हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # १०८५ ⇒ बातों के भूत ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “बातों के भूत।)

?अभी अभी # १०८५  ⇒ आलेख – बातों के भूत ? श्री प्रदीप शर्मा  ?

पहली बात तो भूत होते ही नहीं, और अगर होते भी हैं, तो उनसे डरने की कोई जरूरत नहीं, बस भृगु बनने की है। भूत बातों से नहीं मानते। घोड़ा हवा से बात करता है, और भूत से लातों से ही बात की जाती है। सुना है, भूत के पांव उल्टे होते हैं, जब कुछ लोग उल्टे पांव लौट आते हैं, तो शंका होती है, कहीं ये वो तो नहीं।

भूत के पाँव तो खैर इसलिए उल्टे होते हैं, कि जब उसे लात पड़े, तो भागने में सहूलियत हो। बेचारे भूत की इतनी फजीहत, कि पहले तो उससे लातों से बात करना, और जब वह उल्टे पांव भागने लगे तो उसकी लंगोटी पर भी नज़र रखना। भागते भूत की लंगोटी भली ! वाह रे इंसानियत।।

वैसे भूत अधिकतर किस्से कहानियों और फिल्मों में ही होते हैं, लेकिन क्या पता, कब, किस पर, किस बात का भूत सवार हो जाए। जब हम पर किसी बात का भूत सवार होता है तो फिर हमें भूत से डर नहीं लगता, लोग हमसे डरने लगते हैं। जब हम पर क्रिकेट का भूत सवार होता था तो मोहल्ले के मकानों की खिड़कियों के शीशे तड़ातड़ टूटने लगते थे। शीशे तो जुड़ गए, लेकिन क्रिकेट का भूत आज भी नहीं उतरा।

अंध विश्वास की भी हद होती है। लोगों को हवा में भूत नजर आता है। सुनसान हवेली की ओर जाने से मना किया था, लेकिन आज की पीढ़ी कभी किसी की सुनती है, अब आठ रोज से बुखार में पड़े हैं, कुछ भी बड़बड़ा रहे हैं, अजीबोगरीब हरकतें कर रहे हैं। ओझा को बुलाया है, अब तो वही भूत उतारेगा। भूत उतरे, ना उतरे, अच्छी लू उतरने वाली है, जब झाड़ुओं से पूजा होगी। भूत भागता नजर आएगा।।

मैं किसी भी तरह की हिंसा के खिलाफ़ हूं। इंसान हो या भूत ! पहले लातों से नहीं, बातों से ही मामला सुलझाना चाहिए। लेकिन इसमें एक समस्या और आ खड़ी होती है। किसी पर अगर बातों का ही भूत सवार हो, तो क्या करना चाहिए। आप समझ रहे हैं न बात को।

कुछ लोगों पर बातों का भूत सवार होता है। बातें ही बातें। जैसे बरसात में किसी छाते की दुकान में छाते ही छाते ! इतनी बातें, इतनी बातें, कि बस बातें ही बातें। पहले बातों के लिए मुलाकातें जरूरी होती थी। लोग किसी बातूनी इंसान को देखते ही, पतली गली से निकल लेते थे, अभी मिलेगा तो चाट जाएगा। इंसान भूत से नहीं, ऐसे बातूनी इंसान से अधिक डरता था।।

आज भी डर लगता है, क्या भरोसा कब, किस पर, बातों का भूत सवार हो जाए। मैने लोगों को आधे आधे घंटे वॉक एंड टॉक शो में मशगूल देखा है। अनलिमिटेड डाटा और अनलिमिटेड बांतां। बस कान में स्पीकर लगे हैं और अपना स्पीकर, यानी मुंह भी चालू है। ऐसे चलते फिरते बातूनी भूत मॉर्निंग वॉक और इवनिंग वॉक में बहुतायत से देखे जा सकते हैं।

कौन अधिक बात करता है और कौन कम, यह नहीं जानते हम, लेकिन हर व्यक्ति के जीवन में ऐसा समय जरूर आता है, जब उस पर बातों का भूत सवार होता है। कहीं कहीं तो भोजन की तरह बातें भी हजम नहीं होती। बातें ही उनका हाजमोला होती हैं। पेट में गुड़गुड़ होने लगती है। ठीक से किसी से बात हो जाए, तो सब ठीक हो जाता है।।

जिस तरह लातों के भूत बातों से नहीं मानते, बातों के भूत का इलाज भी लातों से संभव है, यह हम नहीं मानते। यह छोटी सी बात नहीं, गंभीर बात है। कुछ लोग बड़ी प्यारी बातें करते हैं, लगता है, जैसे मुंह से फूल झर रहे हों। बच्चों की बातें कितनी प्यारी लगती हैं।

बातों का एक दर्दनाक पहलू भी है ! किसमें कितना दर्द भरा है, कौन जाने। दो घड़ी अगर बात करने से हल्कापन महसूस होता है तो क्या बुरा है। आधी मानसिक बीमारियां मन ही मन घुटते रहने से होती है;

मेरी बात रही मेरे मन में

कुछ कह ना सकी उलझन में;

से तो अच्छा है;

आपके पहलू में आकर रो दिए।

दास्ताने गम सुना कर रो दिए।।

बातों बातों में कभी कभी ऐसा भी हो जाता है;

जो हमने दास्तां अपनी सुनाई

आप क्यूं रोए !

किसी के दुख दर्द को कम करना, अथवा दूर करना ही तो वास्तव में भूत उतारना है ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवखळ श्रावण… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? विविधा ?

अवखळ श्रावण ☆ संगीता कुलकर्णी ☆

आषाढाच्या धूसर पाऊलखुणा मागे टाकत श्रावण जेव्हा अंगणात येतो तेव्हा निसर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता खुलते..आकाशाच्या निळ्या ओठांवर काळ्या मेघांची हळवी कुजबुज सुरू होते आणि क्षितिजावर पावसाच्या रेशमी पडद्याआड हिरवाईचे स्वप्न आकार घेते. श्रावण म्हणजे केवळ निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू आहे.. मातीच्या कपाळावर उमटलेले पावसाचे कुंकू आहे आणि मनाच्या कोपऱ्यात अलगद जागवणारी आठवणींची सनई आहे म्हणूनच श्रावण आला की मन नकळत म्हणते

‘हा ऋतू आहे की आनंदाची एखादी अवखळ लहर? ’

श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागताच वातावरणात जादू भरते. काळेकुट्ट ढग आकाशात जमू लागतात. क्षणभर सूर्य त्यांच्यामागे लपतो आणि पुढच्याच क्षणी पावसाच्या टपोऱ्या थेंबांची रिमझिम सुरू होते.. ते थेंब जणू आभाळाने पृथ्वीच्या कुशीत पाठवलेली मोत्यांची पत्रेच असतात… कोरड्या मातीवर पहिला पाऊस पडतो आणि मातीचा सुगंध चारही दिशांना दरवळतो.. त्या सुगंधात बालपण दडलेले असते, शेतकऱ्याचे स्वप्न असते आणि जगण्याची नवी उमेदही असते.

श्रावणाचा पाऊस कधी शांत, कधी खट्याळ तर कधी धुवांधार असतो.. कधी तो खिडकीच्या काचेवर बोटांनी टपटप वाजवत गुपित सांगतो तर कधी छपरावर ढोल वाजवत बेभान नाचतो… कधी रिमझिम सरींच्या रूपाने तो आकाशातून उतरतो तर कधी मुसळधार धारांनी पृथ्वीला चिंब भिजवून टाकतो.. त्याच्या या लहरी स्वभावामुळेच तो खरा ‘”अवखळ श्रावण’” वाटतो. एखाद्या लहान मुलासारखा तो क्षणात हसतो, क्षणात रडतो आणि पुन्हा क्षणात खळखळून हसवतो.

शेतांच्या बांधावर तर श्रावणाने हिरव्या रंगाची उधळणच केलेली असते… कालपर्यंत उन्हाने करपलेली जमीन आज हिरव्या गालिच्याने नटलेली दिसते… भाताची कोवळी रोपे वाऱ्याच्या तालावर डोलू लागतात.. ज्वारी-बाजरीची पिके पावसाशी कुजबुजतात.. रानफुलांचे रंगीत ठिपके हिरव्या चादरीवर विखुरलेल्या तारकांसारखे भासतात.. झाडांच्या फांद्यांवर नव्या पालवीचे दागिने चमकतात नी वेली झाडांना बिलगून जणू प्रेमाची मिठीच मारतात.. निसर्गाचा हा साज पाहताना डोळे तृप्त होतात आणि मनाला एक अनामिक शांतता लाभते..

श्रावण म्हणजे पक्ष्यांचाही उत्सव.. पावसाच्या सरींमध्ये भिजत कोकिळेचा मधुर स्वर दूरवर ऐकू येतो.. चिमण्या घरट्याच्या उंबरठ्यावर बसून पावसाकडे कुतूहलाने पाहतात. मोर तर श्रावणाचा जणू राजदूतच..! काळ्या ढगांचे दर्शन होताच तो पिसारा फुलवतो आणि निळ्या-हिरव्या रंगांची इंद्रधनुषी आरास करीत नाचू लागतो.. त्याच्या नृत्यात आनंदाचा उन्माद असतो. त्याला पाहून वाटते की जणू काही पृथ्वीनेच आकाशाच्या प्रेमात पडून नृत्य सुरू केले आहे.

श्रावणाच्या दिवसांना धार्मिक आणि सांस्कृतिक रंगही लाभलेला असतो.. मंदिरांच्या घंटानादाने वातावरण मंगलमय होते… सोमवारी शिवमंदिरांत भक्तांची गर्दी होते. हिरव्या बांगड्यांची खणखण, हातांवरील मेंदीचा सुगंध आणि झुल्यांवरील हास्य यामुळे गावोगावचे वातावरण उत्साहाने भरून जाते. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा सणांनी श्रावण अधिकच रंगतदार होतो.. प्रत्येक सणामागे निसर्गाशी आणि मानवी जीवनाशी जोडलेले प्रेमाचे, कृतज्ञतेचे आणि नात्यांचे धागे असतात.

मंगळागौरीच्या रात्री तर गावातील अंगणे जागी होतात. पारंपरिक खेळ, फुगड्या, गाणी आणि हास्य यांच्या लयीने रात्र बहरते. कुठे झोका उंच जातो, कुठे बांगड्यांचा नाद घुमतो तर कुठे आजीच्या जुन्या श्रावणी आठवणी नव्या पिढीच्या कानात अलगद उतरतात.. त्या क्षणी काळ जणू थांबतो आणि भूतकाळ व वर्तमान एकाच झुल्यावर झुलू लागतात..

शहरातला श्रावणही तितकाच मोहक असतो फक्त त्याचे रूप वेगळे असते.. रस्त्यांवर छत्र्यांची रंगीबेरंगी गर्दी दिसते.. पावसाने धुतलेल्या इमारती नव्याने उजळून निघतात.. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून कोसळणाऱ्या सरींकडे पाहण्यात एक विलक्षण आनंद असतो. कांदा भजी, वाफाळता चहा आणि बाहेर बरसणारा पाऊस

या त्रिवेणी संगमाला कोण नकार देईल?

मात्र श्रावणाचा खरा अर्थ केवळ रोमँटिक पावसात नाही.. या ऋतूमागे शेतकऱ्याच्या आशेची धडधडही आहे. पाऊस वेळेवर पडला तर शेत हिरवेगार होते पाऊस दगा देतो, तर त्या हिरवाईवर काळजीची सावली पडते. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक थेंब हा शेतकऱ्यासाठी अमृताचा थेंब असतो. त्याच्या डोळ्यांतल्या आशेचे प्रतिबिंब हिरव्या शिवारात दिसते.

श्रावण हा बाहेरच्या निसर्गाला जितका भिजवतो तितकाच तो मनालाही चिंब करून जातो…

श्रावण संपताना मनाला एक हुरहूर लागते. झाडांच्या पानांवरून ओघळणारे थेंब जणू निरोपाचे अश्रू वाटतात.. आकाश स्वच्छ होते, ढग दूर निघून जातात पण श्रावणाने मनात पेरलेली हिरवाई तशीच राहते.. पावसाचा सुगंध, मोराचा नाच, झुल्याची उंच भरारी, सणांची लगबग आणि ओल्या मातीचा गंध

या साऱ्या आठवणी मनाच्या कप्प्यात कायमच्या साठून राहतात…

असा हा अवखळ श्रावण..! कधी सरींच्या रूपाने हसणारा, कधी ढगांच्या रूपाने रुसणारा, कधी मोराच्या पिसाऱ्यात नाचणारा तर कधी मातीच्या सुगंधातून मनाला स्पर्शणारा. तो निसर्गाचा उत्सव आहे… भावनांचा झरा आहे आणि नवजीवनाची चाहूल आहे म्हणूनच श्रावण आला की मनाच्या आकाशातही काळे ढग दाटतात पण त्या ढगांतून बरसतो तो पाऊस नव्हे तर आनंद, आठवणी आणि जगण्याची नवी हिरवी उमेद.!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावण महिन्याची कहाणी– -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ श्रावण महिन्याची कहाणी– – ☆ विभावरी कुलकर्णी

एक मोठ्या मोठ्या उंच इमारतीचं नगर होतं. लोक खूप श्रीमंत होते. आधुनिक घरात रहात होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत होते. एका क्लिकवर सगळे पुढ्यात येत होते. भाजीपाला, समान सगळे क्षणात दरात येत होते.

हातात पैसाच पैसा होता. खाण्या पिण्याची चंगळ होती. आलिशान गाड्या होत्या. मुलं उत्तमोत्तम शाळेत जात होती. प्रत्येक हातात मोबाईल होता. टेबलवर संगणक होता. जग जवळ आलेले होते. नेटने जाळ्यात पकडलेले होते. सगळीकडे सुबत्ता होती. पण… कुठेतरी उणीव होती. आरोग्य मात्र बिघडलेले होते. डॉ.कडे मोठ्या रांगा होत्या. औषधांची दुकाने जोरात चालत होती. प्रत्येक माणशी काही ना काही आजार होता. मनस्वास्थ्य हरवले होते.

काय करावे कळेना. आरोग्य पैशाने विकत घेता येईना. सगळे होते चिंतेत.आपापल्या व्यथेत. तेवढ्यात एक माणूस आला. जणू देवदूतच भासला. खूप अनुभव त्याच्या गाठीला. एका मोठ्या कार्यक्रमात दाखल झाला. आनंदी राहण्याचा उपाय सांगतो म्हणाला. फक्त एक अट आहे म्हणाला. सगळे आवाज बंद करा. सर्वांनी जमिनीवर आसन धरा. लोकांनी तसेच केले. कारण सगळे होते शांतीचे आणि आनंदाचे भुकेले. 

देवदूत म्हणाला खरेच मन:शांती व आनंद हवा असेल, तर माझे ऐकावे लागेल. एक व्रत करावे लागेल. सगळ्यांनी होकार भरला. प्रत्येक जण कान टवकारून ऐकू लागला. देवदूत बोलू लागला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला श्रावण महिना आहे चांगला. फरक पडला तर कायम हे व्रत करा. आता फक्त सुरुवात करा. 

या व्रतात काय करावे? सांगतो ऐका लक्ष द्यावे. आठवड्यात एक दिवस हे व्रत करावे. सकाळी लवकर उठावे. प्रथम मोबाईल, इंटरनेट बंद करावे. मोकळ्या हवेत फिरून यावे. फिरता फिरता स्वसंवाद करावे. उत्साहात घरी यावे. आई वडील यांच्या जवळ बसावे. छान छान बोलावे. सर्वांनी एकत्र चहा, नाश्ता घ्यावा. घरात मुलांशी खेळावे. गप्पा गोष्टी कराव्यात. थोडे स्वयंपाक घरात डोकवावे मदती साठी विचारावे. जमेल ते काम करावे. दुपारी निवांत वेळी जुने कपाट आवरायला घ्यावे. त्यातील जुने फोटोंचे अल्बम बघावे. आठवणींना जागवावे. कपाट आवरताना मनही आवरावे. वाटले तर दुपारी आळसावून झोपावे. नाहीतर आवडते संगीत ऐकावे. एक दिवस स्क्रीनचा उपास करावा. आरोग्याचा मार्ग धरावा. आनंदाचा रस्ता शोधावा. रात्री सर्वांनी हसत खेळत, गप्पा मारत सहभोजन करावे. सर्वांनी एक दिवस हॉल मध्ये गाद्या घालून झोपावे. असे व्रत करावे. फायदे अनुभवावे. चांगल्या आरोग्यदायी परिणाम मिळण्या साठी आठवड्यातून एकदा हे व्रत करावे. पुढच्या वेळी येईन तेव्हा अनुभव सांगावे. एवढे सांगून देवदूत निघून गेला. व्रत आचरणात आणण्याचा प्रत्येकाने निश्चय केला. 

आपणही असे आचरण करावे. हे आपल्या चार्जिंगचे साधन समजावे. एक दिवस सुट्टी मिळाली म्हणून इकडे तिकडे जाऊन टेन्शन घेण्या पेक्षा हे उपाय करून बघावे. आपणच आपला आनंद शोधावा.

व्रत कसे वाटले सांगावे. आवडले न आवडले जरुर सांगावे.

 

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यवसायातील राज ☆ श्री राजेश्वर बी. पारखे ☆

श्री राजेश्वर बी. पारखे

??

☆ व्यवसायातील राज ☆ श्री राजेश्वर बी. पारखे 

आज सकाळीच गणेश सलून मध्ये कटिंग करण्यासाठी गेलो असता माझ्या आधीच एक गृहस्थ त्यांची कटिंग चालू होती,.. जुन्या ओळखीतून नमस्कार झाला,

स्व.अशोकराव अग्रवाल शेठ यांचे धाकटे चिरंजीव सन्माननीय विकास अग्रवाल यांची भेट झाली,

अनेक जुन्या आठवणीला वळसा घालताना फ्लॅश बॅक मध्ये गेलो,

त्यांच्या मोहक लाघवी गोड वाणीतून मनाला खूप बरे वाटले…

मला ते म्हणाले “माफ करा साहेब तुमचे नाव मला माहित नाही परंतु लॉर्ड्स मारुती व्हॅन वाले म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखतो…

इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मी त्यांना विचारले… “गोपाल प्रिंटिंग प्रेस” चे नाव तुम्हीं अजूनही व्यवसायातून जपून ठेवले आहे,

“ते म्हणाले आमच्या आजोबांची आणि वडिलांची ती कृपा आणि संस्कार आहेत…”

या यशस्वी व्यवसायाचे अती महत्वाचे राज त्यांनी बोलून दाखविले…

ते म्हणाले…”आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे आमच्या तिघा भावांना दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी शिकविल्या…”

“एक प्रत्येक ग्राहकांशी अगदी प्रेमाने अदबीने विनम्रपणे वागायचे कारण प्रत्येक ग्राहक आम्हाला काही न काही देऊनच जातो, “

“आणि दुसरे अतिशय महत्वाचे आपल्या कामगारांचे पगार दुनिया इकडची तिकडे होवो महिन्याच्या 1 तारखेला त्यांचा पगार झालाच पाहिजे, “

एवढे बोलल्यावर त्यांच्या आवाजात एक कंपन आले आणि गंभीर आणि भावनिक शब्दात ते सांगू लागले…

“वडील म्हणायचे महिन्याच्या 1 तारखेला कामगार नाही तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोर त्याच दिवसाची प्रकर्षाने वाट पहात असतो, “

घरातील किराणा असेल, लेकरांची कपडे लत्ते असतील, शालेय सामग्री असेल, चपला असतील, दूधवाला असेल, प्रत्येकाची देणेदारी, दवाखाना असेल…अशा अनेक गरजू गोष्टीची पूर्तता महिन्याच्या 1 तारखेला मोठी आशा धरून दरवाजाच्या उंबऱ्यावर उभी असते, “

“त्या एक तारखेला जेंव्हा आपला कामगार घरी जातो ना! “

“तेंव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक जण मोठ्या आशेने दरवाज्याकडे टक नजर लावून बसलेले असतात, “

“आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांचा आपण हिरमोड कधीच करायचा नाही”

थोडेसे भावनिक ते म्हणाले,

 “या दोन वडिलांच्या तत्वावर आज आम्हीं “गोपाल प्रिंटिंग प्रेस” ला इथपर्यंत म्हणजे 82 वर्षानंतर ही व्यवस्थित चालू शकलो…”

पुढे जाऊन ते हेही म्हणाले…”आजही आम्ही तिघे भाऊ दीपक शेठ, संदीप शेठ आणि मी विकास एकत्र आहोत…”

“आमचे विचार आचार एक आहेत…”

“आमचे तिन्ही भावांचे कुटुंब एकत्र आहे…”

मी मनाशीच पुटपुटलो…

पवित्र ग्रंथ सांगतो…”तीन पदरी दोर सहसा तुटत नाही”

याचा प्रत्यय आज याची देही आला…

 1943 साली अग्रवाल कुटुंबियांनी सुरू केलेले हे श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील दालन आजही “गोपाल प्रिंटिंग प्रेस” या नावाने दिमाखात यशस्वी रित्या चालू आहे…

छोट्याश्या भेटीतून दोन मूलमंत्र उराशी घेऊन आजचा दिवसाचे अत्यंत सार्थक झाल्याचे खूप मोठे समाधान आज मला झाले…

© श्री राजेश्वर पारखे

जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर

 9822258403

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. इरावती कर्वे – लेखक – बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. इरावती कर्वे – लेखक – बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी, थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका, डा.इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन.

महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डा.इरावतीबाई कर्वे याही एक आहेत.पुण्याच्या फर्ग्युसन कालेजचे प्राचार्य डा.दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला.वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते.वडिल म्यानमरधील एका कंपनीत नोकरी करीत होते.मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे.त्यांना पाच भाऊ होते.म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले.कुटुंबात त्यांना माई म्हणत.विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.

लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती.ठसठशीत कुंकु.घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते.पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन कालेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कूतूहलाने व आदराने पाहत असत.

वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले.आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या.१९२२ साली त्या मट्रिक झाल्या.१९२६ साली फर्ग्युसन कालेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी.ए.झाल्या.आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन कालजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला.१९२८ साली त्या एम.ए.झाल्या.त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी.एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या.१९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी.एचडी मिळाली.तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते.बाई तर परदेशात जाऊन पी.एचडी.होऊन आल्या होत्या.पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती.काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले.व नंतर त्यांनी डेक्कन कालेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते.त्यामध्ये त्या रमून गेल्या.महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन कालेजचे प्राचार्य रँग्लर र.पु.परांजपे यांचा सहवास लाभला होता.त्यांच्या घरीच त्या राहत होत्या.या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले.

संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता.संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या.जगभर प्रवास केला.मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले.अखंड वाचन केले.शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले.जगभर व्याख्याने दिली.त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे.चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे.हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द किर्ती मिळवून दिली.नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.रुढअर्थाने त्या स्त्रिवादी नाहीत.परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रिवादी विचार प्रसवले आहेत.हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल.स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात.इरावतीबाईंनी स्त्रीयांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले.त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले.परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले.त्यांना पुरुषांच्याबरोबरीने शिकू द्या असे सांगितले.

इरावतीबाईनी मानवंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे.महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे.त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे.”युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे.महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे.हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो.भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे.परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली.समारंभ संपला.बाई घरी चालल्या.परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते.त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते.काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते.याच विचारात त्या घरी चालल्या होत्या.वाटेत मुलांचा खेळ चालला होता.बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे! शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? ती बाई जात आहेत ना? त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”.एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या.त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले.आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते.मनाची परिपूर्ती झाली होती.समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती.” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच.”कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.

खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती.स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते.हे त्यांना सांगायचे होते.परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.

त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे.मनाचा तळ ढवळून काढणारे आहे.वैचारिक घुसळण करणारे आहे.एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे.अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुध्दीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाईं वारीत सामील व्हायच्या.भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले.११ आगष्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली.खूप व्याख्याने दिली.परदेशात लौकिक मिळविला.शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या.सनातनी पुण्यातल्या भररस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन कालेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी या महाराष्ट्राच्या विद्वान सुपूत्रीला साष्टांग दंडवत.

लेखक – बी. एस. जाधव 

प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कटू वास्तव – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कटू वास्तव– – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं. 

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या.आपण टपरीवर चहा घेऊ.” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा.”

आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला. 

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. 

५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो. 

 बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. 

“पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय? ” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. 

पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही. 

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही..! बिल भरून माणसं निघूनही गेली. 

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात..! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया..! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात..! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय?

आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही. 

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का?

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत.

बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील?

कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही. 

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे..! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात?

सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? 

जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही. 

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावायलाच हवा.

*राष्ट्रहित सर्वोपरी* 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

ग्रूपमध्ये आनंद असतो.

ग्रुपमध्ये उत्साह असतो.

ग्रुपमध्ये प्रोत्साहन मिळतं.

ग्रुपमध्ये जिव्हाळा असतो.

ग्रुपमध्ये एकमेकांची काळजी असते.

ग्रुपमध्ये सुसंवाद साधता येतो.

ग्रुपमध्ये सहकार्य मिळतं.

ग्रुपमध्ये शक्ती मिळते.

ग्रुपमध्ये दिलासा मिळतो.

ग्रुपमध्ये प्रबोधन होतं.

ग्रुपमध्ये आदर मिळतो.

ग्रुपमध्ये प्रेम मिळतं.

ग्रुपमध्ये आपुलकी असते.

ग्रुपमध्ये समन्वय असतो.

ग्रुपमध्ये सामंजस्य असते.

ग्रुपमध्ये मार्गदर्शन मिळतं.

ग्रुपमध्ये समुपदेशन होतं.

ग्रुपमध्ये सांत्वन केलं जातं.

ग्रुपमध्ये सामाजिकीकरण होतं.

ग्रुपमध्ये व्यक्तिमत्व विकास होतो.

ग्रुपमध्ये मनोबल वाढतं.

ग्रुपमध्ये वक्तृत्व विकसित होतं.

ग्रुपमध्ये आपलेपणाची भावना असते.

ग्रुपमध्ये बुद्धीची मशागत होते.

ग्रुपमध्ये अंतःकरण विशाल होतं.

ग्रुपमध्ये एकटेपणा दूर होतो.

ग्रुपमध्ये निराशा दूर होते.

ग्रुपमध्ये स्वयंविश्वास वाढतो.

ग्रुपमध्ये विचार प्रगल्भ होतात.

ग्रुपमध्ये भाषण व संभाषण सुधारते.

ग्रुपमध्ये मानसिक परिवर्तन घडून येतं.

ग्रुपमध्ये बौद्धिक विकास होतो.

ग्रुपमध्ये भावनिक विकास होतो.

ग्रुपमध्ये सकारात्मकता वाढते.

ग्रुपमध्ये संवेदनशीलता वाढते.

ग्रुपमध्ये कौशल्य विकसित होतं.

ग्रुपमध्ये संयम शिकता येतो.

ग्रुपमध्ये ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लागते.

ज्याला ग्रुपचे महत्त्व कळतं तो संघटित होऊन टिकून राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच..!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मौन… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ मौन…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

मौन म्हणजे चूप राहणं, निशब्द असणं. मौन पाळणं, म्हणजे न बोलणं.

मौन पाळणं जर साधलं तर आपल्या जिभेवर आपला संयम राहतो. मौनात एक विलक्षण सामर्थ्य आहे. न बोलता खूप काही साधता येतं.

मौन राहून एखादं काम करताना एकाग्रता वाढते. वाढलेली एकाग्रता कामातली उत्कटता वाढवते. काम अधिक चांगले होतं.

कधी कधी बोलून सांगून न जमणाऱ्या गोष्टी मौन साधून साधता येतात. मौन साधणारा अंतर्मुख होतो. त्यामुळे तो आत्मपरीक्षण करू शकतो. वरवर सोपी, साधारण वाटणारी क्रिया; आत्मिक उन्नतीचा साधा मार्ग आहे. जसे पैसे वापरले की संपतात. वापर केल्याने वीज संपते, पाणी संपते आणि त्यातील ऊर्जा संपत्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपण बोलून आपली ऊर्जा, आपली शक्ती नष्ट करतो. विजेचा संचय केल्यास ऊर्जा साठून राहते. अगदी त्याचप्रमाणं, मनाचं मौन पाळल्यास आपल्या अंतरीक ऊर्जेचा ऱ्हास थांबतो. आपली शक्ती वाढते.

योग्य वेळी शांत राहणं महत्त्वाचे असतं. मौनामुळं भांडणं, वादविवाद टाळता येतात. शांतता टिकून राहते.

तसं पाहिलं तर, वाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि याबरोबरच जीभ हे देखील महत्त्वाचं ज्ञानेन्द्रिय आहे. जिभेचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि चव घेण्यासाठी करतो. दोन्हींचा अतिरेक घातकच ठरतो. मौनव्रत म्हणजे मानसिक तपच आहे. परंतु वाणीला विराम देणं इतकं सोपं नाही. सर्वांनाच ते जमत नाही. आपल्यामध्ये काहीजण असे असतात की, त्यांच्या तोंडात तीळही भिजत नाही. न बोलता राहणं अशक्यप्राय असतं बऱ्याच जणांच्यासाठी! त्यांची जीभ सतत चालू असते. विषय कोणताही असो, त्यातील काही माहिती नसली, तरी ते बोलत असतात. बोलण्यासाठी काही असो वा नसो पण त्यांच्या बडबडीत खंड पडत नाही.

समंजस लोक कमी बोलतात.त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात. काही गोष्टी साध्य होतात.

मौन पाळणं म्हणजे तोंडानं न बोलणं एवढाच मर्यादित अर्थ नाही हं. खाणाखुणा करणं, लिहून दाखवणं, चेहऱ्यावर विविध भाव प्रगट करणं, मान हलवणं यातलं काहीही न करता राहणं म्हणजे खरं मौन. मौनकाळात व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा नसतो. कोणते; अगदी कोणतेच विचार मनात आणायचे नसतात. चित्ताची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न मात्र करत राहायचं असतं. म्हणून चिंतन करण्याची कला मौनव्रतामुळे शिकून घेता येते. त्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर असे विकार मनात उत्पन्न होत असतात. मनातील विचारांनी या षड्रिपुंना खतपाणी घातलं जातं. विचारांमुळे शरीराची ऊर्जा खर्ची पडते. अस्वस्थता वाढते. केवळ वाणीनेच नाही तर, मनातल्या मनात बोलणेही बंद करता आलं पाहिजे. मग या षड्रिपुंना जिंकता येईल. म्हणून नेहमी नेहमी नाही तरी, प्रसंग परत्वे मौन पाळायला काय हरकत आहे? कारण मुद्देसूद प्रसन्नता देणारं, आनंद देणारं बोलणं ही एक संवाद कला आहे. शब्द चुकले की गोंधळ होतो.

शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल|

शब्दाचे हे जंगल, जागृत रहावं||

जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता |

पाणी, वाणी, नाणी नासू नये ||

तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी किती सार्थ आहेत! जिभेवर ताबा मिळवला पाहिजे हे खरंच आहे.

कधी कधी मौनातही संवाद असतो. म्हणून मौन हे एक असं साधन आहे, जे न बोलता ही सांगण्याचं काम करतं. अर्धा ओरडा करून जे सांगता येत नाही ते मौनात सांगता येतं. मौन म्हणजे स्वतःच्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजनही असू शकतं. मौन ही एक सकारात्मक, विधानात्मक शैली आहे. शक्तिशाली शैली आहे. कारण, मौन पाळणाऱ्यांच्या आजूबाजूचे लोकही ही व्यक्ती का बोलत नाही, याचा विचार करता करता अंतर्मुख होतात आणि न बोलता प्रश्न सुटतात. म्हणूनच मौन म्हणजे विरोध नाही तर मौन एक परीक्षण आहे.

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मैत्रीतली लक्ष्मणरेखा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मैत्रीतली लक्ष्मणरेखा…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

गाडी गेटसमोर आल्यावर दोन-तीनवेळा हॉर्न वाजवूनही सिक्युरिटीनं दार उघडलं नाही.साहेब प्रचंड चिडले.ड्रायव्हर गाडीतून उतरणार इतक्यात घाईघाईनं दार उघडलं.गाडी आत गेली.काही वेळातच साहेबांनी बोलवल्याचा निरोप आला.गार्डला दरदरून घाम फुटला.ड्युटीच्या पहिल्याच दिवसाची सुरवात वाईट झाली. 

“दार उघडायला उशीर का झाला”साहेब. 

“माफ करा.पुन्हा असं होणार नाही”गार्डनं हात जोडले तेव्हा साहेबांनी केबिनमधल्या इतरांना बाहेर जायला सांगितलं. 

“इथं कधीपासून कामाला आहे? ”साहेब 

“आजचा पहिलाच दिवस”

“बस.चहा घेणार”साहेबांनी विचारल्यावर गार्डनं नको म्हणाला.

“चहा का नको.”

“इथं नको.आता ड्युटीवर आहे”

“ड्यूटी संपल्यावर भेट”निरोप घेऊन गार्ड केबिनच्या बाहेर पडला.ऑफिसमधल्या नजरा टाळत गार्ड गेटवर आला.

—-

संध्याकाळी टपरीवर चहा घेताना साहेबांनी विचारलं “भल्या माणसा कुठे होतास.तीन वर्षांनी भेटतोयेस.”

“माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी झाल्या त्यामुळे कोणाच्याच कॉटॅक्टमध्ये नव्हतो.नंबर पण बदलला.”

“एकदम सिक्युरिटी लाइन मध्ये..”

“अचानक कंपनी बंद पडली.काहीतरी हातपाय चलवावे लागणार होते.म्हणून मग…”

“मी काही मदत..”

“नाही नको.आता व्यवस्थित चाललयं.थँक्स.”

“ऑफिसमध्ये चहा नको का म्हणालास”

“ते बरोबर नव्हतं”

“म्हणजे, ”

“तिथं तू मालक मी कामगार”

“आणि इथं?? ”

“मित्र तेही लहानपणापासूनचे”

“तरीही असं बोलतोस.चहा घेतला असता तर आभाळ कोसळलं नसतं.मैत्री अशी ठिकाणानुसार बदलत नाही.”

“खरंय!! पण परिस्थितीनुसार वागावं लागतं.आपल्या मैत्रीतली ‘लक्ष्मणरेखा’ मला ओलांडायची नव्हती.”

“एकदम असं का बोलतोयेस.”

“आपल्यातल्या अंतराची जाणीव आणि मर्यादाही मला माहितीये”

“पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, ईगो या गोष्टी आपल्यात कधीच नव्हत्या.”

“आताही नाहीत.हेच बघ ना माझ्यासोबत टपरीवर चहा घेतोयेस यातच सगळं काही आलं.तू बदलला नाहीस.”

“आणि बदलणारही नाही.”साहेब.

“करेक्ट!! ”

“तरीही तू असा विचार करतोस.आपली मैत्री जगाला कळली तरी काय फरक पडणार आहे”

“मलाही तेच म्हणायचयं.”

“काय? ”

“आपली ‘मैत्री’ जगाला दाखवायचीच कशाला?? लोकांना विनाकारण चर्चेसाठी विषय द्यायची गरज नाही.”

“हे पण बरोबर आहे, आणि आता भेटत राहू.” चियर्स म्हणत दोघांनी चहाचे ग्लास भिडवले.तेव्हा एफएम वर मन्नादा आणि किशोरदा गात होते “ये दोस्ती, हम नही तोंडेगे…”

— 

पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, ईगो असल्या गोष्टींना मैत्रीत स्थान नसलं तरी एक लक्ष्मणरेखा मात्र असते.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”हा EGO नाही तर SELF RESPECT…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “हा EGO नाही तर SELF RESPECT... ☆ संध्या बेडेकर ☆

 – – कधी कधी शक्ति प्रदर्शन करणं आवश्यक असत.

आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वस्थच होते मी.स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.

मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणार, तस काहीतरी वेगळच. 

 भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळं बघीतल.आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगण चालू होत.

आज काही खर नाही.विचाराची दिशा चूकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.

मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला. 

खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते.हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.

 जोर का झटका जोर से ही लगे असाच वार करायचा.

या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असत ना.

दणका द्यायचे दोन फायदे होतात. 

 एकतर आपल्याला आपली शक्ति कळते.वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची strategy तयार होते.

आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.

उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील. 

त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही.असा आज मी शोध लावलाय.

लहानपणी शिकवल होत भांडायच नाही. आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले. 

 कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची testng पण होऊन जाते.

भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.

 अरे!! त्यावेळेस मला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. चर्चांचा दौर सुरू होतो.जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो. 

 हे सर्व मनात येत राहत. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे अस किती दिवस चालेल? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झाल की लवकरात लवकर भांडण थांबविण आवश्यक असत. कधी कधी लोक दुसर्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात.इंग्रजीत भांडतात.त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही. 

भांडताना केंव्हा थांबायच? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण? किती जण आहेत? आपल्याला उक्सवणारे किती आहेत? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण? किती? शुभचिंतक किती? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच.या अशा लोकांच्या तावडीत जायच नाही.

 There are lot of jealous people with friendly faces around us.We must always remember this truth.

त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फूकट मध्ये मजा घेतात.नुक़सान तर आपलही होतय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, Cease fire करण जमल पाहिजे. 

लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.

 If you want to make wrong decision, ask everyone.

 Cease fire मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पूढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती.एवढ समजण्या इतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझ, माझ्या कुटुंबाच हित समजण्या एवढी हुशार मी नक्कीच आहे. फूकटच काही मिळतय म्हणून लाळघोटेपणा करण, जमत नाही मला. हा माझा

 EGO नाही SELF RESPECT आहे.

 सकाळी विचलीत असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.

म्हणतात ना,…

 Revenge is just waste of Time, Skip people.

हे जरी खर असल तरी कधी कधी छान दणका देण आवश्यक असतच.

शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.

खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात.तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असते.

 छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिन झुंकेगे तो बिल्कुलही नही.

हा मेसेज देणे आवश्यक असत…

At the same time…

If you treat me good, I will treat you better. 

हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते. 

कोणाला सांभाळायच? आणि कोणापासून सांभाळून रहायच? हे ही समजलच पाहिजे. नाही का?

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares