कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २६३ – विजय साहित्य
☆ ओवाळू आरती..! ☆
☆
ओवाळू आरती सप्रेम, देवा गजानना
दुःखहारक, सुखदायी तू, पुरवी मनोकामना.. ॥ध्रु॥
*
रूप आगळे, जगावेगळे, तू जगताचा त्राता
बुद्धी दायक, गणनायक तू, सुख समृद्धी दाता
आबालवृद्धांचा ईश्वर तू, दूर करी वंचना…॥१॥
*
मुख्य पुराणे, अठरा अपुली, गाती तव महती
शिव,ब्रम्हा,स्कंद,विष्णू, तुजला साकारती
विविध कलांचा,आविष्कार तू, दे भक्तांसी चेतना..॥२॥
*
सत्य,त्रेता,द्वापार,कलियुगी, तुझाच रे अवतार
गौरी नंदन, पुत्र शिवाचा, गजवदनी साकार
संरक्षक,नी गाणपत्य तू, संजीवन यंत्रणा….॥३॥
*
बृहस्पती तू, वाचस्पती तू ज्योतिर्मय कांती
मयुरेश्वर तू, गणाधीश तू देसी सुख शांती
रक्तवर्ण तू, दैत्य विनाशक, ऐरावत आनना……॥४॥
*
मूषक वाहन,चतुर्भूज तू, लेखनिक नामी
भाग्यविधाता, विघ्नेश्वर तू, ये भक्तांच्या धामी
गजाननाची मंगलमूर्ती नित्य, नवी प्रेरणा…॥५॥
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




