मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फुलांची रंगपंचमी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

? कवितेचा उत्सव ? 

☆ फुलांची रंगपंचमी☆ सौ शालिनी जोशी

आज बागेत सभा भरली फुलझाडांची

प्रत्येक फुल सांगे महती आपल्या रंगाची

*

तगरी म्हणे पांढरा शुभ्र रंग माझा जाणा

तोच पावित्र्य स्वच्छता आणि ताजेपणा

*

जास्वंदी म्हणे भडक लाल रंग माझा असे

तोच रागात आणि प्रेमात साथीला असे

*

अबोलीला कौतुक आपल्या केशरी रंगाचे

जो प्रतीक ऊर्जा आणि त्यागाचे

*

शेवंती मिरवी रंग धम्मक पिवळा

जो आशा आणि आनंदाचा मेळा

*

निळी गोकर्ण म्हणे रंग माझा आभाळाचा

तोच खरा ठेवा गुढता आणि विश्वासाचा

*

गुलाबी गुलाब गालावर फुलतो

शृंगारा बरोबर निरागसताही दाखवतो

*

शेवटी पाने सळसळलई, पुरे तुमची बडबड नुसती

हिरवा रंगच देतो खरी सकारात्मकता आणि शांती

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राधा… राधा…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “राधा… राधा…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

प्रसन्न एका सकाळी,

कृष्ण समवेत अष्टपत्नी,

रमले होते हास्यविनोदात सकळी…

 

दुग्ध प्राशन करण्या घेतला प्याला,

चटका कृष्णाच्या बोटाला बसला,

कृष्णमुखातून एकच बोल आला, “राधा-राधा”!!..

 

साऱ्या राण्यांनी प्रश्न एकच केला,

“स्वामी, का सदैव आपल्या मुखी, राधा?

काय असे त्या राधेत, जे नाही आमच्यांत?… “

 

काहीच न बोलला तो मेघश्याम,

मुखावर विलासत केवळ आर्त भाव,

जणू गेला गढून राधेच्या आठवणीत…

.

.

.

काळ काही लोटला…

कृष्ण देवेंद्राच्या भेटीस निघाला,

निरोप देण्या प्रिया साऱ्या जमल्या,

कृष्णाने पुसले,

 “काय प्रिय करु तुम्हाला?”

 

सत्यभामेची इच्छा एक,

 दारी असावा तो स्वर्गीय पारिजात,

सातजणींनी मागणे काही मागितले,

कृष्णाने रुक्मिणीस पुसले,

“सांग, तुझे काय मागणे?”

 

चरणस्पर्श करण्या रुक्मिणी झुकली,

कृष्णाची मऊसूत पाऊले पाहून थबकली,

नकळत वदली,

“स्वामी, इतके अवघड जीवन,

तरी पाऊले आपली कशी इतकी कोमल?”

 

कृष्ण केवळ हसला,

अन् “राधा राधा” वदला,

रुक्मिणीने मग हट्टच धरला,

 “प्रत्येक वेळी का राधा राधा?

या प्रश्नाचे उत्तर,

हेच प्रिय माझे आता…

 

सांगाच आम्हास आज,

कृष्णाच्या मुखी का ‘राधा राधा?’

हे कृष्णा,

निद्रेत तुझा श्वासही बोलतो राधा राधा!

का असे इतकी प्रिय ती राधा?”

 

कृष्ण वदला,

“हाच प्रश्न मी राधेलाही होता पुसला,

सोडून वृंदावन जेव्हा निरोप तियेचा घेतला.

पुन्हा न भेटणे या जगती आता,

 हे ठावे होते तिजला.

 

ह्ळूच धरून हनुवटीला,

पुसले राधेला,

‘सांग राधे,

आयुष्याची काय भेट देऊ तुजला?

मी सोडून, काहीही माग तू मजला. ‘

 

‘कान्हा,

ऐक, दिलेस तू वचन मजला,

नाही बदलणे आता शब्द तुजला,

जे मागीन मी, ते द्यायचेच तुजला…

 

कान्हा,

वर एकच असा दे तू मजला…

 

पाऊल प्रत्येक तुझे,

 माझ्या हृदयीच्या पायघड्यांवर पडू दे,

सल इवलासा जरी सलला तुझ्या अंतरी वा शरीरी,

तर क्षत त्याचा उमटू दे रे माझ्या शरीरी… ‘

 

 ‘राधे, राधे, काय मागितलेस हे?

आयुष्याचे दुःख माझे,

का पदरात घेतलेस हे?

सारे म्हणती, राधा चतुर शहाणी,

का आज अशी ही वेडी मागणी?’

 

गोड हसून, हृदय राधेचे बोलले,

‘कान्हा, नाहीच कळणार तुला माझी चतुराई.

तुझ्यापासून वेगळे अस्तित्व आता राधेला नाही.

 

कान्हा,

तुझ्या प्रत्येक पावलाची चाहूल,

हृदय माझे मजला देईल.

अन् शरीरी उमटता क्षत प्रत्येक,

क्षेम तुझे मला कळवेल.

 

कृष्ण आणि राधा,

नाही आता वेगळे,

दोन तन जरी,

 तरी एकजोड आत्मे’ “

 

साऱ्याच होत्या स्तब्ध, ऐकत,

अश्रूधारा कृष्णाच्याही डोळ्यात,

तनमनात केवळ,

 नाम राधेचे होते घुमत.

 

“प्रियांनो,

पाऊल प्रत्येक माझे,

हृदय राधेचे तोलते,

घाव सारेच माझे राधा सोसते,

म्हणून चरण माझे राहिले कोमल ते…

 

प्रत्येक पाऊल ठेवता,

हृदय राधेचे दिसते,

सल तनमनात उठता वेदना राधेची जाणवते,

अन् म्हणून प्रत्येक श्वासात राधा वसते…

 

प्रियांनो,

प्रेम तुम्ही केले,

प्रेम मीही केले,

पण

राधेच्या प्रेमाची जातच वेगळी…

ती एकच एकमेव राधा आगळी…

 

जोवरी राहील मानवजात,

तोवरी राधा म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव…

राधा म्हणजे केवळ प्रेमभाव…

राधा म्हणजे प्रेमाचा एक गाव…

प्रत्येकाच्या अंतरीचा कोवळा भाव…

मला ही वंदनीय माझी राधा…

कृष्णाच्याही आधी बोला ‘राधा राधा’.

 

राधा-राधा….

राधा-राधा….

कवी: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

चैतन्य चराचरी

झाली सोनेरी पहाट 

तम गेले लया

सुवर्ण फुले फुलली…

 

साधन नीत ज्याचे

अंतरीचा भानू उदेला

सत्कर्म नीत ज्याचे 

सुवर्ण फुले फुलली..

 

सदगुरुमय हृदय ज्याचे

तमाची रात्र‌ संपलीच

संपलीच चिंता, आता 

सुवर्ण फुले फुलली…

 

मन प्रसन्न ज्याचे

वाणीतही गोडवा

गुरुसेवा हेचि कर्म

सुवर्ण फुले फुलली…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 268 ☆ माफ़ी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 268 ?

☆ माफ़ी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(अल्पाक्षरी)

आपण केलेल्या प्रत्येक चुकीची,

माफी कुणाकडे मागणार?

 Confession Box जवळ जाऊन बोलायची गोष्ट—–

  म्हणजे पापांगिकार !

  अनेक गोष्टीत

दिसत असतात चुका,

स्वतःच्या आणि इतरांच्या ही,

आपण मुळीच नसतो,

हरिश्चंद्राचे अवतार किंवा,

साधू संत ही ! तरीही—-

आपल्याला जगायचेच असते,

स्वच्छ,  पापभिरू बनून!

 पण कसले ,कसले मोह,

भाग पाडतात पाप करायला!

कुठंतरी वाचलं होतं,

“नैतिक अनैतिक म्हणजे काय?

जे मनाला आनंद देतं….

ते नैतिक आणि जे मनाला दुःख देतं ते अनैतिक!”

तू ही म्हणालास,

 ख्रिस्ती धर्मात ज्या Ten commandments सांगितल्या आहेत,

 त्यात अकरावी अशी आहे,

(ही आज्ञा मानवनिर्मित )- —

“ह्यातलं जर काही तुम्ही केलंत,

तर ते कुणाला सांगू नका !”

पण न सांगितल्यानं पाप लपत नाही रे ,

डाचत राहतं मनात!

म्हणूनच मागायलाच हवी माफी,

आपल्या आत्म्याला खटकणाऱ्या–‐

प्रत्येक गोष्टीची,

ईश्वराकडे!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

अल्प परिचय

जन्म – १५/४/१९५९

साहित्य आणि सम्मान – 

  • जवळपास १९८१ पासून मराठी गीत गझल, व ललित लेखन.
  • चार कविता संग्रह, दोन ललित लेख संग्रह, दोन व्यक्ती चरित्र पुस्तक अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बी. एस. सी. भाग १ मधे कविता अभ्यासक्रमात समाविष्ट.
  • कामगार कल्याण मंडळ गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २००५ मधे आर आर पाटील यांच्या हस्ते प्राप्त.
  • कवयित्री शांता शेळके यांचे हस्ते गीत लेखन पुरस्कार पुणे येथे.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन यामध्ये अनेक वर्षे पासून निमंत्रित कवी म्हणून सहभागी.
  • मुंबई दुरदर्शन नागपूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारण.
  • महाराष्ट्रातील अनेक दिवाळी अंकात कविता प्रसिद्ध.
  • अमरावती विद्यापीठाच्या पी. एच. डी. करीता समग्र साहित्यावर माण्यता..

? कवितेचा उत्सव ?

☆ आई… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

सोडून हात माझा आई कुठे निघाली

आता व्यथाच सारी माझ्या घरात आली… १

*

आई तुझा दिलासा देतो मला सहारा

माझा तुझ्याविनागे नाही कुणीच वाली…. २

*

आहे तुझी प्रतिमा हृदयामधेच आई

जातील हे जरीही अश्रू सुकून गाली…. ३

*

माहित हे मला की येशील ना कधी तू

तू नेहमीच माझ्या असतेस भोवताली… ४

*

पदरात फाटक्या या माझी असे शिदोरी

मातीत या कुणाची झोळी नसेल खाली…. ५

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुंतता हृदय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गुंतता हृदय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

गुंतता हृदय.

हृदय गुंतून ठेवणे

दुरुनच प्रीत जपणे

जगणे ते खरे झुरणे

स्मृती अंतरी खुपणे.

*

आयुष्य सावल्यांचे रंग

केवळ स्वप्नांचे तरंग

विरह भेटी लागे भृंग

प्रेमात धुंद कृष्ण संग.

*

वळणे अनंत क्षणाला

प्रश्न एकची या मनाला

होकार मिळती कुणाला

नकार उतरे प्रणाला.

*

भेटणे आतासे विलंब

सांजही जोमात अचंब

लांब-लांब झुलते बिंब

डोळे सांडती अश्र कुंभ.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

आजी आणि नातवंडं यांच्या नात्यावरची श्री संदीप खरे यांची सुंदर कविता आणि तिला दिलेलं उत्तर:

आजी म्हणते काढल्या खस्ता

जन्मभर मी केले कष्ट

तू म्हणजे त्या सगळ्याची

शेवट गोड असलेली गोष्ट

*

सगळं कथा पुराण झालं

देव काही दिसला नाही

कुशीत येतोस तेव्हा कळतं

कृष्ण काही वेगळा नाही… 

– श्री संदीप खरे

 

ह्या  कवितेला नातवाने दिलेले  उत्तर :

प्रश्न खूप पडतात ग, आज्जी,

देशील का मज उत्तरं त्यांची?

ठाऊक आहेत देवकी-यशोदा,

पण… आज्जी होती का कृष्णाची?

*

खाण्यासाठी चोरून माखन

उगाच करी सवंगड्यांसी गोळा?

खडीसाखरेवरती आज्जी

देई न त्या लोण्याचा गोळा?

*

बांधून ठेवी माय यशोदा

उखळासी करकच्चून त्याला,

धावूनी का ग गेली नाही

आज्जी त्याला सोडविण्याला?

*

कधी ऐकले, त्यास आजीने

दिला भरवुनी मऊ दूधभात?

निळ्या मुखावर का ना फिरला

सुरकुतलेला थरथरणारा हात?

*

असेल मोठ्ठा देव, तरी पण

आज्जी त्याला नव्हती नक्की,

म्हणूनी सांगतो मी सर्वांना …

कृष्णापेक्षा मीच लकी

*

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #280 ☆ साठलीत जळमटे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 280 ?

☆ साठलीत जळमटे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

लपून चार बाजुला थांबलीत जळमटे

घराघरात जाउनी शोधलीत जळमटे

*

करून रामबाण हा पाहिला इलाज मी

इलाज पाहुनीच हा फाटलीत जळमटे

*

सुरुंग आज लावला ठोकशाहिला जुन्या

नवीन कल्पने पुढे वाकलीत जळमटे

*

भयाण वाटली तरी जाळु सर्व संकटे

मनात आग पाहुनी पेटलीत जळमटे

*

हळूहळूच हे किटक आत पोचले पहा

चिवट बरीच जात ही थाटलीत जळमटे

*

कुणी न काल रोखले हे कुणा न वाटले

दिसेल घाण त्या तिथे लटकलीत जळमटे

*

लगेच साफ व्हायची आस ही नका धरू

प्रमाणबद्धतेमुळे साठलीत जळमटे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काय सांगू गझलहीतर राम आहे

ईश्वराच्या साधनेचे प्रेम आहे

*

ध्यास आहे जो जयाच्या अंतरीचा

तोच येथे गझल होतो नेम आहे

*

मानता नाजूक नाते कृष्ण राधा

कोण सांगा राधिकेचा शाम आहे

*

लावली ज्याने समाधी साधनेची

गझल त्याला लाभलेले दाम आहे

*

शब्द असतो बांधलेला भावनेशी

त्यात अवघा साठलेला जोम आहे

*

माणसाला माणसांची जाण नाही

कोण येथे जाणणारा व्योम आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्रमास आला बाई…… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ चैत्रमास आला बाई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

चैत्र मास आला बाई आला मोहोर घेऊन

आधी गेली पाने आता आला अंकूर लेवून..

*

सजलाय पर्णभार कोवळी ती पाने किती

सुंदर ती दिसतात हात, झाडावर हलवती…

*

लाल तांबूस पिवळी गर्द हिरवी ती छटा

मोहोराच्या हलवी हो चैत्र झाडावर बटा…

*

कैऱ्या डोलती डौलात गुलमोहोर फुलारला

छत्र लालीचे घेऊन पळस पांगाराही आला..

*

सणासुदीचा आनंद गुढी सुख पावित्र्याची

नांदी नवीन वर्षाची गोड प्रेम नि सौख्याची..

*

माणूस तो एक आहे हाच संदेश देऊ या

गुढी चैतन्याची हाती सण साजरा करू या….

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares