मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावित्री सांगते… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सावित्री सांगते… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

काय उपयोग पुजा,उपास करून

सगळीकडेच वृक्षतोड नावालाच वृक्षारोपण

नाही होत त्यांची जपणूक कशाला करता नाटक

आधी एक तरी झाड जगवा

चला उजाड झालेले डोंगर, माळराने

झाडांनी सजवू माणुसकीचा धर्म जगून

जंगले वाचवून ग्लोबल वाॅर्मिंग थांबवूया

आपली प्रगती करताना निसर्गाची साथ धरूया

चला करूया साजरी आगळी वटपौर्णिमा

तयार होतील नैसर्गिक ऑक्सिजन बुथ

मगच म्हणता येईल

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही गाती आळवती सुस्वरे’

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शा प!… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ 😔 शा प! 😞 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

चपल माझे मन मोठे

सदा धावे सुखा पाठी,

जरी पोहले तृप्त सागरी

तरी बसे कोरडे काठी!

*

नाही समाधान अंतरात

कमी वाटे काही सुखात,

खुपे दुसऱ्याचे डोळ्यात

सदा दुःखी कष्टी मनांत!

*

करता पाठलाग सुखाचा

जीवा लागला भारी घोर,

हाती आले वाटता वाटता

उंच उडे डोळ्या समोर!

*

थकलो धावता सुखामागे

लागली मरणाची धाप,

उशीर झाला मज कळण्या

त्याला मृगजळाचा शाप!

त्याला मृगजळाचा शाप!

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्नापरी भेटतेस… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

स्वप्नापरी भेटतेस… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

स्वप्नापरी भेटतेस

सत्य.. आभासा समान

कधी संथ धारेपरी

कधी ओहोटी.. उधाण

 *

स्वप्नापरी भेटतेस

कधी फुलांचा वर्षाव

कधी वास्तवाचा तीर

घेई काळजाचा ठाव

 *

स्वप्नापरी भेटतेस

कधी ऋतूंची आरास

कधी अनायसे जाई

निमंत्रण वादळास….

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ नभांगणातून आग ओकितो… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ नभांगणातून आग ओकितो… ☆ श्री सुनील देशपांडे 

वीस वर्षे झाली, परंतु अजूनही तो दिवस आठवतो.

स्कूटर वरून नाशिक गावातून एमआयडीसी मधील फॅक्टरी कडे चाललो होतो. असेच मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यातले दिवस. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि जाता जाता मातीचा खमंग सुगंध एकदम नाकात भरला. मन एकदम प्रसन्न झालं. प्रफुल्लित झालं. मला काही समजेचना. मी एका वेगळ्याच जगात गेल्यासारखा झालो.

आणि माझ्या डोक्यात काही शब्द घुमायला लागले…

प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.

बस तेवढीच ओळ. डोक्यामध्ये गुंजारव करायला लागली.

मी फॅक्टरी वर आलो माझ्या केबिन मध्ये बसून कागद आणि पेन हातात घेतले ती ओळ निघून काढली आणि विचार करत बसलो. पण काही सुचेचना! पुढचा एकही शब्द एकही ओळ सुचेना. असं कधी यापूर्वी झालं नव्हतं. एखादी ओळ सुचते आणि नंतर हळूहळू पुढील ओळी सुचत जातात. फार तर त्या लिहून काढल्यानंतर त्यात थोडे बदल करावेसे वाटतात. काही ओळी पुन्हा लिहाव्या लागतात. काही अधिक चांगल्या ओळी सुचतात. आणि कविता पूर्ण होते.

पण याबाबतीत काहीच होईना. मी अस्वस्थ झालो. मूड गेला. चहा मागवला. तरी सुद्धा काही सुचेना. पुन्हा बाहेर पडलो, टपरीवर जाऊन एक सिगरेट मारली. पण काहीच नाही… अस्वस्थ अस्वस्थ.

पुन्हा फॅक्टरी वर येऊन कामांमध्ये गुंतून घेतलं. तो विषय तिथेच थांबला.

अधून मधून कधीतरी ती ओळ आठवायची आणि असेच अस्वस्थतेत काही तास जायचे. पण पुढे काही सुचायचं नाही अशी तब्बल दोन वर्षे गेली!

त्यानंतरही अनेक कविता सुचल्या लिहिल्या. लेखनही केले. परंतु त्या होळीच्या पुढे काहीच सुचैना.

एक ओळ म्हणजेच कविता?

तसे आमच्या मित्राचे नरेश महाजनचे एक पुस्तक ‘लव्हाळी’ वाचनात आलेच होते. एक ओळीच्या कविता. त्याला त्याने लव्हाळी हे नाव दिले होते. पण त्यामध्ये एक ओळ अशी सुचते की तेवढ्यातच कविता होऊन जाते. एकदा कविता होऊन गेली की अस्वस्थता रहात नाही.

त्याच्या एका लव्हाळीचे उदाहरण देतो

तुझी वेणी, जीवघेणी!

बस्स! यापुढे काही असू शकत नाही.

या दोन-तीन शब्दातच पूर्णत्व आहे.

परंतु माझ्या त्या ओळींमुळे मी कायम अस्वस्थ असे. काहीच सुचत नाही आणि ती एक ओळीची कविता सुद्धा नव्हे. त्या एका ओळीत पूर्णत्व आहे असे वाटत नाही.

बघता बघता दोन वर्ष गेली. संध्याकाळी एका कवी संमेलनानंतर चहा पिताना आमचा एक कवी मित्र आणि डॉक्टर सुद्धा. डॉ सुधीर करमरकर त्याला ती ओळ ऐकवली. त्यालाही ती ओळ आवडली आणि त्यानंतरची अस्वस्थता ती सुद्धा त्याला सांगितली.

तेव्हा तो म्हणाला मला असे वाटते की तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोयस म्हणून तुला पुढे काही सुचत नाही. कधीही जेव्हा पुढचा मार्ग बंद होतो त्या वेळेला मागे वळून पाहायचे असते. मला असे वाटते की ही ओळ तुझ्या कवितेची शेवटची ओळ आहे आणि शेवटची ओळ असल्यामुळे पुढे काही सुचणे शक्यच नाही. त्या दृष्टीने विचार करून पहा नक्कीच सुचेल. माझ्या डोक्यात वीज चमकल्यासारखे झाले. अरे खरंच आपण या दृष्टिकोनातून विचारच केला नाही कधी. तोही दिवस मे महिन्यातलाच आणि तसाच काहीसा घरी जाता जाता एका ओळीच्या दोन ओळी झाल्या.

मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होउनी आली,

प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.

त्यानंतर घरी आलो मस्तपैकी चहा करून घेतला आणि टेबलवर बसलो.

आणि मग आठवत बसलो दिवसभराची उन्हाने झालेली काहिली, दुपारची मरगळ, जणू काही सगळं आयुष्य थांबून गेलंय आणि एवढ्यात, …. एकदम वारा आला, छोटासा ढग काही पाण्याचे शिंतोडे उडवून गेला आणि मग तो मातीचा सुगंध आ हा हा…. हे सर्व आठवलं आणि मग माझी लेखणी पाझरू लागली……

नभांगणातुन आग ओकितो ग्रीष्म आज बलशाली.

तगमग तगमग अवनीवरती लाही लाही झाली.

सचेतनाला अचेतनाची मरगळ येथे आली.

चराचरातून सृजनशीलता आज लोप पावली.

मृतवत सारी सृष्टी आणिक प्रसन्नता लोपली.

शुष्क वृक्ष अन् पान न हाले शुष्क जणू सावली.

भूगर्भातून जीवन शोषी दिनकर हा बलशाली.

भूपृष्ठाची तडतड होऊन तृषार्तता रणरणली.

जीवन धारा आज जशी की बाष्प रूप जाहली.

चराचराची जीवनतृष्णा कुंठित स्तंभित झाली.

मेघसावळा दिसे अचानक वरुणाची सावली.

तुषार काही उधळून नंतर लुप्त कुठे जाहली.

आगमनाची वर्षेच्या परि वार्ता सुखवून गेली,

निद्रित साऱ्या सजीवतेला हलवून उठवून गेली.

मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होऊनी आली,

प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.

 बऱ्याच वेळेला अनेक जण विचारतात तुम्हाला कविता सुचते कशी? तर ती ही अशी…

कवितेचा जन्म, नाही सुखासीन।

सहू रात्रंदिन ।। शब्दवेणा ।।

 

© श्री सुनील देशपांडे

(पुणेरी नाशिककर)

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ हीच खरी सावित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हीच खरी सावित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

ती वडाच्या फांदीखाली बसलेली नाही,

ती आय. टी. च्या स्क्रीनपलीकडे दिसते,

ती पिंपळपानं ओवून नवऱ्याचं आयुष्य मागत नाही,

ती त्याच्यासोबत उभी राहून त्याचं आयुष्य बनवते.

 

तिला यम भेटत नाही,

पण बँकेचे कर्ज, मुलांचं शिक्षण, आणि सासूचा रिपोर्ट

या सगळ्या यमाच्या रूपांशी तिचा रोज तिचा सामना होतो

हसत, लढत, झगडत.

 

ती नवऱ्याच्या पाठी मागे उभी नाही,

ती त्याच्या शेजारी आहे

त्याच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवणारी,

त्याच्या अपयशात सुद्धा माझा आहे ना! म्हणणारी.

 

ती संध्याकाळी फक्त दिवा लावत नाही,

ती घर, नोकरी, स्वप्नं आणि नातं…….

सगळं उजळवत ठेवते.

 

ती पाटावर ओवाळत नाही,

पण सकाळी दोन डब्बे भरते — एक स्वतःसाठी, एक त्याच्यासाठी.

ती उपवास करत नाही,

पण गरज पडली, तर स्वतःच्या भुकेवर पाणी फिरवते.

 

आजची सावित्री काळावर नाही, परिस्थितीवर मात करते,

ती पूजा नाही करत,

पण रोजच्या जगण्याला एक –तपस्येचं रूप देते.

 

हीच खरी सावित्री —

मूक नाही, कधी कधी थकलेली, पण कधीही हार न मानणारी.

तिला वंदन, तिच्या अस्तित्वाला सलाम!

लेखक : अज्ञात

संकलन व प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कसरत ही जीवघेणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कसरत ही जीवघेणी…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

तोल सावरीत कसे बसावे

आधारास्तव कुठे धरावे

भीती वाटते पडेन घसरून

बाबा तुम्हास हे का न कळावे!

*

इवल्या गाडीवर एवढा बोजा

मागे चिमुकला देह हा माझा

कसरत माझी जीवघेणी ही

का करावी असली ये जा!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 253 – वसा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 253 – विजय साहित्य ?

☆ वसा…!

कवितेत माझ्या |

माझा परीवार ||

अक्षरांचा पार |

भोवताली…! ||१||

*

अक्षरांची लेणी |

निरामय रुप ||

निखळ स्वरुप |

कवितेचे…! ||२||

*

शब्द,सूर,ताल |

छंद बंध‌ मुक्त ||

प्रतिभेने युक्त  |

काव्य पद…!  ||३||

*

जीवन प्रवास |

सुखदुःख जोडी ||

अनुभूती गोडी |

काव्यामाजी…!  ||४||

*

माझी ही कविता |

अंतरीक‌ साद ||

रसिक संवाद |

नांदताना…!  ||५||

*

शब्दसुता माझी |

प्रकाशाचे पर्व  ||

नाही कुणा गर्व |

सृजनाचा…!  ||६||

*

सांगे कविराज |

पसरोनी पसा ||

घेतलाय वसा |

शारदीय…!  ||७||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बहरसमृद्धीची गाणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ बहरसमृद्धीची गाणी सुश्री नीलांबरी शिर्के 

मेघ जाहला कृष्ण सावळा

बिजली झाली राधा गोरी

जलथेंबातुन नृत्य गोपींचे

उल्हासीत वसुंधरा जाहली

शिवारातुनी नदीनाल्यातुन

संगीताची मैफील सजली

सुर तयांचे वातावरणी

उत्साहाची चौफेर पेरणी

निसर्गाच्या ओठावरती

बहरसमृद्धीची गाणी

🌹

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला आला पाऊस आला… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आला आला पाऊस आला… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

आला पाऊस पाऊस, सारे भिजले पाण्यात

आणि अंकूरले बीज, ओल्या मातीच्या मनात

 *

सुखे भिजे माळरान, सोडी निःश्वास कातळ

अंबराच्या डोळ्यांतले, भिजे ढगांचे काजळ

 *

आला पावसाळा, झाली सैरभैर वावटळ

माती ग्रिष्मांतली पिते, थेंब टपोरे नितळ

 *

टपटपले अमृत, कुठे कोरड्या चोचीत

थेंब मोतीयांचे झाले, पानाफुलांच्या ओठांत

 *

ग्रिष्म भोगल्या माणसा, नको पाणी पाणी करू

आली मृगाची पालखी, झाला घंटानाद सुरू

 *

ग्रिष्म वनवासी झाला, आता पुरे नऊ मास

आसुसल्या धरणीची, आता उजवेल कूस

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री गणपति तालम् स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्री गणपति तालम् स्तोत्रम् ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

विकटोत्कटसुंदरदंतिमुखं

भुजगेंद्रसुसर्पगदाभरणम् ।

गजनीलगजेंद्र गणाधिपतिं

प्रणतोऽस्मि विनायक हस्तिमुखम् ॥ १॥

सुर सुर गणपति सुंदरकेशं

ऋषि ऋषि गणपति यज्ञसमानम् ।

भव भव गणपति पद्मशरीरं

जय जय गणपति दिव्यनमस्ते ॥ २॥

 *

गजमुखवक्त्रं गिरिजापुत्रं

गणगुणमित्रं गणपतिमीशप्रियम् ॥ ३ ॥

 *

करधृतपरशुं कंकणपाणिं

कबलितपद्मरुचिम् ।

सुरपतिवंद्यं सुंदरनृत्तं

सुरचितमणिमकुटम् ॥ ४ ॥

 *

प्रणमत देवं प्रकटित तालं

षड्गिरि तालमिदम् ।

तत्तत तो षड्गिरि तालमिदं

तत्तत षड्गिरि तालमिदम् ॥ ५ ॥

 *

लंबोदरवर कुंजासुरकृत कुंकुमवर्णधरम् ।

श्वेतसशृंगं मोदकहस्तं प्रीतिसपनसफलम् ॥ ६ ॥

 *

नयनत्रयवर नागविभूषित नानागणपतिदं तत्तत्

नयनत्रयवर नागविभूषित नानागणपतिदं तत्तत्

नानागणपति तं तत्तत् नानागणपतिदम् ॥ ७॥

 *

धवलित जलधरधवलित चंद्रं

फणिमणिकिरणविभूषित खड्गम् ।

तनुतनुविषहर शूलकपालं

हर हर शिव शिव गणपतिमभयम् ॥ ८ ॥

 *

कटतट विगलितमदजल जलधित-

गणपतिवाद्यमिदं

कटतट विगलितमदजल जलधित-

गणपतिवाद्यमिदं

तत्तत् गणपतिवाद्यमिदं

तत्तत् गणपतिवाद्यमिदम् ॥ ९ ॥

 *

तत्तदिं नं तरिकु तरिजणकु कुकु तद्दि

कुकु तकिट डिंडिंगु डिगुण कुकु तद्दि

तत्त झं झं तरित

त झं झं तरित

तकत झं झं तरित

त झं झं तरित

तरिदणत दणजणुत जणुदिमित

किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों ताम् ॥ १० ॥

 *

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

शशिकलित शशिकलित मौलिनं शूलिनम् ।

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

विमलशुभकमलजलपादुकं पाणिनम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

प्रमथगणगुणकथितशोभनं शोभितम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

पृथुलभुजसरसिज विषाणकं पोषणम् ।

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

पनसफलकदलिफलमोदनं मोदकम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

प्रणतगुरु शिवतनय गणपति तालनम् ।

गणपति तालनं गणपति तालनम् ॥ ११ ॥

 *

☆ मराठी भावानुवाद ☆

 *

विशाल बलवंत चारुदंतआनन

गदा सर्पराज भूषण धारण

गजनील गजराज गणाधिपती

गजमुख विनायक करितो नमन ॥१॥

 *

सुकुंतला सुर सुर देव गणपती

यज्ञसमान ऋषी ऋषी गणपती

कमलदेही भव भव गणपती

दिव्यप्रणाम जय जय गणपती ॥२॥

 *

गजवक्रतुंड गिरिजापुत्र

शिवप्रिय गणपती गणगुणमित्र ॥३॥

 *

प्रभा कमलासम हाती परशु करावरी कंकण

सुरपती वंद्य किरिट रत्नजडित मोहक नर्तन ॥४॥

 *

प्रणाम इशा प्रकटे ताल 

षट्गिरींचा वाजे ताल 

तोचि तो षट्गिरी ताल 

तोचि तो ऐसा षट्गिरी ताल ॥५॥

 *

सिंदूर वर्णी लंबोदरा कुंजासुरद्वारा पूजित 

हाती मोदक श्वेत मूषक प्रीति-स्नेहाने भजित ॥६॥

 *

नानागणपती त्रिनेत्री नागविभूषित तोचि तो 

नानागणपती त्रिनेत्री नागविभूषित तोचि तो 

नानागणपती तोचि तो नानागणपती तोचि तो ॥७॥

 *

श्वेतवर्ण मेघासम श्वेतवर्ण सोमासम

तेज खड्गधारी फणिमणिकिरणासम

विषहारी देह शूलकपालधारी

हर हर शिव शिव अभयद गणपती ॥८॥

 *

सागरतटी लाटांचा गाज गणपती वादन बाज 

सागरतटी लाटांचा गाज गणपती वादन बाज 

तोचि जणू गणपती वादन बाज 

तोचि जणू गणपती वादन बाज ॥९॥

 *

तत्तदिं नं तरिकु तरिजणकु कुकु तद्दि

कुकु तकिट डिंडिंगु डिगुण कुकु तद्दि

तत्त झं झं तरित

त झं झं तरित

तकत झं झं तरित

त झं झं तरित

तरिदणत दणजणुत जणुदिमित

किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों ताम् ॥ १०॥

 *

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

शिरावरी शोभतो शशी हाती शूल धारण

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

चरण कमलासम, हस्त जयाचे पावन

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

सुशोभित वर्णित प्रशंसित जैसे प्रमथ गण

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

शंखधारी विशाल बाहु पालक पद्मसमान 

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

रंभापर्णावरी मोदक मोदभरे ते भोजन

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

तालदेवता शिवपुत्र गणपती गुरूसिया पूजन

गणपति ताल गणपति तालन॥ 11 ॥

 *

☆ ॥ इति निशिकान्त भावानुवादित श्री गणपति ताल स्तोत्र संपूर्ण ॥ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares