मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

जवळजवळ १६५ वर्षांपूर्वी कोलकत्ता जवळच्या ‘जोरासांको’ येथील ठाकूर घराण्याच्या महाल सदृश घरात ७ मे १८४१ रोजी रविंद्रनाथांचा जन्म झाला. वडील महर्षी देवेंद्रनाथ व आई शारदा देवी यांचं ते चौदावं अपत्य होते. साहजिकच त्यांना आईचा सहवास फार वर्षे लाभला नाही. वडील पण सतत प्रवासांत असत. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे देवेंद्रनाथ वरचेवर हिमालयात भटकंती करत, तिथे जाऊन रहात, त्यामुळे त्यांचा सहवास देखील फारसा मिळायचा नाही. पण जेंव्हा रविंद्र उर्फ ‘रोबी’ ने शाळे विषयीच्या तक्रारी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी रोबीला शाळेतून काढले ते कायमचेच.

घरीच वडील त्यांना शिकवू लागले. प्रवासात ते रोबीला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात शाळेत न मिळणारं, पण बौद्धिक व भावनिक जग समृद्ध करणारे शिक्षण सहज बोलता बोलता रोबीला मिळू लागलं. वडिलांबरोबर केलेला प्रवास, हिमालयातील भटकंती, निसर्गाकडून व वडिलांकडून मिळालेलं ज्ञान हा रविन्द्रनाथ यांच्या जीवनातला सुवर्णकाळ होता. याच काळात या शाळा सोडून दिलेल्या तथाकथित अज्ञानी मुलाचं रूपांतर एका सुसंस्कृत मुलात झालं. (The ugly duckling was transformed into an admired swan) ही शिदोरी त्यांना नोबेल पुरस्कारा पर्यंत घेऊन गेली व शिक्षणपद्धतीचा कायापालट करणाऱ्या शिक्षणमहर्षी या पदवीपर्यंत घेऊन गेली. पूर्ण भारताने नाही तर जगाने त्यांना कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, समाजसुधारणेचं क्षेत्र, तत्वज्ञानाचे क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील गुरुपद बहाल केलं व गुरुदेव या पदवीने सन्मानित केलं. कोणतेही समाजमान्य पारंपारिक शिक्षण न घेतलेला, कोणत्याही विद्यापीठाची कसलीही पदवी गाठीशी नसलेला हा माणूस शिक्षणक्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे.

त्यांच्या मनात शाळेविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या, त्या काळी सर्वसंमत असणाऱ्या, मुलांना शारीरिक क्लेश देणाऱ्या, अपमानास्पद शिक्षा करणाऱ्या पद्धतीचे जगाने खरंतर आभारच मानायला हवेत कारण त्यामुळेच रविंद्रनाथांनी शाळा सोडली. वडिलांकडून, निसर्गाकडून, पुस्तकां कडून ज्ञान मिळवून ते संवेदनशील विचारवंत, हरहुन्नरी कलाकार बनले.

रविंद्रनाथांनी लहानपणीच तीन तीन क्रांतीकारी चळवळी खूप जवळून पाहिल्या, अनुभवल्या. एक म्हणजे राजा राममोहन रॉय यांची धार्मिक पुनरुत्थानाची चळवळ, ज्यातून ब्राह्मो

समाजाची निर्मिती झाली. दुसरी म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी चालू केलेली साहित्यिक चळवळ, ज्यामुळे भारतीय, वाङ्मयीन विश्व खडबडून जागे झाले. आणि तिसरी राजकीय चळवळ ‘Indian National movement’, जी राजकीय व सांस्कृतिक दडपशाहीचा निषेध करत होती. या तीनही चळवळींत टागोर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता व त्यामुळे बालपणी व तरुणपणी रविंद्रनाथांनी या सर्व हालचाली खूप जवळून पाहिल्या होत्या.

पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी एकत्र आणून संघर्षाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी काम करावं अशी भावना कदाचित या तिन्ही चळवळींचा त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचा परिपाक असावा.

वयात बरंच अंतर असूनही वडीलबंधू सत्येंद्रनाथांबरोबर रविंद्रनाथांचे वडिलांप्रमाणेच मित्रत्वाचे संबंध होते. आय ए एस असलेल्या सत्येंद्रनाथांच्या देशातील निरनिराळ्या शहरांत बदल्या व्हायच्या पण तिकडे जाऊन रोबी त्यांच्याबरोबर रहात, वेद, उपनिषदे, संत वाङ्मय यांचे वाचन करीत व त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या ज्ञान कक्षा विस्तारित असत.

‘रोबी’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी म्हटलय की, ” ज्या देवाचा व प्रेमाचा माझ्या सर्व साहित्यात संदर्भ आला आहे तो या जीवनाचा देव (God of life) आहे व ते प्रेम जीवनावरील प्रेम आहे. ” त्यांच्या शब्दांतून उमटणारे दैवी सूर, धर्म, भाषा, देश अशा सर्व सीमा लांघून सर्व विश्वात घुमले. आपल्या एका कवितेत ते स्वतःलाच सांगतात, “Move out of yourself, stand out in the open, you will hear the music of the universe in your heart. “

—–

☆ गीत : ६४ ☆

ON the slope of the desolate river among tall grasses I asked her, “Maiden, where do 

you go shading your lamp with your mantle? My house is all dark and lonesome ⎯ lend 

me your light! ” She raised her dark eyes for a moment and looked at my face through 

the dusk. “I have come to the river, ” she said, “to float my lamp on the stream when the 

daylight wanes in the west. ” I stood alone among tall grasses and watched the timid 

flame of her lamp uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, “Maiden, your lights are all lit ⎯ then where do you go with your lamp? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” 

She raised her dark eyes on my face and stood for a moment doubtful. “I have come, ” she said at last, “to dedicate my lamp to the sky. ” I stood and watched her light 

uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I asked her, “Maiden, what is your quest holding the 

lamp near your heart? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” She 

stopped for a minute and thought and gazed at my face in the dark. “I have brought my light, ” she said, “to join the carnival of lamps. ” I stood and watched her little lamp uselessly lost among lights.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत :६४ ☆

नदीच्या उतरणीला उभा मी असताना,

मज दिसली ती, झाकुनि एक दीप नेताना

 

निघालीस कोठे हा दीप 

तुझा घेउनि?

देशील कां, घर माझे

आले अंधारुनि?

 

डोळे मोठ्ठे करूनि क्षण

मजकडे पाही

म्हणे मावळतीला सोडेन नदी प्रवाही

 

भित्री ज्योत थरथरुनि

वहातच गेली 

निशेच्या तमी पुन्हा दिवा घेउनि दिसली 

 

आता तरी देशील कां,

घर माझे उजळण्या?

म्हणे दिवा हा आणिला

नभासि अर्पिण्या

 

अवकाश पोकळीत दीप व्यर्थ तेवला

गडद रात्री, आली फिरुनि,

दीप छातीशी धरिला 

 

पुन्हा मी पुसले, टक लावुनि, पहात म्हणते

आनंदोत्सव असे दिव्यांचा, त्याचसाठी नेते

 

अनंत दिवे, ध्येय रहित, तेवती प्रकाशात

ती अन् तिचा दीप दोन्ही हरवले गर्दीत

 

भक्तीचा दीप न मिळे, असा आयता कोणास

ज्याचा त्याने तो ठेवावा चेतवुनि हृदयास

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ६५ ☆

WHAT divine drink wouldst thou have, my God, from this overflowing cup of my life?

My poet, is it thy delight to see thy creation through my eyes and to stand at the portals 

of my ears silently to listen to thine own eternal harmony?

Thy world is weaving words in my mind and thy joy is adding music to them. Thou givest 

thyself to me in love and then feelest thine own entire sweetness in me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६५ ☆

*

भरुनी वाहतो देवा

सुखी जीवनाचा ठेवा

*
तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून

*

कोणता रस तुजला

अर्पू मी न कळे मला

*

तूच निर्मिलेले जग 

मम नेत्री पाहशील का?

संगीत तूच निर्मिलेले

मम श्रोत्री ऐकशील का?

*

विश्व तुझेच मम हृदयी

गोफ विणे शब्दमयी

*

अलौकिक तव आलापी

सुखदायक हो भवतापी

*

बली सम तू दाता असशी

मम चेतसी तुलाच देशी

*

तव माधुरी मी हृदयी धरी

तव हृदयांगण जी तृप्त करी

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६६ ☆

SHE who ever had remained in the depth of my being, in the twilight of gleams and of glimpses; she who never opened her veils in the morning light, will be my last gift to thee, my God, folded in my final song.

Words have wooed yet failed to win her; persuasion has stretched to her its eager arms in vain.

I have roamed from country to country keeping her in the core of my heart, and around her have risen and fallen the growth and decay of my life.

Over my thoughts and actions, my slumbers and dreams, she reigned yet dwelled alone and apart.

Many a man knocked at my door and asked for her and turned away in despair.

There was none in the world who ever saw her face to face, and she remained in her 

loneliness waiting for thy recognition.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६६ ☆

*

जी अंतरात माझ्या, ती संधीप्रकाश किरणात

कुणी न तिज पाहिले, दिवसाच्या प्रकाशात

*

प्रेमयाचना शब्दांची, फोल तिला जिंकण्यास 

प्रयत्न निष्फळ होत, तिचे मन वळविण्यास

*

देशोदेशी फिरलो, हृदयात तिज स्थापुनि

आयुष्याचे चढउतार, भोवती तिच्या गुंफुनि

*

अनन्य भक्ती तुजप्रती, हृदयी येई उमलुनि

मार्ग चाललो, जो दिला तिनेच मला दावुनि 

*

सत्ता तिचीच, मम स्वप्न, विचार वा कृती

निराश झाले, ज्यांना ती मागून हवी होती

*

वाट पाहते, तव मान्यतेची, एकटीच राहुनि

अर्पण करी, तिज देवा, अखेरच्या गीतातुनि

*

– क्रमशः भाग २२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर

आशाताईंच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने कवीवर्य सुरेश भटांनी त्यांच्यासाठी एक कविता पाठवली होती. शब्द असे होते…

आता न तुझे कुठल्याही जखमांशी देणे घेणे 

पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो

हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला

तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो

तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना 

हा कैफ तुझा माझ्या धमन्यातून उसळत राहो 

… खरं आहे. आज देहाने त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरात तो सळसळता कैफ मात्र चिरंतन, अविनाशी राहणार.

काल त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मन प्रचंड सैरभैर झालं. मनात आलं, लता आणि आशा नाहीत अशा जगात आता आपल्याला जगण्याची सवय करावी लागणार. चार वर्षांपूर्वी लतादीदींचे निधन झाले आणि त्याच वाटेने आता आशाताई रसिकांच्या मनावर एक पोरकेपणाची भावना ठेवून निघून गेल्या.

भारतीय सुगम संगीत क्षेत्रातल्या एका सुस्वर युगाचा अंत झाला. लता म्हणजे भगवंताची बासरी तर अशा म्हणजे राधेच्या मनातल्या कृष्णाचा सूर होता.

चाळिशीच्या दशकात चित्रपट बोलू लागला आणि गाऊही लागला. त्याच सुमारास लता आणि आशा नावाची संगीताच्या नभांगणात नक्षत्रे उगवली. दत्ता डावजेकरांचे संगीत असलेले ‘माझा बाळ’ या चित्रपटात,

चला चला नव बाळा हे गीत आशाताईंनी गायले आणि इथून पुढे सुरांच्या दुनियेत जे घडले तो चमत्कारच म्हणावा लागेल. नंतरच्या पिढ्यांसाठी संगीतातले महत्त्वाचे ब्रँड त्यांनी अधोरेखित केले. आजही संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये प्रामुख्याने आशा, लता, रफी, मुकेश, किशोर कुमार यांचीच गाणी नव्या पिढ्यांकडून गायली जातात. कित्येक गायक झालेत, होतीलही पण या सुरांचं अलौकिकत्व, तो करिष्मा केवळ अजोड आहे.

आशाताईंच्या गाण्याचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या गळ्याला पेलवत नाही किंवा बसत नाही अशी कुठलीच स्वररचना नाही. त्यांचा कंठ खऱ्या अर्थाने अष्टपैलू. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे पल्लेदार सूरही सहजपणे त्यांच्या गळ्यातून उतरले. “शूरा मी वंदिले. ” किंवा मर्मबंधातली ठेव ही” सारखी नाट्यगीते म्हणजेच एक वस्तुपाठ आहे. हिंदुस्थानी गायकीचे थाट, रंग त्यातून उलगडले. त्याच गळ्यातून अवखळ, उडती, मदमस्त शृंगारिक गाण्यांची बरसात झाली. अनवट गझला त्यांनी गायल्या. त्यांच्या गळ्यात फक्त सात स्वरच नव्हते तर सात ऋतूंचाच मुक्काम होता जणू काही. असा प्रवाही गळा म्हणजे केवळ भगवंतांचेच देणे म्हणावे लागेल.

मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असे म्हणतात पण लतादीदीच्या वटवृक्षासमान सावलीत आशाताईंच्या स्वरवेलींचा मांडवही जोमाने बहरत गेला आणि सर्व प्रकारच्या मानमरातबाने आणि किताबाने त्यांची जोडी भरून गेली. स्वरसम्राज्ञी आशा भोसले अशी स्वतंत्र ओळख त्यांनी मिळवली. गाणे कुठलेही असो,

“ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख”

किंवा

“छोड दो आँचल चल जमाना क्या कहेगा”

किंवा अगदी अलीकडचं,

“ सपने मे मिलता है मुंडा मेरा सपने में मिलता है “

… शब्द, भाव आणि अभिनयाने भरलेलं त्यांचं गाणं ऐकणाऱ्याच्या काळजात रुतून बसतं.

वयाच्या नव्वदीत सुद्धा त्या भरजरी साडी आणि चमचमता रत्नहार परिधान करून मंचावर येऊन “ओ मेरे सोना रे सोना रे” गायला लागल्या की श्रोतृवर्ग अक्षरशः पागल होऊन जायचा.

रसिकांना त्यांनी फक्त गाणं दिले नाही तर या जन्मावर शतदा प्रेम करायलाही शिकवलं. त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या मोडक्या संसाराची लाज टाकून चित्रपट गीत क्षेत्रात एक जबरदस्त ठसा उमटवला.

त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. टक्केटोणपे, मानापान त्यांनी सहन केले. जीवन म्हणजे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं पण त्याला त्यांनी त्यांच्या कंठात असलेल्या दैवी सुराने आणि आत्मविश्वासाने सडेतोड उत्तर दिले.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “स्वतः भोगलेल्या वेदनेतूनच खरा कलाकार जन्म घेतो”

त्यांच्या असामान्यत्वातही त्यांनी एक सामान्यपण जपलं होतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या,

“आज मी तुमच्यासमोर गायिका म्हणून उभी असले तरी मी एक गृहिणी आहे, माझं मन स्वयंपाक घरात रमतं. मला माझ्या मुलांना, इतरांना! सर्वांनाच स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वतः बनवून खाऊ घालण्यात फार आनंद वाटतो, अगदी माझ्या गाण्याइतकाच. ”

त्यांचा व्यासपीठावरचा गप्पिष्ट, मोकळा, मी तुमच्यातलीच असा जाणवून देणारा वावर हेच सांगायचा की, वय हा एक निव्वळ आकडा आहे, त्यांनी १२००० च्या वर गाणी गायली असतील पण त्यांना मात्र त्याचे मुळीच कौतुक नव्हते. अजूनही हजारो गाणी गाण्याचा उत्साह त्यांच्यात टिकून होता हे विशेष. त्यांचा सूर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. उत्साह म्हणजे एखादा अवखळ धबधबाच. जीवनावरचे प्रेम त्यांच्या गायकीतून जाणवायचं. व्यक्त व्हायचं.

“भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले” ही आशाताईंनी गायलेली गझल खोल पाण्याच्या तळाशी नेते.

“जिवलगा राहिले हे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे.. ”

ही विराणी गावी तर ती फक्त आशाताईंनीच.

त्यांची किती गाणी आठवावीत? किती सूर साठवून ठेवावेत हृदयाच्या कप्प्यात?

आशाताईंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मनात याच ओळी घुमल्या.

“ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे

” जणू काही अशाताईंच्या जाण्याचा संपूर्ण भावार्थ याच ओळीत साठलेला आहे.

शब्दसुरांना मरण नसते. सूरात्मा अमर असतो. पिढ्यानुपिढ्या ही संगीत सरिता अशीच झुळझुळ वाहत राहणार आणि या सूरगंगेच्या किनारी उभं राहून सारं चराचर त्यांना आदरांजली वाहत राहणार.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

  

मूर्खपणा आणि वेडेपणा (Madness and Stupidity)!

एका माणसाच्या गाडीचे टायर बरोबर एका मानसिक रुग्णालयासमोर (Mental Hospital) पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना त्याला मोठी कसरत करावी लागली.

त्याने गाडीचा बोनेट उघडला, जॅक काढला, जादा चाक (spare wheel) आणि व्हील स्पॅनर बाहेर काढले. पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी त्याने चारही नट (nuts) उघडले. पण दुर्दैवाने, ते चारही नट गडगडत गेले आणि थेट गटारात पडले. गटाराचे झाकण उघडता येण्यासारखे नव्हते; नट पाण्यात गायब झाले होते.

तो माणूस हताश होऊन इकडे-तिकडे पाहू लागला आणि शेवटी निराश होऊन पदपथावर बसला.

रुग्णालयाचा एक रुग्ण कुंपणातून हे सर्व सुरुवातीपासून पाहत होता. तो ओरडला:

“ए मूर्खा! काय करतोयस तिथे? “

माणसाने उत्तर दिले:

“मित्रा, विचारू नकोस रे. टायर पंक्चर झाला आणि चाक बदलताना चारही नट गटारात पडले. “

तो रुग्ण लगेच म्हणाला: “अरे, तू उगीच गोष्टी अवघड करतोयस! साधी गोष्ट आहे, बाकीच्या तिन्ही चाकांमधून एक-एक नट काढ, म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक चाकाला तीन नट होतील. पुढच्या पेट्रोल पंपापर्यंत किंवा टायर रिपेअरिंगच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी तेवढे पुरेसे आहेत! “

त्या माणसाने रुग्णाने सांगितल्याप्रमाणे केले आणि आनंदाने त्याला विचारले: “अरे वा! मग तू या मानसिक रुग्णालयात काय करतोयस? “

त्या रुग्णाने दिलेले उत्तर खरंच ‘लेजेंडरी’ होते…

“मित्रा, आम्ही इथे ‘वेडेपणा’मुळे आहोत, ‘मूर्खपणा’मुळे नाही! “

‘वेडेपणा’ ही एक वेगळी गोष्ट आहे.

आणि ‘मूर्खपणा’ पूर्णपणे वेगळी.

वेडेपणावर उपचार होऊ शकतात, पण मूर्खपणावर नाही!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ दि. दि. ७/५/२६ ते दि. १०/५/२६ प्रकाशन बंद – सूचना 📖 ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

📖  दि. ७/५/२६ ते दि. १०/५/२६ प्रकाशन बंद – सूचना 📖

कृपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी – – – 

काही तांत्रिक कारणामुळे शनिवार दि. ७/५/२६ ते दि. १०/५/२६.. असे ४ दिवस ई-अभिव्यक्ति दैनिकाचे लिंक स्वरूपातले प्रकाशन बंद राहील. पण त्या त्या दिवसाचे साहित्य ग्रुपवर थेट प्रकाशित केले जाईल.

सोंमवार दि. ११/५/२६ पासून लिंक स्वरूपात पुन्हा नियमित प्रकाशन केले जाईल.

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ‘देवा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? क्षण सृजनाचे ?

☆ ‘‘देवा…’ ☆  शांभवी मंगेश जोशी 

क्षण सृजनाचे:

दि. ३/४/२०२६ या ई-अभिव्यक्ती मध्ये खालील लेख आला आहे. तो वाचल्यानंतर मला माझी एक कविता येथे द्यावी असे वाटले. प्रथम तो लेख व नंतर माझी कविता आपल्यासाठी.

☆  निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

—– 

☆ कविता –  😀 देवा, 🙏🌹🙏 ☆

 आले कशी कळेना, दारी तुझ्या दर्शनास

 नसताच कारण आणि इच्छा जराही मनात😞

 तरीही आस उगा मनात, भेटशील इथे तू खचित!

 वाटले…! वाटले पाहू तरी, असतो कसा तो देव!

 भ्रमनिरास माझा देवा नक्कीच तू केला😢

 साधून ते तुजला, आनंद कुठला मिळाला?

 रांगेत मी भक्तांच्या, तू वेढ्यात सुरक्षारक्षकांच्या

 तिथेच भक्ती माझी टिचकली, जी बळेच होती मी जपलेली 🙃

 ढकलाढकली अन् धक्काबुक्की ती अशी

 आले क्षणभर तव सामोरी कशीबशी

 तशाच धक्क्याने नेले क्षणात दूरदूर

 तनाने तसे मनानेही खूप खूप दूर दूर 👎👎

 सांगते हात जोडुनि शपथ घेउनि तुझी, 🙏🙏

 हात जोडण्यासही जमलेच नाही, त्या एका क्षणात! 😢

 किंचितही वळून ना पाहिले पुन्हा

 परी

 सोडला श्वास सुटकेचा, संपला सोहळा दर्शनाचा

आली कीव तुझीच! वाटले, हवी तुलाच सुटका

 येथुनि

निघाले तडक जरी माघारी… तरी…

तरी पावलांमागोमाग हा कसला भास? 🤔🤔🤔

 

आलास की काय सोडुनि तू तुझ्या राउळास?

 

संशय खरा की खोटा, छळतो मनाला

परी त्या क्षणापासुनिवाटते निश्चिंत माझ्या मनाला👍🙏😀🙏

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे

सहज सुचलं म्हणून… ✍️क्षण झाला अमर

१: “भूत-भविष्य चिंतनात नाही तर वर्तमान कळतं…”

भूत म्हणजे स्मृतींची सावली.

भविष्य म्हणजे कल्पनांची छाया.

दोन्हींचा आधार मन आहे — आणि मनच काळ निर्माण करते.

पण वर्तमान?

तो ना स्मृती आहे, ना कल्पना. तो शुद्ध अनुभूती आहे.

 

उपनिषद म्हणतात —

“यत् साक्षादपरोक्षाद् ब्रह्म” —

जे प्रत्यक्ष आहे, तेच ब्रह्म आहे.

वर्तमान क्षण हाच साक्षात् ब्रह्मानुभवाचा दरवाजा आहे.

जो क्षण पूर्णतेने जगतो, तो काळाच्या पलीकडे जातो.

 

२: “दिवसांचे महत्त्व कमी झाले की ‘क्षणांचे’ मूल्य कळते…”

दिवस हे मोजमाप आहे.

क्षण हा अनुभूती आहे.

दिवस बाह्य घड्याळ सांगते. मात्र क्षण अंतःकरण उलगडते.

जेव्हा आपण दिवसांच्या धावपळीतून थांबतो, तेव्हा जाणवते —

जीवन दिवसांनी नव्हे, तर जागृत क्षणांनी घडते.

 

अद्वैत दृष्टीने —

प्रत्येक क्षणात पूर्णत्व आहे.

कारण क्षणातच चैतन्य प्रकट आहे.

 

३: “भगवंत हृदयस्थ आहे…”

भगवंत शोधायचा बाहेर का?

तो तर साक्षीभावात, शुद्ध जागरूकतेतच आहे.

ईशावास्यमिदं सर्वम्” —

सर्व काही त्याने व्यापले आहे;

मग हृदय त्याच्या बाहेर कसे असेल?

जेव्हा मन भूत-भविष्य सोडते,

तेव्हा हृदयात शांत, निर्विकल्प प्रकाश उगवतो.

तोच भगवंत.

🕉️ थोडक्यात

न भूतं न भविष्यं, केवलं वर्तमानम्।

न कालः तत्र भाति, केवलं चैतन्यम्।

यस्मिन् क्षणे विश्रान्तिः, स एव ब्रह्मक्षणः॥

(भूत नाही, भविष्य नाही — जे उरते ते वर्तमान चैतन्य; ज्या क्षणी विश्रांती मिळते, तोच ब्रह्मक्षण.)

 *

ध्यान म्हणजे अपूर्णतेच गोडी वाटणे, अनुभवणे

भूत-भविष्य निवळले की क्षण पवित्र होतो;

क्षण पवित्र झाला की हृदय मंदिर बनते. 🙏

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी 

शब्दावाचुनी संवादाची

 लाभे तुज स्वरभाषा 

सप्तसुरांची एक स्वामिनी 

नाम तिचे आशा…

अशी ही सुरांची स्वामिनी दोन महाराण्यातील महाराणी आशा भोसले काल आपल्याला सोडून गेली. 92 वर्षाच्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख एकेरी करताना प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आपलेपणाच दिसतो. देवाला जसे आपण अरे परमेश्वरा असे म्हणतो तत्वत त्या दोन भगिनींना.. लता आणि आशा अशा… याना एकेरी संबोधनच मिळाली आणि तीच जगातील सर्वात आपलेपणाची भावना आहे असे मला वाटते.

काल टीव्ही वरती एक वाजता अचानक पणे बातमी आली आशाबाई आपल्याला सोडून गेल्या दोन मिनिट धक्काच बसला विश्वास बसेना चार वर्षांपूर्वी एक स्वर हरपला आणि आज दुसरा..! खूप वाईट वाटलं पण शेवटी मन म्हणायला लागलं अरे जगणार किती वर्ष. समृद्ध आयुष्य जगलेल्या जीवाने लोळत घोळत जाणे बरोबर नाही. आशाबाई अशाच उठून निघून गेल्या एका समृद्ध, संघर्षमय, बंडखोर, मिश्किल युगाचा अंत झाला. मंगेशकरांच्या पाच भावंडामधली ही सगळ्यात चुलबुली मुलगी.. एकदा एका मुलाखतीत ऐकले होते.. आशा घरात कुठे सापडली नाहीतर लहानपणी घरातली सारी या मुलीला हुडकायचे तेव्हा त्यांच्या मातोश्री बरोबर सांगायच्या अगं पलीकडच्या गल्लीत बाया शेवाया घालताहेत तिथे गेले असेल शेवया धरायला…! अशा बाईनी लहानपणापासूनच अशा शेवया घाल कुरडया कर पापड्या घाल सांडगे तोडून दे… या सगळ्या गोष्टीत आनंद घेतला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल आणि केवळ तीन वर्षांनी मोठी असलेल्या आपल्या भगिनीलाच सर्वस्व मानून तिचे श्रद्धेने ऐकत त्या मोठ्या झाल्या. लताबाईंवर जबरदस्त विश्वास ती म्हणाली आई वडिलांच्या पायाचे पाणी तीर्थ असते ते प्याल्याने आपले जीवन सुखी होते आणि ते झोपले असताना त्यांच्या पायावरून पाणी घालून ते एका ताटलीत जमा करून तीर्थसारखे प्राशन करणाऱ्या बहिणी… आशा बाईनी हा किस्सा सांगताना सांगितला होता… कदाचित आई-वडिलांच्या पदस्पर्शाच्या त्या पाण्याने आमचे जीवन उजळून निघाले त्यांचा आशीर्वाद लाभला आणि आम्हाला मोठ होता आलं…

मोठं होण्यासारखं काय होतं जवळ? वय अत्यंत लहान पाच भावंड एकट्या आईने काय करावं पैशाची विलक्षण नड दीनानाथ मंगेशकर गेल्यानंतर त्यांना घरी आणावं की नाही का तसेच स्मशानभूमीत न्यावे? हा प्रश्न त्या घराला पडला होता कारण दोनदा टॅक्सी करणे एवढे भाड्याचे पैसे नव्हते तरीही माईनी घरी नेण्याचा निर्णय घेतला ह्या सगळ्या घटनांचा परिणाम लताबाईंवर झाला होता कारण त्या थोड्याशा कळत्या होत्या. बाकी सगळे भावंडे लहानच होती ना मग सगळी श्रद्धा आपल्या मोठ्या बहिणीवर…! सुरांची जादू सगळ्यांजवळच होती लताबाई आपण मेहनत करत आणि इतराना करायला लावत. यौवनात पदार्पण केल्यानंतर आशाबाई थोड्या बंडखोर निघाल्या मनस्वी होत्याच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला. गणपतराव भोसले यांच्याशी लहान वयात लग्न केलं ते घरी कोणालाही पसंत नव्हतं तरीही त्यांनी आपला संसार नेटका करायचा प्रयत्न केला खूप गरिबी बघितली. गणपतराव भोसले विलक्षण हिंसक खूप त्रास दिला पण आपण केल आहे आपण निभावायच आहे हा आशाबाईंचा विश्वास ठाम होता, आणि त्यांनी ते केले. ही आशा भोसले यानी सांगितलेला एका मुलाखतीला किस्सा आहे… की मी कोणत्याही साडीवर पांढरा ब्लाउज घालून जात असे कारण माझ्याकडे तो एकच चांगला ब्लाऊज होता जुना ब्लाउज रात्री घालायचा आणि हा धुवून ठेवायचा सकाळी तो ब्लाउज साडीवर घालून रेकॉर्डिंग ला जायचं त्यामुळे दोन्ही खांद्यावर पदर घट्ट लपेटून म्हणलेली त्याची गाणी आपल्याला चित्रीकरणात दिसतात हे सार त्यानी मागे टाकले आणि मेहनतीच्या जोरावर त्या पुढे गेल्या त्यांना कामे मिळताना लताबाईंचाच तर मोठा अडसर होता लताबाईंच्या आवाजाची जादू लोकांवर साम्राज्य करीत होते पण हळूहळू त्यानी आपल्या आवाजाची जादू दाखवायला सुरुवात केली. आपल्या आवाजाचे वेगळेपण दाखवायला सुरुवात केले लताबाईंशी स्पर्धा नाही त्या नेहमी म्हणत लता शेवटी लता आहे..! एका मुलाखतीत तिने सांगितले होते दीदी कडून दाद मिळवणं खूप कठीण… एका गाण्यांमध्ये दोघी एकत्र गात होत्या गाणं होतं… मन क्यू बहका रे बहका आधी रात को… त्यावर अशा बाईंची दुसरे ओळ आहे बेला मेहका रे मेहका आधी रात को… आधी रात हा शब्द त्यांनी इतका सुंदर म्हणलाय लताबाईंनी चष्मा खाली घेतला आणि तिला हसून दाद दिली की अरे वा काय सुंदर हमसे भी आगे हो.. आशाबाईनी सांगितलं असे क्षण खूप कमी पण ते मी जपून ठेवले आहेत.

 लताबाईंपेक्षा वेगळ्या धाटणीची असंख्य गाणी गाऊन सुद्धा म्हणजे कव्वाली भावगीत शास्त्रीय संगीत गायले गझल गायल्यात पाश्चिमात्य घाटाची गाणी गायली. कॅब्रे सॉंग गायलं… इतके वैविध्य आशाबाई देऊ शकल्या तरीही त्या म्हणतात लता ही लताच आहे तो हिमालय आहे हे असं म्हणायला खूप मोठे पण लागत. आपल्या मोठ्या बहिणीबद्दल आदर प्रेम हे सगळं सगळं ओसंडून वाहत होतं लताबाई एखादी गोष्ट नाही म्हणाल्या की आशांनी पुढे जाऊन ते कधीच केलं नाही कारण त्यांना कळून चुकलं होतं कि ती जे सांगते त्यात खूप जास्त तथ्य असते. अनेक डॉलरची बिदागी देऊन आपल्या मुलाच्या लग्नात लता आणि अशांनी गावे अशी इच्छा एका माणसाने व्यक्त केली होती लता दीदीनी त्याला साफ नकार दिला. आशाबाई येतील अशी आशा त्याला वाटत होती लताबाईंनी फक्त एकच वाक्य उच्चारलं… ” लता तू लग्नात जाणार आहेस का गायला? ” ह्या एका वाक्यात सगळं काही भरून होतं आणि आशाबाईने तात्काळ नकार दिला.

आशाबाई बंडखोर होत्या कारण त्या लहान बहीण होत्या हट्ट करणे बंडखोरी करणं हा त्यांचा हक्कच होता पण लताबाई ना ते करून जमणार नव्हतं कारण त्यांच्यावर त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं होतं आणि हे करत असताना आपल्या भावंडांनी कुठेही चुकू नये चुकीचा निर्णय घेऊन ये चुकीच्या ठिकाणी गाऊ नये हाच लताबाईंचा उद्देश होता आणि हा त्यांचा हेतू ती सर्व भावंड जाणून होती त्यामुळे लता बाई त्यांच्यासाठी बहीणच नव्हे तर आई बाप सर्वस्व होत्या खूप मुली आपल्या कुटुंबासाठी राबतात पण त्यांची भावंड कदर करतीलच असं नाही लताबाईंच भाग्य मोठं ही सगळ्या भावंडांनी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. आशाबाईंच्या प्रत्येक मुलाखतीत लतादीदींबद्दल विलक्षण आदर प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

काही गोष्टी ‘मन’ रिचार्ज करतात.

झालं असं की…

ऑफिसच्या कामानिमित्त खूप वर्षांनी बालपण जिथं गेलं त्या भागात जाण्याचा योग आला. दहावीत असताना घर बदललं त्यानंतर इच्छा असूनही तिथं जाता आलं नाही आणि ऑफिसमुळे अनपेक्षित संधी मिळाली.

काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. ताबडतोब शाळेजवळ गेलो. खूप वर्षांनंतर ‘शाळा’ पाहताना आठवणींची एकेक फोल्डर उघडली. ‘मन’ पुन्हा शालेय दिवसात रमलं. मोबाइलच्या आवाजानं वास्तवात आलो. भुकेची जाणीव झाल्यावर तिथल्या प्रसिद्ध भेळेची आठवण झाली. ते दुकान अजूनही चालू असेल की नाही असा विचार डोक्यात आला. ‘जाऊन बघू’ म्हणत निघालो. बालपणी पायी तुडवलेल्या गल्ली, बोळातून जाताना भन्नाट फिलिंग होतं. दहा मिनिटांत पोचलो. चक्क दुकान चालू होतं. आजूबाजूला आकर्षक बोर्ड, लखलखाट असलेल्या दुकानांच्या रंगबिरंगी गर्दीत साधा बोर्ड असलेलं भेळेचे दुकान लक्ष वेधून घेत होतं. गाडी पार्क करून दुकानात गेलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास वीसेक वर्षांनी आलेलो तरीही सगळं जसच्या तसं, पंधराजण बसतील एवढीच जागा, पन्नास वर्षाच्या वाटचालीविषयीची कात्रणं भिंतीवर लावलेली. सोबतच गिऱ्हाईकांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी आदेशवजा विनम्र सूचनांचा बोर्ड, तिथंच तीन प्रकारच्या भेळीचं मेनूकार्ड, लाकडी बाक, जुन्या धाटणीचं टेबल, त्यावर चिंचेच्या पाण्याचा स्टीलचा तांब्या आणि शेजारी हिरव्या चटणीचं भांडं, समोरच भेळ करण्याच्या तयारीत मश्गुल मालक, गंमत वाटली लहान असताना यायचो तेव्हाही दुकानात कामगार नव्हते आताही नाही. सगळी कामं मालक आणि कुटुंबीयच करत होते. आवडीच्या भेळेची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर ‘वाह!! ’ आपसूक तोंडातून निघाले. अजूनही ‘चव’ तशीच. यत्किंचितही बदल नाही. चिंचेचं पाणी, चटणी घेतली आणि उदरभरणात गुंग झालो. मन तृप्त झालं. तीन भेळ पार्सल घेतल्या. बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो तेव्हा तिशीतले मालक आपल्या मुलाला ‘भेळ’ बनवायला शिकवत होते.

“वा, भेळ वारसा पुढच्या पिढीकडे.. ”मी बोलल्यावर मालक फक्त हसले.

“खूप वर्षापूर्वी तुमच्या वडीलांना असंच शिकवताना पाहिलं होतं. ”तिथल्या फोटोकडे बोट दाखवत म्हणालो.

“म्हणजे तुम्ही!! ”

“इथली भेळ एक रुपयाला मिळायची तेव्हापासून खातोय. नऊवारीतल्या आजी काउंटर सांभाळायच्या आणि पांढरा पायजमा, हाफ शर्टातले वडील सगळी कामं करायचे. आता तुम्ही आणि नंतर हा छोटा.. पिढी बदलली पण चव नाही. वा!! तात्पुरतेपणाला महत्व असलेल्या काळात वारसा जपला जातोय हे महत्वाचं. छान वाटलं. खूप शुभेच्छा!! ”खुष झालेल्या मालकांनी हातात श्रीखंडाची वडी ठेवली. त्यांच्यासोबत छानपैकी सेल्फी घेऊन निघालो. जुनं जाऊन नवीन येणं हे निसर्गाचं चक्र. आयुष्यही तसंच चालू असतं पण काही परंपरा, वास्तु, ठिकाणं हे पुन्हा जुन्या काळात घेऊन जातात. भेळीच्या निमित्तानं अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. मस्त वाटलं. घरी पोचलो तरी मन आठवणीतच रेंगाळलेलं.

वास्तव विसरायला लावणारी अशी ठिकाणं असतात. जिथं पद, प्रतिष्ठा, अहं काही आडवं येत नाही. अशा ठिकाणी वेळ काढून भेट द्या. भारी वाटेल.

“दिल ढूंढता हैं, फिर वही फुरसत के रात दिन…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अशीही असते चॅरिटी‘!!!’

*”माझ्या गरिबीला कंटाळून तू मला सोडलं होतंस ना? बघ आज मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे! ” साहेबांनी भर शाळेत घटस्फोटित बायकोचा अपमान केला… पण जेव्हा मुख्याध्यापकांनी सत्य सांगितलं, तेव्हा साहेबांचा श्वासच कोंडला! *

*वाशिम जिल्ह्यातील ‘शिरपूर’ गावची ती एक जुनी जिल्हा परिषद (ZP) शाळा. सकाळची वेळ होती. अचानक शाळेच्या गेटवर पोलिसांच्या गाड्या आणि लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. वाशिम जिल्ह्याचे नवे आणि अत्यंत कडक शिस्तीचे ‘जिल्हाधिकारी’ (Collector) अविनाश पाटील साहेब शाळेच्या अचानक तपासणीसाठी (Surprise Visit) आले होते. *

अविनाश साहेब रुबाबात गाडीतून उतरले. मुख्याध्यापक आणि शिक्षक घाबरून स्वागताला धावले. साहेब एक-एक वर्ग तपासत पुढे जात होते. सातवीच्या वर्गात साहेब शिरले आणि फळ्यावर गणितं शिकवणाऱ्या शिक्षिकेने मागे वळून पाहिलं. साहेबांची पावलं तिथेच थबकली! त्यांचा श्वास एका सेकंदासाठी रोखला गेला.

ती शिक्षिका दुसरी कुणी नसून अविनाशची घटस्फोटित बायको, ‘पल्लवी’ होती! अंगावर एक अत्यंत साधी, विटलेली सुती साडी, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर एक अजीब शांतता. पाच वर्षांनंतर ते दोघे असे समोरासमोर आले होते. पल्लवीच्या हातातला खडू खाली पडला, पण तिने स्वतःला सावरले आणि ती गप्प उभी राहिली.

तो ५ वर्षांपूर्वीचा कटू भूतकाळ:

पाच वर्षांपूर्वी अविनाश पुण्यात यूपीएससी (UPSC) ची तयारी करत होता आणि पल्लवी एका खाजगी शाळेत ५-७ हजारांवर शिक्षिका होती. अविनाशचे सलग ३ प्रयत्न अपयशी ठरले होते. घरात भयंकर गरिबी होती. नातेवाईक त्याला ‘निकम्मा’ आणि ‘बायकोच्या पैशांवर जगणारा’ म्हणून हिणवायचे.

एके दिवशी पल्लवीने अचानक अविनाशसोबत भयंकर भांडण काढलं. ती जोरात ओरडली होती, “मला तुझ्या या फालतू संघर्षाला कंटाळा आलाय! तू आयुष्यात कधीच एक रुपया कमवू शकणार नाहीस. मी माझा जन्म तुझ्यासोबत गरिबीत सडवू शकत नाही! ” त्या एका अपमानाने अविनाशचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. रागाच्या भरात दोघांचा घटस्फोट झाला. अविनाश दिल्लीला गेला आणि पल्लवीने वाशिमसारख्या एका मागास गावात बदली मागून घेतली.

तो अपमानाचा प्रसंग आणि साहेबांचा अहंकार:

आज तोच ‘निकम्मा’ नवरा या जिल्ह्याचा राजा (कलेक्टर) बनून तिच्यासमोर उभा होता. अविनाशने शाळेची तपासणी संपवली आणि पल्लवीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावले.

केबिनमध्ये फक्त मुख्याध्यापक, अविनाश आणि पल्लवी होते. अविनाशने अत्यंत तुसडेपणाने आणि गर्वात पल्लवीकडे बघून म्हटलं,

“काय मॅडम? पाच वर्षांपूर्वी माझ्या गरिबीला आणि बेरोजगारीला कंटाळून तुम्ही मला सोडून गेला होतात ना? तुम्हाला वाटलं होतं मी रस्त्यावर येईन. पण आज डोळे उघडून बघा… तोच ‘निकम्मा’ नवरा आज या पूर्ण जिल्ह्याचा ‘कलेक्टर’ बनून तुमच्यासमोर बसलाय! आणि तुम्ही? तुम्ही आजही या खेड्यातल्या फाटक्या शाळेत ५० पोरांना शिकवत खितपत पडला आहात. आज तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप होत असेल! ”

पल्लवी काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे खाली वळवले आणि तिच्या गालावरून एक अश्रू खाली ओघळला. ती केबिनच्या बाहेर जायला वळली.

तो सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग:

तेवढ्यात वयस्कर मुख्याध्यापक (शिंदे सर) पुढे आले आणि त्यांनी पल्लवीला थांबवले.

“पल्लवी मॅडम, आज साहेबांना सत्य सांगाच… नाहीतर हे आयुष्यभर तुम्हाला स्वार्थी समजतील! ”

अविनाशने रागाने विचारले, “कोणतं सत्य शिंदे सर? हिने स्वतःच्या स्वार्थासाठी मला सोडलं होतं, हेच सत्य आहे. ”

शिंदे सरांचे डोळे पाणावले होते. ते साहेबांच्या टेबलाजवळ आले आणि म्हणाले,

*”साहेब, तुम्ही पुस्तके वाचून कलेक्टर झालात, पण माणसं वाचायला पार विसरलात! पाच वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यातून दिल्लीला गेलात, तेव्हा दिल्लीच्या ‘संकल्प आयएएस (IAS) अकॅडमीची’ दीड लाखांची फी आणि तुमच्या दर महिन्याच्या मेसचे (जेवणाचे) ४ हजार रुपये कोण भरायचं… याची तुम्ही कधी चौकशी केली का? ”

अविनाश अवाक् झाला. “ते… ते तर मला एका ‘चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून स्कॉलरशिप मिळत होती. ”

शिंदे सर अत्यंत जड आवाजात म्हणाले,

*”साहेब… ती कोणतीच स्कॉलरशिप नव्हती! या पल्लवी मॅडमने बँकेतून ५ लाखांचं पर्सनल लोन काढलं होतं आणि एका ओळखीच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या दर महिन्याला गुपचूप तुमच्या दिल्लीच्या क्लासची फी भरायच्या!

तुमच्या नातेवाईकांचे टोमणे आणि पैशांची तंगी तुमच्या ध्येयाच्या आड येत होती. तुमचा स्वाभिमान बायकोचे पैसे कधीच घेणार नाही, हे पल्लवी मॅडमला माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतःला ‘स्वार्थी’ आणि ‘वाईट बायको’ ठरवून तुमच्याशी भांडण केलं… जेणेकरून रागाच्या आणि सूडाच्या आगीत का होईना, पण तुम्ही दिल्लीला जाऊन कलेक्टर बनाल! साहेब… या माऊलीने स्वतःच्या अंगावर साधी नवी साडी घेतली नाही, एक वेळ उपाशी राहिली, पण या फाटक्या शाळेत राहून तिने तुमच्या यशाचा महाल उभा केलाय! “*

अहंकाराचा शेवट आणि पश्चात्तापाचे अश्रू:

हे शब्द ऐकताच कलेक्टर अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली! त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ज्या खुर्चीवर बसून तो पल्लवीचा अपमान करत होता, ती खुर्ची तिच्याच रक्ता-घामातून बनली होती!

अविनाश वेड्यासारखा खुर्चीवरून उठला आणि त्याने कोणताच विचार न करता, त्या जिल्हा परिषदेच्या केबिनमध्ये थेट पल्लवीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला!

तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला… “पल्लवी… मला माफ कर! मी नीच आहे. माझ्या यशाच्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं. तू माझं घर नाही सोडलंस, तू स्वतःला जाळून माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास! मला शिक्षेचा अधिकार दे, पण मला सोडून नको जाऊस… ”

पल्लवीने रडत त्याला उठवले. त्या दिवशी एका कलेक्टरचा सगळा रुबाब आणि माज एका साध्या झेडपी (ZP) शिक्षिकेच्या त्यागासमोर कायमचा मातीत मिसळला होता. सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचा असा विजय झाला होता, ज्याने जिल्ह्याच्या राजालाही गुडघे टेकायला भाग पाडले!

आई-वडील आणि बायकोच्या पडद्यामागच्या त्यागाला विसरून, स्वतःच्या यशाचा माज असणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा*

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

गूंजी  हिंदी विश्वमें 

स्वप्न हुआ साकार 

राष्ट्रसंघ के मंच से 

हिंदी की जयकार!

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा. ए. सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.

देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कूच  है

कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिर से दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट सकते

है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल. ’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले. अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस “गुड गव्हर्नन्स डे” अर्थात “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares