मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णजन्माची मंगलरात्र… एक वेगळा विचार ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆  कृष्णजन्माची मंगलरात्र… एक वेगळा विचार ☆ राधिका भांडारकर ☆

श्रावण संपत आलेला असतो आणि आकाशात अजूनही ढगांची लगबग सुरू असते. मातीला ओल असते, पानांवर पावसाचे थेंब असतात आणि वातावरणात सणांची चाहूल लागलेली असते. अशाच या प्रसन्न दिवसांत येते गोकुळाष्टमी.

कृष्ण म्हणजे केवळ देव्हाऱ्यातला देव नाही. तो म्हणजे घराघरात हसणारे बालपण. तो म्हणजे लोण्याच्या गोळ्यासारखे निर्मळ हास्य. तो म्हणजे आईच्या पदराला धरून केलेली एखादी खोडी आणि ती खोडी पकडली गेल्यावर चेहऱ्यावर आणलेले निरागस भाव!

गोकुळाष्टमी म्हटली की डोळ्यांसमोर येते ती काळी यमुना नदी, अंधारी रात्र, डोक्यावर टोपलीत नवजात कान्हाला घेऊन, यमुनेच्या पाण्यातून चालणारा वसुदेव, आणि बालकाच्या पदस्पर्शाने दुभंगलेली नदी आणि त्यानंतर ते छोटेसे गोकुळ. नंदाचे अंगण, यशोदेची लगबग, गोप-गोपींची धावपळ आणि सगळ्यांच्या लाडक्या कान्हाची खोडकर पावले.

आजही आपल्या घरात कृष्णजन्म साजरा करताना त्या गोकुळाचीच एक छोटीशी प्रतिकृती तयार होते. देव्हाऱ्यात सुंदर सजावट केली जाते. पाळणा सजतो. त्यात छोटासा बाळकृष्ण ठेवला जातो. तुळशीपत्र, फुले, सुगंधी धूप आणि निरांजनाच्या प्रकाशात मध्यरात्रीची वाट पाहिली जाते.

आणि मग तो क्षण येतो…

“नंद घरी नंदलाला जन्मला! “

पाळणा हलतो आणि नकळत मनही हलते.

मला गोकुळाष्टमीचा हा क्षण नेहमीच विशेष वाटतो. कारण कृष्णाचा जन्म हा केवळ एका युगपुरुषाचा जन्म नाही; तो आशेचा जन्म आहे. अंधाराच्या रात्री जन्मलेला कृष्ण जणू सांगतो. अंधार कितीही गडद असला, तरी प्रकाश जन्म घेण्याची वेळ येतेच.

कृष्णाच्या बाललीला तर आपल्या संस्कृतीच्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. दही-दूध चोरणारा कान्हा, गोपिकांच्या तक्रारी ऐकणारी यशोदा, त्याच्या खोड्यांवर हसणारे गोकुळ. या सगळ्या कथा ऐकताना आपल्या मनातले बालपणही अलगद जागे होते.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कदाचित ती मातीची अंगणे नाहीत, उंबरठ्यावर रांगोळी नाही, घराघरांत लोण्याची मडकी नाहीत. पण कृष्ण अजूनही आहे.

एखाद्या मुलाच्या खट्याळ हसण्यात,

एखाद्या आईच्या काळजीत,

मैत्रीतल्या निरागसपणात,

आणि संकटाच्या वेळी मनात जागणाऱ्या धैर्यातही तो आहे.

कृष्णाने आपल्याला प्रेम शिकवले, पण त्याचबरोबर कर्मही शिकवले. त्याने बासरी वाजवली, पण वेळ आली तेव्हा सुदर्शनही हाती घेतले. म्हणूनच कृष्णाचे व्यक्तिमत्त्व इतके व्यापक वाटते. तो बालकही आहे आणि मार्गदर्शकही; सखा आहे आणि सारथीही.

गोकुळाष्टमीच्या रात्री पाळण्यातला तो छोटासा कृष्ण पाहताना एक विचार मनात येतो—आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा कान्हा असतोच. कधी मुलाच्या रूपाने, कधी नातवाच्या रूपाने, कधी एखाद्या जिवलग मित्राच्या रूपाने; जो आपल्या आयुष्यात थोडे हसू आणतो, थोडी खोडी करतो आणि नकळत आपले जगणे अधिक सुंदर करून जातो.

म्हणून गोकुळाष्टमी म्हणजे फक्त उपवास, पूजा आणि मध्यरात्रीचा जन्मसोहळा नाही.

ती आहे मनातल्या निरागसतेला पुन्हा एकदा जागवण्याची रात्र.

देवघरातला पाळणा हलताना आपल्या मनातही एखादा छोटासा पाळणा हलावा;

ज्यात विसावलेला असावा,

आपला निरागस कान्हा,

आपले हरवलेले बालपण

आणि जगण्यावरचा अजूनही टिकून असलेला विश्वास.

हात जुळतात आणि ही प्रार्थना करावीशी वाटते,

“कान्हा,

तू देव्हाऱ्यात राहा किंवा न राहा,

पण माझ्या मनातलं बालपण

कधीच हरवू देऊ नकोस. ”

कदाचित हाच गोकुळाष्टमीचा खरा अर्थ असावा.

बाहेरच्या गोकुळात कृष्णाचा जन्म साजरा करताना,

आपल्या आतल्या गोकुळालाही पुन्हा एकदा जागं करणं.

 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेदनेला अंत नाही ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ वेदनेला अंत नाही ☆ श्री संभाजी बबन गायके 

हुतात्मा कमांडो रोहित नारायण पाटील आणि दुसरे हुतात्मा कमांडो अजय कुमार

वेदनेला अंत नाही

वेदनेला अंत नाही… अन कुणाला खंत नाही…

राख मी झाल्यावरी गीते तुला माझी कळावी!

परवाच्या एक तारखेला म्हणजे एक सप्टेंबर, २०२६ रोजी आम्ही दोघे बुडालो…! मी म्हणजे लान्स नायक रोहित नारायण पाटील, जळगाव (महाराष्ट्र) आणि कमांडो अजय कुमार (जम्मू)… पोहता येत असूनही, आमचे प्रचंड कठीण प्रशिक्षण झालेले असूनही धरणाच्या पाण्याच्या भयावह प्रवाहापुढे आमचे प्रयत्न तोकडे पडले. आमचे तीन सहकारी मात्र सुदैवाने किना-याला लागले! परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो!

पुराच्या पाण्यात शोध आणि सुटका कार्य कसे करायचे याचे प्रशिक्षण सुरु होते. जागा होती हरियानातील नहान येथल्या गंगानगर येथील हथीनीकुंड हे प्रचंड मोठे, खोल धरण. आम्ही पाच जणांनी हेलीकॉप्टर मधून दोरीच्या साहाय्याने पाण्यात उद्या घेतल्या. अंगावर सर्व साहित्य होतेच. पाण्यात उतरताच एक यांत्रिक बोट आम्ही चालवणार होतो. त्यानुसार आम्ही पाचही कमांडो सैनिक त्या बोटीत स्वार झालो… पण काहीच वेळात बोट बंद पडली… आणि उलटली… बुडाली… आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुढे वाहून जाऊ लागली. आम्ही पाण्यात उड्या ठोकल्या.. पोहायला लागलो… तिघे जण सहाशे मीटर्स पोहत किना-यास लागले… पण मी आणि अजय मात्र पाण्याच्या धारेत अडकलो… खूप हातपाय मारले… लाईफ जाकेट होतं.. ऑक्सिजन सिलेंडरही होतं… चारच दिवसांपूर्वी हातावर बांधलेल्या राख्यांच्या धाग्यांचे मनगटावरचे रंगही तसेच होते… पण देवाचे बोलावणेच आले त्याला करणार… त्याच्या हाकेला ओ द्यावीच लागते.. नाईलाजाने मरणाच्या हातात हात दिला… पाण्यात!

 हल्ली फार तर दोन अपत्ये असतात लोकांना. त्यातून एकुलतं एक असलेलं गमावलं गेलं की घरच्यांच्या दु:खाला पारावर उरत नाही… पण जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे!

 आम्ही दोघे बेपत्ता असल्याची बातमी तशी लवकरच आली प्रसिद्धी माध्यमांत… त्याच दिवशी… कारण सायंकाळी साधारण सहा वाजता हा प्रकार घडला. पण नंतरच्या दोन दिवसांत म्हणजे तीन सप्टेंबर पर्यंत आमचा शोध सुरु आहे, आम्ही सापडलो, न सापडलो याबाबत follow up घ्यायला मात्र फार कुणाला उसंत मिळाली, असं आढळलं नाही!

आज दुपारी साडेतीन वाजता माझा देह जिथून आम्ही पाण्यात पडलो तिथून सुमारे ८० किलोमीटर्सवर मिळून आला. अजयचा दोनशे किलोमीटर्सवर कुठेतरी मिळाला, असं म्हणतात… पाण्याचा प्रवाहच मोठा! सर्वांनी खूप प्रयत्न केले आम्हांला शोधण्यात. देशात तशी ही बातमी फार गाजली नाही… त्यामुळे देशवासियांनी आमच्या सुटकेसाठी प्रार्थनाही फारशा केल्या नसतील… असे वाटते आता!

तसे आम्ही PARACHUTE REGIMENT चे Commando सैनिक लाखांतून मोजकेच निवडले जातो. म्हणजे प्रशिक्षणासाठी आलेल्यापैकी केवळ चार पाच टक्केच टिकतात कठीण कसोट्यांमध्ये आणि commando बनतात… आम्ही दोघेही या निवडक सैनिकांपैकी होतो. मरणाला घाबरणे हे आम्हांला ठाऊक नसते. त्यामुळे आज पाण्यात पडलो तरी घाबरलो नाही… प्रशिक्षण पणाला लावत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला… पण ईश्वेच्छा बलीयेसी म्हणतात ते खरे. खरं सांगू… मरण तर येतच असतं प्रत्येकाला… लढाईत ते आलं असतं तर आणखीन भारी झालं असतं!

आता आपल्या भारतीय सैन्याचा याबाबतीत खूप कडक protocol आहे. कारण चुकूनही चुकीची माहिती पसरू नये, अशी त्यामागील भूमिका आहे. कारण आज दिवसभर कुणीतरी माझं नाव आर्यन पाटील असं आणि अजय कुमारचं फक्त अजय एवढंच सांगत होतं म्हणे! यामुळे गोंधळ उडू शकतो. त्यामुळे आमची बातमी अधिकृतरीत्या जाहीर व्हायला उशीर लागू शकतो. त्यातून हरियाणा मधून मृतदेह गावी पोहोचायला वेळ लागेलच. त्यात शासकीय protocol असतोच.

त्यामुळे मृतदेहांची उत्तरीय तपासणी (Post Mortem) होते, ओळख पटवली जाते आणि आधी कुटुंबीयांना कळवले जाते आणि मग आमची अधिकृत संस्था बातमी जाहीर करते. हे सर्व बरोबरच आहे म्हणा…

… पण तोवर देश काय करतो? मिडिया काय करतो?

… मान्य आहे, संप, निदर्शने, इतर देशांत आलेल्या आपत्ती, राजकीय घडामोडी यांच्या बातम्यांना मिडीयात अधिक मागणी असते… कारण जनतेची ती खास आवड आहे. परंतू आज तीन तारीख आहे… एक तारखेच्या बातमीनंतर दोन आणि आज अगदी अधिकृत माहिती येईपर्यंत कुणी फार काही चौकशी केली असं दिसलं नाही!

मागे खूप वर्षांपूर्वी एक लहानगा कूपनलिकेत पडला होता आणि तिथेच अडकला होता. त्याचे थेट प्रक्षेपण दाखवत होते तो मुलगा सापडेपर्यंत… एखाद्या प्रिन्स सारखी वागणूक मिळाली त्याला… अर्थात ते चांगलेच झाले म्हणा. आजही बघा ना… कितीतरी बातम्यांमागे वार्ताहर धावत होते… आणि ते थेट दिसत होतं!

स्वत:ला मराठी वाहिन्या समजणा-या वाहिन्यांनी आज दिवसभरात आमच्या बाबतीत अवाक्षर काढल्याचे ऐकिवात नाही. असो. आमच्या बातम्यांना मागणी फारशी नसावी, त्यामुळे जाहिरातींचे उत्पन्नही कमीच असेल!

इकडे आमच्या घरी बहुदा वार्ता गेली आहे… त्यांना आता अधिकृतपणे कळवले जाईलच… पण तो वर आमचा शोध सुरु आहे… कुठवर आले आहे शोधकार्य… याबाबत कुणी वाच्यता करताना दिसत नव्हतं. नाही म्हणायला काही इन्स्टा वाले त्यांना जमेल तसं काही सांगत होते. Reportedly असा एक शब्द वापरतात हे लोक… म्हणजे बातमी आहे… पण अधिकृत नाही असं म्हणतात… अशी त्यांची वाक्यरचना असते… म्हणजे सावधानतेने बातम्या सांगतात.

आता आज रात्रीपर्यंत सर्व औपचारिकता पूर्ण होईल आणि मला आणि अजयला बहुदा उद्या आमच्या घरांचे दर्शन होईल! मग मात्र आमचीच बातमी चालेल बराच वेळ. आमच्या घरच्यांचे रडणारे चेहरे, दृश्ये लोक त्यांच्या त्यांच्या मोबाईल्समध्ये टिपण्याचा आटापिटा करतील, reels तर ढीगभर. अर्थात याला आता काही इलाज नाही. पण कुटुंबियांचे रुदन, शोक, विलाप किती आणि कसा दाखवावा यावर काही निर्बंध नाही घालता येणार का? म्हणजे आम्ही जिवंत असतानाही हा विचार करायचो… कारण आमच्या हुतात्मा सैनिकांच्या देहांसोबत काहीवेळा आम्हीही गेलो आहोत. पण आता मात्र या गोष्टीचा आम्ही खरोखरच तटस्थपणे विचार करू शकण्याच्या स्थितीत आहोत.

… मी म्हणत नाही.. आमच्या मृत्यूचा राष्ट्रीय event व्हावा… पण या निमित्ताने देश आमची काळजी करतो आहे हे तरी आम्हांला समजले असते की. असो. तक्रार नाही… आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला झालं!

… प्रत्यक्ष युद्धात आणि तेही मोठ्या युद्धात सैनिक दगावला तरच त्याला हुतात्मा समजतात आपल्याकडे. पण देशरक्षणाचे प्रशिक्षण सुरु असताना मरण येणे हे सुद्धा हौतात्म्यच नव्हे काय?

असो. खुश रहना… अहले वतन… अब हम तो सफर करते हैं! काळजी घ्या. देशाला पुढील काळात तर सैनिकांची खूपच गरज पडणार आहे. वैद्य निदान गरज सरण्या आधी तरी जगायला पाहिजेत! सैनिकांविषयीची एवढी अनास्था महागात पडू शकते. पण काळजी करू नका… याचेही प्रशिक्षण असते सैनिकांना… कशाचाही विचार न करता कर्तव्य करीत राहण्यातच आम्ही जीवनाचे सार्थक मानतो.

… जय हिंद.. जय हिंद की सेना! काळजी घ्या…!

“ राख मी झाल्यावरी गीते आमची तुम्हांस कळावी…” – – हा दैवयोग आहे!

तुमचेच,

कमांडो लान्स नाईक रोहित नारायण पाटील आणि कमांडो अजय कुमार… भारतीय सेना.!

जय हिंद!

(मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा केलेला तात्पुरता परकाया प्रवेश… काल्पनिक संवाद आहे हा… कोणाचेही मन दुखावण्याचा, व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्याचा हेतू नाही… पण ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमे वागतात, त्यामुळे जनता नाईलाजाने अनभिज्ञ राहते… ते योग्य वाटत नाही… म्हणून हे लिहिण्याचे धाडस. कवितेच्या ओळी – श्री. सुरेश भट)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “९ ऑगस्ट : ‘ विश्व दिवस” ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “९ ऑगस्ट : ‘ विश्व दिवस” ☆ शोभा जोशी

एखादी गोष्ट आपल्याला वरकरणी खूप छान वाटते. मात्र त्यामागचं सत्य फार भयानक असतं. अगदी हीच गोष्ट या मूलनिवासी (आदिवासी) दिनाच्या बाबतीत आहे. खरं तर ९ ऑगस्ट हा जनजातींसाठी /मूलनिवासींसाठी उत्सवाचा दिवस नसून तो रक्तरंजित इतिहासाचा दिवस आहे, हे त्यामागचं सत्य कळल्यावर पटतं.

९ ऑगस्टचा इतिहास… १४४२ साली भारतातील व्यापारासाठी, भारताचा मार्ग शोधण्यासाठी निघालेला कोलंबस चुकून अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर जाऊन पोहोचला. त्यावेळी अमेरिकेत ५ मूलनिवासींचे आदिवासींचे आधिपत्य होते. चॅराॅकी, चिकासो, चोक्ताव, मास्कोगी व सेमिनाॅल या त्या प्रमुख जमाती.

कोलंबसला वाटले, हाच भारत देश आणि हे भारतीय लोक. म्हणून ते रेड इंडियन. विस्तृत क्षेत्रात सुखासमाधानाने नांदणार्‍या या जमातींच्या सुखाला कोलंबसच्या येण्याने ग्रहण लागले.

व्यापारासाठी निरनिराळी क्षेत्रे शोधणे ही तर गोर्‍यांची खासियत. या व्यापारवृध्दीच्या मोहापायी ब्रिटिशांनी अमेरिकेत शिरकाव केला आणि तेथील जमातींच्या जमिनी हडप केल्या आणि तिथल्या मूलनिवासींना बेघर केले. गोर्‍यांनी आपल्या वसाहाती वाढवल्या. हळू हळू चर्चच्या प्रभावाखाली येऊन अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांनी अमानुषपणे तेथील मूलनिवासिंना त्याच्या जन्मभूमीतून नष्ट केले.

९ ऑगस्ट १६१० या दिवशी अमेरिकेतील पवनहाट युध्द सुरू झाले, गोरे युरोपियन आणि मूलनिवासी यांच्यातील हे युध्द. अर्थातच संख्येने कमी असलेल्या मूलनिवासींचा पराभव झाला. १६१०ते १७७५ या काळात इंग्रजांनी अमेरिकेच्या मूलनिवासींना अनन्वीत अत्याचाराने, अतिशय अमानुष पध्दतीने त्यांना ठार केले. त्यांच्याविरूध्द विश्वातील पहिले रासायनिक युध्द केले गेले. त्यात ८०% मूलनिवासिंना तडफडून मारले गेले.

कोलंबसच्या अमेरिकेतील पदार्पणाला ९ ऑगस्ट १९९२ ला ५०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने 

‘कोलंबस डे… थॅंक्स गिव्हिंग डे ‘ साजरा करण्याची जोरात तयारी सुरू होती. पण तिथे शिल्लक असलेल्या मूलनिवासींनी त्याविरूध्द जोरदार आवाज उठवला. कारण त्यांच्यासाठी तो विनाशकारी दिवस होता. कोलंबसच्या पदार्पणामुळे त्यांच्या सगळ्या जमाती नष्ट झाल्या होत्या. संस्कृती नष्ट झाली होती. ८०% मूलनिवासींचे हत्त्याकांड झाले होते. मूलनिवासींच्या या रोषाला शांत करण्यासाठी अमेरिकेने ‘ इंडिजिनियस पिपल्स डे ‘ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ९ ऑगस्ट हा दिवस ‘ मूलनिवासी /आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. पण संख्येने कमी असले तरी अजूनही हे मूलनिवासी त्याला विरोध करतात. कारण त्यांच्यासाठी हा रक्तरंजित नरसंहार दिवस आहे.

काही शतकानंतर मूलनिवासींनी पुन्हा अन्यायाला वाचा फोडली. त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी, २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाने साळसूदपणे जाहिरनामा काढला. भारताने त्यावर सही केली पण मूलनिवासी ही संकल्पनाच मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. कारण भारतातील सर्व जाती-धर्मांचे, पंथाचे लोक मूलनिवासीच आहेत. आदिवासी नाहीत. (आदिवासी म्हणजे इथले मूळचे राहाणारे व बाकीचे बाहेरून आलेले असा अर्थ होतो. भारतातील सर्व लोक मूळचे इथलेच आहेत. बाहेरून आलेले कोणीच नाहीत. म्हणून ते सर्व मूलनिवासीच आहेत. त्यातील कोणी आदिवासी नाही.) भारतीय राज्यघटनेनुसार जंगलात/वनात वास्तव्य करणार्‍यांना अनुसूचित जमाती (जनजाती) संबोधले जाते.

भारतातील परिस्थिती- भारतात सुध्दा विविधप्रकारांनी या जमातींवर / जनजातींवर ब्रिटिशांनी अन्याय अत्याचार केले आहेत.

स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. भारतामध्ये सर्व जनजातींना सन्मानाने वागविले जाते.

भारतातील सर्व मूलनिवासीच आहेत, तरीसुध्दा भारतातील काही देशविघातक शक्ती व गोरे लोक जनजाती व इतर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी, ‘तुम्ही आदिवासी आहात ‘ हे त्यांना ठासून सांगण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना ९ ऑगस्ट हा दिवस ‘ आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करायला लावतात. तरूणांना भडकावतात. तरूणांना वाटते, हा दिवस आपल्या पूर्वजांचा गौरव करण्याचा दिवस आहे. या भावनेने ते तो साजरा करतात. या तरूणांना किंवा हा दिवस साजरा करणार्‍या इतर लोकांना या षडयंत्राची कल्पना नाही. पण आता सत्य कळल्यानंतर सर्व जनजातींनी जागृत होणं आवश्यक आहे.

©  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीवनाची खरी साधनं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीवनाची खरी साधनं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

स्वयंपाकघरातील नळ पुन्हा गळू लागला. वैतागून मी प्लंबरला बोलावलं.

काही वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले. शांत, स्थिर… हातात एक जुनाट टूलकिट.

काम सुरू करताना त्यांनी एक पाना काढला. त्याचा दांडा चक्क तुटलेला होता!

“या साधनाने हे काय दुरुस्त करणार?” असा विचार माझ्या मनात आला.

पुढे गंजलेला पाइप कापण्यासाठी त्यांनी पिशवीतून एक छोटी करवत काढली—तिचाही अर्धा भाग गायब होता!

आता मला खात्रीच झाली—आपण चुकीच्या माणसाला बोलावलं आहे!

पण अवघ्या दहा मिनिटांत नळाची गळती बंद झाली. नळ स्वच्छ चमकत होता आणि एक थेंबही पाणी गळत नव्हतं.

मी त्यांना ₹२०० दिले. त्यांनी त्यातील निम्मे पैसे परत केले.

मी आश्चर्याने विचारलं,

“आजकाल कोण जास्त पैसे मिळाले तर परत करतो?”

ते हसले आणि म्हणाले,

“मॅडम, प्रत्येक कामाची एक योग्य किंमत असते. आज जास्त पैसे घेतले, तर उद्याही तितकेच जास्त मिळावेत अशी अपेक्षा निर्माण होते. ते मिळाले नाहीत की मन अस्वस्थ होतं. मला जे योग्य आहे तेवढंच घ्यायला आवडतं. त्यामुळे मन समाधानी राहतं.”

मी म्हणाले,

“निदान नवीन पाना आणि करवत तरी घ्या. तुमचं काम सोपं होईल.”

ते हसून म्हणाले,

“मॅडम, साधनं झिजण्यासाठीच असतात. ती जुनी, तुटकी किंवा गंजलेली झाली म्हणून त्यांची किंमत संपत नाही. ती आपलं काम करतच राहतात. माणसांचंही तसंच आहे. वय वाढलं, आयुष्यात काही खुणा उमटल्या म्हणून माणूस निरुपयोगी होत नाही.”

क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले,

“तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता, तेव्हा पेन महाग आहे की साधं, याने काय फरक पडतो? लिहिण्याचं कौशल्य असेल तर कोणत्याही पेनने सुंदर लिहिता येतं. कौशल्य हातात असतं, साधनात नाही.”

मी निःशब्द उभी राहिले.

त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान विलक्षण होतं—असं समाधान जे पैशाने विकत घेता येत नाही.

एक विचार मनात ठेवण्यासारखा…

संपत्ती, सुखसोयी आणि अधिकाधिक मिळवण्याच्या धावपळीत आपण जीवनाची खरी साधनं विसरतो—

प्रामाणिकपणा, कष्ट, कृतज्ञता आणि समाधान.

ही चारही शाबूत असतील, तर साधनं जुनी असली तरी आयुष्याची अनेक कामं सुंदरपणे पार पडतात.

पण हीच साधनं हरवली, तर जगातील कितीही संपत्ती असली तरी मनातल्या गळतीची दुरुस्ती होत नाही.

* * * *

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खंबीर लढायाला ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खंबीर लढायाला ? श्री आशिष  बिवलकर ☆

साजूक तुपात | घोळले मराठी |

बापटांच्या ओठी | भाषा तैसी ||१||

*

ध्वनी प्रदूषण | समस्या गंभीर |

बापट खंबीर | लढायाला ||२||

*

सवंग प्रसिद्धी | नसे त्यास लोभ |

डीजेप्रती क्षोभ | प्रकर्षाने ||३||

*

सण उत्सवात | आली मक्तेदारी |

हैराण बिचारी | जनताच ||४||

*

संस्कृतीच्या आड | वाढे झुंडशाही |

समर्थन नाही | विवेकाने ||५||

*

एकला चलो रे | धमक्याचं जमा |

नसे त्यास तमा | विरोधाची ||६||

*

सामान्य माणूस | उठवी आवाज |

उतरतो माज | बलाढ्यांचा ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # १६४ ☆ लघुकथा – गणेश चौथ ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा गणेश चौथ। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # १६४ ☆

☆ लघुकथा – गणेश चौथ ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

‘आज गणेश चौथ है आप भी व्रत होंगी?’ सासूजी खुद तो व्रत रखती ही थीं आस-पड़ोसवालों से भी पूछती रहतीं –‘ नहीं’ या ‘हाँ’ के उत्तर में सामने से एक प्रश्न दग जाता – ‘और आपकी बहू?’ ‘उसके लड़का नहीं है ना? हमारे यहाँ लड़के की माँ ही गणेशचौथ का व्रत रखती है। ‘

ना चाहते हुए भी मेरे कानों में आवाज पड़ ही जाती थी। तभी मैंने सुना आस्था दादी से उलझ रही है – ‘दादी। लड़के के लिए व्रत रखती हैं आप! लड़की के लिए कौन-सा व्रत होता है?’

‘ऐं — लड़कियों के लिए कोई व्रत रखता है क्या?’- दादी बोलीं

‘पर क्यों नहीं रखता’ – रुआँसी होती आस्था ने पूछा।

‘अरे, हमें का पता। जाकर अपनी मम्मी से पूछो, बहुत पढ़ी-लिखी हैं वही बताएंगी। ’

आस्था रोनी सूरत बनाकर मेरे सामने खड़ी थी। आस्था के गाल पर स्नेह भरी हल्की चपत मैं लगाकर बोली – ‘ये पूजा- पाठ संतान के लिए होती है। ’

‘संतान मतलब?’

‘हमारे बच्चे और क्या। ‘

आस्था के चेहरे पर भाव आँख – मिचौली खेल रहे थे। सासूजी पूजा करने बैठीं, तिल के लड्डूओं का भोग बना था। उन्होंने अपने बेटे रजत को टीका करने के लिए आरती का थाल उठाया ही था कि रजत ने अपनी बेटियों को आगे कर दिया – ‘पहले इन्हें माँ’। तिल की सौंधी महक घर भर में पसर गयी थी।

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कथा कहानी ☆ करफिआँल (फूलगोभी) जैसा रोजा (गुलाब) ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆

डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक  के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो  हिंदी  तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं।  आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती  भाषाओं में अनुवाद हो  चुकाहै। आप कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।)

☆ कथा कहानी ☆ करफिआँल (फूलगोभी) जैसा रोजा (गुलाब) ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी 

ऽखिड़की के काँच से इस तरह सटी हैं कि दोनों आँखें फैल गयीं हैं। बाँसुरी सी नाक हो गयी है चप्टी। बाहर बर्फ गिर रही है। देखते देखते सामने के आड़ू के पेड़ सान्ताक्लाज की तरह सफेद हो गये। पापा बता रहे थे – दिसंबर जनवरी में तो बुल्गारिया में -30.सेल्सिअस तक तापमान चला जाता है। बाप रे! इस समय तो फिर भी गनीमत है।

वो – वो रही एक ब्रवचे – यानी गौरैया – आड़ू के पेड़ से उड़ कर नीचे आ गयी। पंख फड़फड़ा रही है। परों के बीच हवा भर कर कैसी गेंद सी हो गयी है। पापा कहते हैं, ‘‘अनु, कोई चीज देखो तो उसका बल्गारियाई शब्द याद करो। तभी न इस भाषा को जल्दी सीख पाओगे। ”तो, पेड़ नहीं दरवाँ। और पत्तियाँ नहीं लीत्स पर बरफ जमी है।

अनुराग मन ही मन मुस्कराने लगा। पापा को उसकी जैसी बुल्गारिआई आती नहीं। मम्मी को तो बिल्कुल नहीं। उनसे अच्छी तो छोटी बहन तूलिका है। यहाँ – राजधानी सोफिआ में आये हुये दिन ही कितने हुए हैं? बस में जाओ, तो अनु। बाजार में जाओ, तो अनु – सभी उसे ही बुलाते हैं।

अचानक एक सोकोल – यानी बाज आकाश में चक्कर लगाने लगा। क्या उसने ब्रवचे को देख लिया? जीव विज्ञान के शिक्षक दिमितिर कहते हैं – यही भोजन श्रृंखला है। एकमात्र इंसान ही सिर्फ शौक के लिए दूसरे प्राणिओं की हत्या करता है। लो, अब नारासित्स – नरगिस – की झाड़िओं में ब्रवचे फुदक रही है। सोकोल उसे ढूँढ़ न सका …..

“अन्नु – तूली -!”लिपिका ने सलवार और स्वेटर के ऊपर अपने ओवरकोट में दस्ताना समेत हाथ डालते हुए बच्चों को बुलाया, ‘‘नाश्ता कर लो। ”

“आज मुझे यहाँ का ब्रेड नहीं खाना है। कैसी मटमैली होती है। मुझे घर के आटे का पराठा बना दो न माँ। ”

उधर स्टडी टेबुल के पास बैठे उस पर लिखते लिखते उल्लास हँसने लगा, ‘‘अरे बेटा अन्ना, इतनी बात जानना – हम लोगों को भारत से केवल 1100 किलो सामान ही लाने की इजाजत थी। उसमें भी बर्तन और कपड़े सभी थे। तो चावल, दाल और आटे होंगे ही कितने? दो साल पूरे बिताने है। ”

“ठीक है मुझे दादीवाली अमावट ही जरा दे दो। बाद में तुम लोगों के साथ नाश्ता करूँगा। ”

“तेरे मामा इसे आम पापड़ कहते हैं। ”उल्लास ने मजाक किया।

“चलो जी। सिर्फ भैया ही क्यों? अमृतसर में सभी अमावट को आम पापड़ ही कहते हैं। स्वर्ण मंदिर के पास इसकी एक सौ साल से भी पुरानी दुकान है। इस बार तो गुरु ग्रंथसाहिब के प्रकाशोत्सव के चार सौवीं वर्षगाँठ मनायी जा रही है। अमृतसर कितना सजा होगा….!”

उल्लास हाल ही में यहाँ सोफिआ विश्वविद्यालय में दो साल के लिए विजिटिंग प्रोफेसर बन कर आया है। साथ ही भारतीय दूतावास में सांस्कृतिक संपर्क अधिकारी का काम भी सँभालता है। दिन भर की व्यस्तता की लहरों पर समुद्री परिंदों की तरह कभी कभी आ धमकती हैं – देश की, घर की यादें…। यहाँ का जीवन बिल्कुल भिन्न। सब अपने अपने में व्यस्त। बेगानी जमीं की बर्फ में खो जाती है अपनी माटी की खुशबू…..

सोफिआ में नये नये आकर सभी कुछ उदास हो गये थे। बीच बीच में अनु के दादा दादी, नाना नानी के फोन आ जाते। उल्लास को तो खास फुर्सत मिलती नहीं, पर लिपिका के लिए एक एक पल सीसा जैसा भारी होने लगा। घर का काम, किताबों के पन्ने पलटना, माँ को, सास को एकाध खत लिखना, बस। आज आई. एस. डी. के जमाने में वो भी कहाँ तक हो पाता है? फिर अनुराग और तूलिका का स्कूल। नया परिवेश, नयी दुनिया।

तूलिका ने खिड़की से मुँह फेर लिया, ‘‘भैया, वो देखो, वह बिल्ली घात लगाये उधर जा रही है। ”

“अरे यह कोत्का क्या ब्रेवचे को झपट लेगी? ”

बड़ी सी बिल्ली। गदबदे ऊन का गोला। रोओं पर बर्फ जमी हुई है। दबे पाँव आगे बढ़ रही है। भाई बहन दौ़ड़े बाहर….

“अरे कहाँ जा रहा है? ”लिपिका कहती रह गयी।

बिल्ली भागी….दोनों पीछे….। मोड़ पर वह ग्रासरी स्टोर्स में घुस गयी।

“अरे रे रे !”दोनों भाई बहन एक बुढ़िया से टकराते टकराते बचे, ‘‘आलो! कदे हौदी? हैलो! कहाँ जा रहे हो? ”

अनुराग ने पहचान लिया – यही तो है दुकान की मालकिन। पिच स्ट्रीट की इस दुकान में पापा और मम्मी के साथ वह आ चुका है, ‘‘साॅरी बोबो !”

“दादी -!”बल्गारिआई में बोबो। इस शब्द ने मानो कई बर्फीले दिनों के बाद एक उजली सुबह की सफेद धूप की तरह इसिनबायेवा को छू लिया। उन्होंने उन्हे अपनी ओर खींच लिया, ‘‘क्या बात है? ”

“वो वो – कोत्का न – उस ब्रेवचे को -”तूलिका तुतलाने लगी। बुल्गारिआई में नहीं कह पा रही थी। अंग्रेजी में कहे? परंतु यहाँ तो अंग्रेजी बिल्कुल पसंद की नहीं जाती। ।

“क्या? ”

“वो पकड़ने जा रही थी। ” टूटी फूटी बल्गारिआई में दोनों ने अपनी बातें सुनायीं। साथ में हिन्दी अंग्रेजी की छौंक…..

“तुम शायद अपने पापा मम्मी के साथ एकबार यहाँ आ चुके हो। कहाँ के हो? तुम्हारा देश? ”

“हम इंडिया से आये हैं। मेरे पिताजी हिन्दी के विजिटिंग प्रोफेसर हैं। ”

“ओ! बच्चों, तुम लोगों ने मुझे बोबो कहा। तो स्कूल की छुट्टी के बाद इस दादी से मिलने आया करोगे न? ”

तूलिका ने भी एक श र्त रक्खी, ‘‘मेरी दादी की तरह आप भी हमें कहानियाँ सुनाया करेंगी न? ”

“कहानी? ” इसिनबायेवा के चेहरे की झुर्रियाँ और भी गहरा गयीं। सब कुछ छूट जाता है, पर यादों का दामन नहीं छूटता। दोनों बच्चे हाथ हिलाते हुए चल दिये। इसिनबायेवा को याद आया – इसी तरह उसका बेटा इल्को जब कभी यहाँ आता है – जाते समय हाथ हिलाते हुए अपने घर चला जाता है। अपना घर ! हाय जेश स ! यह उनका घर नहीं है? वह और उसकी दोस्त मेरिल्ली इस शहर में रहते हुए भी पराये हैं।

तभी तो इन दोनों के जाने के बाद जब उनके पति स्कोल्तानोव ने उनसे पूछा, ‘‘ये कौन हैं? क्या इतनी बातें कर रही थी? ”

तो उन्होंने सब कुछ कह सुनाया, ‘‘ये बच्चे इंडिया से आये हैं। हैं न कितने प्यारे? ”

परंतु पत्नी की बातें सुनते सुनते स्कोल्तानोव का चेहरा बिल्कुल कठोर होने लगा, ‘‘बस बस बहुत हो चुका। फिर से धोखा खाने की गलती न करना। जब सगे ही अपने नहीं हुए, तो पराये से क्या उम्मीद करें? अब क्या दूसरों के लिए भी बैठ कर रोना चाहती हो? ”

इसिनबायेवा को सब मालूम है। संतान से बिछुड़ने पर माँ का हृदय क्या कम रोता है? इल्को सब कुछ छोड़कर मैसिडोनिया जाने की बात करता है। वहाँ कमाई का अवसर है। इसीलिए बुल्गारिआ से काफी लोग इटली, ग्रीस और हंगरी चले जाते हैं। उन्होंने कितनी बार मेरिल्ली से उसकी शादी की बात छेड़ी। उसका घर बसाना चाहा। मगर इन बातों में उसे तनिक भी दिलचस्पी नहीं।

“ति काकसी – आप कैसी हैं? ”

“दुबरे आसम – मैं ठीक हॅूँ। ”

बातचीत की गाड़ी चलती रही। इधर हिन्दी, उधर बुल्गारियाई की पटरिओं पर….

उन दोनों को भी मानो परदेश में एक और दादा दादी मिल गये। स्कूल की छुट्टी के बाद घूमते टहलते दोनों ग्रासरी स्टोर्स पहुँच जाते, ‘‘दोबर बेचर! शुभ संध्या !”

स्कोल्तानोव खास एतराज भी नहीं करता। ग्राहकों को सामान देते हुए, अखबार का पन्ना पलटते हुए, अपनी बुढ़िया के साथ परदेसी पोते पोती की बातों का आनंद उठाता। काश ! ये इल्को के बच्चे होते ! हमारे अपने ! उसके सीने से सिर्फ एक साँस निकलती है – आह !

क्रिसमस की छुट्टियों के पहले ही बर्फबारी शुरु हो गयी। बुल्गेरियाई किसान इसी बर्फबारी के लिए आँखें बिछायें रहते हैं। यही तो खेतों की सिंचाई का मुख्य साधन है। उनका आसरा। बड़े दिन के पर्व पर स्कोल्तानोव की दुकान भी खूब सजी हुई थी। बाहर अंदर – चिरागवाले – सितारे लटक रहे थे। स्टोर के अंदर एक क्रिसमस ट्री सजाकर धरा गया था। उसकी हर एक शाखा पर बच्चों के लिए छोटे छोटे उपहार लटक रहे थे। गुब्बारा, तो टेडीबीअर या चाकोलेट…!

“हैप्पी क्रिसमस, बोबो – द्यौदी !”कहते हुए दोनों बच्चे अंदर दाखिल हुए, ‘‘पापा मम्मी भी आ रहे हैं। ”

उल्लास और लिपिका भी काँच का दरवाजा खोल कर अंदर दाखिल हुए, ‘‘हैलो ज्.द्रास्ति। नमस्कार! क्रिसमस आनंदमय हो !”

“मेरि क्रिसमस!”कहते हुए इसिनबायेवा ने दोनों बच्चों को सीने से लगा लिया। आज के दिन स्कोल्तानोव ने भी हँस कर उनसे हाथ मिलाया।

“अनुराग, तूलिका इधर आओ। क्रिसमस ट्री पर से अपना अपना उपहार छाँट लो। ”इसिनबायेवा की खुशी को मानो पर लग गये थे। उन्होंने अपने हाथ से बनाये चाकोलेट केक उन्हें खिलाये। जाते समय लिपिका के हाथ में एक फूलगोभी जितना बड़ा गुलाब देते हुए बोली, ‘‘आप क्रिसमस के दिन हमारे यहाँ पधारे हैं। हमारी ओर से एक नाचीज भेंट!”

अनु उछलने लगा, ‘‘अम्मां, यह देखो – यह तो करफिआँल जितना बड़ा रोजा है!”

“ब्लागोदारिया!”लिपिका ने शुक्रिया अदा किया, ‘‘म्नोगो खूबवू! बहुत सुंदर!”

जाते जाते तूलिका ने एक समाचार सुनाया, ‘‘बोबो, भैया न – परसों पोलैंड जा रहा है। अकेले। ”

“पोलैंड! वहाँ क्यों? ”

लिपिका मुस्कुरा कर बोली, ‘‘स्कूल टीम के साथ वालीबाल खेलने। मैं तो डर रही हॅूँ। अपने देश में तो हम बच्चों को स्कूल बस में स्कूल भेज कर भी निश्चिन्त नहीं रह सकते। रास्ते में कुछ हो न जाए। और यहाँ तो विदेश का सफर। अकेले। वो भी हवाई जहाज से। ”

उल्लास हँसने लगा, ‘‘इसी तरह तो हमारे बेटे में आत्मविश्वास पैदा होगा। क्यों? आप ही कहिए। ”

इसिनबायेवा मुस्कुराई, ‘‘फिर भी माँ का दिल है। खैर, अनुराग, तुम्हारा स्कूल जीत कर आये – यही मेरी प्रार्थना है ! मदर मरियम तुम्हारा साथ दें, मेरे लाल !”

एक दिन बाद….

माँ से लिपट कर ‘‘जीत आऊँगा न माँ? ” कहकर हँसते हॅँसते अनुराग एरोड्रोम जाने के लिए स्कूल बस में बैठ गया, पर लिपिका उदास हो गई। तूलिका पेवमेंट पर खड़ी हाथ हिलाती रही – जब तक बस आँखों से ओझल हो नहीं गयी….

उल्लास लिपिका को समझा रहा था, ‘‘याद है? एकबार छात्रों का कौन सा विरोध प्रदर्शन शुरू हो गया – वे बसों पर पत्थर और ढेले फेंकने लगे। अनु बस से उतर कर पैदल घर चला आ रहा था, और मैं स्कूटर लेकर मारा मारा फिर रहा था कि बच्चा गया कहाँ? कहीं उसे कुछ हो न जाए ! आज वही सरहद पार जा रहा है – अकेले! कस्टमस से गुजरना, एरोप्लेन में बैठना, सारी औपचारिकतायें पूरी करना, पोलैंड में किसी अन्जाने परिवार के साथ रहना – सब कुछ अकेले ! भारत में भी तो बच्चे मेट्रो या लोकल से रोज स्कूल जाते हैं। अकेले। तो? ”

लेकिन माँ का हृदय थोड़े ही मानता है। उसे बार बार अनु के स्कूल जाने का पहला दिन याद आ रहा था। ‘‘माँ, स्कूल में मैं अकेले जाऊँगा? तुम साथ नहीं चलोगी? तो मैं भी नहीं जाता। जाओ -!”

दो दिन बाद कहीं जाकर उसके होठों पर हॅँसी आयी – जब पोलैंड से श्रीमती बोरलीना का फोन आया। अनु को इन्हीं के घर ठहराया गया था। मिलनसार अनु से मिल कर वे इतनी खुश थीं कि फोन पर कहने लगीं, ‘‘आप दुनिया की सबसे खुश नसीब माँ हैं !”

शाम को सूरज यहाँ जल्दी अस्त नहीं होता। रात के नौ के बाद ही वह अल्विदा कहता है। कभी कभी तो आधी रात तक उजाले में तारे तैरते रहते हैं। भैया घर में नहीं है। तूलिका उदास बैठी थी। फिर निकल पड़ी। जरा बोबो से बतिया कर आयें। बदन पर केवल एक ही स्वेटर था। लिपिका ने भी ध्यान नहीं दिया। रास्ते में रिमझिम बारिश के साथ सर्द हवा की साँय साँय….

इसिनबायेवा तो उसे देखते ही दौड़ कर आयीं, ‘‘यह क्या? न रेनकोट, न कुछ ! कपड़े भी गीले हो गये हैं। अरे पगली, तुझे ठंड लग जायेगी। ”जल्दी से उसके कपड़े बदल कर अलाव की बगल में कुर्सी पर बैठा दिया। एक कप गरम दूध में चाकोलेट मिलाकर पिलाने लगी….

कुछ आराम जरूर हुआ, पर स्कोल्तानोव उन्हे सुनाकर भुनभुनाने लगे, ‘‘नन्ही सी जान। कुछ हो जाये तो? जबर्दस्ती ओखली में सर देना !”

बर्फबारी धीमी हुई तो तूलिका को गरम जैकेट में लिपट कर स्कोल्तानोव उनके अपार्टमेन्ट में पहुँचा आया। बेवजह परेशानी झेलना उसे पसन्द नहीं। उसने कुछ बेरूखी से लिपिका को सुना भी दिया, ‘‘बेटी जब घर से निकल रही थी, तो आपको देखना चाहिए था कि उसने पर्याप्त गरम कपड़े पहन रक्खे है कि नहीं। ”

लेकिन भोर होते होते बात बिगड़ने लगी। तूलिका को बुखार आ गया। साथ में तेज खाँसी और सीने में दर्द। उल्लास को समझ में नहीं आ रहा था कि क्या करे? जयपुरवाले पारिवारिक डाक्टर की याद आ गयी। उसने दूतावास के एक दूसरे सहयोगी को फोन किया। दोस्त ने कहा, ‘‘तुरंत अस्पताल ले जाओ। यहाँ निमोनिआ का खतरा हमेशा बना रहता है। ”

उल्लास परेशान हो उठा। बर्फ पर से कार चला कर वह सहयोगी भी यहाँ तक आ नहीं सकता। वह बुलाये तो किसे? किसकी मदद ले? एम्बुलेन्स मिल जायेगा? इसी उधेड़बुन में घबड़ाकर वह दौड़ा…

स्कोल्तानोव दंपति के घर के बेल बजाते ही उसने देखा सामनेवाली खिड़किओं के शीशे रोशन हो गये। वे जाग गये हैं। दरवाजा खुलते ही उसने सब कुछ कह सुनाया। स्कोल्तानोव पल भर सोचता रहा, ‘‘चलिए, मैं खुद उसे अस्पताल ले चलता हूँ। ”

उल्लास ‘ब्लागोदारिया’ भी न कह सका।

इसिनबायेवा बेडरुम में थीं। पूछने लगीं, ‘‘क्या बात है? इतनी रात गये कौन आया है? ”

“अरे तुम्हारी उस इंडियन बच्ची की तबिअत बहुत खराब है। भींग जो गई थी। अस्पताल ले जाना पड़ेगा। ”

जब तक बूढ़े ने अपना वैन निकाला, बुढ़िया भी तैयार हो गईं। अच्छा ही हुआ। क्योंकि लिपिका के आँसू तो थमने का नाम ही नहीं ले रहे थे। तूलिका की छाती धौंकनी की तरह ऊपर नीचे हो रही थी। सफेद बर्फ को चरमराता हुआ वैन आगे निकला। रास्ते के लैंपपोस्ट, पेड़ों की पत्तियाँ, बिल्डिंगों की चहरदीवारी, और दुकानों के ग्लोबोर्ड – सभी जगह सांताक्लाज की सफेद दाढ़ी जैसी बर्फ जमी हुई थी।

जब तूलिका के मुँह पर आक्सीजन का मास्क लगा कर, इंजेक्शन दिलवा कर, वार्ड से बाहर जाते जाते डाक्टर ने कहा, ‘‘बस, अब हमें इंतजार करना है!”तो, उस समय अस्पताल की खिड़किओं पर से अंधकार के पर्दे कुछ उठने लगे थे। …

बूढ़ा स्कोल्तानोव अपनी दुकान देखता। इन्हें पहुँचाने जाता। मगर किसी से खास कोई बातचीत नहीं करता। इसिनबायेवा तूलिका की सगी दादी की तरह उसकी देखभाल करती रहीं। दोपहर में वह रहतीं, तो लिपिका घर जाकर कुछ आराम कर लेती। फिर शाम तक लिपिका आ जाती। पहली रात तो उसने जाग कर ही बितायी थी।

इस बीच अनुराग भी वापस आ गया। वापस आने पर जैसे किसी को कोई हर्ष ही न हुआ। मैच का क्या हुआ किसी ने न पूछा। व्याकुल उल्लास को भी कुछ ध्यान न रहा। पर स्कोल्तानोव को जब मालूम हुआ कि उसका स्कूल कप जीत कर लौटा है, तो वह हँस कर उसकी पीठ थपथपाने लगा, ‘‘जीओ मेरे नन्हे भालू! मैं भी अपने क्लब का सेंटर फारवर्ड था। फुटबॉल लेकर दौड़ता तो किसी की हिम्मत नहीं होती कि मेरे पैरों से उसे छीन ले -!”

और दो दिन बाद तूलिका घर आ गयी। लेकिन हर समय उसके पास किसी का रहना जरूरी था। इसिनबायेवा ने खुद ही कहा, ‘‘क्यों घबड़ाती हो, बेटी? हम हैं न। ”

इस बार स्कोल्तानोव की भौंहें तनी नहीं। वह अपनी दुकान देखता, फिर यहाँ आकर भोजन करता। पहली रात इसिनबायेवा इनके फ्लैट में ही रह गयीं। दूसरे दिन से वो भी थोड़ी देर के लिए दुकान हो आतीं।

भारत से उल्लास के पिताजी ने जब फोन पर पूछा, ‘‘तूली अब कैसी है? ” अनु खिलखिला कर हँसने लगा, ‘‘अब तो हमारे साथ दादा दादी हैं। ”

“दादा दादी? ”उसके दादाजी चकित रह गये।

“हाँ, सोफियावाले दादा दादी !”

इन दो तीन दिनों में स्कोल्तानोव भी मानो भूल गया था – ये दोनों बच्चे उनके सगे नहीं हैं। साथ साथ खाना। तूलिका को समय से दवा देना। सुबह जब इनके फ्लैट में पहुँचते तो लिपिका या उल्लास हॅँस कर स्वागत करता, ‘‘दोब्रो उतरो! गुड मार्निंग!”फिर वे जब दुकान के लिए निकलते, अनुराग दरवाजे तक छोड़ने आता। हाथ हिलाता, ‘‘गुड बाई, द्यौदी! जल्दी लौटियेगा। ”

फिर एकसाथ रात का भोजन। एक रात इसिनबायेवा ने अपने गाँववाली मसालेदार पनीर की रोटी बनायी। सबको खूब पसंद आयी। फिर रात में सोते सोते कहानी सुनना। दो दिन में उस बूढ़े और बुढ़िआ ने भी मानो दो युग जी लिये….

मगर वे और कितने दिन ठहरते? दुकान के कामों में भी परेशानी हो रही थी। जिस दिन शाम को वे जाने लगे, इसिनबायेवा ने अनु और तूलिका के गालों को दबाते हुए कहा, ‘‘तो अब हमारे स्टोर्स में भेंट होगी। “

दोनों उदास थे। तूलिका बोली, ‘‘बोबो, यहीं रह जाओ न। ”

उल्लास और लिपिका भी वहीं खड़े थे। इस बूढ़े दंपति के प्रति वे सिर्फ कृतज्ञ ही नहीं थे, बल्कि मन में एक लगाव भी हो गया था।

तभी अनु अचानक इनसे मुँह फेड़कर खिड़की के पास जा खड़ा हो गया।

“क्या बात है? अनु, इधर आ। ”लिपिका बोली, ‘‘अपने द्यौदी और बोबो को गुडबाई नहीं कहेगा? ”

इधर देखे बिना अनुराग ने झल्लाकर कहा, ‘‘इससे तो अच्छा था जब तूली बीमार थी। ”

“यह तू क्या बक रहा है? ”लिपिका की भौंहे तन गईं।

“तब तो बोबो और द्यौदी हमें छोड़ कर जा नहीं पाते। ”

उसने हिन्दी में ही यह बात कही थी। स्कोल्तानोव और इसिनबायेवा इतना तो समझ ही रहे थे कि वहाँ तूफान उठ खड़ा हुआ है। -‘‘वह क्या कह रहा है? ”

उल्लास ने उनको बल्गारियाई में सबकुछ समझाया।

स्तब्ध खड़े रह गये वे बूढ़े दम्पति। इसिनबायेवा की आँखों में दुनाव (दान्युब) नदी लहराने लगी।

स्कोल्तानोव को लगा – ये गैर नहीं। उनके इल्को के ही बच्चे हैं। उन्होंने आगे बढ़ कर उन दोनों को सीने से लगा लिया, ‘‘तेरे ये द्यौदी और बोबो तेरे ही रहेंगे, बेटे। वहाँ जाकर भी हम तुमसे जुदा हो सकते हैं क्या?”

——

आभारः डा0 श्रीप्रसाद तथा डा0 आनन्द वर्धन – ब्रजभूमि

♦♦♦♦

© डॉ. अमिताभ शंकर राय चौधरी

पताः फ्लैट नं. 301, चौथी मंजिल, टावर नं 1, मंगलम आनन्दा ग्रैंड रामपुरा रोड, सांगानेर, जयपुर, 302029

मो. 9455168359, 9140214489. ईमेल: asrc.vns@gmail.com

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लिखा-पढ़ी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – लिखा-पढ़ी ? ?

मेरा लिखना,

तुम्हारा पढ़ना,

बहुत हुआ

यूँ जी का बहलना,

चलो लिखा-पढ़ी छोड़ें,

साथ बैठें, जी भर बतियाएँ,

बाकी बची का उत्सव मनाएँ,

शेष को अशेष बनाएँ..!

?

© संजय भारद्वाज   

प्रातः 10:29 बजे, 29 अगस्त 2025

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  शुक्रवार दि. 4 सितंबर (जन्माष्टमी) से गुरुवार 10 सितंबर  तक गोविंद साधना संपन्न होगी। 🕉️

💥 ‘गोविंद साधना’ का जाप मंत्र होगा-  ॐ कृष्णाय नमः.।। इसके साथ ही मधुराष्टकम् का पाठ करेंगे।💥

💥आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे। 💥

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Satire ☆ Witful Warmth # 111 – The Silent Wi-Fi Master… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, widely known in the world of satire by his pen name ‘Uratipt’, expresses his emotions and thoughts with profound honesty and depth. His multifaceted talent is evident in his contributions across various literary genres. He is not only a renowned satirist but also a poet and a children’s author.

His satirical writings have earned him a special place in the literary world. His satire, ‘Shikshak Ki Mout’, went massively viral on the Sahitya Aajtak channel, garnering over a million views and reads—a monumental achievement in the history of Hindi satire. His collection of satires, ‘Ek Tinka Ikyavan Aankhen’ (A Straw and Fifty-One Eyes), is also highly acclaimed and includes his timeless work, ‘Kitabon Ki Antim Yatra’ (The Last Journey of Books). Other celebrated collections include ‘Mayaan Ek, Talwar Anek’ (One Sheath, Many Swords), ‘Gapodi Adda’ (The Gossiper’s Den), and ‘Sab Rang Mein Mere Rang’ (My Colors in Every Hue). His satirical novel, ‘Idhar-Udhar Ke Beech Mein’ (In Between Here and There), is a unique and groundbreaking work focused on the third world.

His significant contributions to literature have been widely recognized. He was honored with the Best Young Creator Award, 2021 by the Telangana Hindi Academy and the Government of Telangana, an award presented by Chief Minister K. Chandrasekhar Rao. The Rajasthan Children’s Literature Academy also honored him for his children’s book, ‘Nanhon Ka Srijan Aasmaan’ (The Creative Sky of Little Ones). Additionally, he has received the Vyanga Yatra Ravindranath Tyagi Sopaan Samman and the Sahitya Srijan Samman from Prime Minister Narendra Modi.

Dr. Uratript has also played a pivotal role in writing, editing, and coordinating a total of 55 books for the Government of Telangana for primary school, college, and university levels. His work is included in university textbooks in Bihar, Chhattisgarh, and Telangana, where his satirical creations are part of the curriculum. This recognition underscores that young readers can identify and appreciate quality and impactful writing.

Key Accolades and Works

  • Viral Satire: ‘Teacher’s Death’ (over 1 million views)
  • Satire Collections: ‘Ek Tinka Ikyavan Aankhen’, ‘Mayaan Ek, Talwar Anek’, ‘Gapodi Adda’
  • Unique Satirical Novel: ‘Idhar-Udar Ke Beech Mein’
  • Awards: Shreshtha Navyuva Samman (Telangana), Sahitya Srijan Samman (PM Modi), and more.
  • Educational Contribution: Authored and edited 55 books for the Telangana government.

Some precious moments of life

  1. Honoured with ‘Shrestha Navayuvva Rachnakar Samman’ by former Chief Minister of Telangana Government, Shri K. Chandrasekhar Rao.
  2. Honoured with Oscar, Grammy, Jnanpith, Sahitya Akademi, Dadasaheb Phalke, Padma Bhushan and many other awards by the most revered Gulzar sahab (Sampurn Singh Kalra), the lighthouse of the world of literature and cinema, during the Sahitya Suman Samman held in Mumbai.
  3. Meeting the famous litterateur Shri Vinod Kumar Shukla Ji, honoured with Jnanpith Award.
  4. Got the privilege of meeting Mr. Perfectionist of Bollywood, actor Aamir Khan.
  5. Meeting the powerful actor Vicky Kaushal on the occasion of being honoured by Vishva Katha Rangmanch.

Today we present his satire The Silent Wi-Fi Master 

☆ Witful Warmth# 111 ☆

☆ Satire ☆ The Silent Wi-Fi Master… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

In the quiet suburb of Green Meadows, Mr. Kapoor was considered a neighborhood legend, not for his past career as an accountant, but for possessing the most powerful, unhackable Wi-Fi connection in the entire locality. His router signal was so strong that people three houses away could stream movies without a single second of buffering.

The catch? Mr. Kapoor refused to share the password with anyone. He guarded it like a state secret, believing that providing free internet to neighbors would corrupt their moral discipline and make them lazy.

This created a covert operation among the local teenagers, led by young Aryan. For months, Aryan tried every trick in the book: guessing basic combinations like ‘Kapoor123’, dropping fake delivery boxes with phishing notes, and even offering to clean Mr. Kapoor’s garden for free while trying to peek at the back of the router. Nothing worked. The network remained locked behind an impenetrable fortress of military-grade encryption.

Then came the night of the big final match of the World Cup. Just ten minutes before kickoff, a massive storm hit the neighborhood, knocking out the local cable TV network. Chaos erupted. Desperate neighbors gathered near Mr. Kapoor’s front gate, peering through the window. Mr. Kapoor’s house was lit up, and his smart TV was seamlessly streaming the pre-match analysis in glorious high definition.

Aryan decided to execute his final, desperate gambit. He walked up to the front door, knocked politely, and handed Mr. Kapoor a freshly baked hot box of homemade garlic bread made by his mother.

“Mr. Kapoor,” Aryan said with pure, innocent reverence. “We know you won’t give us the password, and we respect your principles. But could you at least do us the honor of letting my elderly grandfather sit on your porch? He has watched every World Cup final since 1975, and his heart will break if he misses this one.”

Mr. Kapoor’s stern face softened. He looked at the frail old man waiting by the gate, sighed deeply, and opened the door wide. “Bring him in. In fact, all of you can stand near the doorway. But no phones! Watch the TV!”

The entire neighborhood crowd squeezed into the living room, cheering quietly as the match unfolded. It was a nail-biting finish. In the final minute, as the winning goal was scored, the entire room erupted into wild cheers. People hugged each other, laughing and celebrating.

During the excitement, Aryan’s grandfather leaned closer to Mr. Kapoor, tapped him on the shoulder, and whispered with a warm smile, “Thank you, Kapoor. By the way, your password ‘GarlicBread1975’ is very creative.”

Mr. Kapoor froze. He looked at Aryan, who was quietly holding his phone under his jacket, displaying a full-bar Wi-Fi icon.

Aryan smiled sheepishly and said, “Sir, you only softened when I mentioned garlic bread and the year 1975. It was a logical deduction.”

Mr. Kapoor looked at the boy, then at the happy crowd still celebrating in his living room. He cracked a rare, genuine smile, raised his tea cup, and said, “Well played, Aryan. But tomorrow, it changes to ‘ColdSamosa2026’.”

The entire room burst into loud cheers and applause, honoring the neighbourhood’s ultimate tech showdown.

****

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : drskm786@gmail.com

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २९९ ☆ जन्माष्टमी विशेष – वृंदावन हरियाली में मुस्कुराते मनमोहन ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना वृंदावन हरियाली में मुस्कुराते मनमोहन। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # २९९ ☆

जन्माष्टमी विशेष – वृंदावन हरियाली में मुस्कुराते मनमोहन ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

ग्वाल-बाल के संग नंदलाला,

मुरली मनोहर आ जाओ।

प्यासे-प्यासे इन नयनों को,

मनमोहन अब मत तरसाओ।।

*

भक्त तिहारी राह तके हैं,

यशोदा प्यारे आ जाओ।

माखन-मिश्री के मतवाले,

माधव न्यारे आ जाओ।।

*

कुंज-गलिन में राधा रानी

के मतवाले आ जाओ।

प्यासे-प्यासे इन नयनों को,

मनमोहन अब मत तरसाओ।।

जब भाद्रपद की अँधेरी रात आस्था के दीपों से जगमगाने लगती है, तब मन के आकाश पर एक अनुपम छवि आकार लेती है—मोरपंख मुकुट धारण किए नटखट नंदलाल, अधरों पर सजी बाँसुरी और चारों ओर पसरा हुआ हरा-भरा वृंदावन। यह वही वृंदावन है, जहाँ प्रकृति केवल कृष्ण की लीलाओं की साक्षी नहीं थी, बल्कि स्वयं उनकी लीला का अभिन्न अंग थी।

कदंब की डालियाँ उनके झूलों की सखी थीं, यमुना उनकी चिर-सहचरी और गौवंश उनके वात्सल्य का विस्तार। वन-पथों पर बिखरी दूब, कुंजों की छाया, फूलों की सुगंध और पक्षियों का कलरव—इन सबके बीच कृष्ण का बालपन जैसे प्रकृति के हृदय पर लिखी कोई मधुर कविता था।

श्रीकृष्ण का जीवन हमें उस आत्मीय संबंध की स्मृति कराता है, जिसमें मनुष्य और प्रकृति एक-दूसरे से अलग नहीं, बल्कि एक-दूसरे के पूरक होते हैं। उनकी बाल लीलाओं में मिट्टी की सोंधी गंध है, यमुना की कल-कल है, वृक्षों की शीतल छाया है और जीव-जंतुओं के प्रति सहज करुणा है। इसलिए कृष्ण को जानना केवल उनके दर्शन को जानना नहीं, उस प्रकृति को भी समझना है, जिसमें उनकी चेतना ने आकार पाया।

आज हमारे चारों ओर कंक्रीट के जंगल फैलते जा रहे हैं और वास्तविक वन सिमट रहे हैं। नदियाँ अपना निर्मल स्वर खो रही हैं और पक्षियों का कलरव धीरे-धीरे कम होता जा रहा है। ऐसे समय में यह पर्व हमारे भीतर एक सहज प्रश्न जगाता है—क्या हमारी भक्ति केवल मंदिरों और झाँकियों तक सीमित रहेगी, या हम कृष्ण के उस वृंदावन को भी अपने जीवन में स्थान देंगे, जहाँ हरियाली स्वयं उत्सव थी?

उत्सव की सजावट में यदि जीवित पौधों, पत्तियों, फूलों, मिट्टी के दीपों और प्राकृतिक सामग्री को स्थान दिया जाए, तो सौंदर्य के साथ संवेदना भी जुड़ती है। लड्डू गोपाल के समीप रखा गया एक छोटा-सा पौधा केवल सजावट नहीं, बल्कि आने वाले कल के लिए जीवन का संकल्प बन सकता है।

क्यों न इस अवसर पर ‘एक पौधा कान्हा के नाम’ का संकल्प लिया जाए? पौधा लगाएँ, उसे सींचें, उसकी छाया बढ़ते देखें और उसके साथ अपने भीतर प्रकृति के प्रति प्रेम को भी अंकुरित होने दें।

कृष्ण ने हमें प्रेम का विस्तार सिखाया—मनुष्य से प्रेम, जीव-जंतुओं से करुणा और धरती से आत्मीयता। उनकी बाँसुरी की मधुर तान तभी सार्थक होगी, जब यमुना निर्मल बहे, वृक्षों पर फिर पक्षियों के बसेरे हों और हमारी धरती हरियाली की साँस लेती रहे।

कान्हा को केवल झूले में न झुलाएँ,

उनके वृंदावन को भी अपने जीवन में उतारें।

ऐसी भक्ति हो, जिसमें दीप भी जले और कोई पौधा भी रोपा जाए; ऐसी आराधना हो, जिसमें घंटियाँ भी गूँजें और पक्षियों का कलरव भी सुनाई दे; ऐसा उत्सव हो, जिसमें मंदिर ही नहीं, हमारी धरती भी मुस्कुराए।

राह तके हैं गोपी सारी,

रास-रचैया आ जाओ।

संकट की घड़ियों में कृष्णा,

लाज-बचैया आ जाओ।।

*

भक्तों के हिय आन समाने,

मीरा-मोहन आ जाओ।

प्यासे-प्यासे इन नयनों को,

मनमोहन अब मत तरसाओ।।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares