वीणा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ संध्याछाया ☆ वीणा कुलकर्णी ☆
आयुष्य किती सुंदर वळणं घेतं ना…
एकेकाळी ज्यांचा हात धरून आपण ज्यांना चालायला शिकवलं, त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या आजारपणात त्यांची काळजी घेतली… तीच मुले आज कर्ती सवरती होऊन आपल्या पालकांची काळजी घेतानाचे दृष्य अलीकडे दिसतेय.
– – त्यांच्या डोळ्यांत.. वागण्याबोलण्यात पालकांबद्दल काळजी दिसते, त्यांनी गोळी वेळेवर घेतली का,
ते जेवले का, आज जास्त थकले तर नाही ना… इतके विचार त्यांच्या डोक्यात असतात.
असं बघतो तेव्हा नक्कीच जाणवतं—
लहानपणीची ही आपली मुले किती बरे मोठी झाली?
(कोई लौट आ दे मुझे बिते हुए दिन)
आपण मुलांना वाढवतो,
त्यांना आधार देतो, आता तीच मुले आयुष्याच्या उत्तरार्धात आपले पालक होताना ठिकठिकाणी दिसतात.
जरी वृद्ध नसलो तरी पुन्हा थोडंसं बालपण आल्यासारखं जेव्हा वागत असतो तेव्हा हीच आपली मुलं आपला आधार बनतात.
ही भूमिका बदलताना पाहणं म्हणजे आयुष्याने आपल्याला दिलेली एक अनमोल भेटच…
आज मनात एकच भावना आहे—
मुले नुसतीच मोठी झाली नाहीत तर ती इतकी प्रेमळ आणि समजूतदार झाली की आता त्यांच्या सोबत असण्यात सुरक्षित वाटतं …
ही भावना आयुष्याच्या संध्याछायेत मनात उतरणं म्हणजेच आयुष्य सार्थ झाले समजायचे!!!
© वीणा कुलकर्णी
संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





