श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ज्ञान प्रभा… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
तेजविल्या प्रतिभेने
आत्मज्ञानी शब्दवाती
उजळल्या मौनमनी
कवणांच्या प्रज्ञाचित्ती.
अंतरित भावभक्ती
अक्षरांची कवडसे
उमटली लेखणीत
ठळक प्रवृत्ती ठसे.
अहंः क्रोध तिमीरास
भेदूनी, तेज चैतन्य
अज्ञान दोष विनाश
दिव्यत्व प्रभा अनन्य.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





