कावेरी सुतार

? कवितेचा उत्सव ?

|| बाप, नवरा अन् मुलगा || ☆ कावेरी  सुतार ☆

लहानपणीच त्याच्या हातांत, घराचं ओझं दिलं जातं,

मुलगा आहेस तू, रडायचं नाही, हे मनावर बिंबवलं जातं.

.

शिक्षण सुटतं, स्वप्नं तुटतात, ओढ लागते तीकामाची,

तरीही जगाला किंमत नसते, त्याच्या घामाची अन् श्रमाची.

.

नोकरी नसेल तर स्वतःच्याघरात, तो उपरा होऊन जगतो,

प्रत्येकाच्या नजरेतली टोचणी, तो निमूटपणे बघतो.

.

लग्नानंतर तर फक्त सुखाचे, मुखवटे त्याला लेवावे लागतात,

स्वतःची फाटकी झोळी लपवून, दुसऱ्यांचे हट्ट पुरवावे लागतात.

.

तिला वाटतं तो कठोर आहे, त्याला काहीच वाटत नाही,

पण त्याच्या काळजाचा हुंदका, कधीच शब्दांत फुटत नाही.

.

मुलांची फी, कधी बायकोचाअबोला,

या सगळ्यांच्या ओझ्याखाली, झालाय अधांतरी झोला.

.

तो जुनेच कपडे घालतो, जेणेकरून घर नीट दिसावं,

तो अर्धपोटी झोपतो, जेणेकरून मुलांनी सुखात हसावं.

.

तिला दिसतात फक्त त्याचे, रागीट अन् ताठर डोळे,

पण त्यालाच माहीत आहे, त्याने किती अश्रू आतच गिळले.

.

दिवसभर दुनियेच्या लाथा खाऊन, जेव्हा घरी परततो,

तेव्हाही तक्रारींचा पाऊस, त्याच्याच उंबरठ्यावर असतो.

.

पुरुष आहे म्हणून त्याचं, माणूसपणच हरवून जातं,

आणि अखेरच्या श्वासापर्यंत, तो फक्त एक जबाबदारीम्हणून उरतो.

अखेरच्या श्वासापर्यंत, तो फक्त एक जबाबदारीम्हणून उरतो…

© कावेरी सुतार

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted