सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

महाराष्ट्र साहित्य परिषद, इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना त्यांच्या ‘माझी माय मराठी’ या कवितेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

श्रीमती कुलकर्णी यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

 आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझी माय मराठी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(काव्यप्रकार:अष्टाक्षरी)

 माझी ही माय मराठी

अभिमाने येते ओठी||धृ||

हर्षे कविताही येते

गीते नि भारुड गाते

पोवाड्यात ही रमते

ओव्यातुनी ती सजते ||||

 *

विश्वी कथेच्या फुलते

शब्दा लेते नि खुलते

वास्तवास न्याय देते

आविष्कारे ती नटते ||||

 *

कधी कादंबरी बने

शब्दांसवे ती डोलते

वेधकता  दाखविते

सर्वां काबिज करते ||||

 *

लालित्येही ती मांडते

 संवादाने ती नटते

तेजोन्मेषे नि पांडित्ये

मोहिनीच ती घालिते ||||

 *

सारस्वता जी स्फुरते

नाट्यातुनी प्रगटते

नवरसा दाखविते

विश्वासह ती स्पर्शते ||||

© सौ. दीप्ती कुलकर्णी

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted