मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? निसर्ग … ☆ श्री अनिल वामोरकर ☆

रंगांची उधळण

निसर्गाचं देणं

रंगून रंगात जाणं

मन:शांतीचं लेणं…

*

छाप रंगाची

ठेवून लतांवर

मोहवून टाकते

मन:पटलावर..

*

दूर दूर हिरवाई

आकाशाची निळाई

या संधी समयी

अंतरात प्रज्वले समई…

*

हिरवाई ती शांततेची

केशरी ती विरक्तीची

धवल निर्मळतेची

शिकवण ती आध्यात्म्याची…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२४ ☆ आई… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२४ ?

☆ आई ☆  प्रभा सोनवणे ☆

बहरली अंगणी जाई

अन आठवली माझी आई!

*

मन आईचे निर्मळ

शुभ्र फुलांची ओंजळ!

*

दूर टेकडीच्या पलिकडे

माझे एक सानुले खेडे!

*

त्या हिरव्या वळणावर

आहे मायवेडे घर!

*

जरी माहेर माझे दूर

येई इथंवर आईचा सूर!

*

किती काढाव्या आठवणी

येई डोळ्याला गं पाणी!

*

आई मायेची रांगोळी

आई ममतेची पाकोळी!

*

आई शिवालयातील समई

आई… मुक्ताई ….जनाई!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस☆ श्री अनिल वामोरकर ☆

(जिवलग विषय. त्याचे आगमन, बरसणे, म्हणजे नवजीवन चराचरास. अन्न पाण्याची सोय करणारा, सखाच की. तसा पाऊस हा आध्यात्मिक सुद्धा!

तेच या कवितेत मांडण्याचा प्रयत्न! बघा आवडते का?)

थेंब, रिमझिम आणि मुसळधार

 

विजेचा गडगडाट

सतर्क व्हावे

सूचक साधकासी

श्रीगणेशा करावा साधनेचा..

 

साधनेचा

एक एक थेंब

आर्तता वाढवी,

जवळ नेई

परमेश्वराच्या…

 

साधनेतील

थेंब थेंब जोडी,

सातत्य तया नाम,

रिमझिम संततधार बरसे,

भक्तीबीज अंकुरण्या…

 

आर्ततेची परिसीमा

समाधी अवस्था,

त्याचे प्रत्यक्ष दर्शन,

सार्थक जीवनाचे,

जीवनाची इतिश्री,

मुसळधार.. कृपा..

शांत शांत शांत…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रात्र पावसाची… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ रात्र पावसाची... ☆ श्रीशैल चौगुले ☆

चंद्र झाकलेला

ढग धावणारे

वाट अर्धकाळी

बंध गोवणारे.

*

वारा गारधुंद

स्पर्श अंतरीला

भाव आठवात

ऋतू मंथरिला.

*

मन आषाढात

सृष्टी रिमझीम

घर कोसभरी

ओल रुमझुम.

*

साथ पावलांची

साज सळसळ

किर्र रातकिडे

झरे खळखळ.

*

दृष्टी डोकावून

तारे अल्पसेज

नीर साचलेले

धरा रंगरेज.

  

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मानस-वारी…“☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मानस-वारी☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

 सकाळी उठता नाम तुझे घ्यावे,

 नमनासाठी  दोन्ही हात जुळावे   !

 स्नान करताना, चंद्रभागे आठवावे,

  नामस्मरणात तुझ्या, चिंब चिंब व्हावे!

*

  प्रपंच रेटता, सुख-दुःख विसरावे,

  तुझ्या दर्शनाने, भोग सारेच सरावे!

  विठ्ठल – विठ्ठल सदा, मुखाने वदावे,

  तुझे रूप माझ्या चित्ती,सदैव असावे!

*

  तुझ्या चरणावरी, ठेवूनिया डोई,

  आनंदाचा पूर डोळां, भेटता  विठाई !

  जन्म-मरणाची तूच, चुकवावी फेरी,

  एकरूप होवो  देह, तुझियाच ठायी!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू जा पंढरपुरी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

🍃 तू जा पंढरपुरी… 🍃 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

करुन ये सुखाची वारी

पांडुरंगा पुढे गाऱ्हाणी मांडूनी

चंद्रभागेच्या तिरी

सारी दुःखं सांडूनी…

 

बाजूलाच दिसेल रुक्मिणी विटेवरी

कर कटावरी..

एकटीच एकाकी तिच्या गाभारी

तिला पाहून घे तू डोळे भरुनी..

 

खोल श्वास तिचा घेता येईल का जाणूनी ?

मग कदाचित,

तू घेशील मला समजूनी..

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंढरीच्या वाटेवरी… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पंढरीच्या  वाटेवरी… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

पंढरीच्या वाटेवरी वारी थेंबाची चालली

थेंब अबिरी रंगता विठू नाम ती बोलली

*

टाळ गाजविती थेंब दगडांच्या शिळेवरी

ओवी तुषार पानात टिळा शोभे भाळावरी

*

दगडांच्या कपारीत पाणी वाजवे मृदुंग

थेंब वारकरी नाचे थेंबासवे विठू दंग

*

थेंब अश्व धावे धावे करी शेतात रिंगण

पिक मनी सळसळे भरे धान्यांनी अंगण

*

चाले संताच्या पालख्या थेंब होई तेथे भोई

दंग भजनात होता पाप, ताप सारे धोई

*

थेंब चंद्रभागी नाचे भेट पुंडलिका घेई

रखमाई म्हणे म्हणे सुख पांडुरंग देई

*

विठू  मंदिर पायरी नामा तेथे वाट पाही

थेंब अमृत भेटीत मुखी  वारकरी जाई

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंद दर्शनाचा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंद दर्शनाचा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

न्हावू चला सुखाने प्रेमात विठ्ठलाच्या

दिंडी मधून जावू गावात विठ्ठलाच्या

 *

खांद्यावरी पताका घेवून वैष्णवांची

रंगून दंग होवू रंगात  विठ्ठलाच्या

 *

आध्यात्म साधनेचा मांडू प्रपंच साधा

होवू विनीत आता ध्यानात विठ्ठलाच्या

 *

विसरून भेद सारे समता धरून वागू

होऊन एक जावू नादात विठ्ठलाच्या

 *

वारीत पंढरीच्या मिसळून धन्य होऊ

सहवास नोंदवाया खेळात विठ्ठलाच्या

 *

जपल्या मनात आम्ही आहेत खूप इच्छा

पुरवा म्हणून सांगू कानात विठ्ठलाच्या

 *

घेवू मिळून सगळे आनंद दर्शनाचा

होतील संत भेटी दारात विठ्ठलाच्या

 *

साधा प्रपंच नाही आहे कठीण मोठा

तरण्यास दिव्य शक्ती नामात विठ्ठलाच्या

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विनवणी… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ विनवणी नीलांबरी शिर्के 

मातीची मशागत केली

कसदार पेरले बीज

अंकुरत्या बीजाला तो

कुतुहले निरखतो रोज!!

*

ही काळी आई त्याची

देतसे मुखाला घास

घन भरूनी येवो नभी

धरणीस हवा पाऊस!!

*

 मातीत बैसुनी कुणबी

 आभाळा जणू विनवितो

 धरती पाऊस मिलनी

 तो स्वप्ने रेखीत बसतो!!

*

उघड्यावर त्याची शेती

 उघडेच तयाचे धन

 या धडपडणाऱ्या जीवा

 दे सुख पाऊस रूपानं!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ छत्रीवाली! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? छत्रीवाली! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

सुंदर पिवळी छत्रीवाली 

आनंद लुटत्ये पावसाचा

तमा नाही चिंब वसनांची 

वर्षाव झेलते धुंद सरींचा

*

बेभान होऊनी ललना 

नाचे मनसोक्त पावसात 

जणू देण्या पोज बहुदा 

उंच धरली छत्री हातात

*

करुनी न्यारा पदन्यास 

हसू मोकळे मुखावर 

फिकीर नाही कसली 

जरी बुडले सारे चराचर

*

व्याख्या स्वर्गीय सुखाची

हीच असावी तिजसाठी 

आला क्षण करा साजरा

शब्द असावे तिज ओठी

शब्द असावे तिज ओठी

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares