मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #142 ☆ ज्ञानेश्वरी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 142 – विजय साहित्य ?

☆ ज्ञानेश्वरी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 

ज्ञानदीप

भावार्थाचा

ज्ञानेश्वरी

ग्रंथ साचा.. . . !

 

विश्वात्मक

देवरूप

कल्याणाचे

निजरूप.. . . !

 

प्राणिजात

होवो सुखी

मागितले

दान मुखी.. . !

 

सज्जनांची

धरू कास

मांगल्याची

ठेवू आस. . . . !

 

तिन्ही लोकी

दुःख नाश

मागितले

स्नेहपाश…!

 

वाचूनीया

ग्रंथसार

व्हावा नर

ज्ञानाकार.. . !

 

ऐसे दान

ज्ञानियाचे

आर्णव ते

पीयूषांचे. . . !

 

मागितले

भावदान

संसाराचे

आत्मज्ञान.. . !

 

भेदभाव

नको मनी

ईश रूप

पाहू जनी.. . !

 

ईश्वराने

ईश्वराला

द्यावे दान

प्रेमळाला.. . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॥ अनंतस्तोत्र॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ?

☆ ॥ अनंतस्तोत्र॥  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

मार्ग दावी रे अनंता | आज येथे ऐसे अडता ||

अंधःकारी बुडून जाता | दिशा काही दिसेना ||१||

 

कोण आम्ही कोठुनि आलो | आज येथे ऐसे अडलो ||

काय फळाची आशा राहो |  बूज ती राहीना ||२||

 

धरणीखाली बीज सापडे | जळे वेढुनि त्यास टाकिले ||

जगतासाठी जीवन दिधले | तुझियाचि कृपे ||३||

 

बघता बघता अंकुर आला | डोकावूनिया पाहू लागला ||

मार्ग आपुला शोधु लागला | सूर्यप्रकाशी ||४||

 

दिधले जीवन आदिपासुनी | ठेवुनि त्याची जाण ही मनी ||

घट्ट धरुनिया धरणी ठेवी | मुळीया रूपे ||५||

 

परोपकारी धरणीचा हा | वसा घेतला वृक्षलतांनी ||

फळे अर्पुनी जगतासाठी  | कृतार्थही जाहले ||६||

 

दिशा दाविशी रे अनंता | तृणांकुरांना पशुपक्षांना ||

पोरकाच मग मानवचि का | चाचपडे अंधारी||७||

 

कळत असूनि असा राहिलो | वळता नचही ताठ राहिलो ||

स्वार्था धरुनी अंध जाहलो | असा या जगी ||८||

 

परमार्थाची आस लागली | मोहाची पण भूलचि पडली ||

मजविण दृष्टी आड जाहली | काही कळेना ||९||

 

धाव धाव रे भगवंता | कृपाळू होऊन अनंता |

सोडव यातुनिया निशिकांता |  तेजा तव दावून ||१०||

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #126 – कळले नाही…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 126  – कळले नाही…! 🍃 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

येते म्हणाली, होतीस तेव्हा जाता जाता

किती वाढले, दोघांमधले अंतर अंतर…!

 

रोज वाचतो, तू दिलेली ती पत्रे बित्रे

भिजून जाते, पत्रांमधले अक्षर अक्षर…!

 

तूला शोधतो, अजून मी ही जिकडेतिकडे

मला वाटते, मिळेल एखादे उत्तर बित्तर…!

 

स्वप्नात माझ्या, येतेस एकटी रात्री रात्री

नको वाटते, पहाट कधी ही रात्री नंतर…!

 

उभा राहिलो, ज्या वाटेवर एकटा एकटा

त्या वाटेचाही, रस्ता झाला नंतर नंतर…!

 

विसरून जावे, म्हणतो आता सारे सारे

कुठून येते, तूझी आठवण नंतर नंतर…!

 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – संरक्षण – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – संरक्षण   ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

डोक्यावर छत्री

संरक्षण खात्री

कल्पकतेशी हवी

आपली मैत्री

वेळ निभावते

कामही होते

जोडले जाते

निसर्ग नाते

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुढल्या वर्षी…!  ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🌴 पुढल्या वर्षी…! 🌿  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

(नमस्कार मंडळी !🙏 गणपतीला गावाला गेलेले चाकरमानी मुंबईला परतल्यावर, गावच्या घरात कायम राहणाऱ्या माऊलीच्या मनातील विचार खालील रचनेत मांडायचा प्रयत्न केला आहे !)

दहा दिसांचा सोहळा

उद्या संपन्न होणार,

वाजत गाजत आले बाप्पा

वाजत गाजत जाणार !

 

          वेळ होता आरतीची

          कानी घुमेल झांजेचा नाद,

          गोडधोड प्रसादाचा मिळे

          पुन्हा पुढल्यावर्षी स्वाद !

 

जातील परत चाकरमानी

घरी आपल्या मुंबईला,

येतील पुढल्या वर्षी लवकर

सारे बाप्पाच्या तयारीला !

 

          घर मोठे गजबजलेले

          आता शांत शांत होईल,

          सवय होण्या शांततेची

          वेळ बराच बघा जाईल !

 

होता उद्या श्रींचे विसर्जन,

रया जाईल सुंदर मखराची,

पण घर करून राहील मनी

मूर्ती मखरातल्या गणेशाची !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०८-०९-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मरण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

🙏🏻 स्मरण 🙏🏻 सौ. अमृता देशपांडे  

ऋषि मुनि गुरुजन संतमहंते

स्वराज्यकर्ते सुराष्ट्र नेते

मातृभूमिचे रक्षण कर्ते

कृषिवल आणि सेवाव्रति ते

वंशजनक अन् स्वकुळ प्रणेते

मातुल आणि श्वशुर पितृ ते

स्मरण तुमचे स्फुरण ठरावे

पळिभर पाणी तुमच्या नावे ll

 

वाडवडिल अन् प्रियजन सारे

स्वर्गस्थ तुम्ही अगणित तारे

तुमची नीती तुमची कीर्ती

संस्कार ठेवा दिधला हाती

स्मरण तुमचे स्फुरण  ठरावे

पळिभर पाणी तुमच्या नावे ll

 

पितृदोष अन् ग्रहदोष शांतवे

चुकलो आम्ही तुम्ही क्षमावे

मुलेच तुमची सांभाळुन घ्यावे

आशीर्वादे आम्हां तारावे

स्मरण तुमचे स्फुरण ठरावे

पळिभर पाणी तुमच्या नावे ll

 

व्हा स्वर्गलोकिचे तृप्तात्मे तुम्ही

भूलोकीचे वारस आम्ही

दीर्घायुष्य अन् अभयचि द्यावे

सुख आनंदे वंशी असावे

आर्त प्रार्थना हीच तुम्हाला

जगणे सारे सुखकारी व्हावे

स्मरण तुमचे स्फुरण ठरावे

पळिभर पाणी तुमच्या नावे ll

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 149 ☆ कैफियत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 149 ?

☆ कैफियत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कधी वाटते करावीच का वणवण नुसती

अखेरीस जर होतो आपण अडचण नुसती

 

तरूण असते तेव्हा असते सोशिक,साधी

पण पैशाची भासे तेव्हा चणचण नुसती

 

खस्ता खाते,पोरासाठी,घर सांभाळी

जळत रहाते ,असते ती ही सरपण नुसती

 

सुखात आहे म्हणायची ती ज्याला त्याला

अनवाणी ती,पायाखाली रणरण नुसती

 

उडून गेले पिल्लू आता घरट्या मधले

वाट पाहते डोळ्यामधली झणझण नुसती

 

खात्या मध्ये पैसाअडका पडून आहे

परी एकाकी मरते आहे कणकण  नुसती

 

 म्हातारीला काय पाहिजे कळले नाही

रात्रंदिन ती करत राहिली फणफण नुसती

© प्रभा सोनवणे

७ सप्टेंबर  २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काजळकाळी रात आतली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ काजळकाळी रात आतली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : लवंगलता, मात्रा : ८+८+८+४)

काजळकाळी रात आतली काजळ झटकत आहे….

नव अरुणोदय नव क्षितिजावर आता उजळत आहे !

 

भुईत रुजल्या प्राणा फुटला पालव आकाशाचा

खोल आतला जागा निर्झर झुळझुळ वाहत आहे !

 

पुन्हा नव्याने जन्मे सृष्टी पुनर्जन्म घे दृष्टी

उत्कट अद्भुत सप्तसुरावट प्राणा छेडत आहे !

 

प्राणामधला प्रहर अघोरी सरता सरता सरला

पाषाणावर माझ्या माझी छिन्नी चालत आहे !

 

ताठ कण्याचा गर्व परंतू नतमस्तक मी आता

चरणांची त्या दिव्य धूळही साश्रू चुंबत आहे !

 

समक्ष माझ्या नभांगणातुन किती निखळले तारे

तृणपात्यावर थेंब दवाचे पहाट ढाळत आहे !

 

घणघण घंटा उत्तररात्री दूर मंदिरी वाजे

दुःख कुणाचे शाप कुणाचा टाहो फोडत आहे ?

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

हरिश्चंद्र कोठावदे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकांत… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ एकांत… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

(आनंदकंद – गागालगा लगागा । गागालगा लगागा)

एकांत हा मिळावा कोणास ना कळावा

वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा

 

आपापल्या मनाचा घेण्यास ठाव यावा

साकारल्या क्षणांना वेळीच वेळ द्यावा

पाणावल्या सुखांचा आवेग ओळखावा

वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा

 

धास्तावल्या मनाचा हातात हात घ्यावा

हातातल्या उबेचा आधार त्यास व्हावा

त्याच्यातल्या भयाचा अंधार ओसरावा

वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा

 

झोक्यावरी झुलावा वाऱ्यासही छळावा

हा कोणत्या जगाचा कोणास ना कळावा

माझ्यातल्या खट्याळा आनंद हा मिळावा

वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा

 

डोहात डोकवावे  साक्षात मी दिसावे

त्याच्या तळात माझे स्वातंत्र्य मी पहावे

तो शांत डोह आता माझ्या मनी वसावा

वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा

 

मी सावल्या पहाव्या मोठ्या लहान व्हाव्या

त्यांच्यासवे सुखाने खेळास रंग यावा

माझ्याच या सुखाचा सूर्यास मोह व्हावा

वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा

 

काठावरी विसावा अंती असाच घ्यावा

पाठी वळून सारा तोंडी हिशोब द्यावा

सुखावल्या क्षणांना साभार देत यावा

वाटेवरी खुणांचा ठेवा सुरेख व्हावा

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #155 ☆ लोणच्याची बरणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 155 ?

☆ लोणच्याची बरणी…

मांडणीवर ठेवलेली

लोणच्याची बरणी

टकमक पहात होती

त्या लिंबाकडं

लिंबाचंही लक्ष

होतंच तिच्याकडं

झाली दोघांची नजरानजर

हृदयाच्या घड्याळात

वाजला होता गजर

आले दोघे

लगेच भानावर

गेलं नाही ना प्रकरण

हे कुणाच्या कानावर

बरणीत उतरायची

इच्छा अनावर

मनातल्या भावनांनी पुरवला पिच्छा

सुरीनं पुरी केली त्याची इच्छा

जखमा झाल्या अंगभर

मीठ चोळलं जखमेवर

तिखट, हळद इतरांची

झाली होती युती

गरजेचीच होती

त्यांची ही कृती

धीर द्यायला आला

नंतर थोडा गूळही

आतड्याला पडलेला

होता थोडा पीळही

बरणी सोबत रहायचं

होतं काही दिवस

काही दिवसांनी करावंच

लागेल तिला मिस

हळूहळू कमी होत

चाललाय आता थर

एक दिवस सोडावच

लागणार आहे घर…

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print