श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ चक्रव्यूह… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
माणसाला जगणं महत्त्वाच वाटत. पण त्याला कर्तव्याचा वाटा तुडवताना पडणारा ताण घयाळ करतो. किती केलं तरी काम सरत नाही आणि मनातली मोठेपण घेवून जगण्याची हाव ही मरत नाही. ससेहोलपट सहन करत ताणतणावात गुरफटलेलं जगणं नकोसं वाटतं नाही. यालाच तर माणसांची जिद्द म्हणतात ती जोपर्यंत जोमात आहे तो पर्यंत धडपडत तो नवनवे मार्ग शोधत प्राप्त परिस्थितीसोबत झट्याझोंब्या खेळत तिला नामोहरम करण्यातच आपलं आयुष्य खर्ची घालत असतो. माणसांना कर्तृत्ववान बनवते ती आशा.
ती मोठी चिवट आणि चिकट असते. ती त्याला जन्म जातच चिकटून बसलेली असते, स्फूर्ती देते, कुठल्या तरी ध्येयाचे अमीश दाखवून त्याला कार्यतत्पर बनवते. गती मान करून धावायला लावते. मग माणूस दमत नाही, थकत नाही झपाटल्या सारखा ध्येयाचा ध्यास घेवू धावथच रहातो जगण्याचे सार्थक करण्या साठी. ठरवलेल्या ध्येयाच उदिष्ट पदरी पडलं की त्याचा जीव भांड्यात पडतो. महत्वाकांक्षी माणूस प्रयत्नशील असतो. पूर्वसुरींचा मागोवा घेत तो अनुभव संपन्न होत तो यशस्वी होतो. आपला आवाका ओळखून तो आपल्या भोवती आपणच मारलेल्या रिंगणात आनंदी रहायला शिकतो. पण आशा त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती पुन्हापुन्हा त्याला नवे उदिष्ट देवून धावायला लावते. यालाच मानवी जीवनचक्र म्हणतात पण ते जीवनचक्र नसून जगण्यासाठीचा चक्रव्यूह असतो हे माणसाला फार उशिरा कळतं.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





