श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाटे उठावे स्वतः चहा करावा

झोप मोडेल असा आवाज नसावा

*

प्राणायाम करावा योग साधावा

हाडे मोडतील इतपत तो नसावा

*

फिरायला जावे प्रमाणात असावे

सोबत मोबाईल खिशात असावा

पडाल कोठे तर नक्की सापडाल

आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा

न रागावता गोड मानून घ्यावा

*

किराणा भाजी पोस्ट बँक

फिरणे समजून आनंद घ्यावा

*

ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा

पण त्यात कुठला वाद नसावा

मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा

*

लिहीणे वाचणे वाजवणे गाणे

एखादा तरी छंद नक्की असावा

*

मी कोणी मोठा होतो हे विसरा

मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा

मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती

लक्षात ठेवा हीच कामाला येती

*

आता काय राहलंय? म्हणू नका

कुणाला उपदेश करत सुटू नका

पर्यटन चित्रपट नाटक

राहुन गेले असेल तर उरका

पत्नीला सोबत घ्या विसरु नका

*

प्रकृती आणि पैसा येती कामा

या दोघांना सांभाळून ठेवा

*

संध्याछाया भिववती हृदया

हे विसरण्याची साधावी किमया

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments