प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२२ ?

☆ गझल – सूर ना सोसे तिला ☆  प्रभा सोनवणे ☆

चूल होती छान, आता धूर ना सोसे तिला

चांदराती आसवांचा पूर ना सोसे तिला

*

ही अशी साधी घरे आहेत का गावाकडे?

 कंदिलाचा मंदसा तो नूर ना सोसे तिला

*

पुस्तके कोरी नवी ,अभ्यास करती बालके

 गोंधळाचा कोणताही सूर ना सोसे तिला

*

बाप गेला माय आता एकटी पाहे घरा

रापलेला चेहरा, संतूर ना सोसे तिला

*

दप्तरांचा रंग नीळा जांभळा आहे जरी

दाटलेले अंतरी काहूर ना सोसे तिला

© प्रभा सोनवणे

१३- ७- २६

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted