image_print

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर ☆  मनमंजुषेतून : भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ मंडळी नमस्कार 🙏🏻 आषाढ महिना संपत आला की धरण क्षेत्रातील पावसाने वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ. अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते.  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) " दक्षिणद्वार " सोहळ्याचा कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर, कोयना पाणलोट क्षेत्र, कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा, कोयना, वारणा या नद्या आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  'सप्त कन्या' आणि त्यांची 'कृष्णा माई' सज्ज होतात. या मिळून सा-याजणींची  "परब्रह्म भेटीलागी "  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार ☆ मनमंजुषेतून : मी कडून आम्ही कडे... ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆ सुशिला ताई आज सकाळ पासूनच हिरमुसल्या होत्या .चेहरा पडला होता. दुखावल्या सारख्या वाटत होत्या. .... श्रीपतराव म्हणाले , काय ग ? काय झालं ? चेहरा का पडला तुझा ....? खोदून खोदून विचारल्यावर म्हणाल्या,अहो , “आज काल घरात काही किंमतच राहिली नाही आपल्याला ...? अगदी अडगळीत पडल्या सारखे वाटते पहा ... कां ? काय झाले ...श्रीपतराव म्हणाले... अहो, हल्ली घरात काय चालले आहे कळतच नाही...कोणी सांगत नाही की विचारत नाही... श्रीपतरावांना हसू आले ..अस्सं होय ...! ते म्हणाले , लग्न होऊन तू इथे शहरात आलीस नि ...लगेचच तू स्वतंत्र झालीस , तेंव्हा तू विचारलेस का कोणाला काही .? मग मात्र त्या गप्प बसल्या ...! अगं .. स्वातंत्र्य सर्वांनाच हवं असतं नि आता आपला संसार तो कितीसा राहिला आहे..? काही कमी आहे का तुला कशाची ..? मग रहा ना सुखात ? का दु:ख्ख शोधतेस..? खरं आहे ...माणूस दु:ख्ख शोधतो. मी...मी...मी ...मी....आणि फक्त मीच ...! मला विचारलं नाही ... मला सांगितलं नाही हा ...”मी “ च आपल्याला संघर्षाकडे , सर्व-नाशाकडे घेऊन जातो. मी मोठा ,...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार … ☆ श्री रवींद्र पां. कानिटकर

☆ मनमंजुषेतून : साक्षात्कार… ☆  श्री रवींद्र पां. कानिटकर  ☆ आमच्या घराच्या बागेत आंबा, पेरु, नारळ, सिताफळ अशी अनेक फळझाडे आहेत. जास्वंदी,जाई, जुई,मोगरा, अबोली, गोकर्ण, गौरी अशी मनमोहक फुलझाडे बहरलेली असतात. फुलझाडांना येणाऱ्या कळ्या, हळुवार उमलणारी फुले, अंगणात दरवळणारा सुगंध तासनतास राहतो. सुगंधाने मन उल्हसित होतेच त्याबरोबर निसर्गाचे अनाकलनीय चमत्कार ही अनुभवायास येतात. दरवर्षी मे महिन्यात अतिशय चविष्ट, मोठमोठाले भरपूर आंबे येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर पेरु, पावसाळ्यात सिताफळे, बारमाही नारळ अशा अनेक फळांची आमचे येथे रेलचेल असते. उन्हाळ्यात आंबे पाडाला आले की ते अलगदपणे काढून घरातच अढी घालण्याचा आमचेकडे जणू एक कार्यक्रमच असतो. त्यातल्या त्यात कच्च्या आंब्यांचे पन्हे,चटणी, चैत्रातील आंबा घालून केलेली हरभराडाळीची कोशिंबीर यांची चव जीभेवर बराच कळ रेंगाळते. हळूहळू, आंब्याच्या आंबट गोड वासिने घर भरून जाते. आंबे पिकत आले की ते आमच्या मित्रांना, गल्लीतील ओळखिच्या लोकांना तसेच गावातील नातेवाईकांना देण्याचा दरवर्षीचा आमचा रिवाज आहे. कुणाला आंबे द्यायचे चुकून विसरलेच तर ते स्वतः आवर्जून, अगदी हक्काने आंबे घेऊन जातात. आम्हालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आवडते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंब्याच्या झाडातून मोहोर हळुहळू डोकावू लागला....
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

☆ मनमंजुषेतून : फुलपाखरू... ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ फुलपाखराचं  वेलींवर, फुलांवर बागडणं पाहणं हे नयन सुखकारक आहेच; पण त्याहीपेक्षा त्यांच्या पंखांवरची रंगांची पखरण न्याहाळण्यात मी जास्त रमून जाते. लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा माझा छंद आता मला खूप खटकतो.    कदाचित इतरांचे अनुकरण करण्याचा शिरस्ता मी मोडत नसेन इतकेच! खूप छोटी छोटी झुंडीनं येणारी आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तोच दूर निघून जाणाऱ्या फुलपाखरांचं मला आकर्षण कधी नव्हतच. तेच जर एखादे मोठे फुलपाखरू फुलावर स्थिरावलं की मी हळूच बोटाच्या चिमटीत पकडत असेआणि बोटाच्या तळव्यावर उमटलेलं मीनाकाम तासन तास बघत बसे. फुलपाखरू केव्हाच स्वच्छंदी होऊन जायचं!! काल सकाळी नेहमीप्रमाणे गणपती साठी जास्वंदीची फुले आणावीत म्हणून गच्चीवर गेले आणि माझं लक्ष वेधलं ते एका सुरेख अशा फुलपाखराने!! बऱ्याच दिवसानंतर फुलपाखरू दिसले आणि मी मोहरले. जांभळा, पारवा,निळा, आकाशी,गडद निळा अशा निळ्या रंगांच्या विविध छटा आणि त्यात कोरलेली सुरेख नक्षी, तीही एक सारखी, दोन्ही पंखांवर मोजून मापून काढल्यासारखी जणू फ्रीहँड ड्रॉईंग! कमाल वाटली त्या विधात्याची!! पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना इतकी निरव शांतता ठेवून मी पायरीवर स्थिरावले...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून : निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे☆ ऑफिस मधला एक सहकारी रामानंद आज सेवानिवृत्त झाला. त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कोणी ही  सेवानिवृत्त होतानाचा हा दिवस खूपच वेगळा असतो.  सकाळी 9 ते संध्याकाळी 6, दिवस भर एकत्र काम करणे, खाणे- जेवणे, एकमेकांवर रागावणे, रुसणे, एकमेकांची काळजी घेणे, आपलं काम जितकंं चांगले करता येईल तितका प्रयत्न करणे.  या सर्वात इतकी वर्षे कशी गेली कळतच नाही. सेवानिवृत्त होणारी व्यक्ती उद्यापासून आपल्यात नसणार ही हुरहुर सर्वांना अस्वस्थ करते. निवृत्त होणार्या व्यक्तीच्या  मनात तर भावनांचे काहूर माजलेले असते. काळीज गलबलून गेलेले असते.  मनातलं  वादळ, गलबलणं, चेहर्यावर दिसत असतं. खूप ह्रदयस्पर्शी असतो तो दिवस. रामानंदच्या निरोप समारंभाचा प्रसंग.  आज प्रास्ताविकापासून सगळं  वातावरण घरगुती स्वरूपाचं होतं. प्रेमळ आणि साधेपणाचं होतं.  आपण घरी जसे एकत्र जमून छोटंसं स्नेहपूर्ण संमेलन करतो, अगदी तसं.....कुठेच औपचारिकता नाही, कुणाचा ईगो नाही, सर्वच जण आपापली post ची शाल आपल्या जागेवर ठेऊन मनमोकळ्या स्वच्छ मनाने एकत्र जमले होते. मनाच्या कोपर्यात चलबिचल होती, रामानंद उद्या पासून ऑफिस मध्ये असणार नाही याची. रामानंद मॅनेजिंग डायरेक्टर श्री...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई शिक्षण- B.A B.Com शालेय शिक्षण ज्युबिली कन्या शाळा मिरज, महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय छंद- वाचन, लिखाण, शिवण मैदानी खेळात (खोखो, कबड्डी, ऍथलेटिक्‍स, अनेक बक्षिसे एक वर्ष विलिंग्डन जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड) पुरस्कार- १) कौशिक प्रकाशन सातारा २) मराठी विज्ञान परिषद इस्लामपूर  ३) ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी ४) रामकृष्ण मिशन आणखी बरेच लहान-मोठे निबंधातील पुरस्कार (सकाळच्या मुक्तपीठ स्मार्ट सोबती मध्ये आलेले लेख, राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितासाठी गेली पाच वर्षे लेखकांची निवड, नवरत्न नाथ नगरी दिवाळी अंकांमधून आलेले लेख) ☆ मनमंजुषेतून : मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ आम्ही शेतात रहात असल्यामुळे साप, विंचू, चोर यांच्यापासून रक्षण होण्यासाठी कुत्र्याची गरज होती. योगायोगाने सुंदर ठुसक्या बांधण्याची, पिवळे ठिपके असलेली कुत्री कुठून तरी अचानक आली आणि आमची होऊन राहिली. नामकरण झालं पिंकी. टॉमी कुत्रा आणि पिंकी परिसराचे राखण छान करायचे. आमच्या लहान मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि आणि ते दोघे मिळवून मुलांना छान सांभाळायचे. आता पिंकी छान रुळली होती. आता तिला पहिल्यांदाच पिल्लं होणार म्हणून तिची बडदास्त चालली होती. लवकरच तिला दहा पिल्ल झाली. अगदी...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ. अस्मिता इनामदार परिचय जन्मतारीख - १३/१२/१९४५ शिक्षण - बी.ए. डी.सी.ओ.एस् साहित्यिक कारकीर्द  दोन काव्यसंग्रह - कविता अंतरीच्या काव्यसंग्रह, शब्दुली चारोळीसंग्रह दैनिके व मासिकांमधून कवितांना प्रसिद्धी, नवतरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कवितेचा समावेश अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. ( सातारा , सांगली , पुणे , कराड , इंदौर , डोंबिवली ) अखिल भारतीय महिला कवयित्री परिषद , दिल्ली  ह्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्त्व, संस्कारभारती , सांगली साहित्यविभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षक म्हणून नेमणूक, कवि विचारमंच, शेगाव कडून साहित्यातील योग सांगली / कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन आरोग्य संवेदना , सांगली कार्यकारिणीत कार्यरत, महात्मा गांधी ग्रंथालय कार्यवाह सम्मान / पुरस्कार -  शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कार, इतिहास संशोधन मंडळ , संगमनेर उल्लेखनीय काव्य पुरस्कार, प्रतिष्ठा प्रतिष्ठान , सांगली साहित्य पुरस्कार,  सरोजिनी नायडू पुरस्कार दिल्ली येथे कविता अंतरीच्या पुस्तकाला, कै.सुरेश कुलकर्णी पुरस्कार - सुधांशू , औदुंबर, अनेक काव्यस्पर्धेत पुरस्कार, कल्पना फिल्म असो. कला मंच , मिरज - सन्मानपत्र, श्री समर्थ साहित्य , कला , क्रिडा व सांस्कृतिक युवा मंडळ , पलूस कडून कविता अंतरीच्या पुस्तकास पुरस्कार,  बिझनेस एक्सप्रेस, सांगली काव्यस्पर्धेत उत्तेजनार्थ, रंगत संगत प्रतिष्ठान , पुणे - सन्मानपत्र, साहित्य...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सासू होताना ☆ सुश्री मानसी काणे

☆ मनमंजुषेतून :  सासू होताना – सुश्री मानसी काणे ☆ जेंव्हापासून माझ सासू व्हायच नक्की झाल तेंव्हापासून मी जरा गोंधळूनच गेले होते. सासू म्हणजे ‘‘सारख्या सूचना’’ आणि सून म्हणजे ‘‘सूचना नको’’. म्हणजे हाताची घडी तोंडावर बोटच ठेवायला हव. काय करू? कशी करू सासूपणाची तयारी? ‘गर्भसंस्कार, आई होताना’ अशी पुस्तक असतात तस ‘’सूनसंस्कार, सासू होताना’’ अस काही पुस्तक मिळत का ते पहायला हव. मग होमवर्क म्हणून मी आधी हिंदी सिरीयल पाहिल्या. सगळ्या बा, बीजी, ममीजी, सासूजी, माँजी वगैरे भरजरी साड्या नेसून, अंगभर दागिने घालून, केसांची एकच बट पांढरी करून सुनेन केलेल्या खिरीत मीठ टाक, तिच्या जेवणात पाल टाक, तिच्या खोलीत साप सोड, तिच्या नवर्‍याचे कान भर असले उद्योग करत होत्या. ये अपने बसकी बात नहीं. मी मराठी सिरियलकडे वळले. तिथल्या सासवा सारख सुनेला खाऊन घे, विश्रांती घे, मी तुझा डबा भरते, गजरा घाल, माहेरी जा थोडययात तू उनाडयया कर मी सगळ काम करते अस म्हणत होत्या.  ये भी अपने बस की बात नहीं.  मग आता करायच तरी काय? भारदस्त दिसण्यासाठी मी कॉटनच्या...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाळ- एक संस्कृती ☆ श्री राजीव दिवाण

☆ मनमंजुषेतून :  चाळ- एक संस्कृती -  श्री राजीव दिवाण ☆ ह्या चाळीत जन्माला आलेली नि वाढलेली ही तिसरी पिढी. पण कामानिमित्त इतरत्र रहायला गेलेले, कोणी मुंबई बाहेर,कोणी परदेशी तर कोणी जागा लहान पडते म्हणून वेगळी चूल मांडलेले. पुढील आठवड्यात शक्यतो सर्वांनी एकत्र येऊन,बसून ठरवायचं होतं कि आता ही चाळ पाडून नवी इमारत बांधून काढायची. चाळमालकानी तशी सर्वांना रितसर नोटीस पाठवली होती .... कोर्टाची.. महानगरपालिकेने ऑडिट करून “ सदरहू इमारत जुनी असून धोकादायक म्हणून जाहीर करणेत येत आहे” असा बोर्ड लावला. सत्तरीच्या जवळ पोहोचलेली ही इमारत....तीला "चाळ"म्हणून संबोधलं जायचं. पंधरा बाय पंधराच्या पंचवीस खोल्या,म्हणजे पंचवीस कुटूंबं...सर्व जाती,धर्माच्या माणसांनी व्यापलेली ही " चाळ" म्हणजे "आसेतूहिमाचल" भारताची प्रतिनिधीच... गेल्या तीन पिढ्यांचा जन्म ते मृत्यू हा प्रवास ह्याचाळीनं पाहिला...ती हि "चाळ". ह्या चाळीत काय साजरं झालं नाही ते विचारा... एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालात येणारा प्रत्येक सण,प्रत्येक कुटूंबाच्या सहभागानेच साजरा झाला. संक्रांतीचा तिळगुळ जोशी-देवधरांच्या घरातून निघून व्हाया पाटील खोतांकडून अगदी शेख-फर्नांडिसांपर्यंत वाटला जायचा... तीच बाब इतर सर्व सणांची... होळीला तर बोंबलायला झाडून सगळी पोरं...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार ☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆ माझ्या खिडकीतून दिसतात रात्री नक्षत्रे नि तारे आणि दिवसा वाहत असतात झुळूझुळू मंजुळ वारे ....   खरंच् ...खिडकी...! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे...मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी ... वा...वा..वा....! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर...घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही...घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे...! वा....! काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे....! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ....? माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते....! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते .... , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच ...व माझ्या...
Read More
image_print