कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८७ – विजय साहित्य ?

☆ कविता माझी…!

(अक्षरछंद, दशाक्षरी (५..५), ३२ ओळी)

कविता‌ माझी, अनावृत्त‌ ती

शब्द‌ फुलांनी, आलंकृत ती

अनुभवांची,अनूभूतींची

प्रतिभा शक्ती,‌सालंकृत‌‌ ती. १

*

नांदत आहे, कविता माझी

दूर करीते, बघ नाराजी

वाचत‌‌ जाई,‌ माणसांस‌ ती

शब्द फुलांची, परडी ताजी.२

*

कधी‌ बोलते, कधी वाचते

गूज मनीचे, कधी सांगते

सुख दुःखाचे, पैंजण पायी

कधी हासते, कधी नाचते.३

*

कविता माझी,श्वास बोलका

अंतरातला, शब्द शेलका

नाव गाव नी,‌ वाव देऊनी

जाते ठेऊन, अर्थ नेमका.४

*

आशयारुढ, शब्दांकीत ती

कल्पकतेने, अर्थांकीत ती

फुले तितिक्षा, खुले कविता

रविशलाका,‌स्नेहांकीत ती.५

*

कविता माझी, शब्द प्रतिमा

सृजनतेचा, चढे लालिमा

कधी आरसा,कधी वारसा

संजीवक ती, ही‌ मधुरिमा.६

*

कविता माझी पारिजातक

भाव भावना, होती व्यापक

मनी तितिक्षा, कविराजांची

कलागुणांचे, दैवी द्योतक…!७

*

शब्द पालखी,पहा निघाली

अक्षर लेणी, उदया आली

प्रकाशपर्वी, रसिकांसाठी

शब्द सेतूने, प्रचूर झाली…!८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments