सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 86 ☆
☆ मदिरा?☆
(हरिभगिनी मात्रा वृत्त ८+८+८+६)
मदिरेचा भरला प्याला या रंभेची मदहोश अदा
जरा बहकता या वाटेवर कायम ती देईल सदा
मधुशाळेची वाट दाखवी तो सांगाती हा बहुदा
फिरून यावे त्या वाटेने, एखादा भेटेल खुदा
खैय्यामाची मस्त रुबाई जिची जगाला चढे नशा
सुरई मधल्या सर्व कहाण्या सदासर्वदा धुंद कशा?
या मदिरेचा ध्यास ज्यास तो रंक असो वा धनी कुणी
इथे रंगला, त्यास नको ते तख्त ताज वा शिरोमणी
रंग हजारो, या मदिरेचे एक साजिरा सा निवडा
स्वच्छच राहो तुमची प्रतिमा, कुठलाही जावो न तडा
मद्याचे गुणगान असे का? सवाल तुमचा असे खरा
गुलाम अलिच्या गजलेमध्ये अंगूरीचा कैफ पुरा
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अतिसुन्दर विचारणीय कविता
धन्यवाद सर, आपकी आभारी हूँ ।
सुरेख!!
धन्यवाद अरूणजी