मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१८ ☆ घर… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१८ ?

☆ घर ☆  प्रभा सोनवणे ☆

घरातली सगळीच घड्याळे

बंद पडली,

त्यांची टिकटिक ऐकू येत नाही!

 

बाहेर वाहनांची वर्दळ!

सवयीचे आवाज, हाॅर्नस्…

रिक्षा,बस, अँब्युलन्स…!!

सणावारी डी.जे.चं ध्वनिप्रदूषण!

 

आतल्या जगापेक्षा खूप वेगळं

बाहेरचं जग !

बाहेरच्या कोलाहलाने

काहीच बिघडत नाही,

आतल्या शांततेचं!

किती मूकं झालंय घर…

तुझ्या नसण्याने!

तू असताना—-

घड्याळे कधीच बंद

पडायची नाहीत,

इतका वेळ!

सदा टिकटिकत राहायची!

जिवंत असल्यासारखी!!!

 

कालचक्र थाबलंय जणू,

माझ्यापुरतं!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाणे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ गाणे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गाणे जे ह्रदयातून

मग कंठातून

आणि ओठातून येते.

देहातून देहाचे होते.

देह गाण्याचे देहभान विसरते.

रक्तातून शब्दशब्द वाहते.

नि:शब्द करते

कधीकधी नीरवतेचे आक्रोश होते.

संयमाचे काठ मनाचे सांभाळीत

धीर होउन नदीच होते.

देहातून, रक्तातून, मनातून

पापणी पाशी थेंब होउन येते.

शहाणे होउन मग ते

बंद डोळ्यात राहते.

गाणे हे असेच असावे

गाणे हे असेच असते.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३१ ☆ सुखाच्या सरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३१ ?

☆ सुखाच्या सरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सुखाच्या सरी झेलता येत होत्या

मला चांदण्या माळता येत होत्या

 *

सुखाशीन माहेर होते तिचेही

घरी सोंगट्या खेळता येत होत्या

 *

झग्यासारखी वेशभूषा फिराया

घरी पैठण्या नेसता येत होत्या

 *

धुरा वाहिलेली गुरूंनींच माझी

कथा त्यामुळे वाचता येत होत्या

 *

सदाचार माझ्या सभोवार कायम

म्हणूनच शिव्या टाळता येत होत्या

 *

नसो ओढ ही शिक्षणाची तरीही

इथे बघ मुली छेटता येत होत्या

 *

घराभोवताली असे फक्त लादी

बिया ना कुठे लावता येत होत्या

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गावाकाठचा ओढा – श्रीमंतांचा घोडा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

गावाकाठचा ओढा – श्रीमंतांचा घोडा... ☆ श्रीशैल चौगुले ☆

शहरी नाट्य ओढ्याला गिळत आहेत

श्रीमंत नेते गावाला गिळत आहेत.

 *

हिमतीचा शिवाजी सत्तापिसाट आहे

धोरणीबाज राक्षसा अहंः अचाट आहे.

 *

सारा स्वाभिमान पुढार्यांस गहाण आहे

जाणीवपूर्वक छळणारा महान आहे.

 *

भुकंप-सुनामी कोप कळतोच कुणा येथे

माणसाची व्याख्या लाचखोरीत बेभान आहे.

 *

अधिकारी नेते चंगळ अतिरेकात आहे

धमकी दादागिरीत गांधीवाद शांत आहे.

 *

ज्याला त्याला अमिषाची चाड निती ज्ञात आहे

गाव संपताना नथुराम आरामात आहे.

 *

देशाचा विसर, विदेशवादात दंग आहे

नव्या पिढीचे कारण चार्वाकाचा ढंग आहे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ इथे ओशाळली माणुसकी! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? इथे ओशाळली माणुसकी ? श्री आशिष  बिवलकर ☆

माणुसकी ओशाळली,

संस्कार ही थिजले |

वयाची ही न जाण,

अधिकारी हे कसले |

*

वृद्ध कष्टाळू माऊली ती,

नियम कायदा नसे माहित |

रस्त्यावर विकून भाजी,

सोडवी पोटापाण्याचे गणित |

*

कर्तव्यदक्ष धृतराष्ट्र पालिकेचे,

न दिसली तिच्यात त्यांना आई |

कारवाईचा बडगा कठोर ऐसा,

नासधूस सारी, कशाची ही घाई |

*

गाडीत गॉगल लावून साहेब,

गोरगरिबांच्यावर नुसता रुबाब |

घरात नसेल म्हातारी आई त्याच्या,

श्रीमुखात देऊन विचारावा जाब |

*

अतिक्रमण हटाव मोहिमेत,

सगळीकडे चालतो दुजाभाव |

चिरीमिरी, हप्ते वसुली सर्रास,

परप्रांतीयांसाठी चाले धावाधाव |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भैरवी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

☆ भैरवी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(स्त्रग्विणी – गालगा गालगा गालगा गालगा)

 चूक जाणून घे पाप वाटून घे

ताप झाला तरी शाप भोगून घे

काय आहे कमी सांग सारेच तू

लाज पाळू नको काम मागून घे

 *

खेळ खेळून जा मागचा तू पुन्हा

नेमका एक तू डाव टाकून घे

 *

पाहणारा नवी आस ठेवील ना

श्वास रोखून घे अंग झाकून घे

 *

आठवांचा तुझ्या बांध फोडू नको

खोल पाणी तिथे शांत न्हाऊन घे

 *

जीवनाची नशा वेड लावी मना

ताल सोडू नको फक्त नाचून घे

 *

अंत आहे पुढे टाळ त्याला जरा

सांग थांबायला वेळ टाळून घे

 *

थोरवी तू तुझी फार सांगू नको

जाणत्यांच्या पुढे मौन पाळून घे

 *

व्यर्थ कोणासही दोष लावू नको

कोण आहेस तू हेच पाहून घे

 *

ध्यास आहे तुला भैरवी गायचा

सूर छेडायला साज लावून घे

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

जीवन☆ श्री अनिल वामोरकर ☆

रंगूनी रंगात

अवघा रंग

मी श्रीरंग

एकरूप…

 

मी अन् तू

नच उरलो

तरलो तरलो

भवसागर…

 

तूझे अस्तित्व

मज साठी

तू जगजेठी

ब्रह्मांडाचा…

 

श्वास निःश्वास

एका सोडावे

दूजा धरावे

नामस्मरण…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ये ना सखी गं…” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “ये ना सखी गं…” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

संध्येसंगे ये ना सखे गं.. ज्योती संगे ये

ती प्रीत कोवळी मनातली.. डोळ्यात तेववीत ये..

 *

गुलमोहर फुलता फुलतांना.. उधळे दशदिशी जी लाली

गाली सजवून तिला आपल्या.. फुलूनच तूही ये..

 *

क्षितिजावरती सूर्य टेकता.. नभांगणी हळू चंद्र डोकवे

रुणझुणत्या अलगद पायी.. मम मनी डोकावत ये..

 *

चंद्रास पाहुनी ऊर्मी सागरी.. ती मी घेऊन आलो

चंद्रिका होऊनी प्रेमाचे चांदणे तू उधळत ये..

 *

शामरंगी रंगे जशी ही.. सृष्टी आतुरतेने

हृदयात तुझ्या त्या आतुरतेला जपतच तूही ये..

 *

हाक जी वर्षेला मोराची.. वसंतास जशी कोकिळ-साद

तन मन मम जणू तीच आर्तता.. बहर तू होऊन ये..

 सखी गं बहर तू होऊन ये…

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९७ – झुक झुक गाडी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९७ – विजय साहित्य ?

☆ झुक झुक गाडी…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी..)

 मनातली आगगाडी

किती वेगात धावते..?

गूढ गहन भावना

अंतरात सामावते. ..!

नाही खिडक्या नी दारे

काचपेटी भुयारात

घेई विश्वाचा आढावा

अंतरीच्या परीघात….!

 *

सुख दुःख यात्रेकरू

किती येती किती जाती..?

क्षणकाल प्रवासात

मन जुळविते नाती…!

 *

सवयीचे भाऊबंद

विश्वासाचे दोन हात

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे

शिकवती प्रवासात…!

 *

स्वभावाचे‌ बाळकडू

गूढ गहन अगम्य

चूक भूल द्यावी घ्यावी

राग लोभ व्हावा क्षम्य…!

 *

अशा धावत्या गाडीत

अव्यक्ताने‌ व्यक्त‌ व्हावे

येता मुक्कामाचे गाव

संवादाचे हात घ्यावे…!

 *

दिसे एकटी जरी ती

आठवांची उरी यात्रा

विना तिकीट धावते

सांभाळीत प्राणिमात्रा…!

 *

विचारांच्या काहूरात‌

मन जपते मनाला

अशी झुक झुक गाडी

गूढ गहन क्षणाला…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गजरा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गजरा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काळ सारा उमेदीचा

कष्ट करण्यात सरला,

हवा होता जेंव्हा तुला

गजरा नाही माळला!

*

 हौस मौज सारे काही 

 मी बासनात बांधले,

 करून संसार टुकीने

 कुटुंबाचे हित साधले!

*

कधी न करता कुरकुर

दिलीस आनंदाने साथ,

आज माळतांना गजरा

थरथरतो माझा हात!

*

 नसतीस तू साथीला

 होता खडतर प्रवास,

 साथ मिळो सातजन्मी

 ही प्रार्थना परमेश्वरास!

 ही प्रार्थना परमेश्वरास!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares