नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ हे सुंदरसे घर… ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
संगमरवरी सुंदरसे घर
सभोवताली गर्द हिरवळ
मधून छोटी फुले फुलली
शांत हलका गंध दरवळ!
*
पक्षी हलके कूजन करती
जणू गाती निसर्ग आरती
निवासास हे ठिकाण असता
प्रसन्न होई गती नी मती!
☆
© नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






