श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “मनासारखे घडत नाही तेव्हा” – इंग्रजी लेखक : हैमिन सुनिम ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : मनासारखे घडत नाही तेव्हा..
*आनंदी आणि निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणारे साधेसोपे उपाय
प्रभावी भाषेत सांगणारे पुस्तकं*
लेखक: हैमिन सुनिम
अनुवादिका : माधुरी शानभाग
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पृष्ठ: २२८
मूल्य: ३००₹
आयुष्यातील कठीण प्रसंग आणि अवघड प्रश्न आत्मपरीक्षणाच्या व आत्मविकासाच्या संधी ठरू शकतात, ही जाणीव हे पुस्तक करून देते. आधुनिक जीवनशैलीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक शहाणीव हैमिन सुनिम प्रत्यक्ष अनुभव आणि बौद्ध अध्यात्माच्या आधारे उलगडतात. आनंदी, निरामय जीवनासाठी साधेसोपे उपाय सांगताना ते जगण्याकडे साक्षीभावाने पाहण्याचा सल्ला देतात. मानसिक आणि भावनिक कोलाहलातून शांततेकडे नेणारे व्यावहारिक मार्ग प्रभावी भाषेत मांडतात. मनासारखे घडत नसतानाही स्वतःला समजून घेणे, भावनांचा स्वीकार करणे आणि अंतर्मनातील शांतता शोधणे यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. जगण्याविषयीची शहाणीव वाढवत, संकटांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे. स्वतःशी संवाद साधण्यासाठी आणि आयुष्यात समतोल साधण्यासाठी ही वाचकाला मिळालेली मोलाची सोबत आहे
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

