मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जगणे आपसुक होई सोने!!… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ जगणे आपसुक होई सोने!! ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

निर्मळ पाणी

वाहे खळखळ

धुवून टाकी

वस्त्रातील मळ!!

*

तसेच हसऱ्या 

त्यांच्या संवादी

होते आपसुक

मनही निर्मळ!!

*

शुभ्र वसन

अन शुद्ध मनाने

जगणे आपसुक

होई सोने!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शारदास्तवन… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ बासरी घुमली… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली

हलके हलके गोकुळाला जाग गुलाबी आली ||ध्रु||

* 

दावण सुटली गोधन सारे तीरावर पातले

कपिलेसंगे नंदिनी दौडत सुरांप्रत धावले

कान्हा अमुचा मुरली त्याची मनी आंस लागली

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली ||१||

 *

गोपींसंगे गोपही सारे हरखुनिया गेले

हात स्तब्धले आसूसुनी कर्णही टवकारले

मोहनच्या वेणूसंगे गोकुळ हरपून गेले

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली  ||२||

 *

मुग्ध होऊनी स्तब्ध जाहली रवी गोकुळातली

व्यक्त व्हावया नवनीत रूपे भक्ती साकारली

चराचरांचे भान हरपले दिव्य प्रचीती आली

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली ||३||

 *

श्रीहरीच्या बासुरीतुनी निनादून ये ॐकार

फूक घालता ओठातुनिया उमटे विश्वाचा सूर

उर्जा साऱ्या जगताची या एकवटोनी आली

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली  ||४||

☆

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गरुडझेप… ☆ श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ ☆

श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’

अल्प परिचय 

नाव : महेंद्र बानाजी कोळकर (बानासुत)

बानासुत या नावाने मी लेखन करतो.

शिक्षण :एम. ए. अर्थशास्र

? कवितेचा उत्सव ?

☆ गरुडझेप… ☆ श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ ☆

☆

गरुडझेप घे उंच आकाशी

धडकला तळाला जरी

परतू नकोस माघारी

दोन हात कर संकटांशी

*

भविष्याचा एक तरी दिवस

माझाच असेल हक्काचा

विश्वास ठेव स्वतःवर

उत्साहाने झुंज दे प्रतिस्पर्ध्याशी!

☆

© श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ 

संपर्क : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हॉस्टेल.

ईमेल – banasut001@gmail. com मो. ९२८४३४९२३२

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री गणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्री गणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

श्रीगणेश जाताना

काळजास दुःख आहे

पुन्हा आगमनाची

भक्ती रुख रुख आहे.

* 

पुजा पाठ नेवैद्य

आरतीत तोच आहे

देवळी मुर्ती विना

अप्रसन्न पेच आहे.

 *

आरास गजबज

सारे कसे शांत होई

मन खाई मनास

क्षण क्षण खंत देई.

 *

देवाधिराज देव

गजानन बुध्दि दाता

विरह जणू युग

आशिर्वाद दुर होता,

☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुडघ्याला बाशिंग! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुडघ्याला बाशिंग! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

उतावळे बेचाळीस नवरदेव

बसले नटून बाशिंग बांधून 

वाट बघतं भावी भार्यांची 

आर्त डोळ्यात प्राण आणून

*

नाही फिरकल्या नववधू

दिवे लागण झाली तरी 

सुकले हातातले हार तुरे 

शंका दाटून आल्या उरी

*

पंधरा पंचवीस हजाराला 

चुना आयोजकांनी लावला 

खरी गोष्ट सांगता पोलिसांनी

कपाळी हात मारून घेतला

*

लग्न गाठी म्हणे ब्रम्हदेव 

आधीच वर मारून ठेवतो 

पण तुम्हां सारख्या मुर्खांना 

इथलाच कोणी फसवतो

इथलाच कोणी फसवतो

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ शुभा रुद्र ☆

शुभा रूद्र 

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

माय माझी गौरी। तूच नारायणी।

दुःख निवारणी। दुर्गा माते।।

 

सौंदर्य मोहिनी। तूच अनुसया।

तूच महामाया। शाकंबरी।।

 

हृदय वासीनी। तूच दुर्गा लक्ष्मी।

प्रार्थीते नेहमी। साधनेत।।

 

देवी सरस्वती। मन ही गुंतले।

भावही दाटले। हृदयात।।

 

ढोलक वाजला। टिपरी वाजली।

प्रेमात भिजली। नवरात्री।।

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वंदन तुज मोरया! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वंदन तुज मोरया! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

होता आपले आगमन

झाला प्रसन्न आसमंत,

दुःख दैन्य पळून गेले

उरली नां कसली भ्रान्त!

*

मखर सजले फुलांनी

केली थोडी रोषणाई,

धूपारतीच्या सुगंधाने 

मन प्रसन्न होऊन जाई!

*

वेळ होता आरतीची

जमती मंडपी मंडळी,

गाऊन अकरा आरत्या 

अंगारा लावती भाळी!

*

ताट नैवेद्याचे गणेशा

तव चरणावर ठेविले,

द्यावी सु्बुद्धी सकला

तुज मनोमनी प्रार्थियले!

तुज मनोमनी प्रार्थियले!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३३१ ☆ माझा भारत…🇮🇳 ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३३१ ?

☆ माझा भारत…🇮🇳 ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

शाळेत असताना पाहिला होता—

मनोजकुमारचा शहीद!

तेव्हापासून वीर भगतसिंगाची

राष्ट्रभक्ती,

काळजात खोलवर रुतलेली!

भगतसिंग, राजगुरु, सुखदेव!

देशासाठी प्राण अर्पून,

अमर झालेले!

इंग्रजाच्या जुलमी सत्तेविरुद्ध,

पुकारले होते बंड,

अनेक नौजवानांनी !

त्या राष्ट्रभक्तीने झपाटलेल्यांनी

दिली सर्वस्वाची आहुती !

 

खूप दिवस आठवत राहिली,

ती तीन क्रांतिवीरांची फाशी—

आणि

 “मेरा रंग दे बसंती चोला….”

  चे स्वर!

  सतत येत होते रडू… !

 दुसर्‍याच दिवशी शाळेत

म्हटलेली प्रतिज्ञा—

 

“माझ्या देशावर माझे प्रेम आहे

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

   विविधतेने नटलेल्या

परंपरांचा मला अभिमान आहे…..”

 तेव्हाही ते शहीदच आठवले होते !

 

आज खूप दिवसांनी ते दिवस

आठवले…..

तसे पंधरा ऑगस्ट साजरा करताना—

आठवतेच की सारे,

वर्षानुवर्ष !

 

पण आज,

पुन्हा आठवले–

ते बलिदान,

काळजात रुतून बसलेले शहीद!

आणि सद्यस्थितीतही–

म्हणावेसे वाटले—-

माझा भारत महान!

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || झरा वारा || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ || झरा वारा || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

☆

चाले जैसा झरा, सोबतीला वारा,

निसर्गाचा पारा, वर खाली

* 

वर खाली वाट, धुके घनदाट

माखले लल्लाट, कर्मेधर्मे

 *

कर्मेधर्मे पळ, कष्टांचाच चळ

उठू देत वळ, तळहाती

 *

तळहाती जलं, अर्घ्य ते सोडलं

नातं जे जोडलं, जन्मा संगे

 *

जन्मा संगे वारा, पायाला भोवरा

श्वासांचा हा झरा, जिथवरं

☆

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४१ ☆ काळाचा महिमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४१ ?

☆ काळाचा महिमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

उभा ठाकला भिंतीवरती

कक्षेमधेच काटे फिरती

*

वेगेवेगे कुणी धावतो

कुणी असा का हळू रांगतो

*

सेंकदाचा वेग भयंकर

तोच चालतो येथे भरभर

*

पुढे सरकतो हा मिनिटाने

कधी न जमले यास धावणे

*

याला नसते कधीच घाई

तासानंतर हलतो बाई

*

काळाचा या महिमा भारी

त्याच्या सोबत दुनिया सारी

*

आनंदाने तिघे भेटले

अन बाराचे टोल वाजले

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares