मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७९ – मौलिक प्रवास…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७९ – विजय साहित्य ?

☆ मौलिक प्रवास…!

मित्रासवे दुचाकीने

बालपणी दिली साथ

जवळच्या प्रवासात

“सायकल”  दावी वाट…! १

*

वाट वाकडी तिकडी

कींवा डोंगराचा घाट

कच्च्या पक्क्या रस्त्यातून

“सायकल”  काढी वाट…! २

*

कधी मागे, कधी पुढे

बैसवोनी सवंगडी

वाण सामान वहाया

“सायकल”  हरघडी…! ३

*

हवा भरताच धावे

प्रवासात भरे रंग

“सायकल”  सफरीचा

मनमौजी असे ढंग…! ४

*

हातामध्ये असे ब्रेक

नियंत्रित हिची धाव

क्षण भर विश्रांतीचे

गाठी मुक्कामाचा गाव…! ५

*

नित्य घडतो व्यायाम

वेळ वाचवीते खास

नाही खास देखभाल

करी मौलिक प्रवास..! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सन्मानचिन्ह…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ सन्मानचिन्ह ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

जन्म दिला माऊलीने

पदरात जोजविले

तिच्या पदरात सदा

प्रेम वात्सल्य लाभले ||

आजी मावशी ताईचा

लाभे पदर मायेचा

येता कसले संकट

हात देती आधाराचा ||

 *

चूक पदरात घेई

खूणगाठ पदराला

बांधी पदरी निखारा

वाण सतीचे बाईला ||

 *

ओटी पदरात घेते

संसारात प्रवेशिता

सारे सर्वस्व सखीचे

पदरी सुरक्षितता ||

 *

पदराचे आभूषण

खूण तिच्या सौंदर्याची

शोभे तिला प्रभावळ

शान तिच्या सन्मानाची ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गांव… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गांव… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कोठे असेल ते गांव जिथे आहे पोचायचे

कशी गांवची त्या वाट जिच्यावरून जायचे

 *

कसे असेल ते गांव? भग्न? भकास? समृद्ध?

सप्तसूरांत भिजले? की ते असेल नि:शब्द?

 *

असतील का सोबती? का तो भयाण एकांत?

जीणे असेल का तृप्त? समाधानी आणि शांत?

 *

लळा इथला तरीही आहे हंगामी मुक्काम

जरी सुखवस्तू तरी आहे भाडोत्री हे धाम

असो कसेही ते गांव आणि गांवची त्या वाट

कधीतरी सोडावी ही लागणार वहिवाट

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई गं आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आई गं आई… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

आई गं आई 

एवढी का तुला घाई 

पावसात हात धरून चाललीस तरातरा 

मनी भूभू भिजतय बघ ना तू जरा ||

*

ज्ञानेश्वरांचे पसायदान तूच तर शिकवले 

भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे सांगितले 

मग मला या दोघांशी मैत्री करू दे 

माझ्या छत्रीत दोघांना घेऊ दे ||

*

आता नको म्हणू मस्तीखोर

अगं मीच तुझा ना चित्तचोर

बघ तू माझे मित्र आपल्या बरोबर राहतील

पसायदान ते पण शिकतील ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मकाऊ नगरी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मकाऊ नगरी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाले ऊन पावसाचा 

इथे क्षणोक्षणी खेळ,

छत्री घ्यावी कां न घ्यावी 

लागेना मनाचा मेळ!

*

दिसे मकाऊची सुंदरता 

उंच टॉवरवरून छानशी,

तीन बेटांचे वसले शहर

लगट करुन चीनशी!

*

डोळे दिपविणारी सारी

दिसे मकाऊ नगरी,

खिसे रिते करण्या इथे 

जमती जगातून जुगारी!

*

एका पेक्षा एक कॅसिनो 

मनं आकर्षित करतो,

“डायमंड शो” गॅलॅक्सिचा 

डोळ्याचे पारणे फेडतो!

*

करून रामराम मकाऊला 

परत माघारी वळणार,

रहाट गाडगे रोजचे

दोस्तीत सुरु होणार!

दोस्तीत सुरु होणार!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१५ ☆ कार्यशाळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१५ ?

☆ कार्यशाळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वेदनेने कार्यशाळा घेतली

अन् तरीही खूप होती गाजली

खोल जखमांचीच जागा ही तरी

दुर्बलांनी चाळ तेथे बांधली

जाहलेले तेजही नाही कमी

कुंदनाने खूप ज्वाळा सोसली

खंजिराचा दोष नव्हता फारसा

रक्तरंजित योजना तू आखली

वस्त्र नव्हते अंगभर त्यांच्याकडे

जीर्ण कपडा लाज त्याने झाकली

पेटला शेजार आहे अन् तरी

झोप आम्हाला कशी ही लागली

केस साधा कापतो आहे गळा

क्रूरतेने आज सीमा गाठली

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अदृश्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अदृश्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

दरड कोसळावा

काळीज घुसळावा

मनात उसळावा

ढासळ-ढासळ.

 *

रस्तेच जेरबंद

भावना  अंध-अंध

वेदना धुंद-धुंद

कातळ-कातळ.

 *

आभाळ अबाधीत

वादळ अच्छादित

क्षणात अवचित

अंधार-अंधार.

 *

पिसारे अस्त व्यस्त

जीवन फस्त-फस्त

आठव सुस्त-सुस्त

दुरावा-दुरावा.

 *

कातर चिंब-चिंब

व्याकुळ बिंब-बिंब

नजर टिंँब-टिंब

घायाळ-घायाळ.

 *

प्रेमात घाव-घाव

नितीचा डाव-डाव

ओशाळ भाव-भाव

अदृश्य-अदृश्य.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मळभ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मळभ… ? श्री आशिष  बिवलकर ☆

अर्ध्यावर साथ सोडून गेलीस,

या खुर्चीला तुझी आस आहे |

पदोपदी, श्वासाश्वासात मज,

भोवताली तुझाच भास आहे |

*

सावली होऊन वावरलीस,

अर्पण करून तुझं सारं काही |

आयुष्यभर भरपूर देत राहिलीस,

उरल्या वाटेवर तुझी सोबत नाही |

*

नियती तिचा घाला घालून गेली,

आयुष्यभराचा घायाळ करुनी |

भळभळत्या जखमेवरती फुंकर,

तुझ्या सोबतचे रम्य क्षण स्मरुनी |

*

घराला उरल्यात फक्त भिंती,

ते घरपण आता जाणवत नाही |

किती वेळ एकांतात बाहेरच असतो,

आतुरतेचा उंबरठा खुणावत नाही |

*

स्वागतास नाही रंगीत रांगोळी,

नाही उंबऱ्याच्या बाजूस दिवा |

तिन्ही सांजांना सांग ना गं सखे,

उरलाय फक्त तुझ्या आठवांचा ठेवा |

*

पुढे पडणारं एक एक पाऊल,

न कळत जड वाटू लागलंय |

स्तब्ध एकाच जागी राहून,

ह्रदयात मळभ दाटू लागलंय |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

दशके लोटली सात परि तसा ‘स्वातंत्र्य’लढा अजुनी गाजे

मला पहा अन् फुले वहा ‘ या मनोवृत्तीचे तण अती माजे ।।

*

स्वतंत्र देशी स्वतंत्र आम्ही, रुचे मना ते करूही धजतो

लोकशाहीचे नायक आम्ही, कोण आम्हाला अडवू शकतो?

*

जो तो आहे स्वतंत्र तर मग का आम्हा चिंता इतरांची

आपले आपण फक्त पहावे, जळोना तिथे भ्रांत दुजांची ।।

*

कामापुरते गोड आम्ही अन् काम संपता पाठ करू

गरज आमची पडेल तेव्हा नन्नाचा पाढाच सुरू ।।

*

सहाय्य करण्या दुजा कुणाला सवडच नाही आम्हा मुळी

अन् सहाय्य ते तरी कसे करावे.. भिन्न की आमची जातकुळी ।।

*

निधर्मी आमचे राष्ट्र म्हणविते.. आम्हास देणे-घेणे नाही

निधर्म म्हणजे धर्म सोडणे.. याविण अर्थच ठाऊक नाही ।।

*

राजधर्म हा असेच शिकवी.. कलियुगातली हीच रिती

नेते म्हणजे राजे येथे.. लोकशाही ती दीन अती ।।

*

राजा आणिक रंकामधली निशिदिनी वाढतीच दरी ती

एकाची नित चाले प्रगती.. दुज्या नशीबी अधोगती ।।

*

मर्कटहाती कोलीत तैसा.. स्वैराचारा जणू परवाना

दुर्दशेस या आम्हीच कारण.. उठवू न शकतो निद्रिस्त मना ।।

उठा उठा हो सामान्यांनो.. उशीर किती हा आधीच झाला

जागे व्हा.. तुम्ही सज्जच व्हा अन् परजा आपल्या मनशक्तीला ।।

*

शक्ती एकजुटीची जाणून.. मिळवा मतभेद नि मातीला

स्वैराचारा शह द्या.. मिरवा जित्याजागत्या लोकशाहीला ।।

मिरवा सशक्त लोकशाहीला

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सु सं वा द!” ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏 “सु सं वा द! ” 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नसावे गोष्टी वेल्हाळ

लावू नये पाल्हाळ,

सत्य वाचे सदा वदावे,

मोजके तेव्हढे बोलावे!

घालून डोळ्यात डोळे

‘संवाद’ तुम्ही साधावा,

खोटे न बोलती डोळे

भाव मनीचा कळावा!

 *

‘संवाद’ साधतांना तुम्ही

नका करू हातवारे,

शब्द मुखातुनी “मधाळावे”

न करीता अरे ला कारे!

 *

स्वरपट्टी सांभाळून

साधा संवाद शांतस्वरे,

पकडून धागा संवादाचा

पोचवा मनीचे भाव सारे!

 *

साधे नियम हे संवादाचे

पाळा साधतांना ‘संवाद’

साध्य होईल ध्येय मनीचे

मिटतील फुकाचे वाद!

मिटतील फुकाचे वाद!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares