच जागा नसते. पुढे जावे कां?  असा विचार करत असतो आणि कुणीतरी त्याची गाडी काढतांना दिसतो. आपण लगेच आपली गाडी आत घुसवतो आणि कामाला जातो. कधी कधी जागाच मिळत नाही, मग लांब कुठेतरी गल्लीबोळात जाऊन गाडी लावावी लागते. काम झाल्यावर आपण गाडीजवळ येतो आणि आपली गाडी आजुबाजुच्या गाड्यांमधे अशी पॅक झालेली असते की तिरपे-तारपे होऊन कसरत करत गाडी बाहेर काढवी लागते. कधी कधी आपल्या गाडीच्या मागे बाईक आडवी लावलेली असते. अशा वेळेस थांबणे किंवा as off sight conditions कसरत करणे हाच पर्याय असतो.

फोर व्हीलरला सहसा पाहिजे तिथे पार्कींग मिळतच नाही. पार्कींग मिळालचं तर समांतर पार्कींग मधून गाडी काढ्णे मुश्कील असते. मागची गाडी एकदम जवळ असते आणि समोर खेटून बाईक उभ्या असतात.

यावर लोक काय डोकं चालवतील हे आपल्या कल्पनेच्या नक्कीच बाहेरचे आहे.

गेल्या सोमवारी आम्ही नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पड्लो. रस्त्यात शंकराचे मंदीर आहे. शंकर देव फक्त सोमवारीच पावतात असा आपला समज. त्यामुळे इतर दिवशी शुकशुकाट असणाऱ्या या मंदीरात त्या दिवशी झुंबड होती. अशा ठिकाणी टु व्हीलर पेक्षा फ़ोर व्हीलर वाले जास्त असतात. या रोड्वर समांतर पार्कींगची सोय आहे.

एका गाडीचा मागचा भाग मला एकदमच वेगळा वाटला. कारच्या मागच्या बंपरच्या मागे साधारण ३ फ़ूट लांब स्टॅन्ड होता आणि त्याला कुलुप होते. मी जरावेळ बघत थांबलो की हा काय प्रकार आहे?  मग लक्षात आले की मागच्या गाडीला पार्क करतांना तेवढे ३ फ़ूट अंतर सोडावेच लागणार.

तेवढ्यात गाडीचे मालक आलेच. त्यांनी आल्या आल्या कुलुप काढ्ले आणि आडवा केलेला स्टॅन्ड गाडीच्या मागच्या भागावर फ़ोल्ड केला. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पनेबद्द्ल त्यांचे अभिनंदन केले. स्टॅन्ड वजनाला एकदम हलका होता. मी स्टॅन्ड फोल्ड – अनफोल्ड करून बघितला. मालक गाडीत बसले. स्टॅन्ड मुळे मागे मोकळी जागा होतीच. त्यांनी गाडी मागे घेतली आणि आरामात बाहेर काढली. काही कारच्या मागे सायकल अड्कवलेली असते त्यावरूनच ही कल्पना मालकांना सुचली होती. सकाळी फिरतांना मोबाईल नसतो त्यामुळे फोटो घेता आला नाही.

अड्चण आपली मानली तर त्यावर मात ही करता येतेच, याची प्रचीती आली.

टु व्हीलर करता अशीच पण लय भारी कल्पना परवाच बघण्यात आली –

दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी रोडच्या बाजुच्या रोड्वर काही कामाला गेलो होतो. फूटपाथच्या बाजुला अगदी एकमेकांना चिकटून भरपूर टु व्हीलर उभ्या होत्या. काहींनी फूट्पाथवर पण गाड्या लावल्या होत्या. लोकांची गाड्या लावण्याची आणि गाड्या काढ्ण्याची कसरत दिसत होती. वयस्कर स्त्री-पुरूषांची दमछाक पण दिसत होती. या सगळ्या सीनमधे एक स्कुटी मात्र लक्ष वेधून घेत होती. गाडीच्या दोन्ही बाजुला एक एक फूट मोकळी जागा होती, गाडीच्या मागे कुणी गाडी लावली नव्हती. आणि गाडीच्या सीटवर एक शिकारी कुत्र्यासारखे दिसणारे कुत्रे आरामात बसले होते. बघून पूर्ण कल्पना येत नव्हती. सीटवरच बाजूला एक चारहि बाजूंनी वाचता येईल असा बोर्ड ठेवला होता. बोर्ड वाचायला जवळ गेलो, कुत्रे शांत होते. बोर्ड वरचा मजकूर असा होता –

“तुमची गाडी या स्कुटरच्या दोन्ही बाजुला फूटभर तरी अंतर सोडून उभी करा. जास्त जवळ गाडी लावलेले टॉमीला आवडत नाही. या गाडीच्या मागे गाडी उभी केलेली पण याला आवडत नाही. अशा वेळेस तो काय करतो हे अनुभवच सांगू शकेल. आणि असा अनुभव घेणे महागात पण पडू शकेल. टॉमी भाड्यानी आणला आहे त्यामुळे याला रॅबीज चे इंजेक्शन दिलेले आहे की नाही हे माहित नाही. Happy parking. ” 

मी विचार केला की गाडीच्या मालकाला भेटून अजून माहिती काढायला पाहिजे. तेवढ्यात एक मोठी बाईक आली आणि या स्कुटीच्या मागे उभी राहीली. कुत्र शांत होतं. आपलाच रस्ता आहे या थाटात, बाईक थांबली होती तिथेच ती पार्क करण्याकरता त्यानी साईड स्टॅंड बाहेर काढला आणि उतरण्याची पोझ घेतली. टॉमीचं डोकं सरकलं आणि त्यानी भुंकण्याचं अस्त्र बाहेर काढलं. सटारणे हा काय प्रकार आहे ते बघायला मिळाले. तो माणूस बाईकचा साईड स्टॅंड वर न करताच बाईक घेऊन पळता झाला.

तेवढ्यात एक मॅडम आल्या. त्यांना बघताच टॉमी सीटवरून खाली उतरला. चान्स बघून मी मॅड्मशी संवाद साधला —

मी : मॅड्म, तुमची टॉमीची कल्पना नुसतीच भारी नाही तर लय भारी आहे. भाड्यानी टॉमी हा काय प्रकार आहे?

मॅडम : २० रू तासानी याला आणले आहे. आमच्या भागात कुत्र्यांचे डे केअर सेंटर आहे. एक मॅडम ते सेंटर चालवतात. लोक गावाला जातांना त्यांची कुत्री त्यांच्याकडे सोडून जातात आणि दिवसभर राहण्याकरता पण कुत्री असतात. त्या मॅडम उत्तम ट्रेनर आहेत. कुत्र्यांना ठेऊन घेणं आणि नीड-बेस ट्रेनिंग देणं अशी कामं त्या मॅडम करतात. Know the society and human beings at large या ट्रेनिंगच्या शिर्षकाखाली त्या कुत्र्यांना अनोळखी माणसांबरोबर नाममात्र चार्जेस घेऊन बाहेर पाठवतात. आम्हाला गळ्यात हा टॅग लावावा लागतो, ज्याला हा टॉमी ओळखतो. टॉमीमुळे पार्कींग मधून गाडी बाहेर काढणे एकदम सोपे झाले आहे. आता जातांना हा समोर पायाशी उभा राहतो. बाईक असेल तर तो मागच्या सीट्बर बसतो किंवा मागे बसणाऱ्याच्या मांडीवर बसतो. मी ट्रेनर मॅडम चा फोन नंबर घेतला, मॅडमना बाय केलं आणि टॉमीला बाय केलं.

कुत्री पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे – त्या पटीत कुत्र्यांची डे केअर सेंटर पण वाढतील – आणि पार्कींगची समस्या थोडी हलकी करायला लवकरच प्रत्येकाच्याच टु व्हीलर वर भाड्याचे टॉमी / जिमी / मोती दिसायला लागणार हे निश्चित!

तुमच्याकडे फोर व्हीलर असेल आणि तुम्हाला जर बाहेर गेल्यानंतर पार्किंगचा प्रॉब्लेम येत असेल, तर मागच्या साईडला फोल्डिंग स्टॅन्ड लावायचा विचार जरूर करा. मला जर ती कार पुन्हा दिसली तर मी नक्कीच तिचा फोटो काढून पोस्ट करीन सगळ्यांच्या माहिती करता.

टू व्हीलर वर मार्केटमध्ये जाताना, किंवा कुठे गर्दीच्या ठिकाणी जाताना, टॉमी ला घेऊन जा आणि पार्किंग चा प्रॉब्लेम विसरून जा.

मंडळी, अडचणीवर मात करायचीच असं जर आपण ठरवलं, तर अशक्य असं काहीच नाही. याचा छान आणि मजेशीर अनुभव आला.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “उन्हाळा…???” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “उन्हाळा…???☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कोण म्हणतं उन्हाळा सुरू आहे…?  

.. कुणी पदरानं वारा घालतंय,

.. कुणी उसाचा रस पाजतंय,

.. स्वतःची चूल विझत चाललीय, पण माझ्यातला निखारा पेटता ठेवण्यासाठी दात नसलेल्या बोळक्यातून कुणी फुंकर मारतंय…

… आज्यांच्या मायेच्या दाट झळा… काय वाकडं करेल माझं हा उन्हाळा…???

… आज्यांचे शितल पदर म्हणजे वडाची सावली…

… आज्यांचे खरबरीत हात म्हणजे, बाभळीचं झाड होऊन, पोराचं रक्षण करणारी माऊली…

… खोलगट गेलेले डोळे म्हणजे रात्रभर जळत असलेला दिवा…

… तेल संपलंय, वात जळलीय, शेवटची फडफडणारी ज्योत तेवत ठेवण्यासाठी, बाजूने आधाराचा हात मात्र हवा…!

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मूळ भारतीय शिक्षण पद्धतीचा अंत कसा झाला? – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ मूळ भारतीय शिक्षण पद्धतीचा अंत कसा झाला? – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

आपण लहान असताना आपल्याला फक्त तीन शाखा माहिती होत्या.. 

सायन्स,

आर्ट्स आणि 

कॉमर्स.

1978 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त पाच शाखा होत्या : 

सिव्हिल,

मेकॅनिकल,

इलेक्ट्रिकल,

केमिकल आणि 

इलेक्ट्रॉनिक्स.

पण तुम्हाला माहिती आहे का की 1858 पूर्वी आपल्या भारतीय शाळांमध्ये (गुरूकुल) 50 ते 72 विविध विद्यांचा अभ्यास शिकवला जात होता?

ब्रिटिश धोरणकर्त्यांनी भारतीय शाळांची व्यवस्था उद्ध्वस्त केली.

इंग्लंडमध्ये पहिली शाळा 1811 मध्ये सुरू झाली, आणि तेव्हा भारतात 7,32,000 शाळा (गुरुकुल) होत्या!

आपल्या शाळा कशा बंद झाल्या?  

भारतीय शिक्षण पद्धतीचा अंत कसा झाला?

सर्वप्रथम जाणून घ्या की भारतीय संस्कृतीत कोणकोणती शास्त्रे शिकवली जात होती!!

बहुतेक भारतीय शाळांमध्ये खालील विषय शिकवले जात :

01 अग्नि विद्या (धातुकर्म) 

02 वायु विद्या (वायुरचना) 

03 जल विद्या (जलशास्त्र) 

04 अंतरिक्ष विद्या 

05 पृथ्वी विद्या (पर्यावरण) 

06 सूर्य विद्या (सौर अभ्यास) 

07 चंद्र व लोक विद्या (चंद्र अभ्यास) 

08 मेघ विद्या (हवामान अंदाज) 

09 धातू ऊर्जा विद्या (बॅटरी ऊर्जा) 

10 दिवस आणि रात्र विद्या 

12 सृष्टी विद्या (अंतरिक्ष संशोधन) 

13 खगोल विज्ञान 

14 भूगोल विद्या 

15 काल विद्या (काल अभ्यास) 

16 भूगर्भ विद्या (खाण व भूविज्ञान) 

17 रत्ने आणि धातू विद्याशाखा 

18 आकर्षण विद्या (गुरुत्वाकर्षण) 

19 प्रकाश विद्या (ऊर्जा) 

20 संचार विद्या 

21 विमान विद्या 

22 जलयान विद्या 

23 अग्नेय अस्त्र विद्या (शस्त्रास्त्र) 

24 जीवविज्ञान विद्या (जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र) 

25 यज्ञ विद्या (पदार्थ विज्ञान)

ही झाली वैज्ञानिक शिक्षणाची गोष्ट.

आता पाहू या व्यावसायिक आणि तांत्रिक विद्याशाखा ज्या शिकवल्या जात होत्या!!

26 व्यापार विद्या (कॉमर्स) 

27 कृषि विद्या 

28 पशुपालन विद्या 

29 पक्षीपालन 

30 यान विद्या (मेकॅनिक्स) 

32 वाहन डिझायनिंग 

33 रतंकर (जेम्स आणि ज्वेलरी डिझायनिंग) 

36 कुंभार विद्या (मातीची भांडी) 

37 लघु (धातुकर्म आणि लोहार काम) 

38 टक्कस 

39 रंग विद्या (रंगकाम) 

40 खटवाकर 

41 रज्जूकर (लॉजिस्टिक्स) 

42 वास्तुकार विद्या (आर्किटेक्चर) 

43 जेवण बनवण्याची विद्या (कुकिंग) 

44 वाहन विद्या (ड्रायव्हिंग) 

45 जलमार्ग व्यवस्थापन 

46 इंडिकेटर्स (डेटा एंट्री) 

47 गोशाळा मॅनेजर (पशुपालन) 

48 बागवानी 

49 वन विद्या (फॉरेस्ट्री) 

50 सहयोगी (पॅरामेडिक्स)

ही सर्व शिक्षण शाळांमध्ये शिकवले जायचे, पण काळा बरोबर शाळाच नाहीशा झाल्या आणि ब्रिटिशांनी हे ज्ञानही नाहीसे केले!!

ही प्रक्रिया मॅकाले पासून सुरू झाली.

आज आपल्या देशातील तरुणांचे भविष्य मॅकाले पद्धतीमुळे उद्ध्वस्त होत आहे.

भारतामधील शाळा शिक्षण कसे संपले…?

कॉन्व्हेंट शिक्षणाच्या आगमनाने भारतीय गुरुकुल व शाळा मोडीत निघाल्या. 1835 मध्ये (1858 ला सुधारित) “इंडियन एज्युकेशन अ‍ॅक्ट” बनवण्यात आला. याचे मसुदेकार होते लॉर्ड मॅकाले.

मॅकालेने भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला होता. त्याच्यापूर्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अहवाल दिले होते. त्यात G. W. ल्यूथर आणि थॉमस मुनरो यांचे अहवाल प्रसिद्ध आहेत.

ल्यूथरने उत्तर भारताचा सर्वे केला व तेथे साक्षरता 97% असल्याचे लिहिले. मुनरोने दक्षिण भारताचा सर्वे केला व तेथे साक्षरता 100% असल्याचे लिहिले.

मॅकाले म्हणाला की भारताला कायम गुलाम ठेवायचे असेल तर त्याची मूळ व सांस्कृतिक शिक्षणपद्धती पूर्णपणे नष्ट करावी आणि तिच्या जागी इंग्रजी शिक्षण आणावे. तेव्हाच भारतीय शरीराने भारतीय असतील पण मनाने इंग्रज होतील. असे लोक ब्रिटिशांच्या हितासाठी काम करतील.

मॅकालेने एक म्हण वापरली —

“जशी शेती करण्यापूर्वी जमीन नांगरून सपाट केली जाते, तशीच भारतीय शिक्षणपद्धती नष्ट करून इंग्रजी पद्धती आणली पाहिजे. “

म्हणून त्याने सर्वप्रथम शाळांना बेकायदेशीर घोषित केले. नंतर संस्कृत बेकायदेशीर ठरवली, शाळांना आग लावली, गुरूंना मारहाण करून तुरुंगात टाकले.

1850 पर्यंत भारतात 7,32,000 शाळा म्हणजे जवळजवळ प्रत्येक शहरात एक शाळा. त्या सगळ्या आजच्या भाषेत हायर लर्निंग इन्स्टिट्यूट्स होत्या. त्यात 18 विषय शिकवले जायचे आणि त्या जनता चालवायची, राजा नाही!

शिक्षण मोफत होते…

या शाळा बंद करण्यात आल्या, इंग्रजी शिक्षण कायदेशीर केले आणि पहिले कॉन्कव्हेंट शाळा कलकत्त्यात सुरू झाली. तेव्हा तिला “फ्री स्कूल” म्हटले जात असे.

याच कायद्याखाली :

कलकत्ता, मुंबई आणि मद्रास विद्यापीठ स्थापन झाले 

— ही तीनही विद्यापीठे आजही अस्तित्वात आहेत.

मॅकालेने आपल्या वडिलांना पत्र लिहिले होते. ते खूप प्रसिद्ध पत्र आहे. त्यात तो लिहितो :

या कॉन्व्हेंट शाळांमधून असे विद्यार्थी बाहेर येतील की दिसायला भारतीय असतील, पण त्यांच्या मेंदूमध्ये इंग्लिश विचार भरलेले असतील. त्यांना देश, संस्कृती, परंपरा, म्हणी काहीच माहिती नसेल. अशा पिढ्या निर्माण झाल्या तर ब्रिटिश भारतातून गेले तरी इंग्लिशपणा कधी जाणार नाही.

त्या पत्रातील सत्यता आजही स्पष्ट दिसते!

आपण स्वतःलाच कमी समजतो, आपली भाषा बोलायला लाजतो, आपली संस्कृती ओळखत नाही.

आईच्या भाषेपासून दूर गेलेले समाज कधी फुलत नाही — आणि हीच मॅकालेची रणनीती होती!

आजचा तरुण युरोपबद्दल जास्त जाणतो, भारताबद्दल कमी.

भारतीय संस्कृतीला “कूल नाही” असे समजतो, पश्चिम देशांचे अनुकरण करतो.

आता वेळ आली आहे—आपण सगळ्यांनी जागे होऊन आपली महान संस्कृती व परंपरा पुन्हा उभारण्याची.

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात   

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्निहोत्र गोशाळा आणि उद्योग ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अग्निहोत्र गोशाळा आणि उद्योग ☆ प्रा. भरत खैरकर ☆

इशिताच्या आजोबांनी १९७८ साली तिच्या बाबाची मुंज केली होती. आप्पा बळवंत चौकात फिरत असताना फूटपाथवर जुन्या बुक स्टॉलवर एक पुस्तक मिळालं त्याचं नाव होतं ‘इन सर्च ऑफ हॅपिनेस’! त्या पुस्तकांमध्ये अग्निहोत्र ह्या आयुर्वेदिक इलाजाबद्दल विस्तृत लिहिलेलं होतं. तेव्हापासूनच आजोबांच्या डोक्यामध्ये अग्निहोत्र हे योग्य पद्धतीने करावं म्हणून घर केलं होतं.

अग्निहोत्र म्हणजे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे ह्या विधीसाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, गाईचं तूप तेही देशी गाईचं! देशी गाईच्या पाठीवर एक उंचवटा असतो. ती सूर्यकेतू नाडी असते. ती सूर्याची ऊर्जा शोषून घेते. हवेतील वातावरण शुद्ध करणे हा अग्निहोत्राचा मूळ हेतू आहे. सूर्यास्त, सूर्योदयाच्या वेळी वातावरणात जे बदल होतात त्यासाठी अग्निहोत्राची गरज भासते.

यामध्ये केवळ दोन मंत्र असतात. सात आठ मिनिटाआधी ती तयारी करावी लागते. धूर नको व्हायला म्हणून व्यवस्थित प्रज्वलित अग्नी होऊ द्यायचा असतो. अग्निहोत्राचा रोजचा वेळ हा ठरलेला असतो. ह्या विधी मधून २०-२५ गॅसेस.. वायू वातावरणात सोडले जातात त्याचा परिणाम पुढील बारा तासासाठी कायम राहतो. यामध्ये दोन आहुती दोन मंत्र यांचा समावेश असतो. अग्नेय स्वाहा! ईदम न मम! असे ते मंत्र आहेत.

अग्निहोत्र करायचं असेल तर त्यासाठी शुद्ध शेणाच्या गोऱ्या असाव्या लागतात म्हणून सुरुवातीला चार-पाच देशी गाई घेऊन १४ वर्षांपूर्वी इशिताच्या आई-वडिलांनी गोशाळा सुरू केली. आता ह्या गोशाळेमध्ये देशी गायी, गीर गायी, खिल्लार कामरेज, कोकण कपिला, अशा एकंदर ९५ गायी वासरांचा लवाजमा आहे. इशिताने मागच्या तीन वर्षापासून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर गोशाळेचा कारभार सांभाळला आहे. कोणत्या गायीचं कोणतं वासरू आहे.. कुणाचं काय नाव आहे?  कुणाची आजाराची हिस्टरी काय आहे?  गाईंची ‘फॅमिली ट्री’ काय आहे?  कोण कुणाची मावशी.. भाची लागते?  हा सगळा डेटा इशिताने आपल्या कॉम्पुटरवर तयार केला आहे. जवळपास सगळ्याच गायींचा संगणक डेटा तिच्याकडे उपलब्ध आहे व तो तिला तोंडपाठही आहे!

वेळोवेळी मॉनिटर करून कॅल्शियमचे इंजेक्शन देणे, दुधाची क्षमता ओळखणे, चारा कुणाला किती द्यायचा?  हे ठरविणे शेजारच्या शेतकऱ्यांकडून ठराविक चाऱ्यासाठीच मागणी करणे.. गायींच्या विविध आजारांवर.. जसं की हाड तुटणे, डोळ्यात इन्फेक्शन होणे, विविध रोग, लंम्पी सारखे रोग, इत्यादींवर इशिताचा बारीक डोळा असतो!

गाय वासरा शिवाय दूध देत नाही.. मात्र डेअरी असलेल्या ठिकाणी जर्सी गाईचं वासरू मेल तरी भुसा भरून तिच्यासमोर उभं करतात आणि दूध काढले जाते. हे कटू सत्य इशिताने सांगितले.. देशी गायीच्या तुलनेत जर्सी गायीची आय क्यू लेव्हल कमी असते, हा तिचा अभ्यास सांगतो!

गाईच्या शेणाच्या गोव-या बनविणारी मशीन हवी आहे. इथून उचलून दुसरीकडे शेण ट्रान्सपोर्ट करण्याचा खर्च खूप होतो. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्रोटोटाईप आणि जागच्या जागी गोवऱ्या करता येईल, तसा पीव्हीसी मोल्ड बनवून मिळाला तर चांगलं होईल. शिवाय गोवऱ्या सुकायला तीन-चार दिवस लागतात. त्या जर लवकर सुकल्या तर लगेचच बाजारात पाठवायला सोपं जाईल.. यावर तिचं संशोधन सुरू आहे!

पांढऱ्या रंगाच्या खिल्लार गायी महाराष्ट्राच्या, लाल रंगाच्या गिर गाय गुजरात मध्ये, शिंग टोकदार असलेल्या कामरेज, बुटक्या कोकणी गायी, ह्या सर्व गायींचे स्वभाव व अग्रेशन अलग अलग असते. असं ती सांगते.

तोंडखोरी पायखुरी हे नेहमीचे आजार गायींमध्ये आढळतात. त्यासाठी फुफाटा किंवा मातीत चालवावे लागते अशी माहिती इशिताने दिली.

नेपियर, शाळू, ग्रीन जवार, सुकलेला कडबा, तसेच कणीस इत्यादींचा मिक्स करून ती चारा म्हणून आपल्या गायींसाठी वापरते. इशिताने अलीकडे ‘फ्लावर रेमेडीज’ नावाचा कोर्स केलेला आहे. ‘टेलिफॅथिक सायन्स’चाही तिचा अभ्यास आहे. भाषा विकसित व्हायच्या आधी टेलिपथीचाच वापर व्हायचा असं ती बोलते. ती एक आर्ट आहे. आता आपण ती विसरलो आहे.. गाईचं वासरू आणि माणसांची मुलं सारखीच असतात.. खेळतात.. पळतात.. दंगामस्ती करतात.. गायीचा चेहरा पाहून तिला काहीतरी झालेलं आहे़.. झालं आहे किंवा काहीतरी गडबड आहे.. हे समजतं.. काय झालं असेल?  काय होऊ शकतं?  असा एकांगी विचार आधी व्हायचा. आता मात्र ‘ॲनिमल कम्युनिकेशन’ शिकल्यामुळे त्यात खूप बदल झाला आहे.. असं इशिता बोलते.

आजारपणाची लक्षणे जसे की गायी चारा खाणे थांबवतात.. त्यांचं नाक वाहत.. त्या एका जागी बसून राहतात.. हालचाल करीत नाही.. लंम्पी, तोंडखुरी.. पायखुरी.. त्यांच्या नखांना खुऱ्यांना सूजन येते.. ताप, सर्दी, गरम तापमान याचा परिणाम होतो. हे सगळं ‘ॲनिमल कम्युनिकेशन’ शिकल्यामुळे इशिताला सोपं झालं. गायीच्या डिलिव्हरी वेळी औषध पाणी गरजेचे आहे. गायीमध्ये पण २१ दिवसांचं ‘हीटिंग सायकल’ असतं त्यावरून प्रेग्नेंसी डेट काढता येते. गायीमधेसुद्धा नऊ महिने नऊ दिवस असं बाळ तिच्या पिशवीत राहतं. गोशाळेमध्ये होत असलेल्या अग्निहोत्रामुळे येथे हे जनावराचं आजारपणाचे प्रमाण खूप कमी झाल्याचे इशिता सांगते.

ललशेडच्या बाहेर थोडी मोकळी हवेशीर जागा ठेवली आहे. त्याला ते गायरान म्हणतात. पोट खराब झालं असेल तर गाय स्वतः खुल्या वातावरणात गायरानातील प्रॉपर औषध शोधून खायच्या. त्यासाठी इथेही त्यांना खुल्या जागेत सोडले जाते. पाण्याचा टॅंक आहे म्हणजे टाकं आहे.. जे रोज स्वच्छ केले जाते व पाणी इथे टॉप-अप केल्या जाते.. रवंथ करायला मोकळी जागा ठेवली आहे.. गव्हाच्या भुशांमध्ये औषध टाकून गाईंना टॅबलेट देण्याची सोय इथे आहे..

या ठिकाणी इशिता अग्निहोत्र, फ्लॉवर रेमेडीज, ॲनिमल कम्युनिकेशन आणि नॅचरल कंडिशनिंग तसेच फ्रेश चारा, कमी केमिकलचा उपयोग, आयुर्वेदिक उपाय, इत्यादी डॉक्टर बर्कलेने सांगितलेल्या ३९ उपचार पद्धतीचा वापर करून उपचार करते. डॉक्टर बर्कलेच्यानुसार आपल्या शारीरिक रोगाचे मूळ कारण मनामध्ये किंवा माईंड मध्ये आहे. याचाच वापर करून इशिता ही गोशाळा अग्निहोत्र आणि आपल्या परंपरा सांभाळून एक नवा उद्योग.. एक नवी दिशा घेऊन मार्गक्रमण करीत आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares