मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आराध्यदैवत… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ शिवजयंती निमित्त – आराध्यदैवत… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

बेड्या….गुलामगिरीच्या

 झुगारल्या … शिवबांनी

श्वास…मोकळा घेतला

सह्याद्रीच्या….या कणांनी ..||१||

कला..गुणांची पारख

नसे..जातीपाती स्थान

हर एक.,..शिलेदार

स्वराज्याचा…अभिमान…||२||

मावळ्यांच्या..मनोमनी

रुजविला….स्वाभिमान

किल्यांवरी… लहरतो

जनतेचा … अभिमान…||३||

उभे..आयुष्य वेचले

रयतेच्या .. रक्षणार्थ

रणसंग्रामात…होता

तुम्ही कृष्ण…तुम्ही पार्थ ||४||

स्वप्न …स्वराज्याचे पूर्ण

जिजाऊच्या.. हृद्यातले

गड किल्ले… दरी खोरे

पंचप्राण…सुखावले…||५||

कीर्ती.. निनादे त्रिखंडी

मनी..फक्त एक मूर्ती

माझे….आराध्य दैवत

राजे..शिव छत्रपती…||६||

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

रा. कवठेमहांकाळ, ता. कवठे महांकाळ, जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बंध☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

खेकड्याचे ध्यान आहे माणसाचे

चालणारे पाय मागे ओढण्याचे

*

बांधलेला पायगुंता सोडला की

गाढवाला वेड गो-या फुंकण्याचे

*

कावळ्याला रंग आहे कोकिळाचा

ज्ञान नाही उंच ताना मारण्याचे

*

हासुनीया पाहणारा देव होता

कर्मठानी लाड केले सोवळ्याचे

*

ध्येय ठेवा युद्ध अंती जिंकण्याचे

माणसाला श्रेय मिळते साधनेचे

*

वाचनाने वाचवावे जिंदगीला

वर्तनाला बंध बांधा भावनांचे

*

राबण्याला फार मोठे सत्व आहे

शुद्ध सोने होत जाते जीवनाचे

*

व्हा भल्याना सावराया शूर योद्धे

पाय तोडा दहशतीच्या गारध्यांचे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 161 ☆ हे शब्द अंतरीचे… नेत्र… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 161 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… नेत्र… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(अष्ट-अक्षरी)

नेत्र पाहतील जेव्हा, तेव्हा खरे समजावे

उगा कधीच कुठेच, मन भटकू न द्यावे…

*

मन भटकू न द्यावे, योग्य तेच आचारावे

स्थिर अस्थिर जीवन, मर्म स्वतःचे जाणावे…

*

मर्म स्वतःचे जाणावे, जन्म एकदा मिळतो

सर्व सोडून जातांना, कीर्ती गंध तो उरतो…

*

कीर्ती गंध तो उरतो, सत्य करावे बोलणे

राज केले उक्त पहा, पुढे नाहीच सांगणे…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “इंद्रधनुष्य…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “इंद्रधनुष्य…” ☆ श्री आशिष मुळे ☆

पसाऱ्यात साऱ्या तुला शोधतो आहे

पसरल्या रंगांत, मी आसमंत शोधतो आहे

*

दगड दगडावरी मारीत बसलो आहे

घोळक्यात इथल्या मी एकटाच आहे

*

तू येणार नाहीस, जरी हे निश्चित आहे

मी निश्चिंत, कारण मीही फकीर आहे

*

नको मानुस वाईट, माझी ही चंचलता

मी समजूनच घेत आहे, तुझी निश्चलता

*

दाखवलेस ना मला अंतरंग थोडेसे तुझे

बघ मी इंद्रधनुष्य आता उचलले आहे माझे

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “हर्षोत्सव…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “हर्षोत्सव– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

किती घातले देहावर घाव 

गणना त्याची नाही  केली

कित्येकांनी साल काढली

मूकपणाने  तीही साहिली

*

गेली पाने शाखाही मोडल्या

सौंदर्यासह श्वास गुदमरला

असंख्य जखमा अंगी घेऊन

बुंधाही  हताशवाणा झाला

*

मुळे परंतु भक्कम होती

पोषण पुरवत होती माती

घरतीमाता मुळे धरूनीया

हिंमत आतून पुरवित होती

*

त्या धरतीने हलके मजला

कोवळा नजराणा दिधला

यातुन वाढव वैभव गेलेले 

वसा हिरवा मज पुन्हा लाभला

*

हर्षोत्सव  माझ्या मनीचा

नवनिर्मितीच्या आनंदाचा

नर्तन करती कोवळी पाने

फुटतील आणखी  जोमाने

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत पंचमी – शारदास्तवन ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ वसंत पंचमी – शारदास्तवन ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी

तुझा वास असू दे सकल अंतरंगी  ||ध्रु||

तुझ्या हाती वीणा मधूर सप्तसुरी

प्रभा तेजःपुंज प्रज्ञे सावरी

विलसे मयुरावरी सप्तरंगी

नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी ||१||

तुझ्या अर्चनेचे दे संपूर्ण दान

तुझ्या ठायी अविचल राहू दे ध्यान

विवेका असो कांस बुद्धीतरंगी

नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी ||२||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 209 ☆ रूप गणेशाचे… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 209 – विजय साहित्य ?

रूप गणेशाचे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

सगुण निर्गुण

भक्ती आणि शक्ती

लागते आसक्ती

दर्शनाची…! १

*

चौसष्ट कलांचा

पहा अधिपती

ऋद्धी सिद्धी पती

गुणाधीश…! २

*

रूप गणेशाचे

अष्ट सात्विकात

मूर्ती अंतरात

आशीर्वादी…! ३

*

वक्रतुंड कधी

कधी एकदंत

दाखवी अनंत

निजरूप…! ४

*

कृष्ण पिंगाक्षात

गजवक्त्र वसे

लंबोदर ठसे

नामजपी…! ५

*

विघ्न राजेंद्राचा

अलौकीक थाट

संकटांची‌ लाट

थोपवितो…! ६

*

विकट रूपात

गणेशाची माया

सुखशांती छाया

भक्तांमाजी…! ७

*

धूम्रवर्ण छबी

भालचंद्र कांती

देई मनःशांती

शुभंकर…! ८

*

देतसे दर्शन

गणपती‌ इथे

गजानन तिथे

पदोपदी..!९

*

अष्ट विनायकी

गुणकारी मात्रा

फलदायी यात्रा

सालंकृत…!१०

*

विघ्ननाश करी

व्यक्त प्रेम भाव

पैलतीरा लाव

नाव माझी..!११

*

रूप गणेशाचे

वर्णी कविराज

जन्मोत्सव आज

निजधामी….!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वरुप  शब्दांचे… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वरुप  शब्दांचे☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

   शब्दांना  किंमत   असते

   शब्दांना  वजन    असते

   शब्दांना  खोली   असते

   शब्दांना  उंचीही  असते

   हे शब्दांनो,

  तुमचं खरं स्वरुप  कळण्यासाठी

  तुम्हाला प्रसन्न करुन घेण्यासाठी

  बांधेन मी पूजा तुमची ,

  भक्ताने ईश्वराची बांधावी तशी.

  प्रसाद म्हणून  द्या

  फक्त  शब्द फुले.

  त्या शब्द फुलांच्या माळांनी

  सजवावे मी

  महाराष्ट्र सारस्वताचे मंदिर  !

  एक जरी मोगरा फुलला

  माझ्या हातून

  तर,हे शब्दांनो,

  मी कायमचाच ऋणी राहीन.

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ परमोच्च अनुभव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ परमोच्च अनुभव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

काटेरी टोकावरचे पाखरु

अनुभवाचा परमोच्च क्षण

आता उरते आभाळ कवेत

पंखभरारी अंतीमात मन.

*

गुंतावा सोडवावा अंतरिचा

मोहाला संपवित ते सदन

भाव एकरुप आशा संपुष्टी

वेदना दुःख,पराकोटीचे धन.

*

फडफड झाली हृदयी बळ

अन् चैतन्याचे तारे कण

भेद नाही मृदा क्षितीजात

त्याही पलिकडे मोक्ष ऋण.

*

झुपूर्झा’टोकावर हिंदोळून

आत्मअलिप्त कैवल्य तृण

चंद्र जणू भेटला जन्मात

 तिमीर विरले मुक्ती विजन.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दं व बिं दू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दं व बिं दू ! श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दंव भारल्या पानावर

थेंब थबके टोकावर,

आयुष्य क्षणिक उरले

ठसे त्याच्या मनावर !

*

मिळण्या आधी धरेला 

दावी सौन्दर्य स्वतःचे,

किरण पडता अंगावरी 

रूप लाभे मोतीयाचे !

*

नाळ तुटता पानाशी 

क्षणभर दुःखी होतसे,

अंती धरणी मातेला 

आनंदे मिठी मारतसे !

आनंदे मिठी मारतसे !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print