“अरे,सायकलवर कशी जमेल ही बाज न्यायला..? तुला लोडिंग रिक्षा करून न्यावी लागेल. माझ्या ओळखीचा आहे एकजण, विचारतो त्याला..” एवढं बोलत समोरच्या माणसाने फोन लावला आणि श्यामने खिशातले पैसे काढून मोजायला सुरुवात केली. कळकट, गुंडाळलेल्या दहाच्या, पन्नासच्या नोटा.. फार नसतील पण रिक्षा ठरली तर पुरतील का? ह्या विचारात त्याने पटापट सरळ करून त्या एकात एक घातल्या आणि परत खिशात ठेवल्या. मनात हिशोबाचे खेळ सुरूच होते. ह्यांना आपण महिनाभर बाज मागणार, त्याचेच पैसे किती घेतील माहीत नाही. त्यात ती नेण्याची गाडी नाहीच परवडणार…
… समोरचा माणूस फोनवर बोलून श्यामकडे आला आणि म्हणाला, ” गाडीवाला पाचशे रुपये म्हणतोय.. बघा जमतंय का? “
श्यामने कपाळावर आलेला घाम पुसला.. ” नको, राहू द्या. मी बघतो कशी न्यायची ते ” म्हणत आपल्या सायकलला न्याहाळले… तिच्यावर हात फिरवला आणि तिच्याजवळ वाकून म्हणाला, ” तुला मदत करावीच लागेल गं…”
शेजारच्या किराणा दुकानातून त्याने सुतळी विकत घेतली आणि बाज उचलली. त्याक्षणी जाणवलं, बाज जड होती, त्यामुळे पण तिला घरी नेण्याचा प्रश्न उभा राहणार होताच.. हे अगदी आपल्या घरापासून दूर असलेलं घर. पण इतर ठिकाणी बाज खूप महाग, आपल्याला परवडणार नाही अशीच…. आणि बायकोची तर मागणी होती, ” लेकीला बाळांतपणाला बाज आणा.. माझ्या बाळांतपणाला मी सहन केलं… खाली पोतड्यावर झोपले. पण कोवळ्या अंगात सर्दी अशी भिनली की आयुष्यभर दुखणे सहन करून जगणं सुरू आहे. आता माझ्या लेकीचे नातवंडाचे हाल नको..” तिच्या ह्या वाक्यावर त्याक्षणी आपल्याला आठवलं… आयुष्यात कुठलेही अट्टहास नव्हते हिचे.. कोवळ्या वयात हिने आपला संसार सुरू केला.. पण गरोदरपणातही ओठ घट्ट मिटून सगळं काही सोसलं ते आयुष्यभर. पण आता नातवंड आणि लेक, तिला त्यांच्याबाबतीत हेळसांड नकोय …. स्वतः घरचं सगळं करून चार घरचे भांडे घासते.. थोडं थोडं तूप, बदाम, मनुके, सगळं लाडूचं सामान.. घरातला कोपरा स्वच्छ करून ठेवलाय बाळंतिणीची बाज टाकायला…
स्वतःच आयुष्य कसंही गेलं तरी येणाऱ्या जीवासाठी तिची ही तगमग खरंच आपल्यालाही सकारात्मक करून गेली.. आपणही मग चार खेपा धान्याच्या गोण्या दुकानातून गिऱ्हाईकाच्या घरी नेहमीपेक्षा जास्त केल्या…. त्यादिवशी ह्या कोपऱ्यातल्या घरात पोते टाकले आणि निघताना त्या माहेरवाशीण लेकीची तगमग बघितली.. तिच्या घरातले सगळे नेमके शेजाऱ्याच्या लग्नाला गेले होते आणि घरातला नोकर माणूस तिच्या आक्रोशाने गडबडला, आपल्याला म्हणाला.. ” कसंही कर आणि रिक्षापर्यंत हिला नेऊ लाग..”
सगळे पोते काढलेल्या हातगाडीवर ती बिचारी कशीबशी बसली.. दाराशी कार उभी असून तिच्यावर ही वेळ आली.. कोपऱ्यावर मिळालेली रिक्षा आणि मग सगळी धावपळ.. त्यादिवशीची कमाई तिच्या चहापाण्यात गेली होती.. पण आपल्या लेकीसारखीच होती ती.. त्यांनतर आलेले तिचे घरचे लोक.. आपले आभार मानत होते.. त्यांनी आपल्याला दिलेलं बक्षीस आपण नाकारलं होतं.. तेव्हा तो माणूस म्हणाला होता.. ” काही मदत लागली तर नक्की सांग., आम्ही कायम तुझ्या ऋणात राहू,..”
आज ह्या घटनेला सहा महिने झाले. म्हणजे त्यांच्या घरात जी बाई बाळंत झाली ती आता त्या बाजेवर झोपत नसेल.. बघू तर विचारून… म्हणून आपण शब्द टाकला…. ” तुमच्या ताईची बाळंतिणीची बाज मिळल का..? नाही, फक्त एखादा महिना.. लेक बाळांतपणाला आली आहे माझी..? “
आपलं बोलणं ऐकून खुर्चीत बसलेल्या आजी म्हणाल्या होत्या, ” बाज अगदी जन्मापासून आपल्याशी जोडलेली असते.. खरंतर बाज हा शब्द माणसाच्या बाण्याशी निगडित आहे.. ‘ काय बाज आहे त्यांचा ‘ असं आपण म्हणतो.. पण तुम्ही ओळख नसताना, परिस्थिती नसताना.. हिम्मत दाखवून आमच्या नातीसाठी जे केलं.. तो माणुसकीचा बाज आज क्वचितच सगळ्यांमध्ये दिसतो.. तुमच्यासारख्या माणसाला ही बाज देण्यात आनंदच आहे.. आणि हो, बाज आणण्याची गडबड नको.. ठेवा आठवण म्हणून, माणुसकीची बाज अशीच ठेवा. त्यावर सुखाची झोप नक्की घ्या..”
आजीचं वाक्य मनाला भिडलं आपल्या.. आपली आई नेहमी म्हणायची, ” माणुसकीची बाज विणत राहा.. वेळेकाळेला एकमेकांना मदत करून ही बाज विणली की ह्या बाजेवर येणारी झोप आनंदाचीच…”
मनात आलेल्या ह्या विचारांनी आणि लेकीसाठी मिळालेल्या बाजेने त्यालाच खूप आनंद झाला. फक्त हिला नेणं मात्र सर्कस आहे. पण जमवावं तर लागेल, म्हणत तिला सायकलला घट्ट बांधून तो निघाला होता… आवश्यक त्या परिस्थितीत आपल्या प्रामाणिकपणामुळे मिळालेलं ते बक्षीस घेऊन जातांना त्याला दिसत होती त्याची पोटुशी लेक आणि हसरी बायको … त्या बाजेवर समाधानाचं आयुष्य विणणारी…
“ लेकरा माझ्या आगमनाची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले ..मी येणार म्हणून तुला काय करू काय नाही असं होतं… त्याचं मला समाधान वाटतं… पण खूप काम करून दमून नको जाऊस.. सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.
आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या दिवसभर काम करणाऱ्या असतात. त्याच घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस… त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं…
उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस. त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर .. आणि बदल करताना मनात भीती नको ग ठेवूस… माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला ……आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे ….हे पालुपद तर अजिबात लावू नकोस….पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती. आता तसे नाहीये हे लक्षात घे.
माझ्यासाठी हे करतेस ना…. मनातल एक खरं सांगू …
… मला हे काही नको असतं ग…
आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते…
घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण सुखात आहात… हे मला बघायचं असतं…. तुमच्याशी बोलायचं असतं..
मायेनी प्रेमानी त्या ओढीनी मी येते ग….घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा …मला बरं वाटेल बघ..
डेकोरेशनच्या गडबडीत पहिला दिवस जातो. दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड..
हो आणि अजून एक सांगायचे आहे … करायलाच हव्यात म्हणून भाज्या कोशिंबिरी भजी वडे सगळं करतेस.. संपत नाही ग सगळं… मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं….
हे योग्य आहे का ?
शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर कर… आणि संपेल इतकंच कर..
चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का ग कधी ….
मला ओळखतेस ना तू …मग आता शहाणी हो …
खेड्यात काहीजण राहिलेलं अन्न गाईला घालतात … पण गायी त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत…
फार नासाडी होते ग अन्नाची …बघवत नाही म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे
सणाची मजा घे…
हसत आनंदात सण साजरा कर…
यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी… आवडली बरं का…
आणि सुनबाईनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच…
.. .. आता सजून घ्यायला आणि तुम्हा सगळ्यांना भेटायला येते की….
आणि हे बघ आईच ऐकायचं…. आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना… म्हणून बाळा प्रेमानी सांगतीये …… तशी तू समजूतदार शहाणी आहेसच
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे… शिक्षा”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
☆ आपदां अपहर्तारं ☆
माधव साधना सम्पन्न हुई। आपको अगली साधना की जानकारी शीघ्र दी जाएगी।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆
(याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?) – इथून पुढे —
‘कारवाँ’ या चित्रपटाचं उदाहरण घ्या ना, तिथं नायिकेवर म्हणजे आशा पारेखवर चित्रीत झालेलं ‘दैया ये मैं कहां आ फसी’ हे गाणं आशाताईंनी गायलं आहे आणि अरुणा इराणीवर चित्रित झालेलं ‘दिलवर दिल के प्यारे’ हे गाणं दीदीचं आहे. अशी बरीच उदाहरणं देता येतील. ज्या सातत्यानं आशाताई गाणी गात राहिल्या, ते तर अफाट आहे, विस्मयजनक आहे.
‘उमराव जान’ हा चित्रपट म्हणजे आशाताईंचा अक्षरशः पुनर्जन्म होता. त्यांच्या कारकीर्दीचा मोठा आणि यशस्वी टप्पा तोवर होऊन गेला होता. एक प्रकारचा ठहराव त्यांच्या कारकीर्दीत आला होता. त्याच सुमारास अचानक ‘उमराव जान’ आला. दीदी त्यांच्या स्थानी अढळ होत्याच; तरीही संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’नंतर आशाताईंच्या गायकीला, लोकप्रियतेला मिळालेली झळाळी अभूतपूर्व होती आणि अगदी या क्षणापर्यंत ती उंची तशीच कायम आहे.
मी ‘प्रभुकुंज’समोरून जातो, तेव्हा मनात येतं, की भारताचा सांगीतिक इतिहास लिहायचा म्हटलं, तर या इमारतीच्या एकाच मजल्यावर किमान २५ हजार गाणी आहेत. काजव्यांनी लगडलेलं एखादं झाड असावं, तशी ही इमारत गाण्यांच्या लखलखत्या सुरांनी लगडलेली आहे. असा चमत्कार जगात कुठं तरी असेल का? साक्षात प्रभूचंच तिथं वास्तव्य आहे, असं म्हणायला हवं. या सगळ्या पुरुषप्रधान उद्योगामध्ये या दोन बायकांनी अक्षरशः राज्य केलं. देश पातळीवर असा दरारा असणाऱ्या केवळ तीनच स्त्रिया मी पाहिल्या आहेत. एक लता मंगेशकर, दुसऱ्या आशा भोसले आणि तिसऱ्या इंदिरा गांधी.
एस. डी. आणि आर. डी. यांची बरीच गाणी ईशान्य भारतातील लोकगीतांवर बेतलेली आहेत. तिथल्या पारंपरिक संगीताचं सौंदर्य या दोघांनी हिंदी गाण्यांत अतिशय नजाकतीनं ओतलं आहे. ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले’ हे ‘अजनबी’मधलं गाणं ऐकून बघा किंवा ‘हरे राम हरे कृष्ण’मधलं ‘कांची रे कांची रे’ ऐकून बघा. अशा खूप चाली तयार झाल्या असतील. आपण त्या दीदी किंवा आशाताईंच्या आवाजात ऐकतो, तेव्हा मूळ चालींचं ते वेगळंच रूप असतं. मूळ ट्यूनपासून केवळ स्फूर्ती घेतलेली असते, बाकीची निर्मिती संगीतकाराची असते, गायक ते अधिक फुलवतो.
‘बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर दोन केवढे सक्षम पर्याय होते. एखादं गाणं दीदीला द्यावं, की आशाताईंना असा त्यांना प्रश्न पडत असेल,’ असं लोक अनेकदा म्हणतात; परंतु मला त्याहीपेक्षा पंचम यांचं जास्त कौतुक वाटतं. आशाताई तर त्यांच्या पत्नी होत्या; परंतु त्यांनी किती बरोब्बर वाटणी केली आहे बघा गाण्यांची. दीदींचं गाणं दीदींना, आशाताईंचं आशाताईंना. ‘हमशक्ल’ नावाचा चित्रपट होता, राजेश खन्ना आणि तनुजाचा. तनुजा वेडी असते आणि तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलेलं असतं. त्यातलं गाणं आहे, ‘देखो मुझे देखो, कैसी मैं दिवानी हूँ’ हे गाणं ऐका. त्या गाण्याची स्केल बघा. एक तर पंचम यांनी ते बसवलंच खूप वेगळं आणि आशाताईंनी काय गायलंय बघा. व्यक्तिरेखा ‘वेडी’ आहे, तो वेडेपणा सुरांमधून बरोब्बर थ्रो करायचा, म्हणजे काय आव्हान होतं! त्यात सुरुवातीला आशाताई अगदी एखाद्या वेडीसारखं हसल्यादेखील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याची चाल पूर्ण वेगळी आहे. वरच्या पट्टीतून थेट खालच्या पट्टीत गाणं येतं; पण आशाताईंनी ते सहजपणे पेललं आहे. ‘जवानी दिवानी’मधल्या ‘जाने जां ढूंढती फिर रहीं हूँ’मधले चढ-उतार ऐका. ‘ज्वेलथीफ’मधलं ‘रात अकेली है’ ऐका. ‘अनहोनी’ या चित्रपटातल्या ‘मैने होठों से लगाई तो हंगामा हो गया’ यातली मदहोशी अनुभवा. राजेश रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’मधलं ‘आनेवाला, आयेगा आनेवाला’ बघा. त्या गाण्यात केवढे चढ-उतार आहेत. ही गाणी ऐकल्यावर मग तुम्ही थेट ‘ज्यूली’मधलं राजेश रोशननं संगीत दिलेलं भजन ऐका, ‘सांचा नाम तेरा…’ काय जबरदस्त भजन आहे. त्यात सोबत उषाताईही आहेत. या गाण्यात आशाताईंचा आवाज भक्तीरसात अगदी ओथंबलेला आहे. ही रेंज कल्पनातीत आहे.
आशाताईंना खाण्याची आणि खिलवण्याची आवड आहे. एकदा मी आशाताईंच्या घरी जेवायला गेलो होतो. संपूर्ण टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी भरलं होतं. लॉबस्टर, प्राँझ, बांगडा, पापलेट, मटण, चिकन, बिर्याणी… तुम्ही नाव घ्या, तो पदार्थ टेबलवर होता. मी विचारलं, ‘आणखी कोण कोण आहेत जेवायला?’ त्या म्हटल्या ‘तुम्ही एकटेच आहात.’ मी हसून विचारलं, ‘अहो आशाताई, मला काय भस्म्या लागला का?’ तर मला म्हणाल्या, ‘सगळं खाऊ नका; पण सगळं खाऊन बघा. प्रत्येक पदार्थाची फक्त चव बघा.’ त्या दिवशी मला सुगरण या शब्दाचा खरा अर्थ कळला. गाणं असो की खाणं, प्रत्येक गोष्ट आशाताई जीव ओतून करणार. त्या साक्षात शारदा आहेत आणि साक्षात अन्नपूर्णही आहेत!
‘पुलं’चंच एक वाक्य आहे, ते सखाराम गटणेला म्हणतात, ‘करोडो लोकांमधून एक असा जन्माला येतो, ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणतात. बाकीच्यांचं फक्त आयुष्य असतं.’ दीदी आणि आशाताई यांच्या जगण्याला जीवन म्हणतात. त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं, सुसह्य केलं. त्यांना नव्वदी निमित्त त्रिवार शुभेच्छा !
– समाप्त –
लेखक : श्री राज ठाकरे
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण गीत – बहुत बहुत कहना है तुमसे…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 156 – गीत – बहुत बहुत कहना है तुमसे…
☆ “मानुष हौं तो वही रसखानि” – भाग – 2 ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆
कृष्णभक्त रसखान के सवैयों का काव्यानुभव (उत्तरार्ध)
प्रिय पाठकगण
सस्नेह वंदन!
जन्माष्टमी का पर्व हमने उत्साह सहित मनाया! उस पावन पर्व के अवसर पर हम कृष्णभक्त रसखान के ‘मानुष हौं तो वही रसखानि’ इस काव्य के अन्य सवैयों का काव्यानंद अनुभव करेंगे|
धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।
काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥
उपरोक्त सवैये में एक गोपी अपनी सखी से कृष्ण के सुंदर रूप का वर्णन करते हुए कहती है, “अरी सखी, देख तो, धूल में खेलते खेलते कृष्ण का पूरा शरीर धूल से धूमिल हो गया है, कितना सुंदर लग रहा है ना! और हाँ देख उसके घुंघराले बाल कितनी खूबसूरती से बंधे हैं, एक चोटी उसके सर पर कैसी सज रही है (भले ही द्वारका जाकर उसे सोने का मुकुट मिला हो, परन्तु, बचपन की यह चोटी सचमुच निराली ही थी!) आंगन में खेलते हुए खाना और खाते हुए खेलना, यह दृश्य तो हृदयंगम है| खाता क्या है तो माखन रोटी| इस प्रकार दौड़ते भागते और गिरते समय उसके पैरों के पैंजनियों की छन छन करती आवाज तो अति मधुर है| यह नादब्रह्म तो सप्तसुरों के परे है अर्थात आठवाँ सुर है| स्मरण करते रहें आठवें का (कृष्ण का) आठवाँ स्वर अर्थात उसके पैंजनियों की झनकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) उसने पीत वर्ण की लंगोट पहन रखी है (बड़े होने पर पीतांबर, धन्य हो किसनकान्हा!)| इस कृष्ण के मनमोहक और मनभावन रूप ने हर किसी को पागल कर रखा है, यहां तक कि कामदेव और कलानिधि चंद्र भी उनकी सुंदरता के सामने अपने करोड़ों रूप न्योछावर कर रहे हैं। अरी सखी देख, उस मुए कौवे की किस्मत कैसी चमक उठी है, उसने सीधे सीधे कृष्ण के हाथ की माखन रोटी पर ही झपट्टा मारा और देख तो, उसे लेकर उड़ भी गया!”
कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।
माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥
उपरोक्त पंक्तियों में रसखान बताते हैं कि गोपियाँ कृष्ण के प्रेम में किस कदर पागल थीं। एक गोपी अपनी सखी से कह रही है, “ऐ मेरी सखी, सुन ले, जब जब कृष्ण की मंद मंद सुरीली बांसुरी बज रही हो, तब तब कोई मेरे कानों में अपनी उंगलियां डाल दे, अर्थात मैं उनकी बांसुरी बिल्कुल भी सुनना नहीं चाहती! वह मेरे घर की सबसे ऊपरी अटारीपर चढ़ आएगा और जानबूझकर गायों को चराने ले जाते समय चरवाहे गाते हैं न, वैसे ही गीत (गौचरण) गाते रहेगा, जो मेरे मन को मंत्रमुग्ध कर देंगे| लेकिन मैं सभी ब्रजवासियों को चिल्ला चिल्ला कर यहीं बताऊंगी कि, मुझे भले ही कोई भी कितना ही और कैसे भी लाख समझाने का प्रयत्न करो, परन्तु हे सखी, इस श्यामल तनु कृष्ण के चेहरे की वह मंद, मधुर मुस्कान मेरे मन पर कब्ज़ा कर रही है! मैं अपने मन को नियंत्रित नहीं कर पा रही हूँ| वह मेरे हृदयकमल के चारों ओर भ्रमर की भांति घूम घूम कर मुझसे प्रेमालाप करते हुए मधुर गुंजन कर रहा है! अर्थात् मैं कृष्ण के प्रेम में पूरी तरह डूब चुकी हूँ| मैं इतनी अधिक व्याकुल और उन्मत्त हो गई हूँ कि, क्या कहूँ और कैसे कहूँ! मैं सारी लज्जा छोड़कर श्रीकृष्ण की ओर दौड़ रही हूँ|”
मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।
ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥
भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।
या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥
इस सवैये में कवि ने कृष्ण के प्रति गोपी के अनोखे प्रेम को प्रकट किया है। देखिए कैसे वह कृष्ण की चीजें पहनने के लिए किस कदर तैयार है। वह गोपी अपनी सखी से कहती है, “हे सखी, मैं ना अपने सिर पर (कृष्ण की तरह) मोर पंख का मुकुट पहनूंगी। मैं अपने गले में गुंजा की माला डालूंगी, यह भी संभव है कि, मैं पीत वस्त्र धारण करूँ और हाथ में एक छड़ी लेकर एक ग्वालिन बनकर गायों को जंगल में चराने के लिए भी ले जाऊँ और उनके पीछे चलते हुए उनकी अच्छी तरह से रखवाली कर लूं| कृष्ण तो मुझे इतना प्रिय है कि, मैं उसके लिए जो भी हो करुँगी, उसे पाने के लिए तुम जो कहोगी वहीं स्वांग रचूंगी| परन्तु एक बात याद रखना ऐ मेरी प्रिय सखी, कृष्ण की जो मुरली है न, जिसे वे अपने अधर में रखते हैं, उसे तो किसी भी हालत में, यानि कभी भी, अपने अधर में नहीं रखूंगी!” (सौत है न!)
मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।
ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥
अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।
और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।
गोपिकाएं कहती हैं, ‘सर पर मोर पंख, होठों पर मुरलिया और गले में वनमाला पहने कृष्ण को देखकर मन हवा में कमल का फूल जिस प्रकार से लहराता है, उसी तरह झूल रहा है| मेरी ऐसी प्रेममग्न स्थिति में, यदि कोई बैरन उल्टा सीधा बोल भी दे, तो भी उसे सहन किया जाता है! रसखान कहते हैं, जब लावण्य के मूर्तिमंत रूप कृष्ण से इतने स्नेह्बंधन बंध गए हैं कि, चाहे कोई एक बात कहे, चाहे कोई लाख बार टोके, चाहे कोई और रंग हो या न हो, उस साँवरे कृष्ण सखा के रंग में ही रंगते हुए रहना है! जाते जाते इसी अर्थ के निकट जाता हुआ प्रसिद्ध मराठी गायिका माणिक वर्माजी के गाने का स्मरण हुआ, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’ (अर्थात उस श्यामल तनुको देखते ही मैं उन्मना अवस्था में पहुंची हूँ, अब यह समझ नहीं पा रही हूँ कि, इस उन्मुक्त मन पर कैसे काबू रखूं|)
जिसके गले में वैजयंतीमाला शोभायमान होती है ऐसे कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवन श्रीकृष्ण के चरणों में यह शब्द कुसुमांजली अर्पित करती हूँ!
☆ परिवर्तन – भाग ३(भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात आपण पहिले – त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही. कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर. आता इथून पुढे)
आपल्यावर खूप अन्याय झालाय आणि काही झालं तरी याचा बदला आपण घ्यायचाच असा ठाम निश्चयही त्याने आता केला. इतकी वर्षे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब करत, तो मानवी नात्यांपासून दूर राहिला. त्याने कुणाला संधीच दिली नाही, त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण करायची.
डॉ. हंसा दीप
कोर्टाने जेव्हा त्याला, जोएना आणि कीथ या दांपत्याच्या हवाली केलं तेव्हा त्याच्या माथ्यावर एक छत आलं. रहाण्यासाठी चांगलं घर, आणि जगण्यासाही जे जे आवश्यक, ते सारं तिथे होतं. या दोघा पती-पत्नीमध्ये कधी भांडणे झालेली त्याने पाहिली नाहीत. सगळे कसे हळू आवाजात विनम्र होऊन बोलायचे. त्या घराने कधी, कुणाचा मोठा आवाज ऐकला नव्हता. त्याच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे, हे कधी ल्क्षातच आलं नाही त्याच्या. त्याला वाटायचं, पोलीस आणि कोर्ट यांच्या भीतीमुळे, ते त्याच्याशी चांगलं वागतात. थोडा जरी आवाज झाला, तरी तो खडबडून उठून बसे. त्याला वाटायचं, आत्ता त्याच्या थोबाडीत बसेल. असेच दिवस जात राहिले. होता होता तो सतरा, अठरा वर्षाचा झाला. या दरम्यान त्याचे दत्तक आई-वडीलही गेले. तो शाळेत गेला होता. दोघेही रेग्युलर चेक आपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. ते परत कधी आलेच नाहीत. तो शाळेतून परत आला, तेव्हा नातेवाईकांची, परिचितांची तिथे गर्दी झाली होती. त्याच्या कानावर आलं, की रस्त्यावर एका अपघातात, त्या दोघांचा मृत्यू झालाय. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तिथे राहायला सांगितलं. पण तो आपल्याच नादात मुक्त पक्षाप्रमाणे, आपली वाट शोधत आपलं घरटं बनवण्यासाठी तिथून बाहेर पडला.
आता तो एकटा… अगदी एकटा होता. त्याच्या आई-वडलांना त्याच्यापासून हिरावून घेणं, हा त्याच्यावर झालेला अन्याय होता. त्यानंतर तो मिळेल ते आणि जमेल तसं काम करू लागला आणि स्वत:च स्वत:चा चरितार्थ चालवू लागाला. स्वत:ला खूश ठेवण्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य होतं, ते सारं त्याने केलं, पण तो कुणाचा मित्र नाही बनू शकला. त्याला एकच भीती होती, कुणी त्याच्या जवळ आलं आणि हिंसक बनलं, तर काय होईल?
तो बुद्धिमान होताच. मनापासून अभ्यासही केला. जोएना आणि कीथने त्याच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च केला होता. तो त्यांना निराश करणार नव्हता. ते चांगले होते, पण त्याला सतत वाटायचं, की त्यांनी त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवायला नको. त्याचंच त्याला दु:ख व्हायचं. त्यांचं लाडा-कोडाचं वागणं, त्याला पोकळ वाटायचं. सगळ्यात त्याला जास्त भीती कशाची वाटायची, तर त्याच्या आत धुमसणार्या संतापाची. तो कधीही उसळून बाहेर येऊ शकत होता.
सगळ्याचा विचार करता करता तो खूप पुढे आला होता. आता या मनोकामनेचा अंत करण्याच्या दृष्टीने तो खूप जवळ पोचला होता. बस्स! ही शेवटचीच लाल बत्ती. त्यानंतर तो लगेचच त्या ठिकाणी पोचेल.
‘अरे साशा तू? ‘ शेवटच्या लाल दिव्याशी गाडी थांबली, तेव्हा कुणी तरी हवेत हात फडकावत म्हंटलं.
आपलं नाव ऐकल्यावर तो गडबडून गेला. त्याला वाटलं, कुणी तरी आपली चोरी पकडलीय. त्याने वळून पाहिलं. ती लीसा होती. ती आत्ता इथे काय करतेय? साशाला प्रश्न पडला. ती नेहमीच साशाच्या अवती-भवती रेंगाळायची. पण काम झाल्यावर. ‘आत्ता इथे…?’ ही तर कामाची वेळ होती. आज त्याच्याप्रमाणेच लीसानेही कामातून रजा घेतली आहे का? यावेळी लीसाशी बोलत राहीलं, तर तो आपल काम करू शकणार नाही. तिची नजर चुकवून निघून जाणंच योग्य होईल. त्याने तिला न पाहिल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत काही तरी शोधत असल्याचे नाटक करू लागला. तिथे खरं तर काहीच नव्हतं.
“साशा, साशा!” ती इतकी मोठमोठ्याने ओरडत होती, की आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तर लोक तिला वेडीच समजतील. त्याला हार मानावी लागली.
हो. मीच! सगळं ठीक आहे ना? तू यावेळी इथे कशी? कामावर गेली नाहीस का? ‘ साशाच्या स्वरात आश्चर्य होतं आणि पाठ सोडवून घ्यायची घाईही होती.
‘आज मी रजा घेतलीय, पण तू इथे कसा? तू पण रजा घेतलीयस का?’
‘रजा नाही घेतली. पण एका मित्राला घर बदलण्यासाठी मदत करतोय. त्यानंतर कामावर जाईन.’
‘चल साशा! कॉफी घेऊयात. नंतर जा म्हणे.’ लीसाच्या डोळ्यात चमक होती, ’ठीक आहे’ साशा म्हणाला. दिवा बदलला होता आणि त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोचायचं होतं. मधेच लीसा आली, तर सगळंच अवघड झालं असतं. त्यापूर्वी तिच्याबरोबार कॉफी होऊन जाऊ दे. काही बिघडत नाही. थोड्या वेळाने तो आपलं काम करू शकतो.
लीसाला पसंतीचा अंगठा दाखवून त्याने आधी विचार करून ठेवला होता, तिथे गाडी पार्क केली. आजचीही मुलाखत लीसाला संस्मरणीय वाटायला हवी, असा विचार करत तो तिच्यासोबत आत जाऊन बसला. त्याच्या आतल्या धोकादायक इच्छांचा तिला वासही लागू नये, यासाठी नेहमीपेक्षा तो जास्तच काळजी घेत होता. लीसाला जरा आश्चर्यच वाटलं.
‘काय झालं? आज जरा वेगळा वाटतोयस तू! ‘ लीसा म्हणाली. या आकस्मिक झालेल्या भेटीचा आनंद लीसाच्या चेहर्यावर झळकत होता.
‘लीसा आज तू फार गोड दिसते आहेस.’ लीसाच्या डोळ्यात बघत तो प्रेमाने म्हणाला.
‘आज तू प्रथमच माझ्याकडे नीटपणे बघतोयस.’ आपले खोडकर डोळे नाचवत लीसा म्हणाली.
‘ मग काय आधी डोळे बंद होते? ‘ सगळं माहीत असूनही साशा आजाण बनू पहात होता. त्याला अभिनय काही करता येत नव्हता. आज प्रथमच तो अगदी मनापासून बोलत होता.
‘मला तरी असंच वाटतय, की तू कधी माझ्याकडे नीटपणे पाहीलंच नाहीस. मीच तेवढी अशी आहे, की कित्येक दिवसापासून तुझ्या मागे मागे फिरते आहे आणि एक तू आहेस, जो माझ्यापासून दूर दूर पळतो आहेस.’
‘माहीत आहे.’ हत्यार खाली ठेवण्यातच आपली भलाई आहे, हे साशाच्या लक्षात आलं.
‘शाळेपासून हे असंच चाललय. कधी कधी मला वाटतं मी वेडी आहे, जी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतेय. मरतेय तुझ्यासाठी. आता तर आपण दोघे मिळवायलाही लागलोत. आता तू कुठल्या गोष्टीसाठी वाट बघतोयस, कुणास ठाऊक?’ लीसा आणखी थोडी त्याच्याजवळ सरकली. तिची जवळीक साशाला चांगली वाटली. शरीराच्या ऊबेचं आकर्षण प्रथमच त्याला जाणवलं. एक वेगळीच ओढ, ज्याच्या पकडीत तो यापूर्वी कधीच आला नव्हता.
लवकरच कळेल तुला, मी कोणत्या गोष्टीची वाट पाहत होतो.’ तिचे हात आपल्या हातात घेऊन साशा म्हणाला आणि क्षणभर विसरलेलं त्याचं लक्ष्य त्याच्यासमोर आलं.
‘खरच!’ त्याच्या हाताचं चुंबन घेत लीसा म्हणाली, ‘ओह! साशा, चल, मग आपण लग्न करू. आता प्रतीक्षा करणं आवघड झालय! ‘
‘लीसा तू चांगली मुलगी आहेस. किती तरी चांगली मुले तुला मिळू शकतील. ‘ तिचा आनंद साशाला जाणवत होता, पण एक शंकाही होतीच.
‘अनेक जण मिळतील, पण तू नाही ना मिळणार! बरं ते जाऊ दे. हा भाड्याचा ट्रक घेऊन तू निघलाहेस कुठे? घर बदलण्यासाठी कुठल्या मित्राची मदत करायला निघाला आहेस?’
‘आहे एक जुना दोस्त. ‘ पुन्हा एकदा आपली विचारांची गाडी रुळावर आणीत साशा म्हणाला. ‘लीसा प्लीज़ आता मला जाऊ दे. जरा घाईत आहे. ल्ग्नासारख्या गोष्टीवर विचार करण्यासाठी थोडा वेळ तरी हवा ना!’
‘ हो! हो! नक्कीच! जरूर वेळ घे, पण इतकाही वेळ लावू नको, की आपण म्हातारे होऊ. पण साशा आज आणखी थोडा वेळ थांब ना! जीवनातील हे रोमांचक क्षण, मी आणखी थोडा वेळ अनुभवू इच्छिते.’ लीसाला प्रथमच इतक्या निवांतपणे साशा भेटला होता आणि हे क्षण ती हातचे जाऊ देऊ इच्छित नव्हती.
‘ नाही लीसा मला जायला हवं. मी माझ्या दोस्ताला वेळ दिलीय.’ साशाच्या डोक्यातील विचारांची वावटळ त्याला घाई करायला उसकत होती.
‘मी पण येऊ का तुझ्याबरोबर?’
‘नको.’ तिचा पाठलाग चुकवणं, तसं आधीपासूनही त्याला अवघड वाटायचं. तिला खूप आवडायचा तो, पण तिला माहीत नाही, आज त्याचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्याच्यासाठी खास आहे. आज त्याचात परिवर्तन होणार आहे. यानंतर ना आठवणी रहातील, ना तो. ना भूतकाळ राहील, ना भविष्यकाळ.
कॉफी शॉपमधून उठून आता तो तिला बाय म्हणत होता, एवढ्यात त्याच्या समोरून एक ट्रक धडधडत- खडखडत निघाला आणि फुटपाथवर चढला. फुटपाथवर चढताच त्याने अशी गती पकडली की जणू जमिनीवर कुणीच नाही आहे. त्याचा अॅक्सीलेटर दाबला जात होता आणि किंचाळ्यांचा आवाज आकाश फाडू पाहात होता. भूकंप झाला होता जसा. जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. कुणी वाचले. कुणी टायरच्या खाली आले. कुणी मधेच अडकून ओढले जाऊ लागले. आता सगळीकडून पायी चालणारे वाट फुटेल तिकडे अंदाधुंद पळत सुटले. गर्दीला डोळे नव्हते. गर्दी मेंढीच्या चालीने निघाली होती. सगळे पळत होते, बस! जो कुणी फुटपाथवर मधे होता, तो त्या ट्रकच्या पकडीत होता. डाव्या-उजव्या बाजूला पळणारे लोक धक्क्यांनी कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला पडत होते. असं वाटत होतं, की ट्रक चालवणारा डोळे बंद करून ट्रक चालवतोय. लोकांना चिरडत पुढे पुढे निघालाय. अशा तर्हेने तर कुणी किडा—मुंग्यांनाही चिरडत नाही.
क्रमश: भाग ३
मूळ हिंदी कथा 👉 ‘शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈