श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४७ ?

☆ घामाने भिजते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

वेल होउनी कवेत घेते हसते आता

विळखा घालत सभोवताली फिरते आता

 *

टिळा लावते माथ्यावरती सूर्य जसा की

भाजीसोबत अंधाराला चिरते आता

 *

फुलासोबती एक पाखरू रमले आहे

कायम गुंजारव करताना दिसते आता

 *

बोलायाचे बरेच असते तिला परंतू

ओठावरच्या शब्दाला ती गिळते आता

 *

चिडण्यासाठी कुठेच नसतो वाव तिला मग

कधीकधी तर स्वतःचवरती चिडते आता

 *

घरचा मालक असून त्याने हात टेकले

ती दैवाच्या सोबत आहे लढते आता

* 

विहीर सुकता पायपीट ही चालू होते

पाण्यासाठी ती घामाने भिजते आता

 ☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted