श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३१
☆ सुखाच्या सरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सुखाच्या सरी झेलता येत होत्या
मला चांदण्या माळता येत होत्या
*
सुखाशीन माहेर होते तिचेही
घरी सोंगट्या खेळता येत होत्या
*
झग्यासारखी वेशभूषा फिराया
घरी पैठण्या नेसता येत होत्या
*
धुरा वाहिलेली गुरूंनींच माझी
कथा त्यामुळे वाचता येत होत्या
*
सदाचार माझ्या सभोवार कायम
म्हणूनच शिव्या टाळता येत होत्या
*
नसो ओढ ही शिक्षणाची तरीही
इथे बघ मुली छेटता येत होत्या
*
घराभोवताली असे फक्त लादी
बिया ना कुठे लावता येत होत्या
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






