श्री जगदीश काबरे
वाचताना वेचलेले
स्व माधुरी काबरे
☆ “नको जाऊस मंदिरात…” – कवी : श्री. रविंद्रनाथ टागोर मराठी भावानुवाद : स्व माधुरी काबरे ☆ श्री जगदीश काबरे ☆
☆
नको जाऊस मंदिरात
फुलं वाहण्यासाठी
मूर्तीच्या चरणावर…
प्रेमपुष्पांचा गंध पसरून घे
आधी आपल्या घरभर ।।१।।
*
नको जाऊस मंदिरात
दिवा उजळण्यासाठी
मूर्तीच्या गाभाऱ्यात…
आधी पापांचा अंधार दूर कर
साकळलेला मनभर ।।२।।
*
नको जाऊस मंदिरात
नतमस्तक होऊन
करायला प्रार्थना…
आधी नम्रपणे वाग ना
भोवतालच्या जगभर ।।३।।
*
नको जाऊस मंदिरात
दगडी मूर्तीसमोर
झुकण्यासाठी गुडघे टेकून…
आधी झुकून त्यांना वर काढ
खितपत आहेत जे खोलवर ।।४।।
*
नको जाऊस मंदिरात
पश्चात्तापाने पोळून
मागण्यासाठी क्षमा…
आधी माफ कर त्यांना
ठेवलेस ज्यांना लांबवर ।।५।
*
कवी : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (गीतांजली)
भावानुवाद : माधुरी काबरे
प्रस्तुती : जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







