प्राची अभय जोशी
चित्रकाव्य
चंद्रप्रभा…
प्राची अभय जोशी ☆
☆
सहज शोधती आठवणी
वाट हळव्या मनाची
भिजलेल्या पापण्यांनी
होतसे भावुकता मनाची
*
तरलपणे या आठवणी
मनावर तलम साय धरी
साईच्या तलमपणाचे
हे स्पर्श अलवार रेशमी
*
आठवणी फेर धरूनी
अवतीभवती नाचती
त्यासवे गिरक्या घेई
हसरी मूर्ती मनमोराची
*
कोजगिरीचा चन्द्र नभी
करीतसे मनास आनंदी
चांदणताऱ्यांच्या रातीला
साक्ष मंद मंद प्रकाशाची
*
चंद्र प्रकाश वाट दावीता
तेज उजळले गाभारी
मनातील हिंदोळ्यावर
मात होतसे चंद्राची
*
कोजागिरीच्या चंद्राचे
जणू हे मानवा सुचवणे
अंधार आणि प्रकाशाचा
खेळ आयुष्यातही चाले.
*
चंद्राच्या वाढत्या या कला
कमी होऊनी विरणाऱ्या
आभाळी विरत जाऊनी
अस्तित्वाला जपणाऱ्या…
*
अस्तित्वाला जपणाऱ्या…
☆
© प्राची अभय जोशी
मो 9822065666
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






