मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मृद्गंध…☆ ज्योत्स्ना तानवडे☆

ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ मृद्गंध ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सागर घनदाट मेघांचा उचंबळतो अंबरी

अतीव इच्छा त्यातुनी याव्या सरी वरती सरी ||

*

काळ्या करड्या फिकट पारव्या मेघांच्या या लाटा

 झाडांमधुनी जणू शोधतो वारा चोर वाटा ||

*

भिरभिर वारा पानांमधुनी छेडीतसे धून

क्षणात येते मळभ वेढुनी गायब होते ऊन ||

*

ऊन काहिली सोसेना तगमग हो जीवाची

तहानलेली सृष्टी पाहे वाटुली पावसाची ||

*

वृक्ष डोलती सळसळ पाने वारा धावत आला

सोबत घेऊनी मृद्गंधा सांगावा देता झाला ||

*

अंगे भिजली मने मोहरली थेंब आले आले

जलधारांनी सचैल सारे चिंब चिंब मन झाले ||

*

मृद्गंधाने धुंदी येई जलधारांनी तृप्ती

विश्व व्यापुनी अभंग राहे नभ मातीची संतृप्ती ||

*

(संतृप्ती म्हणजे संपूर्ण समाधान)

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा घनगर्द ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी  ☆

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

 

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा घनगर्द प्रतिमा रवींद्र कुलकर्णी 

पाऊस असा घनगर्द बरसतो

 रातही काजळकाळी

का गीत असे ओठात माझीया

 असल्या भलत्या वेळी?

 

ते रुप पाहण्या नयने आसावली

मनमयूर नाचे वेडावून गोकुळी

मधुसूर बासरी करते मोहक खेळी

मन गंध-धुंद, कानात गुंजती,

 आज सख्याच्या ओळी…

 

घनव्याकूळ भेटी घडल्या कातरवेळी

अन तरंग उठती श्यामल यमुनाजळी

गारुड करीतसे अजुनी तो वनमाळी

का नीज नसे डोळ्यात?

 जाळते रात, अशी काजळी…

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्त्री हट्ट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्त्री हट्ट! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

हट्ट कसा करायचा ते 

बायकांनाच कळतं,

पक्षी काय मानव काय

यात त्यांचंच फावतं!

*

पंख पसरला उन्हात

थंड ठेवण्या डोके प्रियेचे,

रग लागली पंखाला

सांगू कसं आता वाचे?

*

जरी धरे छत्र प्रियेवरी 

राग पहा नयनातला,

समस्त नवऱ्यांना कळावा

भाव त्याच्या मनातला!

भाव त्याच्या मनातला!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सृजनानंद – ☆ डॉ. स्वाती पाटील ☆

डॉ. स्वाती पाटील

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – सृजनानंद  ? ☆ डॉ. स्वाती पाटील 

ओढ म्हणू की आनंदाची शिरशिरी

अंगातून वाहते तरंगाची थरथरी

हसले उन्हात चांदणे या वनांमध्ये

लेऊन रंगांची रंगबिरंगी मखमल सुंदरी

*

थुई थुई नाचतो झुकतो थोडा पुढे

कळेना राणी मज शोधू तुला मी कुठे

ओढ दाटली मिलनाची तुझ्या ग सखे

बरसतो मनी मल्हार का कोडे अता सुटे

*

हा संभार नाही केवळ मिलनाचा गडे

निळे निळे लक्ष डोळे तुझ्या वाटेकडे

येशील कधी पाहतो वाट आसमंत हा

मागेन आता हे सृजन सडे मी नभाकडे

© डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पावसात भिजायचं…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पावसात भिजायचं” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

पावसात भिजायचं

मातीत रुजायचं

आभाळी भिडायचं

*

स्वप्न पहायचं

पावसात भिजायचं

थंडीत थिजायचं

मनात पहायचं

*

कवितेत हसायचं

पावसात भिजायचं

स्मृतीत रमायचं

गेलेल्या दिसांचं

*

चित्र स्मरायचं

पावसात भिजजायचं

आजारी पडायचं

देणं डाॕक्टरचं

*

देऊन टाकायचं

पावसात भिजायचं

घरात शिरायचं

भजी अन् चहाचं

जमवून आणायचं

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ सरी ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ आषाढ सरी ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

ओल्या सरी संगतीनं

वाहू लागला रानगंध

ओसरती आषाढ सरी

रानं पसरती हिरवे पंख

ढग डोंगरावर लोंबतो     

ओला गारवा झोंबतो  

यक्ष पत्नीच्या शोधात   

वेडा मेघदूत धावतो     

 *

लाल कौलारू छप्पर

गळू लागली वळचण

हिरव्या डोंगराच्या कुशीत

खेडी जातात सुखावून

 *

कोवळा जीव कुरवाळीत

शीळ घालतो रानवारा

चिंब सरींचा शिडकाव

आषाढ पावसाच्या धारा

 *

फुटं कातळाला पाझर

आबादानी झाली रानं

आंबल्या-चिंबल्या जीवाला

सुखावतो आषाढघन

 

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ महिधात्रिकेची फुले… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? महिधात्रिकेची फुले… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

भावगीत (वर्ण संख्या १२ यति ६ व्या अक्षरावर) 

पानांच्या छत्रीत लावण्यात न्हाली

महिधात्रिकेची फुले इवलाली ||ध्रु||

*

किती बाई याचे रूपडे देखणे 

पाचूच्या मण्याचे सरित गुंफणे

नाजूक साजूक दिसे भुईवाली

महिधात्रिकेची फुले इवलाली ||१||

*

हिरव्या रंगात पांढरी पाकळी 

भुईला पाहण्या बघाना वाकली

कधी मुंडावळी तोरणाची जाळी

महिधात्रिकेची फुले इवलाली ||२||

*

लोधर म्हणती, भुईन आमला

मनाला भावला शब्दात गुंफला

औषधी खजिना आहे भोम्यामाली

महिधात्रिकेची फुले इवलाली ||३||

*

रानभाजी खाती भुई आवळ्याची

दगड फोड्या हा आहे याची ख्याती

देखणे लोलक पाचुची झळाळी

महिधात्रिकेची फुले इवलाली ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? निसर्ग … ☆ श्री अनिल वामोरकर ☆

रंगांची उधळण

निसर्गाचं देणं

रंगून रंगात जाणं

मन:शांतीचं लेणं…

*

छाप रंगाची

ठेवून लतांवर

मोहवून टाकते

मन:पटलावर..

*

दूर दूर हिरवाई

आकाशाची निळाई

या संधी समयी

अंतरात प्रज्वले समई…

*

हिरवाई ती शांततेची

केशरी ती विरक्तीची

धवल निर्मळतेची

शिकवण ती आध्यात्म्याची…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२४ ☆ आई… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२४ ?

☆ आई ☆  प्रभा सोनवणे ☆

बहरली अंगणी जाई

अन आठवली माझी आई!

*

मन आईचे निर्मळ

शुभ्र फुलांची ओंजळ!

*

दूर टेकडीच्या पलिकडे

माझे एक सानुले खेडे!

*

त्या हिरव्या वळणावर

आहे मायवेडे घर!

*

जरी माहेर माझे दूर

येई इथंवर आईचा सूर!

*

किती काढाव्या आठवणी

येई डोळ्याला गं पाणी!

*

आई मायेची रांगोळी

आई ममतेची पाकोळी!

*

आई शिवालयातील समई

आई… मुक्ताई ….जनाई!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस☆ श्री अनिल वामोरकर ☆

(जिवलग विषय. त्याचे आगमन, बरसणे, म्हणजे नवजीवन चराचरास. अन्न पाण्याची सोय करणारा, सखाच की. तसा पाऊस हा आध्यात्मिक सुद्धा!

तेच या कवितेत मांडण्याचा प्रयत्न! बघा आवडते का?)

थेंब, रिमझिम आणि मुसळधार

 

विजेचा गडगडाट

सतर्क व्हावे

सूचक साधकासी

श्रीगणेशा करावा साधनेचा..

 

साधनेचा

एक एक थेंब

आर्तता वाढवी,

जवळ नेई

परमेश्वराच्या…

 

साधनेतील

थेंब थेंब जोडी,

सातत्य तया नाम,

रिमझिम संततधार बरसे,

भक्तीबीज अंकुरण्या…

 

आर्ततेची परिसीमा

समाधी अवस्था,

त्याचे प्रत्यक्ष दर्शन,

सार्थक जीवनाचे,

जीवनाची इतिश्री,

मुसळधार.. कृपा..

शांत शांत शांत…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares