श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ तुझे पंढरपूर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
दिंडी चालवावी पुढे
मागे ठेवा, गणगोत गोत्र.
दुःख विसरुन जावे
हेच आयुष्याचे सुत्र.
मुखी हरीनाम सदा
जपू पांडुरंग मंत्र.
सुखपंढरीस जावे सवे
वारकरी सारे मित्र.
ध्यानीमनी इथेतिथे
आहे ईश्वर सर्वत्र.
आत्मशोध घेताक्षणी
देही वसे अहोरात्र.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





