मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – होय होय वारकरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – होय होय वारकरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

होय होय वारकरी /

पाहे पाहे रे पंढरी //१//

*

काय करावी साधने/

फळ अवघेंचि येणें

*

अभिमान नुरे/

कोड अवघेचि पुरे //३//

*

तुका म्हणे डोळा /

विठो बैसला सावळा//४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

तुकाराम महाराजांची साधी सोपी सरळ पण रसाळ भाषा भक्ती मार्गातल्या अडाणी माणसाला सहजतेने उमगते व महाराजाना भक्ताला काय सांगायचे आहे ते नेमके पणाने ध्यानी येते.

भक्ती मार्ग किती सोपा आहे हे सांगताना ते म्हणतात. तुला जर भक्तीच करायची आहे तर तू पंढरीला जा आणि कयमचा वारकरी हो. जर तुला त्यातच समरसून भक्ती करण्याचे फळ मिळत असेल तर मग अन्य जप तप साधने या सारखे काही उपाय करण्याची गरजच नाही.

तू तेथे गेल्यावर तुझ्यातला अभिमानाचा ताठा आपोआपच गळून पडेल. तुझ्या मनाचे भक्ती रसाचे कोडकोतूक ही पूर्ण होईल. कारण तू एकदा का पांडुरंगाचे सावळे लोभस रूप पाहिलेस की ते तुझ्या डोळ्यात आणि काळजात कायमचे ठाण मांडून बसेल. आणि तिथला अनुपम्य सोहळा तू कधीच विसरू शकणार नाहीस.

परमेश्वराची भक्ती करण्यास भावना आणि श्रद्धा एकवटली पाहिजे. त्यासाठी तू एकदा पंढरीला जा. आणि खरोखरचा वारकरी बन. तिथे गेल्यावर तू तिथल्या आनंदमयी सोहळ्यात समरसून एकरूप झालास की तुझा अहंकार आणि स्वाभिमान आपोआप गळून पडेल. कारण तिथे कोणताही भेदभाव द्वैष, द्वैतभाव जातीपाती या सारखे काही ही उरत नाही. सगळे समसमन होवून एकामेकात पांडुरंग पहातात. गळा मिठी घेतात. परस्पर दर्शनाने पावन होतात. आपल्या मनातील भक्तीचे कोडकोतूक पूर्ण करून घेत पांडुरंग मय होवूनच वावरताना दिसतात. असा अनुपम्य सोहळा इतरत्र कोठे पहावयास मिळत नाही.

अशा वातावरणात सर्वांभूती संचारणारा सावळा विठूराया तुझ्या ही अंत:करतात कायमचा भरून राहिल. इतका साधा आणि सोपा भक्ती मार्ग सांगितल्यावर लोक भक्ती मार्ग अनुसरतील याचा विश्वास महाराजाना होता तो आज सार्थ आणि समर्थपणे चालत आलेल आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हेच आहे समाजाकडून वारीचे शतकानुशतके चालत आलेले महत्त्व.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मंत्रपुष्पांजली.. इतिहास आणि आशय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मंत्रपुष्पांजली.. इतिहास आणि आशय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे, म्हणून एक दिवस प्रजेने त्या राजाला राजपदावरून बेदखल केलं.

राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.

खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा आविक्षित याला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे आविक्षिताला वारंवार आक्रमणांच्या संकटांना तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने उत्तम राज्य केले. आविक्षित हा प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.

“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित 

“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त

हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.

भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय? त्यानी प्रजेसाठी अनेक अडचणींना तोंड देत एक मोठ्ठा यज्ञ केला.

यज्ञ म्हणजे समाजातील अनेकांच्या भल्यासाठी केलेला प्रकल्पच.

यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक संघ तयार होतो. या संघातील सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार, तज्ञ, कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या संघाच्या प्रमुखाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे, डोंगरावर झाडी लावणे, जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे, शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि साठी अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.

यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.

तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी(इंद्र आदि देवांनी) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी मदत द्यायचं मान्य केलं.

समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळू हळू मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून, त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ उत्तमप्रकारे यशस्वी केला.

यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” – अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.

अशाप्रकारे “ यज्ञेन…. ” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार केवळ श्रद्धा नसून आपली परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता (कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.

असा हा मंत्र पुष्पांजलीचा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा समाज, देश आणि विश्व सुखी आणि आनंदी बनवण्याचा परंपराप्राप्तमार्ग वारंवार आपल्या सर्वांच्या मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्रपुष्पांजली आहे.

मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात. मंत्रपुष्पांजलि शिवाय पूजेची सांगता होत नाही. स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करण्यासाठी असा हा मंत्र खाली दिलाय.

प्रथम:

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।

ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||

*
द्वितीय:

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।

स मे कामान् काम कामाय मह्यं।

कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।

*

तृतीय:

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।

समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।

पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

*
चतुर्थ:

ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।

मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

*
॥ मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि ॥

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझा गणेश – –” कवी : श्री. वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझा गणेश…” ☆ श्री जगदीश काबरे

त्रैलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा 

माझा गणेश नाही मखरात मावणारा ।। धृ।।

*
नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी 

आरक्त सूर्य भाळीं सिंदूर लावणारा

*
मूर्ती अमूर्त त्याची रेखाल काय चित्रीं 

विज्ञानरूप सूत्रीं भूगोल ओवणारा

*
स्वार्थी लबाड लोभी रोगी अपत्यकामी 

येता पवित्र धामीं हाकून लावणारा

*
भक्तांस ना कळे हा पोथीतुनीं पळे हा 

संशोधकां मिळे हा सत्यास पावणारा

*

आहे प्रकाशरूपं विश्वात कोंदलेला 

रेणूत कोंडलेला बुद्धीस भावणारा……

*
कवी : श्री. वसंत बापट

~~~~~~~~~~

(वरील कविता गेल्या शतकात मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. ही कविता वाचून आजच्या भक्तांच्या विचारात काही फरक पडावा ही अपेक्षा..)

प्रस्तुती : जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ यामिनी भाळे निशिगंधावर… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? यामिनी भाळे निशिगंधावर…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रजनीगंधा उमलून आली 

सुगंध चोहिकडे 

भिरभिर भिरभिर फुला फुलावर

फुलपाखरू बागडे

*
यामिनी भाळे निशिगंधावर

धवलांगी चांदणं कांती 

चषक भरावे अत्तर घेऊन 

निसर्गातली प्रसन्न शांती 

*
चंद्र म्हणाला चांदणं टिकल्या 

धरणीवर का गेल्या 

सुगंध घेऊन निशिगंधाचा 

जणू सुवासिनी सजलेल्या 

*
धवल चंद्रिका शृंगाराने

खुणावते वाऱ्याला

आला आला बहर फुलांचा 

पुष्पगुच्छ घेऊन आला

*
गंधकुपी ती हळूहळू उघडे

कलिका खुलवत येतो

सुगंध मजला वेड लावतो 

अत्तरफाया देतो

*
हार तुऱ्यातच शोभा याची 

जिकडे तिकडे दिसतो 

गजर्‍यामध्ये, प्रभु चरणावर 

निशिगंध सुखावून हसतो

*
शब्द देऊनी मला म्हणे तो 

कर माझ्यावर कवने 

या जगताने ऐकावी या 

गुलछडीवरची स्तवने

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रेमाची आरास… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रेमाची आरास… ? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

पदकमलाच्या सौंदर्याला, पैंजणांचा कडा गं..

माथ्याच्या मधोमधी, कुंकवाचा टिळा गं..

*
दरवाजाच्या उंबऱ्यावर, वाट पहाते वेडी गं..

सांजवेळी व्याकुळ सजनी, माळून गजरा सजली गं..

*
नेसली साडी हिरवी, हातात छननन बांगड्या गं..

अंगणी झुल्यावर राधा, मोहन होईल बावरा गं..

*
येता धून बासरीची, हरखून ती जाते गं..

गीत होईल ती त्याची, तो तिचा आलाप गं..

*
प्रेमाच्या त्या पाऊलखुणा, ओल्या मातीचा सुगंध गं..

फुललेल्या त्या फुलांमध्ये, प्रेमाची आरास गं..

*
ती बाहुली होऊन सावली, रंग केशरी उधळी गं..

भेट होता त्या वेड्यांची, चंद्र तारे खुलले गं..

*

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८२ ☆ आठवणी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८२ ?

☆ आठवणी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कुठून , कुठून, कशा ,कशा,

येतातच आठवणी,

काय कमावलं आणि

काय गमावलं ?

हे हिशोब लावणं सोडून दिलंय मी !

आता डोळे पैलतीरावर…

आणि शेवट गोड व्हावा,

हेच घोकतेय!

काही गोष्टी आजही,

अनाकलनीय आणि गुढच!

आयुष्य,

म्हणता म्हणता,

सरकलं पुढे—-

भूतकाळात रमू नये फार आणि,

भविष्यकाळाची चिंता न करता,

वर्तमानात जगावं म्हणतात,

पण आठवणी—

नाही सोडत पिच्छा!

 

 सांजवेळ कातर होत जातेय,

नाठाळ आठवणींचा पिंगा,

मनभर—

वर्तमानाचा विसर पाडणारा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा लपला पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ माझा लपला पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

तुझ्या सहवासा करता,

लांबविन मी रात्रीला.

खास भेटीसाठी तुझ्या,

थांबवीन मी चंद्राला.

वाट पाहता भेटीची,

थबकला काळ, थबकले क्षण.

भेट घडो वा ना घडो,

प्रतीक्षाच विलक्षण.

झाले कासावीस प्राण,

अडकले जसे श्वास.

छळवादी कवितेच्या,

दंतकथांचे आभास.

थांब सखे थोडी,

नको सोडून जाउस.

मेघा आड तुझ्यासाठी,

माझा लपला पाऊस.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तुझ्या रंगात रंगले…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ तुझ्या रंगात रंगलेसौ. वृंदा गंभीर

प्रेम केले तुझ्यावर

तुझ्या रंगात रंगले

प्रीती जडली माझ्यावर

भान हरपून तुझ्यात रमले….. 1

*

बहरली प्रीत दोघांची

जग हर्षाने पाहू लागले

एक होताच जीवनाची

सुखी स्वप्न मी पाहिले….. 2

*

कसे कुठे फुटले अंकुर

कधी नजरानजर झाली

तूच घालतो प्रेमाची फुंकर

जणू प्रेम रंगात न्हाली……. 3

*

सांजवेळी वाट पहाते

नटून थटून दारी बसते

तुला बघताच गोड हसले

तुझ्या रंगात रंगले…….. 4

*

मन माझे मोहून जाते

तुला पाहताना प्रिया

चंद्र तू चांदणी मी तुझी

एकमेका साथ ही प्रिया….. 5

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आमुचा गणपती आला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ आमुचा गणपती आला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

||श्री||

सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…

दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.

🙏 गणेशाने हे काम करून घेतलं असावं. 🙏

अबीर गुलाल उधळीत आमुचा ‘गणराज’ आला|

आमुचा ‘गणपती’ आला||

*

ढोल, ताशे, झांजांचा नाद ‘विनायका’ तव त्रिभुवनी निनादला|

नाद तव त्रिभुवनी निनादला||

*

दारी सडा रांगोळी तोरण सजले ‘गजानना’ तुज स्वागतासाठी|

गजानना तुज स्वागतासाठी||

 *

धूप, दीप, अत्तर, गुलाब ‘हेरंबा’ तुज वाहतो दुर्वांच्या राशी|

वाहतो मस्तकी दुर्वांच्या राशी||

*

मोदक लाडू पेढे ‘लंबोदरा’ पंगत प्रसादाची,

वाढली पंगत प्रसादाची|

*

म्हणू आरती करु प्रार्थना ‘एकदंता’ तव चरणापाशी|

प्रार्थना तव चरणापाशी||

*

बुद्धी, शक्ती अन् कलेचे ‘विनायका’ लाभो वरदान आम्हाला|

देशी वरदान आम्हाला ||

*

‘भालचंद्रा’ तव कृपेने सौख्य- सुख-शांती लाभो भक्तांना|

लाभो आम्हा भक्तांना||

*

जळो भेदभाव नुरो वासना ‘विघ्नेशा’ अहंकाराला दे आमुच्या मुक्ती|

आम्हास दे आता मुक्ती ||

*

चराचरातील तुझ्या रूपाशी ‘गजवक्रा’ राहो सदा प्रीती||

‘गौरीपुत्रा’ राहो सदा प्रीती||

*

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #२९८ ☆ माझी स्वामिनी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # २९८ ?

☆ माझी स्वामिनी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

हाच चंद्रमा मनात, हीच द्वाड दामिनी

झोपुनी आहे घरात, तीच माझी स्वामिनी

*

वादळा आधीची ती, अशीच शांत वाटते

बरसते जशी जशी, हे आभाळ फाटते

अता न संयमात ती, नेई सर्व वाहूनी

*

चांदण्यात ती मुळात, होय फार वेगळी

शोधतोय मी आभाळ, रिक्त एक पोकळी

वागते कठोर ती, नेत्र फक्त रोखुनी

*

ओठ कोवळे असे, की गुलाब पाकळी

काटेरी हात तिचे, चाल फार वेगळी

मोहिनी म्हणू तिला, की म्हणू मी भामिनी

अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares