श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ मी-तू… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
दूर मी
दूर तू
तरी पण
हृदयी तू ||
अंबरात तू
अंतरात तू
चराचरात तू
श्वासात तू ||
सभोवती तू
त्रिलोकी तू
मागे उभी तू
पुढे दिससी तू ||
वात्सल्य तू
करूणा ही तू
कृपेचा सागर तू
माय बाप तू ||
किंकर मी
आकारले तू
लोह मी
परिस तू ||
भक्तीचे बीज
पेरलेस तू
कृपे तूझ्या
अंकुरलो मी…
संपृक्त मी
नको काही
ठाव दे मज
तूझिया चरणी…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




