image_print

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाळ- एक संस्कृती ☆ श्री राजीव दिवाण

☆ मनमंजुषेतून :  चाळ- एक संस्कृती -  श्री राजीव दिवाण ☆ ह्या चाळीत जन्माला आलेली नि वाढलेली ही तिसरी पिढी. पण कामानिमित्त इतरत्र रहायला गेलेले, कोणी मुंबई बाहेर,कोणी परदेशी तर कोणी जागा लहान पडते म्हणून वेगळी चूल मांडलेले. पुढील आठवड्यात शक्यतो सर्वांनी एकत्र येऊन,बसून ठरवायचं होतं कि आता ही चाळ पाडून नवी इमारत बांधून काढायची. चाळमालकानी तशी सर्वांना रितसर नोटीस पाठवली होती .... कोर्टाची.. महानगरपालिकेने ऑडिट करून “ सदरहू इमारत जुनी असून धोकादायक म्हणून जाहीर करणेत येत आहे” असा बोर्ड लावला. सत्तरीच्या जवळ पोहोचलेली ही इमारत....तीला "चाळ"म्हणून संबोधलं जायचं. पंधरा बाय पंधराच्या पंचवीस खोल्या,म्हणजे पंचवीस कुटूंबं...सर्व जाती,धर्माच्या माणसांनी व्यापलेली ही " चाळ" म्हणजे "आसेतूहिमाचल" भारताची प्रतिनिधीच... गेल्या तीन पिढ्यांचा जन्म ते मृत्यू हा प्रवास ह्याचाळीनं पाहिला...ती हि "चाळ". ह्या चाळीत काय साजरं झालं नाही ते विचारा... एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालात येणारा प्रत्येक सण,प्रत्येक कुटूंबाच्या सहभागानेच साजरा झाला. संक्रांतीचा तिळगुळ जोशी-देवधरांच्या घरातून निघून व्हाया पाटील खोतांकडून अगदी शेख-फर्नांडिसांपर्यंत वाटला जायचा... तीच बाब इतर सर्व सणांची... होळीला तर बोंबलायला झाडून सगळी पोरं...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार ☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆ माझ्या खिडकीतून दिसतात रात्री नक्षत्रे नि तारे आणि दिवसा वाहत असतात झुळूझुळू मंजुळ वारे ....   खरंच् ...खिडकी...! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे...मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी ... वा...वा..वा....! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर...घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही...घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे...! वा....! काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे....! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ....? माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते....! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते .... , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच ...व माझ्या...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कामाचे नियोजन … ☆ सुश्री अमृता देशपांडे 

☆ मनमंजुषेतून : कामाचे नियोजन... ☆ सुश्री अमृता देशपांडे ☆ काम   काम  काम आज काय केलं? ..आज काय झालं? ..... हे रात्री कागदावर उतरवण्यापेक्षा आज काय करायचं आहे, हे सकाळीच कागदावर नमूद करणं मला जास्त योग्य वाटतं. अशी कामांची यादी करत असताना ' आजच करणे आवश्यक आहे ' अशा कामांना प्राधान्य दिले जाते. अगदी देवाच्या फुलवायची तुपात भिजवण्या पासून बँकेत FD पुनर्जीवित करण्यापर्य॔त, घरातले पडदे धुवायला काढण्या पासून गाडीचा टायर बदलण्या पर्यंत, स्वयंपाकघरातला ओला पुसायचा स्पंज ते मागील दारातील पायपुसणे आणण्या पर्यंत, खिडक्यांचे गज स्वच्छ करण्यापासून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्या पर्यंत, सर्व कामांना सारखंच आणि महत्त्वाचं स्थान मिळतं. एकदा का यादी तयार झाली की स्वतःलाच best of luck देऊन ती कामे पार पाडण्याच्या तयारीला मी लागते.देवपूजेनंतर त्या दिवसाच्या कामाची यादी देवासमोर ( मनात) ठेवली की वाटतं, अर्धं काम झालं.वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं. सुरवातीला केलीच पाहिजेत (must) अशी यादीत न घालायची कामे सुध्दा असतातंच की. ती तर रोजची. अंघोळ, पूजा, नाश्ता, स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाक.  पिण्याचे पाणी उकळून थर्मास भरणे, अशी अनेक. ती सर्व...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महपुरानंतरची एक आठवण ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆ मनमंजुषेतून : महपुरानंतरची एक आठवण  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆ पद्मिनी सातलाच कामाला आली. भराभरा बोलत होती."आत्ताच काय ती भांडी टाका वयनी. सांजच्याला काय मी येनार न्हाई". म्हणाली तेव्हा तिचा  ठसका मला जरा बोचलाच."आता पूर उतरून बरेच दिवस झाले. आता का तुझ रडगाणं?आम्हाला सुध्दा त्रास झालाय महापुराचा. खूप स्वच्छता करायची आहे घराची. त्यात तुझा खाडा. आम्हालाही त्रास झालाय पुराचा. किती स्वच्छता करायची आहे." "आज पैसे द्यायला येनार हाईत.रासन कार्ड, फोटो तयार ठ्येवायला सांगितलंय कवाबी येनार म्हनं.मानसं मोजून तितके हजार देनार" "होय का? महत्वाचंच काम आहे. कर सगळं व्यवस्थित. नि मग ये." मी तिला म्हटलं. निरक्षर आहे पण व्यवहारज्ञान चांगलं आहे तिला. दोन दिवसांनी ती कामाला आली."किती मिळाले पैसे?" "मिळाले की चार हजार.". "आता ते पोस्टात ठेव. अडिअडचणीला उपयोगी पडतील." "व्हय, साठले की गंठन करनार. हौस भागवून घेनार." दुसरे दिवशी पोस्टाचं काम करणाऱ्या बाई माझ्याकडे आल्या. नि त्याच वेळी पद्मिनी पण आली."आणलेस का पैसे? " "आज आण ग बाई तीन हजार. त्या बाई सारख्या मागे लागल्यात." "न्हाई जमायच वयनी. पावनं म्हनाय लागलेत" कुलदैवत करून या." "अग पद्मे, सरकारने हे पैसे तुम्हाला का दिलेत? तुमचं महापुरातलं  नुकसान...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून :  मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे ☆ शेतात ऊसाची रोपे लावायला गेलो होतो. आता नर्सरीत ऊसाची देखील रोपे मिळतात . ऊसाची लागण करणारी पुरुषांची टीम असते. रोपं लावायला मात्र बायकाच असतात. मग मीही बायकांबरोबर गेले. शेतात काम करण्याचा आनंद असतो. जसा लेखन वाचनात असतो. शारीर कष्टाने मनही टवटवीत होते. रोपांची लावणी करण्याची पध्दत मला माहीत नव्हती. मी वाकून लावू लागले. तर बायका म्हणाल्या, 'वाकून कुठवर लावशील? बसून लाव.' 'मला दोन पायावर बसता येत नाही. बसून मागे सरकता येत नाही.' मी म्हटलं. 'अगं असं फतकल घालायचे. अन्‌ असं सरीवर हात टेकवून मागं सरकायचं.' ६० वय ओलांडलेल्या फुईंनी सांगितलं. मग मी बसले सरीत फतकल घालून, खुरप्याने खड्डा खणून त्यात ऊसाचे रोप लावायचे. माती घालून नीट दाबायचे. मग खुरपे , रोपांमधील अंतर मोजण्यासाठी दिलेली दोन फुटाची काटकी. रोपांचा ट्रे मागे ओढायची आणि सरीवर हात टेकूवून मागे सरकायची.  जमायला लागलं . मग मलाही हुरूप आला. बाकीच्यांनी डोक्याला टॉवेल, अंगात जुना शर्ट, कमरेला जुनं गुंडाळलेलं. त्यामुळं त्यांना कपडे खराब होण्याची भिती नव्हती. मला फुई म्हणाल्या, 'सायबीन आली तशीच....
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अबोली ☆ सुश्री मानसी चिटणीस

☆ मनमंजुषेतून :  अबोली  – सुश्री मानसी चिटणीस ☆ लहानपणापासूनच मला अबोली आवडते..माझं नाव अबोली का ठेवलं नाहीस म्हणून मी  आईवर  कितीदातरी रूसले असेन. आमच्या मागच्या अंगण्यात अबोलीचं रान होतं. मी रोज फुलं वेचून आणायचे आणि हट्टाने आजीकडून त्याचा गजरा करून घ्यायचे. रोज वेणीत माळायचे. त्या अबोलीच्या गजऱ्यासाठी मी माझे केस ही वाढवले होते.. चुकला पिर मशीदीत तशी मी बघावं तेव्हा त्या अबोलीच्या रोपांसोबतच असायचे..असं कोणतं नातं , ऋणानूबंध आमच्यात होते काय माहित पण माझं अबोली वेड कायम राहिलं.. लग्न झाल्यावर कित्येक वर्ष गेली आणि संसारीक अबोल्यात माझीच अबोली झाली..अंगणातली अबोली मनात लपून गेली आणि मी अबोली होत गेले. तिचे केशरी रंग रुजवत राहिले रोज नव्याने. अबोली होवून जगताना तिला नेहमीच समजायची माझी भाषा अन् मला तिची सळसळ मोहवायची. साधारण वर्षभरापुर्वी एका झाडवाल्याकडे मला ती मिळाली  आणि माझं अबोलीप्रेम पुन्हा उफाळून  आलं. एखादी जिवलग मैत्रीण भेटावी असा आनंद झाला. वर्षभर ती छान फुलली, डवरली, मोहरली पण  साधारण महिनाभरापुर्वी काही कारणास्तव आम्हाला सगळ्यांनाच  पंधरा दिवस गावाकडेच रहावं लागलं आणि त्यावेळात घरातली सगळी झाडे सुकून गेली त्यात...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतले जसराज…. ☆ सुश्री आसावर केळकर-वाईकर

☆  मनमंजुषेतून : आठवणीतले जसराज.... – सुश्री आसावर केळकर-वाईकर ☆ काहीवेळापूर्वी बातमी आली आणि मनानं खूप वर्षं मागं नेलं. अगदी शालेय वय होतं... नुकताच घरात टीव्ही आला होता आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम त्यावर लागला कि वडिलांची हाक यायचीच... हातातलं काय असेल ते सोडून हाकेला ओ देत धावायचं आणि ‘बैस इथं.. ऐक नीट’ असं त्यांनी म्हणताच टीव्हीला डोळे लावून पाहाताना काय सुरू असेल ते सगळं कानात साठवायचा प्रयत्न करायचा... एकदा असाच टीव्हीवर कार्यक्रम सुरू झाला आणि पपांनी मला हाकारलं... मी धावत आले तर कुणीतरी मैफिलीची अगदी नुकतीच सुंदर सुरांत खूप सुरेल सुरुवात करत होतं आणि कॅमेरा त्याचवेळी फिरून प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेल्या धोतर-झब्बा-खांद्यावर शेला अशी सुंदर वस्त्रं परिधान केलेल्या एका व्यक्तीवर स्थिरावला आणि वडिलांनी सांगितलं, ‘हे बघ... हे पंडित जसराज!’ ती त्यांच्या नावाची झालेली पहिली ओळख! ते खुर्चीच्या हातावर कोपर टेकवून तर्जनी आणि मधलं बोट गालावर आणि उरलेली तीन बोटं हनुवटीवर ठेवून अतिशय कौतुकभरल्या नजरेनं एकाग्रपणे त्या गायकाकडं पाहात होते, त्याला ऐकत होते. पुन्हा कॅमेरा गायकाकडं वळला आणि जेमतेम वीस-बाविशीचा तो तरूण...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुंबईस्पिरीट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर ☆  मनमंजुषेतून : मुंबईस्पिरीट  - श्री अमोल केळकर ☆ Running (Raining)  successfully since २६ जुलै २००५ १५ वर्ष होतील.  अनेक प्रसंग जातायत डोळ्यासमोरुन. त्यानंतरची एक ही २६ जुलै अशी नाही की २००५ ची आठवण आली नाही मुंबई वर अनेक संकटे आली. पण २६ जुलैच्या संकटाचा वय्यक्तिक अनुभव घेतल्याने ते मनावर कायम कोरले गेलंय म्हणूनच आज सगळ्या जगासमोर भयानक आपत्ती असताना, यापूर्वी असे भयानक संकट कुठले अनुभवले?  तर २६ जुलैचा प्रलय असे मी सांगेन दुपारी ३ ते दुस-या दिवशी उजाडेपर्यत मुंबईची जीवन वाहिनी अर्थातच लोकलच्या कुशीत, कुर्ला स्थानकात ती काळ रात्र काढली. त्यावेळी स्थानकात दोन लोकल एक ठाण्याकडे जाणारी तर एक मुंबई कडे जाणारी ज्यात मी स्वतः होतो, माझ्यासारख्या  हजारो लेकरांचा सांभाळ करत या दोन माऊली भक्कम उभ्या होत्या. मी कुर्ला स्थानकात लोकल मधे सुखरुप अडकलोय हा घरी साधारण रात्री ७ च्या सुमारास धाडलेला शेवटचा निरोप. नंतर केवळ प्रतिक्षा. काही तासात लोकल सुरु होऊन कुर्ल्याहून पहिल्या लोकलने परतायचे भले  रात्रीचे ११/१२ वाजले तरी चालतील ही आशा संपुष्टात आली जेंव्हा रुळावरील पाणी फलाटाला समांतर...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चांदीचा पेला ☆ सौ अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून : चांदीचा पेला - सौ अंजली दिलीप गोखले ☆ अमेरिकेतील नेब्रास्का या छोट्या गावांमध्ये पाच सात वर्षाची मुले खेळत होती. जवळच एक खोल पाण्याचा हौद होता. खेळता खेळता मोठ्या भावाने डी कल्सन या आपल्या लहान भावाला पाण्यात ढकलले. तो गटांगळ्या खायला लागला. सगळेजण खूप घाबरून गेले. बुडता बुडता त्याचे लक्ष आकाशाकडे गेले, तेथे त्याला अनेक रंगांच्या प्रकाशाच्या झोताने सगळे व्यापले आहे असे जाणवले. त्या प्रकाशाच्या मध्यभागी एक छानसा चेहरा दिसला, त्याचे डोळे टपोरी पण शांत होते. तेवढ्यात एका मुलाने झाडाची एक लांबलचक काठी पाण्यामध्ये खोलवर बुडवली आणि त्याने हाताने गच्च पकडली. मुलांनी त्याला ओढून काठावर आणले. पुन्हा मुलांचे खेळणे सुरू झाले. त्यानंतर बरोबर बारा वर्षांनी डिकन्स आई बरोबर शिकागोला गेला होता. अठराशे 93 चा तो सप्टेंबर महिना होता, तिथे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रेलिजनस अधिवेशन सुरू होते, अचानक त्या मुलाला पुन्हा हा प्रकाशाचा अजस्त्र झोत दिसला. एक व्यक्ती सभागृहामध्ये जाताना दिसली. तो मुलगा आईला म्हणाला,"आई, ज्यावेळी मी पाण्यामध्ये बुडत होतो, त्यावेळी हीच व्यक्ती आली होती."ते दोघेही त्या इमारतीकडे धावले. ती व्यक्ती...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोनाडा ☆ सुश्री दीपा पुजारी

☆ मनमंजुषेतून : कोनाडा – सुश्री दीपा पुजारी  ☆ आज सकाळपासून मन सैरभैर झालंय माझं.कारणही तसंच होतं.भावानं फोन वर सांगितलेली बातमी तशीच होती.आई बाबांनी आमचं जुनं घर पाडून नवीन बांधण्याचं ठरवलं होतं. हे कधी ना कधी होणार च होत.पण मनच ते. केंव्हाच माहेरघरी पोचलं. आमचं घर तसं जुनंच,मातीचं, दोन मजली.जुन्या पध्दतीचं, तरीही मायेचा गारवा देणारं! या घरात आठवणींचा खजिना होता.असच एकदा बाहेरच्या खोलीतल्या कोनाड्यात मी एक पेन लपवून ठेवलं होतं. मिलिंद, माझा लहान भाऊ, त्यानं घेऊ नये म्हणून. बाबांनी आणलेलं तेच पेन दोघांना पाहिजे असे.बरेच दिवस या कोनाड्यानं पेनाचं गुपित सांभाळून ठेवलं.त्या कोनाड्यात आईनं एक कृष्णाची मूर्ती ठेवली होती.गोकुळाष्टमी ला तिथं कोनाड्यात च सजावट करून पूजा केली जाई. याच खोलीत गणपतीचा कोनाडाही होता. चांगला लांब रुंद तसाच उंच.पुढील चौकटीला छानशी नक्षीदार कमानी होती.कोनाडा बंद करण्यासाठी लहानस दार होतं,पिटुकल्या कडीसह. माजघरातल्या कोनाड्यांची साठवण काही वेगळीच बरं. एकात तेलाची बुधली, फणीपेटी, कंगवे, कुंकू,रिबीनी इ.वस्तू असत. दुसऱ्या कोनाड्यात वाळवून ठेवलेल्या भाज्या, कडधान्य असतं.माहेरपणाला आलेल्या माझ्या आत्त्या या कोनाड्यांमध्ये त्यांचं बालपण शोधत स्वैपांकघरातील कोनाडे म्हणजे आजच्या घरांतील स्टोअररुम!...
Read More
image_print