☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
|| एकदा आपल्या मुलींना यांच्या जागेवर ठेऊन पाहूयात???…..अखेर भीती संपली ||
आज दादर प्लॅटफॉर्म बाहेर तिकीट काउंटर येथे सहा शिकणाऱ्या मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या, त्रस्त असलेल्या, चिंतीत व भयभीत अवस्थेत दिसल्या..
मुंबईत हे दृश्य सायंकाळच्या 7.30 ते 8.00 च्या वेळेचे होते… या मुली बाहेर जमिनीवर अश्या का बसल्या आहेत ? विचारणा केली असता किती वाईट व्यवस्था व भीतीदायक परिस्थिती आहे हे कळाले….
आपल्या गांव खेड्यातून येणाऱ्या एकट्या मुलींसाठी ही किती गांभीर्याची बाब आहे …… ( सदिच्छा मनीष साने, ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली असता एकाएकी बेपत्ता होते आणि मग तिचा खून या घडलेल्या घटनेनेही आपण सावध अजूनही नाही कसे????) …हे मुंबईत घडत असताना आपण इतके निष्काळजी कसे ?????…..
अश्या अनेक मेहनती मुली आपल्या कुटुंबीयांचे आधार असतात….मुंबईत एकट्या येतात परीक्षा देतात आपल भवितव्य घडविण्यासाठी….
नाशिक जिल्ह्यातून अश्याच या सहा मुली मुंबईत नायगांव येथे पोलिस भरती परीक्षेला आलेल्या आहेत, आपल्या आई वडिलांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या घरी वाट बघत असलेल्या या लाडक्या मुली दुर्दैवाने त्यांना पोलिस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी नायगांव येथे राहण्याची जागा अचानक नाकारण्यात येते, जागा तुडुंब भरलेली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात येते…. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नाही… या बिचाऱ्या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत पण कोणीच कसलीच मदत करत नाहीत … आम्ही रात्र काढायची कुठे??? याचे कोणी उत्तर देत नाही…. खरंच शरमेची गोष्ट आहे….
या सहा मुली रात्री कुठे जातील?? कुठे राहतील?? काय खातील?? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सुरक्षा बाहेर अंधारात कोण करतील???? किंवा रस्त्याकडील फूटपाथ वर या मुलींचे संरक्षणाचे काय???…. हा विचार कोणालाही पडला नाही ???? मग काही अनर्थ घडले की मेणबत्ती घेऊन आपण सगळे काही वेळ मैदानात….मग आपआपल्या घरी…. ही दयनीय व्यवस्थेची अवस्था पाहून भीतीदायक वाटले आणि या सहा मुलींची चिंता वाटू लागली आणि वाईटही…
आपल्या शेतकऱ्यांची ही मुले गावा खेड्यातून पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहेनत घेऊन मुंबईत येत, या मुली आपल्या कुटुंबीयांचा आधार असत आणि पोलिस परीक्षेला मुंबईत आल्यावर या मुलींनाच आपल्या सुरक्षेची भीती वाटणारे घडत…. सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येत…. मग नंतर कोणीतरी 5000 रुपये मागत गेस्ट रूम चे….
कुठून देणार या शेतकऱ्यांच्या मुली इतके पैसे एका रूम चे???म्हणून या मुली एकत्र पुन्हा दादर स्टेशन परिसरात आल्या…व तेथे बसल्या….व प्रत्येक मुलगी चिंतेत होती रात्री काय होईल आपले ????कसे होईल ???
दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबल ला विचारले असता त्यांनी ही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्म वर असलेल्या विश्रामगृहात 2 तासांच्या वर राहता येणार नाही असे ते म्हणाले..मग दोन तासांनी या 6 मुली रात्री कुठे जाणार????….
या सहा मुली जेथे बसलेल्या होत्या तेथे गर्दुल्ले, पाकीट मार सतत फिरतात हे ही पोलिस कॉन्स्टेबल यांनी सांगितले म्हणाले रात्रीचे इन्चार्ज या मुलींना बसू देणार नाहीत मी आहे तोवर इथे बाहेर बसा पण सामानाची काळजी घ्या….मी इथेच आहे काही वेळ….
रात्रीच्या भीतीच्या विचारात असताना मी या सहा मुलींना पाहिले व ही सगळी बाब ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला व त्यांचा फोन व्यस्त असल्याने लगेचच वर्षा बंगल्यावर फोन केला, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं एकताच ताबडतोब स्टेशन मास्टर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधला व त्या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्याची व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रुममध्ये तत्काळ व्यवस्था केली ….
सकाळी 5.00 वाजता ग्राउंड वर धावण्याची, अंग कासरतीची परीक्षा म्हणजे आदल्या दिवशी पुरेस जेवणं आणि पुरेशी झोप…या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव हे कर्तव्यात खरे उतरले….
या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे वा रेल्वे स्टाफ यांचे मनःपुर्वक आभार मानले…CM एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे….
रात्रीची भीती ?…अखेर संपली….
पण जर पूर्णतः संपल्यास बरे होईल अशी ग्वाही या मुलींच्या कुटुंबीयांनी दिली आहे….या परिस्थतीचा विचार करून प्रशासनाने काळजी घेत योग्य तो निर्णय घेऊन GR काढला तर बाहेरगावाहून येणाऱ्या या आपल्या मुली मुंबईतही पूर्ण: सुरक्षित राहतील ……
जरा आपण सगळ्यांनी काही क्षणासाठी आपल्या मुलींना या मुलींच्या जागेवर ठेऊन पाहूयात ???? किती भीतीदायक आहे असे घडणे.
लेखक : अस्मिता (वार्ताहर)
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पत्नीच्या मृत्यूनंतर, रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते.
तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे.
आज सर्व मित्र शांत बसले होते.
एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते.
“तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो? आज मी सांगेन.” रामेश्वर बोलला!
“सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का?” एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले!
“नाही यार! असं काही नाही, सून खूप छान आहे.
वास्तविक “पोळी” चार प्रकारची असते.
पहिल्या “मजेदार” पोळीमध्ये “आईची” ममता “आणि” वात्सल्य “भरलेले असते. जिच्या सेवनाने पोट तर भरते, पण मन कधीच भरत नाही.
एक मित्र म्हणाला, “शंभर टक्के खरं आहे, पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते”,
“दुसरी पोळी ही पत्नीची आहे, ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे, जी “पोट” आणि “मन” दोन्ही भरते.” तो पुढे म्हणाला..
“आम्ही असा विचार केलाच नाही, मग तिसरी पोळी कोणाची आहे?” मित्राने विचारले.
“तिसरी पोळी ही सूनेची आहे, ज्यात फक्त “कर्तव्या ची” भावना आहे, जी थोडी चव देते आणि पोट देखील भरते, सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासांपासून वाचवते,”
तिथे थोडा वेळ शांतता पसरली!
“मग ही चौथी पोळी कसली आहे?” शांतता मोडून एका मित्राने विचारले!
“चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे, जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही! चवीचीही हमी नसते.”
मग माणसाने काय करावे?
“आईची उपासना करा, बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य जगा, सूनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान-सहान चुकांकडे दुर्लक्ष करा. जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल.
“जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते, तर देवाचे आभार माना की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे, आता चविकडे लक्ष देऊ नका, फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे जेणेकरुन आपलं म्हातारपण आरामात आणि आनंदात व्यतीत होईल.”
सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की, खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत!!
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
Believe – विश्वास आणि Trust – विश्वास… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई
Believe-विश्वास आणि Trust -विश्वास.
दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.
एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबलवरून या इमारतीवरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.
दोन इमारतींच्या मध्ये हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.
हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.
जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले. तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो, सेल्फी काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले.
तो डोंबारी सगळ्यांना उद्देशून म्हणाला,
“मला हे पुन्हा एकदा करावसं वाटतं. तुम्हाला विश्वास वाटतो का मी हे पुन्हा करू शकेन?”
सगळी माणसं एक आवाजात म्हणाली, “हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस.”
डोंबारी म्हणाला “तुम्हाला विश्वास आहे ना, मी हे परत करू शकेन?”
पुन्हा सगळे ओरडले, “हो हो.आम्हाला विश्वास आहे. तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील.”
“तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?”
“हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील.”
डोंबारी म्हणाला “ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या. त्याला खांद्यावर घेऊन मी या केबलवरून चालतो.”
जमावामध्ये एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले. डोंबारी म्हणाला, “काय झाले. घाबरलात का?”
“अरे!आताच तर तुम्ही म्हणालात ना, की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून?”
तात्पर्य :- जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा Belief आहे, Trust नाही.
तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे, परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.
You only believe in God, But you don’t trust him.
परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताण – तणाव कशाला हवेत.
त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार?
परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो.आपल्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी.
आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्या सोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच, हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या मुलीचे माहेरपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.
परत सासरी जातांना वडिलांनी तिला एक सुगंधी अगरबत्ती पुडा दिला. “जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा”, असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली “असं अगरबत्ती देतं का कुणी? ती प्रथमच माहेरपण करून सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होतं. “
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासूने, सुनेच्या आईने दिलेल्या सगळ्या वस्तू बघितल्या. बाबांनी दिलेला अगरबत्ती पुडा बघून नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा उघडला. आत एक चिठ्ठी होती.
“बेटा, ही अगरबत्ती स्वतः जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करून जाते. एवढंच नाही तर आजूबाजूचा परिसरही दरवळून टाकते. तू काही वेळा नवऱ्यावर रुसशील, कधी सासू-सासऱ्यांवर नाराज होशील, कधीतरी नणंद किंवा जावेचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल, तर कधी शेजाऱ्यांच्या वर्तनावर खट्टू होशील, तेव्हा माझी भेट लक्षात ठेव. स्वतः जळताना अगरबत्ती जसं संपुर्ण घर आणि परिसर सुंगधी बनवते, तशी तू सासरला बनव…”
मुलगी चिठ्ठी वाचुन रडू लागली. सासू धावतच जवळ आली. नवरा, सासरे देवघरात डोकावले.
ती फक्त रडत होती.
“अगं ! हात पोळला का?” नवऱ्याने विचारले.
“काय झालं ते तरी सांग,” सासरे म्हणाले.
सासू आजुबाजुचे सामानात काही आहे का, ते बघू लागली.
तेव्हा ती वळणदार अक्षरातील चिठ्ठी नजरेला पडली. ती वाचून तिने सुनेला मिठीत घेतले. चिठ्ठी स्वतःच्या नवऱ्याच्या हातात दिली. सासरे चष्मा नसल्याने मुलाला म्हणाले , “बघ काय आहे.”
सारे कळल्यावर संपूर्ण घर स्तब्ध झाले.
“अरे, ही चिठ्ठी फ्रेम कर, ही माझ्या मुलीला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे. देवघराच्या बाजूलाच याची फ्रेम लाव,” सासू म्हणाली.
अन् त्यानंतर ती फ्रेम सातत्याने दरवळत राहिली, पुडा संपला तरीही…..
यालाच म्हणतात संस्कार…
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈