मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मर्मबंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मर्मबंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मी जे जगलो त्याचा हा तर मर्मबंध आहे

या गझलेचा अर्थ पसारा लांबरुंद आहे

 *

साध्य साधना करून येथे पूर्ण कर्म केले

निवांत झाल्या देहकुडीचा श्वास मंद आहे

 *

काळजातल्या कथाव्यथांचे स्तोम खूप झाले

त्याच सुखाच्या आठवणींचा मंद गंध आहे

 *

संसाराच्या धकाधकीची रीत छान साधी

जगणे तेथे कालक्रमाने जेरबंद आहे

 *

स्वैरपणाने भटकायाची शांत वेळ नाही

वातावरणातील जराशी हवा कुंद आहे

 *

जमेल तितकी अध्यात्माची साथ घेत जावी

तप करण्याला सोबत तुमच्या संतवृंद आहे

 *

स्वतंत्रतेचा आज जमाना फार ठारवेडा

जगात आता जगणे म्हणजे मुक्त छंद आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाम… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ नाम… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

खुंटवावे बोलणे

टाळीजे उणे होणे..

*

मनी विषयाची दाटी

जणू पापाची गाठोडी…

*

निरंतर मुखी राहो

तुझेच नाम आई..

*

नामात असता तू आई

मनात दुसरे कदापि नाही…

*

ये करिता होई

विषयांची पायामल्ली..

*

न होई पापाची गाठोडी

अन् पुन्हा न परतावे लागे, ये ठायी..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७५ – द्राक्ष…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७५ – विजय साहित्य ?

☆ द्राक्ष…!

(अष्टाक्षरी)

द्राक्ष कोल्ह्यासी आंबट

आजी सांगायची मला

द्राक्ष आवडीचे फळ

पाहू बाग मळा चला.

 *

बिया नसलेले द्राक्ष

वाटे रत्न अनमोल

किती खाऊ किती नको

द्राक्ष फळ लंबगोल.

 *

बाग द्राक्षाची पाहून

पाणी‌ सुटते तोंडाला

काळी,लाल,हिरवीशी

घोस लोंबती वेलाला.

 *

तासगांव नाशिकची

पहा द्राक्षे चवदार

रोग प्रतिकार शक्ती 

असे गुणकारी फार.

 *

डोळे,हृदयाच्यासाठी

आहे द्राक्ष गुणकारी

द्राक्षासव,ताजारस 

असे मात्रा गुणकारी.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गाठ नात्याविना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “गाठ नात्याविना…” ☆ सुश्री शीला पतकी 

नात्याविना नात्यात गुंतण्याची ही गाठ तु का बांधितो

कधी धागे रेशमी कधी दोरखंड सांधतो

*

कधी धागे कच्चे…. गाठ विरते

कधी तुटते कधी अर्ध्यावरही सुटते

*

रेशमी गाठी सुखाने नांदती… दोरखंडे मारती आवळून पाठी

विरल्या धाग्यांची गाठ कधी न बसते

धागा तुटलेला… गाठ मात्र सलते

*

विरलेले फसवे धागे मोहाचे असेच विरून जातात

आठवणी तयांच्या धूसर होतात करकचणाऱ्या गाठीतून

.. सुटका नसते कधीही

.. रक्तबंबाळ होण्याशिवाय पर्याय नसतो

*

गुदमरणारा श्वास दैवाचा फास तुटता तुटत नाही

तुटलेल्या गाठीचा सल हाती

.. तो जखम कुरवाळतो

.. रोज अश्रू ढाळतो

.. आतल्या आत रडतो

*

– – आणि जगाला सांगतो

हसते रहो यार हसना मना नही……! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई आठवते… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आई आठवते… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

देवाजवळी दिवा लावता आई आठवते

कातरवेळी वाट पाहता आई आठवते

*

रस्त्यावरुनी चालत होते कितीक वेळा मी

उंबरठ्याची ठेच लागता आई आठवते

*

औषध घेते थकून जाते ताप का हटेना

मीठ मोहरी दृष्ट काढता आई आठवते

*

दुःखाचीही गर्दी होते दव पापणकाठी

कढ मायेचे उगा दाटता आई आठवते

*

आयुष्याच्या सायंकाळी मज सोबत नाही

भविष्य बघुनी भिती वाटता आई आठवते

*

दारी माझ्या श्रावणसरही उदास पाझरते

पुन्हा न येणे तिचे जाणता आई आठवते

*

मंदिरातली घंटा घणघण रोजच वाजवते

माझ्यापाशी देव कोणता आई आठवते

*

निघून गेली दूर तरीही आठव तव स्मरतो

आई म्हणुनी हाक ऐकता आई आठवते

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ये फुली तू सदाफुली गं… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ये फुली तू सदाफुली गं… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

ए फुली तू सदाफुली गं 

फुलत रहा राणी

तुझ्या रुपावर भाळ-भाळले 

गाते बघ गाणी 

*

इथे तिथे तू माझ्या दारी 

आपोआप आली

नाही घेतली काळजी तरी 

बहरे तव् लाली

*

शुभ्र धवल आणि गोड गुलाबी

पाकळीत झाली 

निलवंती तू नभांगणाचे 

रंग जणू प्याली

*

सुगंध नाही तुला तरीपण 

औषध तव ठाई

तुझ्या रूपाने बहरत जावी

सारी वनराई   

*

पाच पाकळ्या तुझ्या साजऱ्या 

कधी जांभळ्या लाल

धरणी वरती जणू भासते 

फुलाफुलांची शाल 

*

कंच हिरव्या पानांमधुनी

डोकावून तू हसशी

कवितेमधली शब्द पाकळी

सदाफुली तू दिसशी 

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९६ ☆ श्रद्धांजली… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९६ ?

💐 श्रद्धांजली…💐 सुश्री प्रभा सोनवणे ☆

जेव्हा जन्म तेव्हाच,

मृत्युची तारीख ठरलेली…

तू गेल्यानंतर आलेलं —

एकाकीपण,

शब्दात नाही व्यक्त करता येत,

 समजण्या पलिकडचं,

 एक नातं असतं..

म्हणजे होतं,

तुझ्यामाझ्यात !!

ते निसटलं…हरवलंही…

आता मरेपर्यंत भरून न येणारी पोकळी…

हीच असणार आहे,

आयुष्यभराची,

श्रद्धांजली !💐🙏

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखाचा पाया… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुखाचा पाया… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

वचने तू दिलीस आणि प्रेमाचे कीट ही

होईल का सांग मला नभ माझे धीट ही

*

वाट बघता कंटाळले पक्षी नयनांचे

नाही का रे येत कधी अश्रूंचा वीट ही

*

काळजाची सावली लुप्त हो नशिबातुनि

सांग आता तरी मज वेध पुढचे नीट ही

*

जीवन प्रवासात ही वाट असते तमाची

ठेव आता तरी मज तुझ्यासोबत सीट ही

*

जीव गमतो तुझा शहराच्या गाण्यांत म्हणे

रानटी ऐश्वर्य जपले भाबडी तीट ही

*

निखारे सर्व ॠतुचे झेलले जागेपणी

स्वप्नात तुझी नजर विरघळते हार्ट बीट ही

*

नको अगतिक होऊ वैभवाच्या वर्तमानी

बंगला भक्कम सुखाच्या पायाची वीट ही

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१० ☆ कवितेचं घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१० ?

☆ कवितेचं घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

ती मला भेटली तेव्हा

अगदी अल्लड

मुक्त छंदासारखी होती

तोंड ओळख झाली

ती थोडी सावरली

आणि

छंदात वावरू लागली

माझीही छाती

अभिमानाने भरून आली

आज ती

माप ओलांडून

घरात आली

आणि

तिच्या वागण्यात

छान लयबद्धता

दिसू लागली

कवितेच्या भाषेत सांगायचं झालं

तर वृत्तबंद्ध कविता…

 

आज ती

एक पाऊल

अजून पुढं गेली

चक्क वृत्तबंद्ध

गजलेच्या रुपात

समोर आली

हळू हळू त्या गजलेत

ठासून गजलीयत

भरू लागली

आज माझं घर

संपन्न झालं

कवितेचं घर झालं…

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मांदियाळी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मांदियाळी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

विठ्ठलाने द्यावे

अमृताचे घोट

शंकराने प्यावे

ओमरुप लोट.

*

कधी योग येतो

ऐसा मनी संत

भरोनीया देतो

प्रेम ते अनंत.

*

म्हणोनी करावा

एक वेळ काला

कृष्ण शिव ब्रम्ह

भक्ती भाव झाला.

*

तैसे भेटे मित्र

मांदियाळी वारी

गीता ज्ञान भक्ता

मार्गशिर्षा दारी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares