सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # २९२
☆ तू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
तू एक ताठ कणा,
“मोडेन पण वाकणार नाही”
असा!
मला समजत होते,
तुझे वेगळेपण,
पण सहन होत नव्हते,
तुझे शाब्दिक अंगार,
सहनशीलता—
वेगवेगळ्याच असतात ना…
प्रत्येकाच्या!!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




