सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

ई-अभिव्यक्ति के सभी प्रबुद्ध लेखकों एवं पाठकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं 🇮🇳.

कुछ अपरिहार्य कारणों से कल शनिवार दि. १५/८/२६ से  दि. २०/८/२६ (६ दिवस) तक ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ✒️संपादकीय निवेदन !!✒️ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 ✒️संपादकीय निवेदन !!✒️ 📖

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी…

काही अपरिहार्य कारणामुळे दि. १६/८/२६ ते दि. २०/८/२६ असे ५ दिवस आपला दैनिक अंक नेहेमीसारखा लिंक स्वरूपात प्रकाशित केला जाणार नाही. त्या ऐवजी अंक थेट व्हाट्सअप ग्रुपवर प्रकाशित केला जाईल. 

शुक्रवार दि. २१/८/२६ पासून अंक पुन्हा नेहेमीसारखा प्रकाशित होईल. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ तकनीकी कारणों से आज गुरुवार  दि. ६/८ /२६ को ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ गंगा माहेराची… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच या संस्थेने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या काव्यास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे सौ. तानवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज पुरस्कार प्राप्त काव्य प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “सांग दर्पणा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त’)

न्याहाळते दर्पणी मी

सज्ज होऊनी साजिरी

ल्याली आभूषणे भारी

शालू माझा भरजरी ||

केला शृंगार देखणा

फिदा माझ्यावरती मी

सांग दर्पणा यामध्ये

काही नसे ना रे कमी ||

 *

तूच खरा मित्र जगी

रूप अचूक दाखवी

उणे अधिक काहीही

ओळखाया तू शिकवी ||

 *

ऐक दर्पणा एवढे

आठवाने मी लाजते

छबी नयनात त्याच्या

पाहण्याला आसुसते ||

 *

त्याची चाहूल लागता

सुखावले मी अंतरी

लाज साखर मिठीची

उमटली गालावरी ||

 *

नेत्र दर्पणी दोघांना

खूण पटे अंतरीची

सरे क्षणातच दूरी

साथ सात पावलांची ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी माय मराठी… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

महाराष्ट्र साहित्य परिषद, इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना त्यांच्या ‘माझी माय मराठी’ या कवितेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

श्रीमती कुलकर्णी यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

 आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझी माय मराठी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(काव्यप्रकार:अष्टाक्षरी)

 माझी ही माय मराठी

अभिमाने येते ओठी||धृ||

हर्षे कविताही येते

गीते नि भारुड गाते

पोवाड्यात ही रमते

ओव्यातुनी ती सजते ||||

 *

विश्वी कथेच्या फुलते

शब्दा लेते नि खुलते

वास्तवास न्याय देते

आविष्कारे ती नटते ||||

 *

कधी कादंबरी बने

शब्दांसवे ती डोलते

वेधकता  दाखविते

सर्वां काबिज करते ||||

 *

लालित्येही ती मांडते

 संवादाने ती नटते

तेजोन्मेषे नि पांडित्ये

मोहिनीच ती घालिते ||||

 *

सारस्वता जी स्फुरते

नाट्यातुनी प्रगटते

नवरसा दाखविते

विश्वासह ती स्पर्शते ||||

© सौ. दीप्ती कुलकर्णी

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information – ☆ रंगमंच/Theatre 🎬 शॉर्ट फिल्म ‘तावीज़’ में युक्तार्थ का जीवंत अभिनय ☆

सूचनाएँ/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री युक्तार्थ श्रीवास्तव

🎬 शॉर्ट फिल्म ‘तावीज़’ में युक्तार्थ का जीवंत अभिनय 🎞️

​जबलपुर। संस्कारधानी की माटी से निकले बहुमुखी प्रतिभा के धनी अभिनेता युक्तार्थ श्रीवास्तव इन दिनों अपनी नई लघु फिल्म “तावीज़” में अपने असाधारण और जीवंत अभिनय को लेकर देश भर में आकर्षण का केंद्र बने हुए हैं। निर्माता अजय जोशी की इस लघु फिल्म में मुख्य भूमिका निभा रहे युक्तार्थ ने अभिनय की एक ऐसी नई मिसाल पेश की है, जिसकी हर तरफ जमकर सराहना हो रही है। यह लघु फिल्म समाज को तंत्र-मंत्र और अंधविश्वास के जानलेवा जाल से दूर रहने का एक बेहद भावप्रधान और मार्मिक संदेश देती है।

Ajay Joshi Films Presents – Taweez – Short feature film.

Please Watch, Subscribe, like and drop your valuable thoughts comments, also on its IMDB page (TAWEEZ).

इस लघु फिल्म में युक्तार्थ का अभिनय सिर्फ कलाकारी नहीं, बल्कि जीवंतता की पराकाष्ठा है। उन्होंने अपने किरदार के दर्द, कशमकश और हर एक जज्बात को पर्दे पर इस तरह उतारा है कि दर्शक खुद को उस चरित्र से जुड़ा हुआ महसूस करते हैं। उनका अभिनय इतना मार्मिक और प्रभावशील है कि देखने वालों को भी रुला देता है। समीक्षकों का मानना है कि उनके चेहरे के हाव-भाव, आँखों की गहराई और संवाद अदायगी में ऐसा जादू है जो सीधे दिलों को छू जाता है। उन्होंने बिना किसी बनावट के, बेहद स्वाभाविक और रियलिस्टिक तरीके से मुख्य चरित्र की आत्मा को पर्दे पर जिंदा कर दिया है।

​युक्तार्थ की यह बेमिसाल अभिनय क्षमता उनके वर्षों के कड़े संघर्ष और कला साधना का परिणाम है। वे रंगमंच के एक बेहद मंझे हुए खिलाड़ी हैं, जिन्होंने देश भर में 1500 से अधिक नाटकों और मोनोलॉग में अपनी कला का लोहा मनवाया है। इसके साथ ही प्रसिद्ध टीवी शो ‘क्राइम पेट्रोल’ सहित कई धारावाहिकों में उनके द्वारा निभाए गए किरदारों ने उन्हें घर-घर में पहचान दिलाई है। अपनी इसी लाजवाब अदाकारी के दम पर आज देश भर में उनके लाखों प्रशंसक हैं। ‘तावीज़’ में उनके इस झकझोर देने वाले अभिनय ने जहाँ दर्शकों को भावुक किया है, वहीं अपनी जन्मभूमि का गौरव भी पूरे देश में बढ़ाया है।

युक्तार्थ भाषा विज्ञानी, हिंदी बुन्देली के मर्मज्ञ स्व.डॉ पूरनचंद श्रीवास्तव के नाती एवं वरिष्ठ पत्रकार प्रतुल श्रीवास्तव, श्रीमती विमला श्रीवास्तव के सुपुत्र हैं।

ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री युक्तार्थ श्रीवास्तव जी को हार्दिक बधाई अभिनंदन 💐

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ ✒️ नम्र निवेदन ✒️ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🙏 नम्र निवेदन 🙏

सर्व कवी व कवयित्री यांना  नम्र निवेदन

“कवितेचा उत्सव” या  सदरासाठी पाठवण्यात येणारी कविता  वीस ओळींपेक्षा मोठी असू नये. कृपया सर्वांनी सहकार्य करावे.

 – संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information – कवितेचा उत्सव ☆ संघर्ष – सम्पादकीय निवेदन – सुश्री अरुणा मुल्हेरकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☘️🌹अ भि नं द न 🌹☘️

शुभंकरोती साहित्य परिषद या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृत्तबद्ध काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अरुणा मुल्हेरकर यांना त्यांच्या ‘संघर्ष’ या गझलेसाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई-अभिव्यक्ती समुहातर्फे श्रीमती मुल्हेरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

आज त्यांची पुरस्कार प्राप्त गझल ‘संघर्ष’ प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

प्रथम पुरस्कार प्राप्त गझल

? कवितेचा उत्सव ?

☆ संघर्ष ☆ अरुणा मुल्हेरकर

(वृत्त ~ लवंगलता (८+८+८+४)

संघर्षाविण नाही जीवन मला समजते आहे

अस्तित्वास्तव झगडायाचे पुरते कळते आहे

अशुद्ध होई पावन गंगा कलीयुगी या आता

सारित कचरा काठांवरती संथ वाहते आहे

 *

चुकला नाही रामालाही वनवासाचा भोग

देवदानवामधील युद्धा छान जाणते आहे

 *

कौरव~पांडव वावरताती विश्वातचि या सार्‍या

धर्मयुद्ध मग न्यायासाठी अटळ मानते आहे

 *

कशी सिद्ध मी करू स्वतःला स्वस्थ बसुनिया सांगा

सापशिडीचा खेळ जणू हा असा खेळते आहे

 *

जुगार आहे आयुष्याचा मांडियला हा वाटे

पटावरी या फासे अलगद तरी टाकते आहे.

 *

निर्णय घेणे सोपे नाही प्रवाह अखंड वाहे

प्रवाहातुनी चालत असता मन घाबरते आहे

 *

एक सारथी संसाराचा विश्वाचा तो नाथ

दयावंत तो कृपावंत तो श्रद्धा धरते आहे

 *

जीवननौका भवाब्धीत या डचमळ डळमळ करते

तारायासी प्रभुजी या हो धावा करते आहे

© अरुणा मुल्हेरकर

मिशिगन, अमेरिका, +१ २४८ ७०६९९९८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ ✒️महत्वाची सूचना !!✒️ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 ✒️महत्वाची सूचना !!✒️ 📖

ई अभिव्यक्ती मराठी साठी साहित्य पाठविण्याविषयी निवेदन:-

अभिव्यक्तीसाठी साहित्य पाठवताना खालील प्रमाणे व्यवस्था केली आहे.

१ .श्री.सुहास रघुनाथ पंडित

यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.

कवितेचा उत्सव, काव्यानंद, क्षण सृजनाचे, प्रतिमेच्या पलीकडले, प्रवास वर्णन, विविधा (ललित व अन्य लेख).

संपर्कासाठी:

व्हाॅटस् ॲप नं. .9421225491 किंवा soorpandit@gmail.com

२ सौ.मंजुषा मुळे

यांच्याकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे:

जीवन रंग (कथा), मनमंजुषा, (स्वतःचे अनुभव, आठवणी यावर स्वत: व्यक्त होणे), इंद्रधनुष्य (माहिती पर साहित्य), पुस्तकावर बोलू काही, चित्रकाव्य.

संपर्कासाठी :

व्हाॅटस् ॲप नं. 9822846762 किंवा msmulay@gmail.com

३ गौरी गाडेकर

यांच्याकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे:

वाचताना वेचलेले (आपल्या वाचनातील उल्लेखनीय साहित्य: लेख, उतारा, कथा, कविता इ.)

संपर्कासाठी :

व्हाॅटस् ॲप नं. 9820206306 किंवा gaurigadekar589@ gmail.com

शक्यतो सर्वांचे साहित्य समाविष्ट केले जाईल याची काळजी संपादक मंडळ घेत असते.संपादन कार्यात सुसूत्रता यावी म्हणूनच वरीलप्रमाणे विभागणी केली आहे.तरीही काही वेळेला येणा-या अडचणीं लक्षात घेऊन काही सूचना करीत आहोत. त्याचा गांभीर्याने विचार करून पालन व्हावे अशी अपेक्षा आहे.

१) आपली कोणतीही साहित्य कृती वरीलपैकी एकाच संपादक मंडळ सदस्याकडे पाठवावी. एकच साहित्य एकापेक्षा जास्त ठिकाणी पाठवू नये.

२) साहित्य पाठवताना वरील विभागणी लक्षात घ्यावी.

३) एखाद्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन त्या संबंधी साहित्य पाठवले जाते. असे साहित्य एक दोन दिवस आधी आले तर पूर्व नियोजित आराखडा बदलून असे ऐनवेळेस आलेले साहित्य स्विकारणे तांत्रिक कारणांमुळे खूप कठीण असते. त्यामुळे असे साहित्य त्या दिवसाच्या किमान आठ दिवस आधी मिळेल अशा बेताने पाठवावे. त्यामुळे
आपण पाठवलेले साहित्य योग्य दिवशी प्रकाशित करता येईल.

४) प्रासंगिक साहित्य (अनपेक्षित सामाजिक/नैसर्गिक घटना, यश इ.विषयी व्यक्त होणे) पाठवतानाही फार विलंब करू नये ही विनंती.

५) लेखासाठी शब्द मर्यादा साधारणपणे १२००-१५०० शब्दांची आहे.लेख,कथा दीर्घ असल्यास त्याचे भाग करून पाठवावेत.

६) कवितेचा उत्सव या सदरासाठी कविता वीस ओळींपेक्षा मोठी असू नये.

७) लेखनाच्या शेवटी आपले नाव व संपर्क नंबर लिहावा.

सर्वांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक साहित्य प्रकार योग्य वेळेत लावता येईल. सर्वांच्या सहकार्याची खात्री आहेच.

धन्यवाद.

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ स्व. अनुराधा फाटक – श्रद्धांजलि ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

🙏🏻 स्व. अनुराधा फाटक 🙏🏻

।। भावपूर्ण श्रद्धांजली ।। 

संपादकीय निवेदन — 

आपल्या समूहातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका व कवयित्री श्रीमती अनुराधा फाटक यांचे वृद्धापकाळाने रविवार दि. २१ जून रोजी दु:खद निधन झाले. आपल्या ई- अभिव्यक्ती या साहित्य-मंचाला सुरुवात झाली, तेव्हापासून त्या या मंचाच्या सदस्य होत्या आणि मंचासाठी सातत्याने लेखन करत होत्या..

त्यांनी कविता, कथा, कादंबर्‍या, बालसाहित्य असे विविध प्रकारचे लेखन केलेले आहे. विशेषत: संतांच्या जीवनावर त्यांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या आहेत, ज्या वाचकप्रिय ठरलेल्या आहेत. आणि यापैकी बहुतेक सर्व कादंबर्‍यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

आपल्या सर्वांच्यातर्फे स्व अनुराधाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली … त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना.

 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

– संपादक मंडळ, 

ई अभिव्यक्ति, मराठी विभाग. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares