श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३२
☆ काळ सुखाचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
बालपणीचा काळ सुखाचा
आजोबांना असं वाटतंय
सेड्यूल माझं पाहिल्यावर
कुठं आहे मला पटतंय
*
झोप होतच नाही आमची
सात वाजता असते शाळा
शाळेमधल्या बाकावरती
अचानकच लागतो डोळा
*
छडी वाजता बाकड्यावर
झोपच उडते खाडकण
कुठे आहोत आपण स्वतः
कळतच नाही काही क्षण
*
जेवण होता थोड्या वेळात
क्लासकडे वळतात पाय
नाहीच चालत कंटाळून
तुम्हीच सांगा ना करू काय
*
खरंच सांगा आता आजोबा
कुणाचं जीवन सुखी आहे
रिक्षामध्ये कोबलंय मला
ईश्वर तुमच्या मुखी आहे
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




