शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆
☆
रस्ता – मार्ग
- जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
- जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.
खरं – सत्
- बोलणं खरं असतं
- सत्यला सोबत पुरावा जोडावा लागतो.
घसरडं – निसरडं
- पडून झालं की घसरडं.
- सावरता येतं ते निसरडं.
अंधार – काळोख
- विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
- निसर्गात जाणवतो तो काळोख.
पडणं – धडपडणं
- पडणं हे अनिवार्य.
- धडपडणं हे कदाचित सावरणं.
पाहणं – बघणं
- आपण स्वत:हून पाहतो.
- दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.
पळणं – धावणं
- पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
- ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.
झाडं – वृक्ष
- जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
- जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.
खेळणं – बागडणं
- जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
- जे मुक्त असतं ते बागडणं.
ढग – मेघ
- जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
- जे नक्की बरसतात ते मेघ.
रिकामा – मोकळा
- वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा.
- आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.
निवांत – शांत
- *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
- काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.
आवाज – नाद
- जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
- जो घ॔टेचा होतो तो नाद.
झोका – हिंदोळ*
- जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
- जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.
स्मितं – हसणं
- मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
- जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं.
अतिथी – पाहुणा
- जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
- जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.
घोटाळा – भानगड
- जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
- जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.
आभाळ- आकाश
- भरून येत ते आभाळ
- निरभ्र असत ते आकाश
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





अभिनंदनीय.
सहसा शब्दार्थ गवसत नाहीत म्हणून ह्या वेचलेल्या शब्दांचे महत्त्व.