सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 106 ?

☆ गज़ल ☆

जसे लव्हाळे जळात असते

तशी सदा तू   मनात असते

 

चिवटपणाची कमाल बघता

इथे तिथे त्या  घरात असते

 

 निशांत होता रवी उगवतो

जगी सुखाची प्रभात असते

 

 मनात माझ्या सदैव असता

 कधी कधी  मंदिरात असते

 

जमीन करते कयास नुसता

खरेखुरे अंबरात  असते

 

 ‘प्रभा’ मला तू नकोस विसरू

तुझ्याच मी अंगणात असते

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद हेमंत सर ?