मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गजरा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गजरा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काळ सारा उमेदीचा

कष्ट करण्यात सरला,

हवा होता जेंव्हा तुला

गजरा नाही माळला!

*

 हौस मौज सारे काही 

 मी बासनात बांधले,

 करून संसार टुकीने

 कुटुंबाचे हित साधले!

*

कधी न करता कुरकुर

दिलीस आनंदाने साथ,

आज माळतांना गजरा

थरथरतो माझा हात!

*

 नसतीस तू साथीला

 होता खडतर प्रवास,

 साथ मिळो सातजन्मी

 ही प्रार्थना परमेश्वरास!

 ही प्रार्थना परमेश्वरास!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुलमोहर… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ गुलमोहर… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गुलमोहरा, गुलमोहरा,

 फुलवलास तुझा पिसारा!

जेव्हा पसरून येतोस तू,

 उधळीत तुझा रंग सारा! . १

पानां पेक्षा रंग बेरंगी,

 फुलांचा गुच्छ तो बहुढंगी!

उष्ण झळा उन्हाच्या झेलीत,

 उभा रहातो तू पहात संधी! .. २

 *

 ना गंध, ना रूप दिसेना,

तुझ्याच या पुष्प गुच्छांना!

तरीही माझे प्रेम तुझ्यावर,

 झेलतो तू रविकिरणांना! .. ३

 *

 वर्षातील ते सारे महिने,

 असतोस तू उभा एकाकी!

 रवि राजाच्या सोबत दिसे,

 रंग तुझा तो एकाएकी! .. ४

 *

तुझ्या कडून शिकत रहावे,

जीवन अपुले कसे असावे,

 कधी निष्पर्ण, तर कधी मोहक,

 जसे मिळेल ते जगत रहावे! .. ५

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ही जिवतीची पणती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ही जिवतीची पणती? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रानात दिसती वेलीत हसती

रानभाजीची फुले 

नाजूक चांदण्या देखण्या देखण्या 

पाहून मन माझे खुले

*

पावसाच्या सरीत वारा भिरभिरित

वेलींवर हिंदोळे घेती

झुपक्यात देखणे फुले नजराणे

चैतन्य जणू हे देती 

*

जंगलची राणी किती देखणी

चवीला रुचकर मेजवानी

फुलांना खुडता झिरमिर येते

झिरमिर पावसाचे पाणी

*

डुडी कुणी म्हणती हिला 

झटुलीही म्हणती

झुटेल, दवडी आणि

शेरी म्हणून गणती

*

दाटी वाटी किती हिची 

हिरव्या बदामात बाई

पर्णपाती दाट किती

गगनाला उंच जाई 

*

शुभ्रांगी दिसते कधी

कधी हसते पोपटली 

ओंजळ भरून घेता

गोरी गोरी दिसते कळी

*

दीर्घायु वेल असे

आदिवासी मान देती

जिवतीची पणती ही

आरोग्य देणारी खाशी

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतिम क्षण मातृत्वाचे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अंतिम क्षण मातृत्वाचे ☆ श्रीशैल चौगुले ☆

गंगेच्या कुशीत सुखावले

माय-लेकरु दैवगतीचे

कसा जिव्हाळा एक जाहला

अंतिम क्षण मातृत्वाचे.

*

नाही कसले दुःख अपार

भाव जन्माचे शांत-शांत

हृदय बंद-जिवंत आत्मा

पुण्य म्हणावे का एकांत.

*

आक्रोश न कसला जीवाचा

प्रारब्ध भोग मानवलोकी

मातेची माया कशी कळावी

निष्पाप लेकरू मृत्यूनौकी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसृष्टी… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

कोकण मराठी साहित्य परिषद,विले पार्ले यांनी प्रकाशित केलेल्या काव्यतरंग या सामुहिक काव्यसंग्रहात , आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका दीप्ती कुलकर्णी यांची     शब्दसृष्टी ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे .एकूण १७५ कवितांपैकी फक्त निवडक ७५ कविता या संग्रहात घेतल्या आहेत.कवितेच्या निवडीबद्दल दीप्ती कुलकर्णी यांचे मन: पूर्वक अभिनंदन

आज ही कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “शब्दसृष्टी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

कविता ही माझी |

शब्दांचाच साज ||

प्रतिभेचा बाज |

संगतीला………||||

शब्दांचे ते रुप |

वेधक ही ठरे ||

क्षणातच स्फुरे |

आनंदात……..||||

 *

एकली मी नसे |

सोबतीस येते ||

मनोमनी लेते |

शब्दलेणे ………||||

 *

अक्षरांचा गंध |

घेई वेडे मन ||

फुलतसे तन |

चाहुलीने………||||

 *

माझी ही कविता |

ठाव लेते जनी ||

बोलविता धनी |

निसर्ग तो ………||||

 *

मनाचा गाभारा |

भावनांचा स्नेही ||

प्रतिबिंब पाही |

सुखदु:ख ………..||||

 *

मनी शब्दसृष्टी |

निसर्गाचे रुप ||

वाटते अप्रुप  |

दीप्ती म्हणे……..||||

© सौ. दीप्ती कुलकर्णी

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१७ ☆ गझल… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१७ ?

☆ गझल ☆  प्रभा सोनवणे ☆

मी मानले स्वतःला गंधाळता धुलीकण,

सारे समग्र जीवन केले तुलाच अर्पण

*

त्या पावसात जाता,वारा मुजोर झाला,

सारे ऋतू सुखाचे मी ठेवलेत तारण !

*

गेल्या बुजून तेव्हा साऱ्या वसंतवाटा,

मग शुष्क भावनांनी केली पुन्हा भलावण !

*

नाही,नको म्हणाले घेण्यास उंच झोका,

आकाश चांदण्याचे त्याने दिलेच आंदण !

*

आल्या फुलून बागा,वणवा विझून जाता,

 आयुष्य सांजवेळी झाले कसे विलक्षण !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३० ☆ फ्रॉड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३० ?

☆ फ्रॉड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नेटची परीक्षा

होत नाही नीट

भ्रष्टाचारी शिक्षक

झाले किती धीट

मनिषा, मनिषा, मनिषा

आलाय नुसता वीट…

*

ह्याच्यामधे म्हणे

आहे एक गॉड

नाही पात्र विश्वासाला

तोही निघतो फ्रॉड…

*

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

नव्हत्या ते तर खून

दोषींनाही देऊयात

यमसदनी पाठवून

*

कॉपी करून विद्यार्थी

आता डॉक्टर होणार

जगायचं का मरायचं

कसलं औषध देणार…

*

पैशासाठी लाचार

यंत्रणा ही किती

शासन, पोलीस कशाची

नाही राहिली भीती…

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – प्रज्ञाचंद्र – ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रज्ञाचंद्र  ☆ श्रीशैल चौगुले ☆

 मनाच्या नभाला

 शब्दांचे चांदणे

 काव्याचे कोंदणे

 प्रज्ञाचंद्र.

 विवेका क्षितीज

 चिंतन काळीज

 तिमीरात तेज

 भावव्यक्ती.

 *

 ज्ञानाची प्रभात

 अक्षर पाखरे

 लेखणी उतरे

 धरापत्री.

 *

 संदर्भ अध्याय

 अध्ययन शब्द

 तत्वादि प्रारब्ध

 सृष्टीसौख्य.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रचंड धग!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रचंड धग!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

नीट पेपरफुटीची धगच इतकी,

शिक्षण मंत्रालयाला लागली आग |

बेचिराख झाले आता सर्व पुरावे,

भाग रे बाबा.. अब तू भाग |

*

जिथे जिथे संशयाची सुई जाते,

तिथे तिथे आग कशी काय लागते |

भ्रष्ट व्यवस्थेवर प्रसन्न होऊन,

अग्निदेवता त्यांच्या नवसाला पावते |

*

फायर ब्रिगेड एनओसीसाठी,

नागरिकाना कडक नियम लावतात |

मंत्रालयाला मात्र आग लागते,

मोठी धेंडगं सहीसलामत वाचतात |

*

स्पर्धा परीक्षा शिक्षणाच्या बाजारात,

खासगी इंटीग्रेटेड क्लास झाले अड्डे |

बंद करा कॉलेज शाळा सर्व आता,

सरकारी अनुदानाला नकोयत खड्डे |

*

शिक्षण व्यवस्थेच्या आयचा घो,

तर केव्हाच तो झालाय |

पाल्यांच्या फिया भरून भरून,

मध्यमवर्गीय पुरता मेलाय |

*

राईट टू एज्यूकेशन,

आहे फक्त ते मिरवायाला |

वाईट केलीय सिच्यूवेशन,

सामान्यांची पुरती जिरवायला |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाजार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

☆ बाजार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

विसरू नका कुणीही गतकाळ वैभवाचा

ठेवा जपून ठेवा मागील वारशांचा

आनंद शोधणारा दिसला कुणीच नाही

चुकलाय आज थोडा अंदाज धोरणांचा

 *

जमला जमाव पुढचा भिजलाय भावनांनी

पाऊस बरसला ना नुकताच भाषणांचा

 *

सजली किती दुकाने आनंद वाटणारी

पाहून घ्या जरासा बाजार देवळांचा

 *

रानात श्वापदांची झालीय आज मैत्री

माणूस आज वैरी झालाय माणसांचा

 *

आली सखीच आहे ती अंगणात माझ्या

आवाज ऐकला मी अलवार पावलांचा

 *

विकणार काय आता सांगा तुम्ही स्वतः ला

देतो दलाल मोठा माझ्याच भरवशाचा

 *

इथला रिवाज साधा आहे अजून बाकी

भोगायचाच असतो तो शाप पातकांचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares