सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ उत्तम असामान्य ज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
हे आपणास माहित आहे का?
- गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.
- मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.
- “The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात इंग्रजीचे सर्व अक्षर आलेले आहेत.
- जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.
- मुंग्या अजिबात झोपत नाहीत.
- “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.
- कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.
- जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद
- जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमीपेक्षा जरासे कमी भरते.
- वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.
- “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.
- सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.
- अमेरिकेत दरमाणशी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.
- TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळ दाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे.
- उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.
- चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टमवर विपरित परिणाम होतो.
- स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.
- आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.
- ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड”– तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नमूद आहं.
- डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.
- “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील सर्वात उच्चारण्यास अवघड वाक्य मानले जाते.
- “Rhythm” हा इंग्रजीतील स्वररहित सर्वात लांब शब्द आहे.
- आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.
- पत्त्यातील चारही राजे महान राजांचे चित्र आहेत.
- – इस्पिक – राजा डेव्हिड
- – किलावर – अलेक्झांडर
- – बदाम – चार्लमॅगने
- – चौकट – जुलियस सिझर
- आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.
- 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321
- ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
- गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स ही सर्व स्त्रियांनीशोधलेली साधने आहेत.
- मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.
- मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
- साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.
- सर्व विषुववृत्तिय अस्वले डावरी असतात.
- विमानात द्यावयाच्या सॅलडमधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन, अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.
- फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.
- हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
- मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.
- मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
- Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्या हाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
- मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
- वीज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
- 41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते.
- उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात.
- इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.
- सिगारेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
- बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈