नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ सृजन… ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
सृजन धरती
हिरवी पाती
धरतीच वाटे
जणू अंबाबाई!!
*
कलशाखाली
पुजली मृत्तिका
भूवरी माऊली
प्रगटत जाई!!
*
हेच पाचुसम
रूप आईचे
सकल सजीवा
वरदान होई!!
*
सृजन आईचे
स्वरूप बाईचे
नवदुर्गा रूपाने
पुजले जाई!!
☆
© नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






